{"product_id":"aniruddh-kanisetti-2-book-set-अनिरुद्ध-कनिसेट्टी-दोन-बेस्ट-सेलर-पुस्तकांचा-संच","title":"Aniruddh Kanisetti 2 Book set (अनिरुद्ध कनिसेट्टी दोन बेस्ट सेलर पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलॉर्ड्स ऑफ द अर्थ ॲण्ड सी\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eहजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम  स्त्रोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तक केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिसेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.\u003cbr\u003eकिमत – 500\u003cbr\u003eपाने – 428\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलॉर्ड्स ऑफ द डेक्कन\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eसहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याच दिसतं, मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाच गंभीरपणे स्वागत झालं आहे. या पुस्तकात अनिरुद्ध कनिसेट्टी यांनी अंधारावर प्रकाशझोत टाकला आहे आणि मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीच्या म्हणजे सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळातील दख्खनला, त्याच्या सगळ्या ऐश्वर्यासह आणि निखळ कीर्तीसह चोखंदळ वाचकांसमोर जिवंत केलं आहे.\u003cbr\u003eकिमत – 499\u003cbr\u003eपाने – 416\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Aniruddh Kanisetti \/ Marathi","offer_id":47279540142338,"sku":null,"price":849.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_b9b990db-7565-45bd-b31a-bb7209770cc4.jpg?v=1769065009","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aniruddh-kanisetti-2-book-set-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}