{"product_id":"chhatrapati-shivaji-maharaj-va-ingraj-by-sandeep-thakare-छत्रपती-शिवाजी-महाराज-व-इंग्रज","title":"Chhatrapati Shivaji Maharaj va Ingraj By Sandeep Thakare (छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eछत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया भूमीस सातासमुद्रापलीकडून आलेल्या युरोपियन लोकांचा भविष्यात होऊ घातलेला धोका ओळखून त्यावर अंमल करणारे छ. शिवाजी महाराज हे तत्कालीन एकमेव भारतीय सत्ताधीश होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e…..शिवाजी महाराज हे या पुढारलेल्या नौदलधारी पाश्चिमात्त्यांना रोखण्याचा केवळ विचार करून थांबले नाहीत तर त्यांचा सरळसरळ सामना करण्यासाठी महाराजांनी सागरात प्रत्यक्ष आरमार उभारून पाश्चिमात्यांना धाक निर्माण केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज या पुस्तकात त्यांच्यातील व्यापारी संबंध, इंग्रजांनी पत्रांतून रेखाटलेल्या शिवाजी महाराजांच्या हालचाली, इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिका, महाराजांच्या स्वाऱ्यांदरम्यान इंग्रज वखारींना बसलेले धक्के, इंग्रज व शिवाजी महाराज यांच्यात झालेले तहाचे प्रयत्न, इंग्रजी दूतांचे रायगडावरील आगमन, शिवाजी महाराज व जंजिऱ्याचा सिद्दी यांच्यातील संघर्षात इंग्रजांचे दुटप्पी वर्तन, शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यात उद्भवलेला नाविक संघर्ष, शिवाजी महाराजांच्या मुघल, आदिलशहा, रुस्तुमेजमा, पोर्तुगीज, डच यांच्यासोबत आलेल्या संबंधात इंग्रजांची भूमिका व दृष्टिकोन अशा विविध बाबींचे विवेचन करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्या परस्पर संबंधांविषयी अधिक माहिती मिळावी या हेतूने या पुस्तकाचे लेखन संदीप ठाकरे यांनी केलेले आहे. या विषयावर सखोलपणे प्रकाश टाकणारे अशा प्रकारचे मराठीतील हे पहिलेच पुस्तक होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Merven Technologies","offers":[{"title":"Merver Technologies \/ Sandeep Thakare \/ Marathi","offer_id":48073017622786,"sku":null,"price":472.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ch-Shivaji-Maharaj-Va-Ingraj-scaled.jpg?v=1783076868","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chhatrapati-shivaji-maharaj-va-ingraj-by-sandeep-thakare-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b5-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}