{"title":"Umesh Kadam","description":"","products":[{"product_id":"amanush-by-umesh-kadam-अमानुष","title":"Amanush By Umesh Kadam (अमानुष)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजावेद इब्राहिम झारी उर्फ सुलेमान-खर्या आयुष्यातील `दाऊद हारी’ हा दार्फुर व छादच्या काही भागांत वास्तव्य करणार्या ‘झाधवा’ जातीचा - त्या प्रदेशातील सर्व भाषा-बोलीभाषा-अरबी भाषा व अस्खलित इंग्रजी बोलणारा – २००३पासून सतत सुरू असलेल्या चकमकींचे आणि जीव वाचवण्यासाठी, जीवाच्या आकांताने पळ काढणार्या गरीब जनतेचे हाल, सुदानी सैन्य, जंजाविद, सरकारधार्जिणे सशस्त्र गट यांनी दार्फुरच्या जनतेला चिरडून टाकण्याचा लावलेला सपाटा आणि यानंतर सुरू झालेला मृत्यू, बलात्कार, कत्तली, बॉम्ब हल्ले आणि जीव वाचवण्यासाठी स्थलांतराचा भयावह प्रवास दुभाषा असंख्य वेळा बघतो आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून आंतराष्ट्रीय मदतीसाठी समोरच्याच्या भाषेत सांगतोही.. स्थलांतरीत लोकांसाठी उभारलेल्या छावण्या आणि त्यातील भीषण परिस्थिती मांडतना लेखक दुभाषाबरोबर आलेला अनुभवही मांडतात आणि या धगधगत्या ज्वालांची झळ पोहोचूनही जावेदची वैचारिक पातळी ढळत नाही – कारण तो परिस्थितीप्रमाणे `अमानुष’ होत नाही!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Umesh Kadam","offer_id":46689271218434,"sku":null,"price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4183.jpg?v=1755932121"},{"product_id":"ethiopiyi-suras-katha-by-umesh-kadam-इथियोपियी-सुरस-कथा","title":"Ethiopiyi Suras Katha By Umesh Kadam (इथियोपियी सुरस कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस’ या जागतिक मानवतावादी संघटनेतल्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले उमेश कदम यांचा ‘इथिओपियी सुरस कथा’ हा कथासंग्रह. कामाच्या निमित्ताने दहा वर्षं ते आफ्रिकेत होते. त्यांपैकी अडीच वर्षं ते इथिओपियात वास्तव्यास होते. या कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. कथासंग्रहातल्या कथा त्यांच्या तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर आधारित आहेत. ‘भुतांची टेकडी’, ‘मेंगेशा’, ‘इथिओपियी कांद्यांची गोष्ट’, ‘चिन्मय आफ्रिका’ यांसारख्या एकूण पंधरा कथा त्यात समाविष्ट केल्या आहेत. सर्वच कथांमधून इथिओपियन संस्कृती, दैनंदिन जीवन आणि त्या अनुषंगाने सर्व गोष्टींचं चित्रण आढळतं. त्या संदर्भातले विविध उल्लेख अगदी बारकाव्यांसहित येतात. इथिओपियातलं दैनंदिन जीवनच या कथांमधून वाचकांना भेटत राहतं. लेखकाच्या स्वानुभवांवर आधारित असलेल्या या सर्वच कथांमधून त्याच्या परिघातल्या सर्व माणसांचं भावविश्वही उलगडतं. उमेश कदम यांनी सत्य घटनांना कल्पिताची जोड देऊन लिहिलेल्या या कथा अतिशय ओघवत्या शैलीत आल्या असून त्या वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Umesh Kadam \/ Marathi","offer_id":47269264392450,"sku":null,"price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4221.jpg?v=1768978655"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/umesh-kadam.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}