{"product_id":"amhi-bhagirathache-putra-gopal-nilkanth-dandekar-आम्ही-भगीरथाचे-पुत्र-गोपाळ-नीलकंठ-दांडेकर","title":"Amhi Bhagirathache Putra – Gopal Nilkanth Dandekar (आम्ही भगीरथाचे पुत्र :गोपाळ नीलकंठ दांडेकर )","description":"\u003cdiv class=\"et_pb_row et_pb_row_1_tb_body et_pb_equal_columns\"\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_column et_pb_column_1_3 et_pb_column_3_tb_body  et_pb_css_mix_blend_mode_passthrough et-last-child\"\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_module et_pb_wc_description et_pb_wc_description_1_tb_body et_pb_bg_layout_light  et_pb_text_align_left\"\u003e\n\u003cdiv class=\"et_pb_module_inner\"\u003e\n\u003cp\u003e‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ही गोनीदांची अगदी वेगळी कादंबरी. अर्धशतकापूर्वी भाकरा-नंगल धरण प्रकल्पावर लिहिलेली. मराठी साहित्यविश्वात अपवादात्मक म्हणावी अशी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोनीदांना जसे जुन्याचे आकर्षण तसे नव्याविषयी कुतूहल. नवनिर्माणाविषयी आंतरिक ओढ. साहजिकच भाकडा-नंगल धरण प्रकल्प हा त्यांना कादंबरीचा विषय वाटला. सत्य आणि कल्पिताचा सुरेख संगम साधून कादंबरी लिहिता येईल हे त्यांच्या प्रतिभेला जाणवलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या नवनिर्माणाच्या कुतुहलामागे होतं, त्यांचं भारतीय संस्कृतीविषयीचं प्रेम. हिमालयाच्या त्या भागातील माणसांचं भावजीवन त्यांनी जाणून घेतलं. त्यांच्या परंपरा, त्यांच्या रीतीभाती, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांच्या अस्मिता असं सगळं अनुभवलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभगीरथाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली. गंगेबरोबर शतलज नदीही भगवान शंकराच्या जटेतून प्रकट झालेली एक अवखळ धारा. तिला बांध घालून अडविण्याचा भगीरथ प्रयत्न म्हणजे भाकडा-नंगलची अभूतपूर्व निर्मिती. नव्या भारताचा हा प्रचंड प्रकल्प. महानिर्माण. ते केलं भगीरथाचा वारसा सांगणाऱ्या शेकडो तंत्रज्ञांनी आणि हजारो मजूर-कामगारांनी. ते सगळे ‘भगीरथाचे पुत्र’.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Gopal Nilkanth Dandekar \/ Marathi","offer_id":47654584287490,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-516-Aamhi-Bhagirathache-Putra.jpg?v=1775895737","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/amhi-bhagirathache-putra-gopal-nilkanth-dandekar-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%a0-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}