{"product_id":"iye-kirtan-vidya-mandiri-by-vishnubuva-shetgaonkar-इये-कीर्तन-विद्या-मंदिरी-विष्णुबुवा-शेटगांवकर","title":"Iye Kirtan Vidya Mandiri By Vishnubuva Shetgaonkar (इये कीर्तन विद्या मंदिरी – विष्णुबुवा शेटगांवकर)","description":"\u003cp\u003eमनोगत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकीर्तन प्रेमी सज्जन हो !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकीर्तन क्षेत्रात मी गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. कला अकादमी पणजी आयोजित सर्व कीर्तन महोत्सव, हरिभक्त परिषद, गोमंतक आयोजित सर्व कीर्तनकार स्नेहसंमेलनात मी सहभागी झालो आहे. कोल्हापूर व सांगली येथे आयोजित अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनात सहभागी होण्याचे भाग्यही मला लाभलेले आहे. कला व संस्कृती संचालनालय तसेच कला अकादमी पणजी आयोजित कीर्तन कार्यशाळांमध्येही मी सहभागी झालेलो आहे. अग्रगण्य, नामवंत व नवोदित कीर्तनकारांची कीर्तने खूपवर्षे श्रवण करण्याचे भाग्यही मला लाभले आहे. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही भागांत मी गेली चाळीस वर्षे हजारो कीर्तने सादर केली आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकीर्तनप्रेमी मला माझ्या कीर्तन कॅसेट बाबत विचारायचे. गोवा कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक माननीय श्री. अशोक परब सर, प्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ श्री. मनोहर कोरगांवकर मला नेहमीच 'बुवा कीर्तनाचे पूर्वरंग व आख्याने असलेले एखादे पुस्तक प्रसिद्ध करा.' असा मौलिक उपदेश करायचे. त्यांच्या प्रेमळ आग्रह व प्रोत्साहनामुळे हे पुस्तक साकार करण्याचे साहस मी केले आहे.\u003cbr\u003eपाने 178\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vishnubuva Shetgaonkar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534274347266,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at11.49.13.jpg?v=1774077580","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/iye-kirtan-vidya-mandiri-by-vishnubuva-shetgaonkar-%e0%a4%87%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}