{"product_id":"dayitva-by-m-d-korgaonkar-दायित्व-म-द-कोरगावकर","title":"Dayitva By M.D.Korgaonkar (दायित्व-म. द. कोरगावकर)","description":"\u003cp\u003eमनोहर कोरगांवकर ह्यांचा 'दायित्व' हा कथासंग्रह सोळा लघुकथांचा संग्रह असून कथा कोकण आणि गोव्याच्या पार्श्वभूमीवरील कथा आहेत. ह्या सर्व कथांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून होणारा कोकण व गोवा यांचा विकास आणि त्यामुळे बदलणारी येथील संस्कृती आणि त्या संस्कृतीच्या पडझडीबरोबर मानवीमूल्यांचा होणार अदृश्य विनाश आणि त्यामुळे बदलणारे पारंपारिक राहणीमान ! ह्या सर्व कथा 'लघुकथा' ह्या कथा प्रकारात जरी लिहिल्या गेल्या आहेत तरी त्या प्रत्यक्ष घडलेल्या 'स्फुटगोष्टी' वाटतात. गावात शाळात येते. नवी शिक्षिका रुजू होते. तिला आपल्या मोलकरणीची मुलगी हुशार वाटते. ती सर्व शिक्षकांना आवाहन करून त्या मुलीला सामूहिक दत्तक घेते. पण नंतर मुलगी ज्या वस्तीत राहते त्या वस्तीत होणाऱ्या बदलांचा परिणाम तिच्यावर होते. खाण व्यवसायामुळे गोव्यामध्ये होणारी अफाट ट्रक वाहतूक आणि त्यांच्या माध्यमातून शिरणारी उपभोग्य संस्कृती शिक्षिकेचा 'पराभव' करते. वस्तीतील एक ट्रक ड्रायव्हर मुलीला नादी लावतो. गोष्ट इतकी पुढे जाते, की लग्नाशिवाय पर्यायच नसतो. मुलीचे शिक्षण थांबते व जेमतेम दहावीला असणारी मुलगी संसाराला लागते.पाने 128\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ M.D. Korgaonkar \/ Marathi","offer_id":47483714470146,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at15.24.50.jpg?v=1773827739","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/dayitva-by-m-d-korgaonkar-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%ae-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}