{"product_id":"mahamanav-swami-vivekanand-by-vijay-satpute-महामान-स्वामी-विवेका-नंद-विजय-सातपुते","title":"Mahamanav Swami Vivekanand By Vijay Satpute (महामान स्वामी विवेका नंद- विजय सातपुते)","description":"\u003cp\u003eलेखकाचे मनोगत जगातील नररत्नांच्या खाणीतील काही नररत्न, मान्यवर, महात्मे, महामानव यांचे चरित्र कार्यकर्तुत्व, नेतृत्व, वक्तृत्व अलौकिक समाज कार्य हे अनाकलनीय आहे. हे त्रिकालबाधीत सत्य आहे. आपल्या या विश्वात्म्याचे स्मरण म्हणजे कार्यकर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत असतो. त्यांच्या चरित्रातून मानव जातीला नेहमीच प्रेरणा, बोध आणि मार्गदर्शन मिळत असते. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील साऱ्या मानवांना त्याचा लाभ होत असतो. आपल्या जगाच्या पाठीवर, ज्यांनी ज्यांनी विजयध्वज फडकविला त्या महान महामानवाची विश्वात्म्याची जीवन-चरित्रे, कार्यकर्तृत्व, नेतृत्व, संघटन कौशल्य, अमोघ वाणीतील वक्तृत्वाचे पैलू संक्षिप्त सोप्या आणि सहज शैलीत रूचेल, झेपेल अशा पद्धतीने श्रेयस व प्रेयस, स्थल काल, परिस्थिती सापेक्ष पृष्ठ संख्याची मर्यादा विचारात घेऊन मी एका विश्वात्म्याची वक्तृत्वाचा महामेरू, विद्युत प्रभावी वक्ता, महामानव \"स्वामी विवेकानंद\" यांचे अलौकिक वक्तृत्व कार्यकर्तृत्व धर्मप्रसार, प्रचार वाचंकासमोर ठेवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. प्रामुख्याने चोखंदळ वाचक विद्यार्थी नवयुवक अभ्यासकांना या महामानवाची विश्वात्म्याची भारतीय नररत्नाच्या खाणीतील एका नररत्नाची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न. प्रामुख्याने या पुस्तकात स्वामी विवेकानंदाच्या वक्तृत्व शैलीचे व त्यांच्या अमोघ वाणीतून जगाला जिंकल्याचे विवेचन व त्यांच्या काही पैलूंचे विवेचन करण्यात आले आहे. या पूर्वी माझी तीन चरित्रात्मक पुस्तके रमाई, अण्णाभाऊ साठे, व माँ जिजाऊ प्रकाशित झाली आहेत. सर्व पुस्तके लेखनासाठी मला अनेकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. माझ्या गावच्या सावित्रीबाईफुले वाचनालय नांदुर घाटच्या कु. विद्या तारळकर यांचा मला संदर्भ ग्रंथ पुरविण्यात सिंहाचा वाटा आहे. माझ्या कुटुंबियांनी मला लेखनासाठी निवांतपणा दिला व माझ्या वडिलांनी पांडुरंग राघोबा सातपुते यांनी वेळोवेळी वाचन करून प्रेरणा दिली. म्हणूनच मी माझे लेखन करू शकलो. त्यांचे आभार मानणे उचित ठरेल.पाने 128\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Vijay Satpute \/ Marathi","offer_id":47483791245570,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at16.08.25.jpg?v=1773830693","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mahamanav-swami-vivekanand-by-vijay-satpute-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}