{"title":"Sudha Murty","description":"","products":[{"product_id":"aajichya-potaditalya-goshti-by-sudha-murty-by-leena-sohani-translators","title":"AAjichya Potaditalya Goshti By Sudha Murty By Leena Sohani (Translators)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं तिच्या खेड्यात सुट्टी घालवायला आपल्या आजीकडे आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45538927902978,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/245.jpg?v=1728235021"},{"product_id":"gopichi-diary-by-sudha-murty-leena-sohoni-translators-गोपीची-डायरी","title":"Gopichi Diary by Sudha Murty, Leena Sohoni (Translators) (गोपीची डायरी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"आपल्या घरच्या उबदार वातावरणातून बाहेर पडलेला गोपी रस्त्यावर भटकत असताना खूप नवनवीन अनुभवांना सामोरा जातो. त्याला रस्त्यात अनेक भटकी कुत्री भेटतात, त्यांचा जीवनसंघर्ष त्यांच्याबरोबर तोही अनुभवतो. या संपूर्ण दिवसांमध्ये गोपीला एक नवी भटकी मैत्रीण मिळते आणि त्याच्या दिवसभरातल्या अनेक कारनाम्यांमध्ये ती त्याची सोबत करते. एक दिवस असा काही विलक्षण उजाडतो, अगदी जगावेगळा! पण, गोपीला मात्र क्षणोक्षणी आपल्या आवडत्या आजीची आठवण येत असते. गोपीला आपल्या घराचा पत्ता सापडेल का? आजी आणि गोपी यांची परत भेट होईल का? ही सुंदर आणि मनाला आनंद देणारी गोष्ट वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा उलगडा होईल. सुधा मूर्तींनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लिहिलेली ही कथा आबालवृद्धांचं मन नक्कीच जिंकून घेईल. रस्त्यावर भटकणार्‍या कुत्र्यांचं आयुष्य किती कष्टाने भरलेलं असतं, हे गोपी आपल्याला दाखवून देईल, त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हेही आपल्याला त्यातून समजेल. \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647255830786,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4079.jpg?v=1731832562"},{"product_id":"sarpacha-sud-सर्पाचा-सूड-by-sudha-murty-author","title":"Sarpacha Sud - सर्पाचा सूड  By Sudha Murty (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647417999618,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41DWMM9ERxL.jpg?v=1731832521"},{"product_id":"how-the-mango-got-its-magic-by-sudha-murty","title":"How the Mango got its Magic By Sudha Murty","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eWe all love the sweetness of mango and how it quenches our thirst on a hot summer day, but have you ever wondered how the mango got its magical sweetness?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eThe tale of how such sweetness came into existence is a fascinating one indeed. India's favourite storyteller brings alive this delightlful tale with her inimitable wit and simplicity. Bursting with captivating illustrations, this gorgeous chapter book is the ideal introduction for beginners to the world of Sudha Murty.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Penguin","offers":[{"title":"Default Title","offer_id":45690725826818,"sku":"","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91TDBnocGVL._SY425.jpg?v=1733468210"},{"product_id":"aajobanchya-potaditlya-goshti-by-sudha-murthy-leena-sohoni-translatorsआजोबांच्या-पोतडीतल्या-गोष्टी","title":"Aajobanchya Potaditlya Goshti By Sudha Murthy, Leena Sohoni (Translators)(आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"भारतातल्या आघाडीच्या बालसाहित्यकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथामालिकेतील एक नवीन रोमांचकारी साहसकथा! अनुष्का, कृष्णा, मीनू आणि रघू आपल्या आजी आजोबांसोबत उत्तराखंडमधील डोंगराळ भागात वसलेल्या मायावतीच्या दिशेने साहससफरीला निघाले आहेत - चला, आपणही त्यांच्या सोबत तिकडे जाऊया. पण आपली ही सहल अनपेक्षित अशा मंतरलेल्या गोष्टींनी भरलेली असेल, हे त्या मुलांना तरी कुठे माहीत आहे? या खेपेस आपल्या नातवंडांना वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टी सांगण्याचं काम त्यांच्या प्रेमळ आजोबांनी स्वत:कडे घेतलं आहे. हिमाच्छादित पर्वतशिखरं आणि उंच उंच देवदार वृक्षांनी वेढलेल्या या प्रदेशात फिरताना या मुलांचे आजोबा राजेरजवाड्यांच्या, राजपुत्रांच्या, जलपऱ्यांच्या, इतकंच नव्हे तर कार्ल्याच्या भाजीच्यासुद्धा कथा मोठ्या कौशल्याने गुंफतात आणि त्या कथांच्या माध्यमातून कितीतरी ज्ञान सहजगत्या त्या मुलांना देतात. मुलं जेव्हा त्या डोंगराळ भागात फेरफटका मारायला निघतात तेव्हा तिथे त्यांना नवे मित्र भेटतात. त्यांना पहाडी लोकवाड्मयाबद्दल, पहाडी संस्कृतीबद्दल खूप काही शिकायला मिळतं, डोंगरमाथ्यावरून अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं मनोरम दृश्य पाहायला मिळतं आणि नवनवीन ठिकाणांना भेटी देता येतात. “आजीच्या पोतडीतल्या गोष्टी” आणि “आजी- आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी” या सुधा मूर्ती लिखित दोन लोकप्रिय पुस्तकांच्या यशानंतर आता त्याच मालिकेतील हा आणखी एक बालवाचकांना मंत्रमुग्ध करणारा आणि त्यांना एका अनपेक्षित वळणावर नेऊन ठेवणारा कथासंग्रह आला आहे.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45742916665602,"sku":"","price":196.