{"product_id":"balkumaransathi-valmiki-ramayan-by-kedar-kelkar-बालकुमारांसाठी-वाल्मिकी-रामायण","title":"Balkumaransathi Valmiki Ramayan By Kedar Kelkar (बालकुमारांसाठी वाल्मिकी रामायण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या देशात राजेशाही राजवट चालू असताना अनेक राजे आपली राज्ये भारतीय संस्कृती' युक्त धर्माच्या पायावर वर्षानुवर्षे सांभाळून आणि त्यामुळे ' कीर्तिवंत होऊन गेले ही आपली संस्कृती रामायण काळापासून प्रकर्षाने उजेडात आली ती ' प्रभू श्री रामचंद्र ' यांच्या संस्कृतीबद्ध अश्याच आचरणामुळे हे अगदी स्वच्छ आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे चारित्र्य नजरेसमोर ठेवून ऋषी वाल्मिकी यांनी ' रामायणा' ची रचना केली. आपल्या देशातले मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासह सर्व जगप्रसिध्द राजे आपल्या बालपणात रामायण आणि त्यानंतर घडलेल्या महाभारत ह्या दोन्ही ' भारतीय संस्कृतीने' ओतप्रोत भरलेल्या ग्रंथातील सर्व कथा आपल्या पालक आणि गुरू यांच्या मुखातून ऐकून आणि पुढे स्वतः वाचन-मनन करूनच आपला राज्यकारभार चालवून जगप्रसिध्द होऊन गेले....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या आजच्या नव्या पिढीतील बाल - शिशु - कुमार युवक अश्या सर्वच संस्कारक्षम गटातील मुला मुलींना डोळ्यापुढे ठेवून ह्या पुस्तकाचे लेखन केले असून ' वाल्मिकी रामायणाचे ' मूळ मराठी ग्रंथ वाचणे जड जातील आणि, ' रामायण कसे घडले' यांसह त्यातली व्यक्तिमत्वे कळण्यासाठी फार लांबण न लावता ह्यातील कथा थोडक्यात लिहिल्या आहेत अश्यावेळी, मोठ्या हिंदी आणि मराठी ग्रंथांचाही आधार घेतला आहे, त्यामुळे ह्या कथा सर्वांना भावतील अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Kedar Kelkar","offer_id":46204555133186,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5724.jpg?v=1749551099","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/balkumaransathi-valmiki-ramayan-by-kedar-kelkar-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}