{"product_id":"antarang-by-dilip-gurav-अंतरंग-दिलीप-गुरव","title":"Antarang by Dilip Gurav (अंतरंग - दिलीप गुरव)","description":"\u003cp\u003eनवीन लेखक, उदयोन्मुख कवी म्हणून काव्य, कथा लेखन, यात पदार्पण करणारे श्री. दिलीप गुरव हे पहिलाच काव्य लेखन संग्रह घेऊन \"मित्र परिवार व रसिक मित्रमैत्रीणी यांच्या भेटीला सहर्ष, उत्साहाने येत आहेत . त्यांचे लेखन व विचार, मन भावना, या प्रत्येक कवितेतून दिसून येतात. कवी हे स्वभावाने प्रेमळ, भावूक व स्नेहशिल, संघप्रिय व ओघवत्या वाणीचे आहेत. हे त्यांच्या प्रत्येक कवितेतन दिसते. उदा. प्रथमच शारदास्तवन करून आशीर्वाद मागितला आहेच. तसेच 'आई' या कवीतेतून मातेचे उपकार ही स्मरीले \"जीवन मूल्य\" \"दान\" यातून मानवाला उपदेश करून दानाचा अर्थ व्यक्त केलाय. तसेच मित्र कसा असावा. नाती कशी असावी. हे ही प्रेरकपणे सांगितले आहे. जीवन हे एक कोडे आहे. असेहि ते म्हणतात. भरीन तुझी ओंजळ प्रेमाच्या पाकळ्यांनी असे संकेत मिलनाचा या काव्यातून ते सांगतात. अनभिज्ञ माझं मन\" असे म्हणणारे हे कवी नक्कीच सखोल, वैचारिक, अनुभवसिध्द मनाने पण स्वैर लेखन करतात. हे त्यांच्या प्रत्येक कवितेतून दिसून येते. त्यामुळे दिलीप गुरव हे प्रथित यश कवी म्हणून प्रसिध्द पावतील हे दिसून येते. तसे पाहता श्री. दिलीप गुरव हे आजचे तुमचे नव कवी. परंतू आमच्या कुटूंबातील नातेवाईक असल्या सारखे आहेत. लहानपणी ते म्हणजे आमचा दिलीप अत्यंत खोडकर, खेळकर व अभ्यासू असायचा. काही बोललो तर हत्तायचा. अगदी आजच्या सारखा. आमच्या शेजारी. पण माझा विद्यार्थी, तो लहानपणापासून हुशार कल्पक, जवळ वावरलेला म्हणून त्याच्या या काव्य संग्रहाला आशीर्वाद देताना अतिशय आनंद उत्साह वाटतो. त्याची किर्ती व लेखन असेच वृध्दींगत होवो ही सदिच्छा व गणेश चरणी प्रार्थना! आणि मनोमन आशीर्वाद व शुभेच्छा !\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Dilip Gurav \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47530563928322,"sku":null,"price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.51.25.jpg?v=1774002844","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/antarang-by-dilip-gurav-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}