{"title":"Swatija Manorama","description":"","products":[{"product_id":"topi-shukla-by-rahi-masoom-raza-swatija-manorama-and-suhas-paranjapetranslatorsटोपी-शुक्ला-राही-मासूम-रझा","title":"Topi Shukla By Rahi Masoom Raza, Swatija Manorama and Suhas Paranjape(Translators)(टोपी शुक्ला | राही मासूम रझा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘मी लेखकांच्या अशा जमातीचा आहे ज्यांच्या मते लेखकाचं काम \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविश्वभरात शांती पसरवण्याचं आहे. त्याचं काम आहे अशा प्रेमकथा \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिणं की ज्या वाचल्यावर माणसं आपापसातल्या भिंती विसरून \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजातील. सीमारेषा पुसून टाकणं हेच तर लेखकाचं काम आहे.' \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराही मासूम रझा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराही मासूम रझा यांच्या ‘टोपी शुक्ला' या कादंबरीचा माझ्या मनावर \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमोठाच प्रभाव पडला. एकीकडे तिने अंतर्मुख केलं, तर दुसरीकडे \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलढ्याची नवी दृष्टी दिली. या कादंबरीची भाषा लढ्याची प्रेरणा देणारी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच मानवी करुणेचीही आहे. यातील भाषाशैलीने मनाची पकड \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघेतली आणि युवकांशी संवाद साधण्याची नवी दृष्टी दिली. तिने धर्म, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजाती, प्रांतीयता, भाषा, लिपी, संस्कृती, राष्ट्र्रीयता, देशप्रेम या संकल्पना \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वसामान्य माणसांच्या जीवनात कशा उतरतात ते दाखवून दिलं. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक भारतीयतेशी त्यांचा असलेला अतूट धागा \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमोर आणला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eत्याबरोबरच या भारतीयतेचा एकेक चिरा कसा ढासळत चालला आहे, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयावरील भाष्यही या कादंबरीत येतं. टोपीला त्या काळात पडलेले प्रश्न\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजचे आपलेच प्रश्न आहेत. भारतात, भारतीय समाजात तरुणांना \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसांप्रदायिकतेचं आणि केवळ सत्ताप्राप्तीचं साधन मानलं गेलं, तर \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताला, भारतीयतेला काय भवितव्य उरतं? यापेक्षा वेगळं भवितव्य \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eघडवायला आपण उभं राहायला नको का? \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eही संपूर्ण कादंबरी इशारा देते की धर्मवादी लोकशाहीविरोधी \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशक्तींशी तडजोड केली तर ती भारताची, भारतीयतेची आत्महत्या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eठरेल, त्यामुळे पडेल ती किंमत देऊन धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमूल्यांसाठी लढणं, ती जगणं अटळ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरझिया पटेल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45688776655106,"sku":"","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TopiShukla_Cover-CQ-13-800x800.jpg?v=1733375834"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/swatija-manorama.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}