{"product_id":"aisi-ratne-melvin-by-narayan-dharap-ऐसी-रत्ने-मेळवीन","title":"Aisi Ratne Melvin By Narayan Dharap (ऐसी रत्ने मेळवीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“तुम्ही माझ्याविरुद्ध लढा पुकारला आहे! स्वत:च्या शक्तीचा अदमास न घेता गगनाला गवसणी घालायला निघाला आहात! मूर्ख! ज्याच्यामागे तुम्ही दोघे आता कोकरासारखे मुकाट्याने चालत आहात, तो कोण आहे पाहा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाएकी सर्वत्र दिव्यांचा झगझगाट झाला. अंधाराला सरावलेले माझे डोळे एकदम दिपून गेले. जरा वेळाने मला जेव्हा सर्वकाही स्पष्ट दिसायला लागले तेव्हा मी समोर पाहिले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्ही एका फरसबंदी चौकात उभे होतो. समोरच प्रखर दिवे होते, त्यामुळे त्यामागचा भाग दिसत नव्हता. जेवढा भाग प्रकाशित होता तेवढ्या भागात मला शिवभक्त दिसले नाहीत; पण आणखी काहीतरी दिसले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआमच्याकडे पाठ करून एक ओळखीची वाटणारी आकृती समोर उभी होती. मागाहून दिसायला अगदी डॉक्टर कोतवालांसारखीच ती व्यक्ती दिसत होती; पण एका विलक्षण कल्पनेने माझी छाती धडधडायला लागली होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही आवाज न करता ती व्यक्ती स्वत:भोवती फिरली; पण आमच्याकडे वळली तरी तिला चेहराच नव्हता. कोट आणि पीक कॅप यांच्यामध्ये काहीही नव्हते- केवळ मोकळी हवा होती...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक सेकंदभर तिकडे पाहून सुमित्रा एकदम किंचाळली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआमच्या डोळ्यांसमोर तो आकार पाहता पाहता विरघळला आणि नाहीसा झाला! एका फसव्या, काल्पनिक आकृतीमागे लागून आम्ही पार त्याच्या मुठीत सापडलो होतो!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि तिकडे डॉक्टर कोतवाल आम्हाला शोधत असतील, आम्ही दिसलो नाही तर आमची काळजी करीत असतील!”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e...प्रस्तुत पुस्तकातून\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122771087618,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81PWSDGESYL._SL1500.jpg?v=1746169015","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aisi-ratne-melvin-by-narayan-dharap-%e0%a4%90%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}