{"product_id":"aanvik-apghat-aani-anvastre-by-niranjan-ghate-आण्विक-अपघात-आणि-अण्वस्त्रे-निरंजन-सिंहेंद्र-घाटे","title":"Aanvik Apghat Aani Anvastre By Niranjan Ghate (आण्विक अपघात आणि अण्वस्त्रे- निरंजन सिंहेंद्र घाटे))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्याला अणुऊर्जा, अणुबॉम्ब वगैरे शब्दांतून अणू माहीत झालेला आहेच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अणूने अनेक ठिकाणी अनेक वेळा गोंधळ घातलेला आहे. त्यात सुद्धा चेर्नोबिल, थ्री माईल आयलँड इथल्या अपघातांची बरीच चर्चा झाली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया मोठ्या गोष्टी वृत्तपत्रातून गाजतातही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e१६ जुलै १९४५ रोजी पृथ्वीवर झालेला स्फोट ही विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाची घटना मानावी लागेल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमात्र ही घटना घडल्यानंतर एका महिन्याने तिचं खरं स्वरूप जगाला कळलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदरवर्षी ६ ऑगस्टला हिरोशिमा आणि ९ ऑगस्टला नागासाकी या शहरांचे स्मरण केले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया शहरांच्या पुण्यतिथीनिमित्त राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ही दोन शहरे अणुबॉम्बनी बेचिराख केल्यावर पुन्हा कशी उभी राहिली याची वर्णनं छापून येतात. इथं मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आठवण करून अश्रू ढाळले जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रचंड मोठ्या प्रमाणात भाषणबाजी होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाव्यतिरिक्त पहिला अणुबॉम्ब कसा घडविला, याबद्दल अनेक लेख लिहिले जातात आणि जातीलही; पण तो कसा दडवला याची माहिती मात्र सहसा कधी छापली जात नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पार्श्वभूमीवर आज जागतिक चित्र कसे दिसते ? तर प्रतिवर्षी अण्वस्त्रांची संख्या वाढते आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअणूच्या बाबतीत अनेक छोटे मोठे, प्रसंगी धोकादायक असे प्रसंग गेल्या ४० वर्षांत घडले, ते या पुस्तकात एकत्र मांडले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाशिवाय एका विद्यार्थ्याने गंमत म्हणून कॉलेजात अणुबॉम्ब करायचा सैद्धांतिक प्रकल्प हाती घेतला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो कसा यशस्वी झाला याची हकीकतही यात दिलीय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाकिस्तानसारख्या राष्ट्रांनी त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधल्यानंतरच या प्रकरणाचे गांभीर्य संबंधितांच्या लक्षात आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पाहून आपण किती धोकादायक आणि स्फोटक परिस्थितीत सध्या राहतो आहोत हे लक्षात येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Niranjan Ghate \/ Marathi","offer_id":47625835839746,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/For-Website-MockupAnvik-Apghat-Ani-Anwastare.jpg?v=1775461371","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/aanvik-apghat-aani-anvastre-by-niranjan-ghate-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}