{"product_id":"binapaishane-vyasanmukti-by-s-s-surywanshi-बिनापैशाने-व्यसनमुक्ती-एस-एस-सूर्यवंशी","title":"Binapaishane Vyasanmukti By S.S. Surywanshi (बिनापैशाने व्यसनमुक्ती – एस. एस. सूर्यवंशी)","description":"\u003cp\u003eमनोगत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगिरणा नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव. त्या गावचा मी रहिवासी. शहरापासून ३ ते ८ कि.मी. अंतरावर हे गाव वसलेले आहे. वडील पोलिस खात्यात नोकरीस असल्यामुळे त्या गावाशी आमचा जास्त संबंध आला नाही, पण लहानपणी कधी कधी आई-वडिलांसह आम्ही गावी जायचो, तेव्हा पायी किंवा बैलगाडीने प्रवास करावा लागत असे. गावी बाजाराच्या निमित्ताने मी बऱ्याचवेळा काकांबरोबर पायीच गेलेलो मला आठवते. बऱ्याचवेळा काही कामानिमित्ताने बैलगाडीने किंवा पायीच आम्ही सहकुटुंब लहानपणी शहराच्या गावी गेलेलो आहोत. शहरात जाण्यासाठी या गावातून नदी पार करावी लागत असे. त्यावेळी डोंगे म्हणजे छोट्या नावा चालायच्या. त्या प्रवाशांना या तिरावरून त्या तिरावर घेऊन जायच्या. शहराकडे जाताना दोन नद्यांचा संगम आहे. त्यावर पवित्र असे महादेवाचे मंदिर आहे. मोठा निसर्गरम्य परिसर आहे हा. या छोट्याशा गावात राहून माझे वडील सातवी पासपर्यंत शिकलेले होते. घरची परिस्थिती चांगली होती. घरी शेत होते, बकऱ्या होत्या. आमचे आजोबा म्हणजे नांदते होते. माझे वडील आम्हाला सांगायचे लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्याकाळी इंग्रजांचे राज्य होते. आपण इंग्रजांचे गुलाम होतो. त्यावेळी ज्यांच्याकडे बैलगाडी असायची त्यांनाच मतदानाचा अधिकार होता, त्यामुळे माझ्या आजोबांनी स्वतःची बैलगाडी घेतलेली होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे शिक्षण झाल्यावर घरातील कर्ता मुलगा या नात्याने माझे वडील घरच्या बकऱ्या चारायचे काम लहानपणी करायचे. बकऱ्या चारता चारता त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण, उच्च विचार, काहीतरी मोठे व वेगळे बनण्याचा त्यांचा जबरदस्त आत्मविश्वास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. शिक्षण असल्यामुळे इतरांपेक्षा त्यांचे विचार वेगळे होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने 48\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"S. S. Surywanshi \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534109884674,"sku":null,"price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at11.49.10_1.jpg?v=1774076300","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/binapaishane-vyasanmukti-by-s-s-surywanshi-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%88%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}