{"product_id":"kaikayee-by-v-v-shirwadkar-कैकयी","title":"Kaikayee By V. V. Shirwadkar (कैकयी)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-root=\"1\"\u003eरामायण-महाभारतातील व्यक्तिरेखांचे आकर्षण अनेक प्रतिभावंतांना वाटत आले आहे. भास-भवभूतीपासून आजतागायत अनेकांनी त्यांतील आख्यानांना कलारूप दिले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवि.वा. शिरवाडकरांना कर्णासारखी उदात्त धीरगंभीर व्यक्तिरेखा जशी भुरळ पाडते तशाच आजपर्यंत खलनायकी स्वरूपात भेटलेल्या दुर्योधन, कैकयी अशाही. त्यांचे दुर्योधनावरील नाटक आराखड्याच्या रूपातच राहिले. परंतु ‘कैकयी’ नाटकात त्यांनी दशरथाची तरुण पट्टराणी आणि तिचे पुत्र यांच्यातील संबंध सहृदयतेने दाखविले आहेत. आपल्या तारुण्यावर भाळून दशरथाने आपल्याला राणीपद दिले, पण त्याच वेळी दिलेले वचन महाराज विसरले हे लक्षात आल्यावर तिचा क्रोध अनावर होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसे असले तरी तिची रामाकडे पाहण्याची दृष्टी ही आईचीच असते, सावत्रपणाची नव्हे. अयोध्येची प्रजाच नव्हे तर आपला युवराज भरतदेखील रामाचा पक्षपाती आहे हे पाहिल्यावर तिचे रामाबद्दलचे पुत्रप्रेम जागृत होते. रामही आपल्या विवेकी स्वभावाने आपल्या मातेला जिंकून घेतो आणि नाटक संपते ते मातापुत्राच्या मनोमीलनाने. रामायण कथेचे शिरवाडकरांच्या प्रतिभेला झालेले दर्शन खरोखर अनोखे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया नाटकातील कथावस्तू आणि वाल्मीकी रामायणातील कथा यांचे संबंध दाखविणारा श्री. शं. सराफ यांचा लेख आणि मुकुंद कुलकर्णी यांचे टिपण या ‘शिरवाडकर जन्मशताब्दी आवृत्ती’त वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Popular Prakashan \/ V. V. Shirwadkar \/ Marathi","offer_id":47400711586050,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kaikayee-front-Cover-MRP-150_2026.jpg?v=1771930257","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kaikayee-by-v-v-shirwadkar-%e0%a4%95%e0%a5%88%e0%a4%95%e0%a4%af%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}