{"product_id":"संपूर्ण-चाणक्य-चरित्र-व-नीती-संच","title":"संपूर्ण चाणक्य चरित्र व नीती - संच (अभ्यासू व दुर्मिळ ग्रंथ)","description":"\u003cp data-start=\"118\" data-end=\"141\" style=\"text-align: center;\"\u003e📢 \u003cstrong data-start=\"121\" data-end=\"139\"\u003eमहत्वाची घोषणा 📢\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"143\" data-end=\"261\" style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003e\u003cstrong\u003eरुद्र पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित होणारी ही उत्कृष्ट पुस्तके\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cbr data-start=\"203\" data-end=\"206\"\u003e📚 \u003cstrong data-start=\"209\" data-end=\"259\"\u003eदिनांक १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध होणार आहेत.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"143\" data-end=\"261\" style=\"text-align: center;\"\u003e✨ वाचकांसाठी खास संधी!\u003cbr data-start=\"285\" data-end=\"288\"\u003eआजपासूनच तुम्ही या पुस्तकांची \u003cstrong data-start=\"318\" data-end=\"345\"\u003eपूर्वनोंदणी (Pre-Order)\u003c\/strong\u003e करू शकता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित - लेखक - प्रशांत कुलकर्णी. \u003cspan\u003e पाने १२० | किंमत \u003c\/span\u003e\u003cspan\u003e१९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून  कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले  आर्य चाणक्य यांनी  आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे. राज्याच्या  एखाद्या  गूढ समस्येवर उपाय शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला कोंडून घेत असत.जेव्हा झोपडीचा दरवाजा उघडत असे तेव्हा जणू काही  काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशच बाहेर पडावा अशाप्रकारे  समस्येवरील रामबाण उपाय शोधूनच ते बाहेर येत .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e२) आर्य चाणक्य अर्थात चाणक्याची संपूर्ण गोष्ट .  पाने १९५ |  किंमत २९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनंद राजाच्या कृत्याने अपमानित होऊन शेंडीची गाठ सोडून, ‘नंद कुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही,’ अशी घोर प्रतिज्ञा करणारा चाणक्य नेमका कुठला, नंद राजाच्या देशात तो कसा आला? चंद्रगुप्त कोण? त्याची चाणक्यशी भेट झाली कशी झाली आणि या प्रतिज्ञेप्रत येण्यास ठोस कारण काय घडले, हा इतिहास फार प्रकाशित नाही. वामनशास्त्री पंडित यांनी संस्कृत ग्रंथावरून लिहिलेले हे पुस्तक चाणक्यच्या पूर्वायुष्याबद्दल खूप सखोल माहिती देतं. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने लिहिलेल्या सूत्रांनुसार व्यवहार होतही असतील, पण पूर्वार्ध ज्ञात होणे म्हणजेच पूर्ण चाणक्य समजणे होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e३) चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे  | किंमत २९९\/- \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षांनंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशस्वी नेतृत्व कसे करावे, संपत्तीचे योग्य व्यवस्थापन, संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा आणि मानवी नातेसंबंध कसे ओळखावेत, यावर हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन करते. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर दैनंदिन जीवनात वापरता येतील असे सडेतोड आणि स्पष्ट विचार या पुस्तकातून मिळतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धेच्या या आधुनिक युगात स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या आणि यशोशिखरावर पोहोचू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे यशाची खात्रीशीर गुरुकिल्ली आहे. चाणक्यांची ही प्रेरणादायी जीवनसूत्रे आत्मसात करा आणि आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा द्या!\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Prashant Narayan Kulkarni \/ Marathi","offer_id":47602493227266,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Aarti Jagtap \/ Marathi","offer_id":47602493260034,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":47602493292802,"sku":null,"price":597.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-30at16.52.04_1.jpg?v=1774870732","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}