{"product_id":"indhan-abridged-edition-hamid-dalwai-इंधन-संक्षिप्त-आवृत्ती-हमीद-दलवाई","title":"Indhan (Abridged Edition) – Hamid Dalwai (इंधन (संक्षिप्त आवृत्ती) - हमीद दलवाई )","description":"\u003cp\u003eजवळपास पंधरा वर्षांनी आपल्या कोकणातल्या वतनाकडे आलेला हा प्रवासी म्हणजे स्वतः लेखकच आहे. त्याला आलेल्या हार्टअॅटॅकनंतर हवापालटासाठी आणि ताणरहित जगण्यासाठी तो इथे आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक पुरोगामी विचारांचा, मुस्लीम आहे. त्याने सारी धार्मिक कवचं झुगारून दिलेली आहेत. त्यासाठी त्यांना आपली वतनवाडी सोडून मुंबईसारख्या महानगरात दाखल व्हावे लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारण अरूंद परिघात सनातन्यांच्या फळ्या पाडणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्य झाले असते. त्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागल्याचा सल त्यांच्या मनात आहे. तो अनेक घटना, प्रसंगातून प्रतीत होत राहातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरुवातीच्या काळात तो गावातल्या घटनांकडे तटस्थपणे पाहतो. पण जसजशी गावातल्या राजकारणात तीव्रता यायला लागते, राजकारण टोकदारपणाकडे सरकू लागते, तसतसा त्याच्यातला मानव जागा होतो आणि त्याच्यातल्या पुढारीपणाला नकळत साद घालू लागतो.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Hamid Dalwai \/ Marathi","offer_id":47654597198082,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-523-Indhan.jpg?v=1775895930","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/indhan-abridged-edition-hamid-dalwai-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}