{"product_id":"ghanshyam-talvatkar-vichardarshan-by-zumbarlaal-kamble-घन-श्याम-तळवटकर-झुंबरलाल-कांबळे","title":"Ghanshyam Talvatkar Vichardarshan By Zumbarlaal Kamble (घन:श्याम तळवटकर विचारदर्शन  - झुंबरलाल कांबळे )","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील एक व्यासंगी, विद्वान, प्रभावी वक्ते, निष्ठावंत सामाजिक नेते, बौद्ध धर्मक्रांतीचे विख्यात प्रवक्ते, दलितांच्या समाजक्रांतीचे, साहित्याचे व कलांचे तडफदार पुरस्कर्ते व बौद्ध तरुणांचे शक्तीकेंद्र बनलेले श्री. घनश्याम तळवटकर यांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने, समतोल वृत्तीने, संघटना चातुर्याने, प्रतिमेने व पराक्रमाने अनन्य साधारण महत्त्व व स्थान प्राप्त करून घेतले आहे, यात संदेह नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघनश्याम तळवटकरांच्या जीवनाला एकप्रकारचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. साताऱ्यात वकिली करीत असलेल्या न. चिं. केळकरांना जसे लोकमान्य टिळकांनी आपला सहकारी होण्यासाठी पुण्यात बोलावून घेतले तसेच चांगल्या, सरकारी नोकरीत असलेल्या तळवटकरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साहाय्यक म्हणून बोलावून घेतले. टिळकांनी केळकरांना कळविले की, 'माझ्या दृष्टीने पाहिले तर मला असे वाटते की, माझे आयुष्य आता संपत आले आहे; म्हणून सार्वजनिक आयुष्यात जो मला कधीही सोडून जाणार नाही असा सहकारी मित्र व कार्यकर्ता मला मिळाल्यास हवा आहे.' लोकमान्य टिळकांनी हे पत्र ४०व्या वर्षी लिहिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ६३व्या वर्षी घनश्याम तळवटकरांना लिहिले की, 'माझ्या जागा घेण्यासाठी कुणीतरी पुढे आले पाहिजे, तरच मी ज्या संस्था निर्माण केल्या आहेत त्या पुढे चालू राहतील.' केळकर, टिळकांवर कोसळलेल्या भयंकर संकटाच्या वेळीही त्यांना सोडून गेले नाहीत. तसेच तळवटकरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सोडून गेले नाहीत. दोघेही निःस्वार्थी बुद्धीने आपापल्या नेत्याचे कार्य पुढे चालविण्यासाठी अढळपणे उभे राहिले श्री. घनश्याम तळवटकरांचा जन्म हरवीत गावी ५ एप्रिल १९२२ रोजी झाला. पाने 152\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Zumbarlaal Kamble \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47504673440002,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-25at15.08.34_2.jpg?v=1774433550","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ghanshyam-talvatkar-vichardarshan-by-zumbarlaal-kamble-%e0%a4%98%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%a4%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}