{"product_id":"ai-chalata-kasa-ai-cha-tufan-and-ai-che-godfather-set-3-pustkancha-एआय-चालतं-कसं-एआयच-तुफान-एआयचे-गॉडफादर-जेफ्री-हिंटन","title":"AI Chalata Kasa , AI cha Tufan and AI che Godfather Set 3 Pustkancha (एआय चालतं कसं, एआयच तुफान, एआयचे गॉडफादर : जेफ्री हिंटन)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांमध्ये \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअभूतपूर्व धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य माणसापासून मोठमोठे उद्योगपती \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि सत्ताधीश यांच्यापर्यंत सगळ्यांना या ना त्या कारणामुळे एआयची दखल घेणे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअपरिहार्य झाले आहे. एआयविषयी माहीत नसलेला माणूस आजच्या आणि उद्याच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजगात कालबाह्य ठरणार याविषयी अजिबात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया पार्श्वभूमीवर मराठीमध्ये एआय या विषयाचा सखोल आढावा घेणारी खूप कमी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपुस्तके आहेत. बहुतेक वेळा एआयचा जुना इतिहास किंवा एआयमुळे कोणत्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eक्षेत्रांमध्ये कोणते बदल घडणार अशा प्रकारचा मजकूर त्यात असतो. एआय \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eम्हणजे नेमके काय, ते नेमके कसे चालते, ते मानवी बुद्धिमत्तेशी कशी स्पर्धा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकरू शकते, या तंत्रज्ञानाच्या मुळाशी नेमके काय असते, कुणाचे संशोधन \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयामागे आहे, यामध्ये गणिताची भूमिका नेमकी काय असते अशा असंख्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगोष्टींचा अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत आढावा घेण्यासाठी या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपुस्तक मालिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे अगदी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसर्वसामान्य वाचकालाही या विषयाची सखोल ओळख होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या पहिल्या पुस्तकात एआयच्या सुरुवातीपासून त्याचा प्रवास \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअगदी आजच्या चॅट जीपीटीपर्यंत कसा झाला याचा अतिशय रंजक आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवेगवान पण सखोल परिचय करून देण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या दुसऱ्या पुस्तकात एआयचे कामकाज नेमके कसे चालते याचे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसखोल विवेचन केलेले आहे. एआयच्या मागची जादू या पुस्तकातून उलगडते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या तिसऱ्या पुस्तकात एआयच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eभूमिका बजावणारे एआयचे जनक ॲलन ट्युरिंग आणि नोबेल पारितोषिक \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविजेते जेफ्री हिंटन यांच्या आयुष्याचा आणि कामाचा प्रवास रेखाटलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया पुस्तक मालिकेने एआय या अतिशय महत्त्वाच्या विषयासंबंधीची सखोल \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि रसाळ माहिती वाचकांसमोर आणलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Atul Kahate \/ Marathi","offer_id":47591791100162,"sku":null,"price":612.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AI_20set-800x800.jpg?v=1774588253","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ai-chalata-kasa-ai-cha-tufan-and-ai-che-godfather-set-3-pustkancha-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9a-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%89%e0%a4%a1%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}