{"product_id":"dyansut-by-dr-sanjay-chakane-ज्ञानमूत-प्राचार्य-डॉ-संजय-चाकणे","title":"Dyansut By Dr. Sanjay Chakane (ज्ञानमूत - प्राचार्य डॉ. संजय चाकणे)","description":"\u003ch3 style=\"text-align: center;\"\u003e\n\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eज्ञानमूत - प्राचार्य डॉ. संजय चाकणे | पाने २०८\u003c\/span\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003e\u003cspan\u003e\"ज्ञानसूत\" हे डॉ. संजय ज्ञानेश्वर चाकणे यांचे आत्मचरित्रपर लिखाण आहे. त्यांच्या असीम कष्टांची, संघर्षाची आणि जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे त्यांना खानदेश, कोकण, नगर जिल्हा आणि पुणे अशा विविध ठिकाणी शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रवासातून त्यांना जीवनाचे अनेक पैलू अनुभवता आले आणि त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला. अशिक्षित आई, मर्यादित शिक्षण घेतलेले वडील, १९७२ च्या दुष्काळामुळे आलेली आर्थिक हलाखी, शिक्षणासाठी झालेली परवड आणि \"कमवा व शिका\" योजनेच्या माध्यमातून घेतलेले उच्च शिक्षण या सर्व संघर्षातून त्यांनी शिक्षक, प्राचार्य आणि पुढे राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त करणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून केलेली प्रगती वाचनीय आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थी असूनही त्यांची मराठी भाषेवरील पकड, लेखनशैली आणि वाचनाची ओढ विशेष प्रभाव पाडते. डॉ. संजय चाकणे यांची माझी गेल्या पंधरा वर्षांपासून ओळख आहे. गेली चार वर्षे ते खडकी शिक्षण संस्थेच्या टी. जे. महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबविणे, विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्न करणे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. मराठी भाषा प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, अवकाशशास्त्र प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रयोगशाळा तसेच विविध क्रीडा उपक्रम यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली असून \"ज्ञानसूत\" या आत्मचरित्रपर साहित्यकृतीद्वारे त्यांनी आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे दर्शन वाचकांना घडविले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003e\u003cspan\u003e - कृष्णकुमार गोयल\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Dr. Sanjay Chakane \/ Marathi","offer_id":48201414443266,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2026-07-24_at_10.35.50.jpg?v=1784869948","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/dyansut-by-dr-sanjay-chakane-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}