{"product_id":"mansoon-jan-gan-mann-मान्सून-जन-गण-मन","title":"Mansoon - Jan Gan Mann (मान्सून - जन गण मन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमान्सून - जन गण मन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमान्सूस म्हणजे केवळ मौसम किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे. भूगोल आणि हवामानशास्त्राच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपलिकडे त्याला वैश्विक सांस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. आपल्या सामाजिक नव्हे, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतर कृषी आर्थशास्त्राबरोबर रजकीय संदर्भही त्याला आहेत. हजारो वर्षे विविध ओळखी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसलेल्या जनसमूहांचे संमीलन, संघर्ष आणि स्पर्धेतून साकारलेलंसहजीवन हा या मान्सूनचा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपरिणाम आहे. दक्षिण आशिया म्हणजे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे सर्व देश मिळून एक राष्ट्र बनतं असं मान्सून सांगतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयुरोप-अमेरिका ते चीन-जपान या देशांना दक्षिण आशियाचं आकर्षण वाटण्यामागेही हाच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमान्सून कारणीभूत आहे. तो केरळमधून विस्तारत सर्वत्र पसरला नसता, तर वास्को-द-\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगामाला केरळमधल्या मसाल्याची चव कळली असती का? योरोपला मसाल्याची, अन्नाची, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीभेची चव समजली नसती, तर विस्तारवाद, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद हे त्याचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआविष्कार झालेच नसते. म्हणजेच जगाची नवी मांडणी झालीच नसती. ती मान्सूनमुळे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eघडली. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा या इतिहासाचे आणि भौगोलिकाचे भान जपत सुनील तांबे यांनी सिद्ध केलेला हा ग्रंथ \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअभ्यासपूर्ण आणि वाचनीय झालेला आहे. या ग्रंथातून केवळ मान्सूनचेच नव्हे, तर \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘सिव्हिलायझेशन मार्च’ कसा होत होता याचे दर्शन घडते. तांबे यांच्या चित्तवेधक आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशैलीदार मांडणीमुळे हे पुस्तक वाचकाला एका वेगळ्याच मान्सूनची अनुभूती देईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Sunil Tambe","offer_id":46919162298626,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MansoonF.jpg?v=1761375318","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mansoon-jan-gan-mann-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}