{"product_id":"gosht-mansachi-by-prof-b-u-gore-गोष्ट-माणसाची","title":"Gosht Mansachi By Prof. B. U. Gore (गोष्ट माणसाची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसध्या मनुष्यप्राणी कितीही आधुनिक झालेला असला, तरी निसर्गातील सर्व ज्ञान तो आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने प्राप्त करू शकत नाही; परंतु प्रचंड बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास करून वेगवेगळ्या उपकरणांचा शोध लावला व ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांवर मात केली. माणूस ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला अज्ञाताची ओढ असते. तो सतत सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची बुद्धिमत्ता आणि आकलनक्षमता अलौकिक आहे. सजीव सृष्टी, पृथ्वी, विश्व व स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अनेक गूढ प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. त्याने सातत्याने या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात वानर ते सुसंस्कृत, विवेकशील मानव या परिवर्तनाचा लाखो वर्षांचा मागोवा वैज्ञानिक पुराव्यासह घेण्यात आलेला आहे. आफ्रिकेतील एपसारख्या पूर्वजांपासून आजचा आधुनिक मानव कसा उत्क्रांत झाला याची कहाणी रंजक आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Prof. B. U. Gore \/ Marathi","offer_id":47478080831746,"sku":null,"price":339.15,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/GoshtMansachiF.jpg?v=1773662966","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/gosht-mansachi-by-prof-b-u-gore-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}