{"product_id":"gelya-shambhar-varshatalee-yuddha-गेल्या-शंभर-वर्षांतील-युद्धे","title":"Gelya Shambhar Varshatalee Yuddha (गेल्या शंभर वर्षांतील युद्धे)","description":"\u003cp\u003eGelya Shambhar Varshatalee Yuddha (गेल्या शंभर वर्षांतील युद्धे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : नीलू दामले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपाने : 184 \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसं म्हातारी होऊन मरतात, रोग होऊन काहीशी अकाली मरतात. माणसं कधी तरी मरणारच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाला मरण नकोसं वाटतं. माणसं जास्तीत जास्त जगावीत असा विचार माणूस करतो. त्यासाठी अन्नव्यवस्था, उपचार व्यवस्था, औषध व्यवस्था तयार करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण याच माणसानं मरण कवटाळण्याचीही व्यवस्था केलीय. युद्ध ही ती व्यवस्था आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइसवीसनपूर्व पाचव्या शतकापासून ते इसवीसन 1900 पर्यंतच्या 2400 वर्षात युद्धात सुमारे 30 कोटी माणसं मारली गेली. विसाव्या शतकात शंभर वर्षात सुमारे 19 कोटी माणसं युद्धात मेली. विसाव्या शतकापासून आज एकविसाव्या शतकाची पंचवीस वर्षं होत असताना सुमारे 19.20 कोटी माणसं युद्धात मेलीयत. चोवीसशे वर्षात 30 कोटी आणि सव्वाशे वर्षात 19.20 कोटी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eक्षणार्धात पाच पासून पन्नास माणसं खलास करता येतात. टोलेजंग इमारत क्षणार्धात जमीन दोस्त करता येते. इथं बसून यंत्रणेला आज्ञा द्यायची, पाच हजार मैलावरची माणसं आणि इमारती नष्ट होतात. पूर्वी माणसं मागास होती तेव्हां स्वतःचा जीव धोक्यात घालून समोरच्या एका माणसाला मारायची. आता मारणारा माणूस खूप अंतरावर असतो, सुंदर वातावरणात मजेत असतो, कीबोर्डावरची एक की दाबली की दूरवर धडाम, बटन दाबणारा सुखात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसाला काय झालंय कळत नाही. माणसं कोणाला तरी मारण्याची वाटच पहात असतात. मारण्यासाठी शत्रू शोधत असतात. आणि त्याला शत्रू पटापट मिळतातही. आपल्यापेक्षा वेगळा तो शत्रू. जो आपल्यासारखा नाही तो मरायच्या लायकीचा. आपण श्रेष्ठ. बाकीचे कनिष्ठ. कनिष्ठांनी जगता कामा नये.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसानं विज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रज्ञानात केलेली प्रगती युद्धासाठीच केलीय की काय अशी शंका येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविचारही करायला नकोसं होतं अशा युद्धाचा हिशोब प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Nilu Damale \/ Marathi","offer_id":51145170387202,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2026-10-30-at-15.08.07-1.jpg?v=1795160114","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/gelya-shambhar-varshatalee-yuddha-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}