{"product_id":"bharatmatechya-kartutvan-kanya-by-vitthal-ray-bhat-भारतमातेच्या-कर्तृत्ववान-कन्या-विठ्ठलराय-भट","title":"Bharatmatechya Kartutvan Kanya By Vitthal Ray Bhat (भारतमातेच्या कर्तृत्ववान कन्या – विठ्ठलराय भट)","description":"\u003cp\u003eभारतीय समाजात गेल्या अनेक शतकांपासून, विशेषतः 'मनुस्मृती' काळापासून स्त्रियांचे सामाजिक स्थान झपाट्याने खालावत चालले आहे. स्त्रीला अतिशुद्रांच्या पंक्तीला बसवून तिला शिक्षण व स्वातंत्र्यापासून वंचित करण्यात आले. वेदकाळात मात्र तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्त्रीयांचे मुंज (उपनयन संस्कार) होत असे. वेदांतील अनेकानेक ऋचा-गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, इला, शचि, सविता, सरस्वती - इत्यादी स्त्रियांनी रचिल्या होत्या. याचे स्पष्ट उल्लेख सापडतात. भास्कराचार्यांची मुलगी-लीलावती तर गणितज्ज्ञ, ज्योतिषी व सकल शास्त्रांत पारंगत होती. तिला आचार्य ही पदवी प्राप्त होती व ती गुरूकुल चालवत असे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदिमानव प्रारंभी गुहांतून रहात असे व नंतर टोळी करून राहू लागला. तेव्हा त्या आदिम समाजात मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. हळूहळू शेतीचा शोध, अग्नीचा शोध, वन्यप्राणी माणसाळण्याची युक्ती प्राप्त झाली. नैसर्गिकरित्या येणारे गरोदरपण, बाळंतपण व मग मुलांचे पालनपोषण यात बराच काळ स्त्रीचा व्यतीत होऊ लागला व मातृसत्ताक पद्धत लयाला जाऊन पित्तृसत्ताक जीवनपद्धती अमलात आली. पुरुषाने सर्व कारभार आपल्या हाती घेतला व स्त्रीला एक भोगवस्तू बनवली. तिला उंबरठ्याबाहेर पडण्यास बंदी, शिक्षणबंदी, निवडीच्या स्वातंत्र्यावर बंदी अशा अनेक बंधनातून जखडण्यात आले. त्यामुळे स्त्रीची सर्व त-हेची प्रगती पूर्णतया थांबली व तिच्या नशिबी फक्त गुलामगिरीचे आयुष्य आले. तुलसीदासाने आपल्या 'रामचरितमानस' या महाकाव्यातर स्पष्टपणे लिहिलेले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाने 64\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534016200962,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at11.49.10.jpg?v=1774075884","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/bharatmatechya-kartutvan-kanya-by-vitthal-ray-bhat-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}