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4090.jpg?v=1735369017"},{"product_id":"the-circle-of-life-by-sudha-murty","title":"The Circle Of Life By Sudha Murty","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eUttara Rao, Janaki Paranjape, Arvind Shah, K. Subba Rao and Sumitra Iyer first cross each other’s paths at Indian Institute of Science, Bangalore, in 1999. Coming from vividly different backgrounds, the five soon became friends. As they navigate relationships, careers and life, they vow to come back to the campus twenty-five years later. A story of hardships, perseverance, success and disappointment, the book examines the lives of five friends as they look back and reminisce on how life turned out. Life has indeed come to a full circle for them. Inspirational and poignant, The \u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eCircle of Life\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is a moving story of five friends as they deal with life’s great expectations.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Penguin","offers":[{"title":"Default Title","offer_id":45823534006530,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/719iaWmZP5L._SY385.jpg?v=1738306520"},{"product_id":"aaji-ajobanchya-potaditalya-goshti-by-sudha-murty-आजी-आजोबांच्या-पोतडीतल्या-गोष्टी","title":"Aaji Ajobanchya Potaditalya Goshti By Sudha Murty | आजी- आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878973563138,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3460_75f3b6cd-3d9f-4e08-9b5a-bc64a4efa326.jpg?v=1740034513"},{"product_id":"ajichya-potaditalya-goshti-by-sudha-murty-आजीच्या-पोतडीतल्या-गोष्टी","title":"Ajichya Potaditalya Goshti By Sudha Murty | आजीच्या पोतडीतल्या गोष्टी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला घेऊन बसते. ही नातवंडं तिच्या खेड्यात सुट्टी घालवायला आपल्या आजीकडे आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामट्यांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं. तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांद्यात रूपांतर होतं... एक राणी रेशमी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात... आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण करमणुकीबरोबरच त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर, या गोष्टींचा आनंद लुटू या!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878977626370,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/245_306e931f-ec48-403b-bfac-f59f66c1deb9.jpg?v=1740034509"},{"product_id":"astitva-by-sudha-murty","title":"Astitva By  Sudha Murty |","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुधा मूर्ती यांच्या विवेचक लेखणीतून साकारलेली, वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी. एका श्रीमंत,सुखवस्तू घरातल्या मुकेशची, त्याच्या अस्तित्वाची ही कहाणी. सुखी समाधानी मुकेशच्या जीवनात अचानक एक वादळ उठतं. तो कोण, कोणाचा मुलगा अशा कधीच न पडलेल्या प्रश्‍नांनी तो वेढला जातो. त्याचं आयुष्य पार बदलून जातं. एक बळकट कौटुंबिक बंध अचानक तुटून जातो. मानलेली नाती खरी की, रक्ताची नाती श्रेष्ठ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वत:च्या जन्माचा शोध घेता घेता मानवी जीवनातल्या कितीतरी अनोख्या वाटावळणांवरून त्याला जावे लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878990995714,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1412.jpg?v=1740120946"},{"product_id":"ayushyache-dhade-giravatana-by-sudha-murty-आयुष्याचे-धडे-गिरवताना","title":"Ayushyache Dhade Giravatana By  Sudha Murty | आयुष्याचे धडे गिरवताना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुधा मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद. \"बॉंबे टु बंगळुरू' ही पहिलीच कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. सुधा मूर्तींना आयुष्यात ज्या विविध व्यक्ती भेटल्या, ज्या प्रसंगातून त्यांना नवीन अनुभव मिळाला, ते सारे कथारूपाने त्यांनी मांडले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील, त्यांच्या नोकरीच्या कालखंडातील व इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक माणसं त्यांना भेटली, त्यातील काही यातील कथांमध्ये अवतरली आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878994895106,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/244_4dd6d82c-12dd-45b3-9989-4316cee7d0b7.jpg?v=1740120911"},{"product_id":"bakula-by-sudha-murty-बकुळा","title":"Bakula By  Sudha Murty | बकुळा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूकसं बकुळीचं फूल त्याला आठवणीनंं पाठवायची. तिचं पत्र आलं की, श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो गोड आठवणींमधे रमून जायचा. जणूकाही आत्ता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे, असा त्याला भास व्हायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावातला तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्त्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्शसुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एकेक फूल त्यानं जमा केलं होतं. