{"product_id":"leadership-intelligence-marathi-by-dr-kamlesh-soman-लीडरशिप-इंटेलिजन्स-मराठी","title":"Leadership Intelligence (Marathi) By Dr. Kamlesh Soman (लीडरशिप इंटेलिजन्स (मराठी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्वार्थाने मुक्त व निरंकूश Leadership Intelligence ही अगदी वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. भयापासून संपूर्ण मुक्तता, हीच खरी बुद्धिमत्ता असते. बुद्धिमान नेतृत्त्वाला असुरक्षिततेचे भान व ज्ञान असते. असे नेतृत्व आपल्या मनातील व मनाबाहेरील (अवतीभोवतीच्या) गोंधळाच्या स्वरुपाशी चांगला संवाद साधू शकते. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्व देत कारणांच्या व परिणामांच्या पलीकडे जाणारे बुद्धिशाली नेतृत्व, जीवनाच्या सर्व अंगोपांगांची एकात्मता सहजपणे साधते. असे नेतृत्व हे अतिशय सखोल, समृद्ध व अतीव समजूतदार, स्थिरावलेले व गंभीर असते. या नेतृत्त्वाच्या जगण्यात एक प्रकारची ग्रेस आणि संपूर्ण चांगुलपणा असतो. समस्येचा बाऊ न करणारे बुद्धिशाली नेतृत्त्व, भावनिक आवाहनाचे सामर्थ्य ओळखून असते. सर्वार्थाने प्रभावी आणि परिणामकारक व्यक्तिमत्त्व असलेल्या नेतृत्त्वातील चुंबकीय शक्ती आपल्या सहकार्यातील ऊर्जेला प्रवाहित करीत त्याला योग्य दिशा व दृष्टी देते. बद्धिशाली नेतृत्व नेहमीच तीक्ष्ण, लवचिक व सदैव सजग असते. एका आंतरिक रेट्यातून नवी वाट चोखाळत आणि प्रत्येक क्षण समग्रतेने व पूर्ण क्षमतेने जगत मोठ्या संवादशीलतेने सर्वात मिसळणे आणि सर्वांचेच होऊन जाणे बद्धिशाली नेतृत्वाला निकडीचे वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे सृजनशीलता व शोधकता यांचे अनोखे मिश्रण बुद्धिशाली नेतृत्वाकडे असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Goel Prakashan \/ Dr. Kamlesh Soman","offer_id":46189584154882,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51SO4h53mnL_1024x1024_2x_8494af3f-1514-4678-80c7-d3f2cf6b13c2.jpg?v=1749106620","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/leadership-intelligence-marathi-by-dr-kamlesh-soman-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%aa-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}