{"product_id":"maratha-samrajyasurya-vajir-shahaji-bhosale-by-dr-anand-patil-sankpal-मराठा-साम्राज्यसूर्य-वजीर-शहाजी-भोसले","title":"Maratha Samrajyasurya Vajir Shahaji Bhosale By Dr. Anand Patil (Sankpal) (मराठा साम्राज्यसूर्य वजीर शहाजी भोसले)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. डॉ. आनंद पाटील (संकपाळ) हे क्षत्रिय मराठा समाजातील आंतरराष्ट्रीय तुलनाकार म्हणून मान्यता मिळालेले पहिले मराठी लेखक. खुल्या जागेवर जिद्दीने लढा देत गोवा विद्यापीठ इंग्रजी विभागप्रमुख आणि स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा आणि साहित्य संकुलाचे पहिले संचालक, परदेशवाऱ्या, मराठी कथा, कादंबऱ्या, प्रवास लेखने, नाटक, भाषांतरे आणि तुलना असे एकूण ६० ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्या दहा इंग्रजी ग्रंथांमुळे त्यांचा इंग्रजी निबंध केंब्रिज विद्यापीठाने पाठ्यपुस्तकात छापला आहे. (पाहाः गुगल विकीपीडिया). भारतभर त्यांची पुस्तके अभ्यासक्रमात आहेत. विशेषतः त्यांच्या 'पाटलाची लंडनवारी'चा कन्नड अनुवाद कर्नाटकात प्रसिद्ध आहे. स्वतःच्या संकपाळ-लाड वंशावळ्या मोडी लिपीत शोधण्यापूर्वीच त्यांनी भाषणे देण्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी लिहिले आणि ते बेस्टसेलर ठरले आहे. रूढ इतिहासात भूकंपच झाला. लोकाग्रहास्तव त्यांनी संशोधन करून साम्राज्यशौर्य लक्ष्मी जिजाबाई खऱ्या कोण होत्या? प्रकाशनाच्या वाटेवर आहे. इजा बिजानंतर हा तिजा 'मराठा साम्राज्यसूर्य वजीर शहाजी भोसले' बौद्धिक इतिहासात ज्वालामुखी जागृत करेल असा विश्वास वाटतो. प्रत्येक वाक्य पुराव्याने लिहिणाऱ्या या तुलनाकार पाईकाला वाचक कोल्हापुरी मुजरा करतो. - प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन (पुणे) संपादक, सक्षम समीक्षा (डॉ. आनंद पाटील विशेषांक)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Dr. Anand Patil (Sankpal) \/ Marathi","offer_id":46793804349698,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81JCgUUe_ZL._SY466.jpg?v=1759301765","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/maratha-samrajyasurya-vajir-shahaji-bhosale-by-dr-anand-patil-sankpal-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}