{"product_id":"biodynamic-sheti-paddhati-by-diliprao-deshmukh-baradkar-बायोडायनामिक-शेती-पद्धती","title":"Biodynamic Sheti Paddhati By Diliprao Deshmukh Baradkar (बायोडायनामिक शेती पद्धती)","description":"\u003cp\u003eगेल्या ९७ वर्षांपासून देश-विदेशात विकसित होत असलेल्या बायोडायनामिक शेती पद्धतीकडे शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eजमिनीतील उर्वराशक्ती, सूक्ष्मजीवशक्ती ब्रह्मांडातील शक्तीद्वारे प्रेरित करून जमिनीची उत्पादकता व शेतमालाची गुणवत्ता अल्पावधीत सुधारता येते, हे सिद्ध झाले असून न्यूझीलंड, युरोपीय देश, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्यासह जगातील सुमारे ७० देशांतील शेतकऱ्यांना याची प्रचिती आल्याचे यात स्पष्ट केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eमृदा-विज्ञान (Soil Science), पीक-विज्ञान (Crop Science) व ब्रह्मांड-विज्ञान (Biodynamic\/Cosmic Science) यांची योग्य सांगड घालून पिकनिहाय लागवडपद्धती शेतकऱ्यांसाठी सहजपणे उपलब्ध करून दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eबायोडायनामिक शेती पद्धतीचे महत्त्व ओळखून विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, मराठवाड्यात नांदेड, परभणी; पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, खानदेशात धुळे, जळगाव; तर कोकणात डहाणू परिसरातील अनेक शेतकरी याकडे वळले असल्याचे नमूद करून यातील काही संपर्क क्रमांक पुस्तकात दिले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eसेंद्रिय व बायोडायनामिक निविष्ठांचे उत्पादन व वापर याबद्दल पुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून या निविष्ठा शेतातच तयार करून याआधारे पीकलागवड खर्च वाचवावा व पिकांचे उत्पादन वाढवावे, हाच मुख्य उद्देश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":46812313059586,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4808-thickbox_default.jpg?v=1759820411","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/biodynamic-sheti-paddhati-by-diliprao-deshmukh-baradkar-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}