{"product_id":"je-honechi-ase-by-m-d-korgaonkar-जे-होणेचि-असे-मनोहर-कोरगांवकर-1","title":"Je Honechi Ase! By M.D.Korgaonkar (जे होणेचि असे-मनोहर कोरगांवकर)","description":"\u003cp\u003eगोमंतकातील एक प्रसिद्ध वृतपत्र दैनिक गोवादूत चे संपादक मा. सचिन परब ह्यांचा फोन आला. तसा त्यांचा परिचय होताच. त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर काही विषयावर गप्पा झाल्यावर त्यांनीच मूळ विषयाला सुरूवात केली. दै. गोवादूत मध्ये ज्येष्ठ नागरिकांविषयी एक सदर सुरू करावयाचे आहे. त्या सदराची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी. आठवड्यातून दर सोमवारी त्या सदरासाठी एक लेख तुम्ही लिहावा, असे मला वाटते. निदान एक वर्षभर तरी हे सदर चालवावे असा विचार आहे.' त्यांची सूचना म्हणजे त्यांनी माझ्यावर टालकेला विश्वावासच होता. मी ह्यावर विचार करून चार-पाच दिवसात तुम्हाला कळवितो असा शब्द दिला. संपादकाची ती सूचना म्हणजे मला एक आव्हानच । त्याचबरोबर एका महत्वाच्या विषयाबर वाचन, विचार, अभ्यास व चिंतन करण्याची ही फार मोठी संधी आहे मला बाटले. ह्या संधीचा फायदा घ्यायलाच हवा असाही एक विचार पक्का झाला. मनात विचार आला की, एखाद्या या विषयावर लेखन करेल अशा एखाद्या लेखक मित्रांची मदत घेतल्यास ही जबाबदारी काही प्रमाणात कमी होईल. डोळ्यासमोर नाव आले माझे मित्र श्री. मनोहर जोशी (फोंडा) यांचे. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विषय सांगितला. आणि काय आश्चर्य! ते म्हणाले बा, ही संधी सोडणे शहाणपणाचे ठरणार नाही. तुम्ही त्यांना होकार कळवा. आपण दोघांनीही दर आठवड्याला आळीपाळीने ह्या सदरासाठी लेख लिहायचा..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने 148\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ M.D. Korgaonkar \/ Marathi","offer_id":47593565421826,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at14.06.41_15983add-58a0-446b-98d6-800ac7f897e4.jpg?v=1774605514","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/je-honechi-ase-by-m-d-korgaonkar-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0-1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}