{"product_id":"anandashram-by-baba-bhand-आनंदाश्रम","title":"Anandashram By Baba Bhand (आनंदाश्रम)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलं आणि मोठ्यांसाठीची गोष्ट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही आहे शरीर आणि मनाच्या संस्काराची गोष्ट.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणूस आणि निसर्गाचं एक अतूट नातं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजे जग आणि त्यातील सगळे नियंत्याने निर्मिले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिर्मिकाच्या निसर्गचक्राने ऊन, पाऊस, बर्फ अन् थंडी पडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभूतलावरील माणूस, किडे-मुंग्यांसारखे कीटक, पक्षी - प्राणी आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाडा-झुडपांसाठी निसर्गाने नियम केले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनियम पाळणे हा निसर्गाचा धर्म आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनियम मोडले की तो शिक्षा करतो. आपणही जगताना, वागताना, खाताना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनियम मोडला की शिक्षा होणारच; पण बरेचदा ती दृश्य स्परूपात नसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसते मात्र हमखास.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयातून शरीर मनाच्या बिघाडाची सुरूवात होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचांगले संस्कार शरीर-मनास निरोगी राहण्यास मदतच करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमात्र प्रत्येक गोष्टीची सुरूवात स्वत:पासूनच करायची असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआज जगभर आवर्षणाचं, अतिवृष्टीचं आणि पर्यावरण असंतुलनाचं संकट\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघोंघावत आहे. जाती-धर्माच्या नावानं दहशतवादाचं भूत भेडसावत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअतिलोभानं धनदांडग्यांची शक्ती दुर्बलानं चिरडून टाकत आहे आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्ही आमच्या स्वार्थासाठी निसर्गाची सगळी घडी बिघडवून टाकली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया गोष्टीला मी मीच जबाबदार आहे. ही स्थिती आपण जोपर्यंत स्वीकारत नाही,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतोपर्यंत या जबाबदारीच्या जाणिवेचा स्पर्श होत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणून प्रत्येक गोष्टीची सुरूवात माझ्यापासूनच होऊ शकते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग ती चांगली असू दे, नाही तर चांगली नसू दे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएवढं जरी केलं तर अनेक प्रश्न सोपे वाटू लागतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशी आहे ही आनंदाश्रमाची गोष्ट.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Baba Bhand","offer_id":46130749440258,"sku":"","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/614cprXC9qL._SY466.jpg?v=1746600939","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/anandashram-by-baba-bhand-%e0%a4%86%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}