{"product_id":"mantra-sukhacha-by-apurva-karpe-मंत्र-सुखाचा-अपूर्वा-कर्पे","title":"Mantra Sukhacha By Apurva Karpe (मंत्र सुखाचा – अपूर्वा कर्पे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाने १०२\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eलेखिकेचे मनोगत \u003c\/span\u003e.........मी जे काही लेखन करते, ते पूर्णपणे माझ्या मनातले विचार असतात, जे वाचकांच्या हृदयात उतरवण्याचे माझे प्रयत्न आहेत. मला वाटतं, प्रत्येक गोष्ट आठवणीत गेल्यावरच, आपल्या हातातून निसटल्यावरच तिचं महत्त्व कळतं. या पुस्तकांतआठवणींच्या कप्प्यात साठवलेल्या मनात रुतून बसलेल्या गोष्टी आहेत, तर काही न विसरता येणारा, जीवनाच्या वाटेवर चालता चालता आलेला अनुभव आहे. अनुभवाची ही गोधडी तुकड्या-तुकड्यांनी शिवलीय. विविध लोकांच्या भेटीतून आलेल्या क्षणांचा खजिना खुला करून वाचकांच्या समोर ठेवलाय.... यातले काही क्षण, काही अनुभव वाचकांना आपले वाटू शकतात. पण यावरचे, माझे स्वतःचे प्रामाणिक विचार मी मांडले आहेत. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची बढाई मारणे किंवा काही खाजगी गोष्टींबद्दल मुद्दाम बोलणे, असा माझा हेतू नाही. तेव्हा वाचकांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता याचे वाचन करावे, अशी माझी विनंती आहे. मी व्यावसायिक लेखिका नाही त्यामुळे शब्दफुलांचा फुलोरा माझ्यापाशी नाही, याची मला जाणीव आहे; पण श्री महादेव रवलुभर दुधाने व श्रीकृष्ण तुळशीच्या दोन पानांनी जसे तृप्त होतात, तशा या माझ्या अंतरंगातील जाणिवा, ज्या माझ्या हृदयातून उमटल्या आहेत, त्या थेट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतील, याची मला खात्री आहे !\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House \/ Apurva Karpe \/ Marathi","offer_id":47588403970306,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-26at12.34.38_2.jpg?v=1774511064","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mantra-sukhacha-by-apurva-karpe-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}