{"product_id":"chanya-niti-by-vijaya-deshpande-चाणक्य-नीती-विजया-देशपांडे","title":"Chankya Niti By Vijaya Deshpande  (चाणक्य नीती -विजया देशपांडे  )","description":"\u003cp\u003eआर्य चाणक्य नीति आजही आदराने वाचली जाते. ही नीति म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो, त्या क्षेत्रात वावरताना विशिष्ट प्रकारची वागण्याची पद्धती त्या व्यक्तीला आचरणात आणावी लागते. या वागण्याच्या पद्धतीला नीति असे म्हणतात. संसारात, नोकरीत, प्रवासात, समाजात वावरताना माणसाने नेहमी इतरांशी कसे वागावे यासाठी काही कल्पना असतात. असे वागले नाही अगर काही वेगळ्या पद्धतीने आचरण करीत असला तर आपण म्हणतो अरे या माणसाला कसे नीतिने वागावे हे समजत नाही. असे वागले तर व्यवहार करायचा कसा? आपले जीवन सुख करण्यासाठी प्रत्येकाने नीतिनियम हे पाळलेच पाहिजे. नाहीतर आपले आयुष्य काय, पण दैनंदिन व्यवहारही सुरळीत चालणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनीति या शब्दाचा अर्थ 'न इति' असा आहे. 'न इति' म्हणजे असे असू नये. ही सांगण्याची पद्धत. नीतिनियम म्हणजे तुम्ही कसे वागावे व कसे वागू नये हे सांगत असतात. नीतिमध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे व्यवहारी नीति आणि दुसरी नैतिक. व्यावहारीक नीति ही आचरणात आणण्यास फार सोपी असते व फायदेशीरही ठरते. नैतिक नीति ही उच्चदर्जाची असते. या नीतित फार बारकावे आहेत. ज्याला समाज सुखी व्हावा असे वाटते, तोच या नीतिनियमांच्या वाटेवरून चालणार.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनैतिक नितीचा पहिला नियम म्हणजे स्वतः या जगत्रियंत्या परमेश्वराची मनात सतत आठवण करीत राहणे. अशी आठवण करीत राहण्याने माणसाच्या हातून कधीही वाईट गोष्ट घडणार नाही. म्हणून समाजहिताची चिंता करणारे पोटतिडकीने उपदेश करतात. 160\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vijaya Deshpande \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47532074139906,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.41.18.jpg?v=1774008899","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/chanya-niti-by-vijaya-deshpande-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}