{"product_id":"ai-cha-tufan-by-atul-kahate-एआयच-तुफान-1","title":"AI cha Tufan By Atul Kahate (एआयच तुफान)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांमध्ये अभूतपूर्व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eधुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य माणसापासून मोठमोठे उद्योगपती आणि सत्ताधीश \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयांच्यापर्यंत सगळ्यांना या ना त्या कारणामुळे एआयची दखल घेणे अपरिहार्य झाले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eएआयविषयी माहीत नसलेला माणूस आजच्या आणि उद्याच्या जगात कालबाह्य ठरणार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाविषयी अजिबात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पार्श्वभूमीवर मराठीमध्ये एआय या विषयाचा सखोल आढावा घेणारी खूप कमी पुस्तके \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहेत. बहुतेक वेळा एआयचा जुना इतिहास किंवा एआयमुळे कोणत्या क्षेत्रांमध्ये कोणते \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबदल घडणार अशा प्रकारचा मजकूर त्यात असतो. एआय म्हणजे नेमके काय, ते नेमके \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकसे चालते, ते मानवी बुद्धिमत्तेशी कशी स्पर्धा करू शकते, या तंत्रज्ञानाच्या मुळाशी नेमके \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाय असते, कुणाचे संशोधन यामागे आहे, यामध्ये गणिताची भूमिका नेमकी काय असते \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा असंख्य गोष्टींचा अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत आढावा घेण्यासाठी या पुस्तक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमालिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे अगदी सर्वसामान्य वाचकालाही या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविषयाची सखोल ओळख होईल.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या पहिल्या पुस्तकात एआयच्या सुरुवातीपासून त्याचा प्रवास अगदी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआजच्या चॅट जीपीटीपर्यंत कसा झाला याचा अतिशय रंजक आणि वेगवान पण \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसखोल परिचय करून देण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या दुसऱ्या पुस्तकात एआयचे कामकाज नेमके कसे चालते याचे सखोल \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविवेचन केलेले आहे. एआयच्या मागची जादू या पुस्तकातून उलगडते.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमालिकेच्या तिसऱ्या पुस्तकात एआयच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबजावणारे एआयचे जनक ॲलन ट्युरिंग आणि नोबेल पारितोषिक विजेते जेफ्री\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहिंटन यांच्या आयुष्याचा आणि कामाचा प्रवास रेखाटलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पुस्तक मालिकेने एआय या अतिशय महत्त्वाच्या विषयासंबंधीची सखोल \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि रसाळ माहिती वाचकांसमोर आणलेली आहे.\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Atul Kahate \/ Marathi","offer_id":47129927680258,"sku":null,"price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AI_20-1-800x800_a0f0f721-e1e3-47f1-836e-43f0f0615145.jpg?v=1765622084","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ai-cha-tufan-by-atul-kahate-%e0%a4%8f%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9a-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%a8-1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}