{"product_id":"chhatrapati-shahoo-maharaj-satara-1708-to-1749-by-dr-ismail-pathan-छत्रपती-शाहू-महाराज-सातारा-1708-ते-1749","title":"Chhatrapati Shahoo Maharaj : Satara ( 1708 to 1749) By Dr. Ismail Pathan (छत्रपती शाहू महाराज : सातारा (1708 ते 1749)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eछत्रपती शाहू महाराजांनी आपले आजोबा हिंदवी स्वराज्य-संस्थापक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eश्रीशिवछत्रपतींचे प्रशासनिक नीतीचे अनेक दंडक बाजूस ठेवले. प्रशासनातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकोणतेही पद वंशपरंपरेने द्यायचे नाही; कोणाही मंत्र्यास सरंजाम द्यायचा नाही, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा महत्त्वाचा दंडक ते महाराष्ट्रात आल्यावर खेडच्या लढाईनंतरच त्यांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअल्पावधीत वाऱ्यावर सोडला.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eयावर टिपणी करताना डॉ. पठाण म्हणतात, “कोणतेही पद वंशपरंपरागत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपद्धतीने द्यायचे नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांचे नातू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविसरले,... पुढील वाटचालीत वंशपरंपरागत पदे देण्याची पद्धतच शाहू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहाराजांनी स्वीकारल्याने केंद्रीय सत्ता नाममात्र होऊन त्यांच्या पदरचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमानकरी मात्र सत्तेचे वाटेकरी बनले.”\u003c\/span\u003e\u003cspan\u003eशिवछत्रपतींपासून महाराणी ताराबाईंपर्यंत सर्व मराठा राज्यकर्त्यांचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविचार दिल्लीची पातशाही बुडवून तिथे मराठा पातशाही स्थापन करण्याचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहोता. शाहू महाराजांना मोगल पातशाहीविषयी जे प्रेम वाटत होते, ते \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनाकलनीय होते, असे डॉ. पठाण यांना वाटते. आपल्या पित्याच्या निर्दयी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहत्येचे विस्मरण त्यांना व्हावे, हे त्यांच्या मनाचा कमकुवतपणा व मराठा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअस्मितेचे दुर्दैव दर्शविते, असा आपला स्पष्ट अभिप्राय डॉ. पठाणांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनोंदविला आहे. तथापि शाहू महाराजांच्या धोरणामुळेच मराठी सत्तेचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eरूपांतर साम्राज्यसत्तेत कसे झाले, याचा सविस्तर आढावाही त्यांनी या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचरित्रग्रंथात घेतला आहे. विशेषत: आजच्या सातारा शहराच्या स्थापनेचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eव त्याच्या उभारणीचे सर्व श्रेय शाहू महाराजांना जाते.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e18 व्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासाच्या जडणघडणीत शाहू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा व धोरणाचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही गोष्टी आपणास पटो वा न पटो, त्यांचे इतिहासातील स्थान मात्र \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअबाधित राहाणार आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e- डॉ. जयसिंगराव पवार\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Ismail Pathan \/ Marathi","offer_id":47491313205506,"sku":null,"price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ChhatrapatiShahuMaharaj_Satara_CoverArtwork_Version13-800x800.jpg?v=1773979020","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chhatrapati-shahoo-maharaj-satara-1708-to-1749-by-dr-ismail-pathan-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-1708-%e0%a4%a4%e0%a5%87-1749","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}