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878997745922,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bakula-FC_748bfe87-f2c2-4dcd-877e-62624a5237bc.jpg?v=1740120955"},{"product_id":"dollar-bahu-marathi-by-sudha-murty-डॉलर-बहू-मराठी","title":"Dollar Bahu - Marathi By  Sudha Murty | डॉलर बहू - मराठी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eफार विचित्र आहे हा देश ! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्‍या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात, पण माघारी जायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं ! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय ? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45878999908610,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/247_d6743cdf-4fb6-40e1-9a7a-c6353cca96cf.jpg?v=1740121140"},{"product_id":"don-shinge-asalela-rushi-by-by-sudha-murty-by-leena-sohani-translators","title":"Don Shinge Asalela Rushi By By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | दोन शिंगे असलेला ऋषी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879032774914,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3583.jpg?v=1740121041"},{"product_id":"garudjanmachi-katha-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-गरुडजन्माची-कथा","title":"Garudjanmachi Katha By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | गरुडजन्माची कथा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात. \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879042375938,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2226.jpg?v=1740121009"},{"product_id":"gopichi-diary-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-गोपीची-डायरी","title":"Gopichi Diary By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | गोपीची डायरी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही कहाणी गोपी नावाच्या एका कुत्र्याची आणि त्याला दत्तक घेऊन आपल्या घरी आणणार्‍या एका प्रेमळ कुटुंबाची. सुधा मूर्ती यांच्या खास शैलीतून उतरलेल्या कहाणीतून हा गोपी कुत्रा स्वत:शीच बोलतो. सुरुवातीला छोटंसं पिल्लू असलेला गोपी नंतर मात्र जास्त खोडकर आणि खट्याळ होतो. त्याच्या आयुष्यात आणखी दोन सोबती कुत्रेसुद्धा येतात. गोपी हा खरंतर एक चिरंतन ऊर्जेचा आणि चैतन्याचा झराच. गोपीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो, की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्याला त्या दिवशी बसतो... त्याच्या आयुष्यात नवीन आकर्षणं निर्माण होतात आणि त्याला एक नवी मैत्रीणसुद्धा मिळते - आकर्षक अशी नोव्हा. ते दोघं मिळून त्यांचं स्वत:चं कुटुंब निर्माण करतात... सुधा मूर्तींच्या लेखनाचे चाहते असलेल्या आबालवृद्धांना हा गोपी खूप आनंद देऊन जाईल आणि आपल्या छोट्या पावलांनी त्यांच्या हृदयात शिरकाव करून, तिथे कायमचं स्थान मिळवून बसेल, यात शंकाच नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879066820866,"sku":"","price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3828.jpg?v=1740121091"},{"product_id":"goshti-manasanchya-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-गोष्टी-माणसांच्या","title":"Goshti Manasanchya By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | गोष्टी माणसांच्या","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणाया लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नव्या व्यवसाय सुरु करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... `मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते टू समृद्ध कर,` असं वचन आपल्या नातीकडून घेणाया, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणाया, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879081042178,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Goshti-Mansanchya-FC.jpg?v=1740121149"},{"product_id":"haravalelya-goshtiche-rahasya-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-हरवलेल्या-गोष्टीचे-रहस्य","title":"Haravalelya Goshtiche Rahasya By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | हरवलेल्या गोष्टीचे रहस्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"चौदा वर्षांची अनुष्का मागचे वर्षभर लॉकडाऊन मध्ये राहिलेली आहे. आता ती सोमनहळ्ळीमध्ये राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांच्या भेटीला निघालेली आहे. गेल्या खेपेला सोमनहळ्ळीला तिनं पुरातन पायऱ्यांची विहीर शोधून काढली होती. या तिच्या ‘हरवलेल्या मंदिराचे रहस्य’ च्या आठवणी अजून ताज्या आहेत. अखेर एकदा घराच्या चार भिंतींमधून बाहेर पडायला मिळाल्यामुळे अनुष्का खूष आहे. पण लवकरच ती आणखी एक रहस्य शोधून काढणार आहे, हे तिला कुठे माहीत आहे? फक्त याखेपेला ती तिच्या स्वतःच्याच घराण्याच्या इतिहासातील एक हरवलेला दुवा शोधून काढणार आहे. या पुस्तकातून लेखिकेनं प्रश्न विचारण्याचं आणि यांची समर्पक उत्तरं मिळवण्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा चित्रांनी आणि थक्क करणाऱ्या दृश्यांनी नटलेल्या या पुस्तकातून भारतातील सुप्रसिद्ध कथालेखिका सुधा मूर्ती आपल्याला विशाल अशा तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानं एका अविस्मरणीय प्रवासाला घेऊन जातात. \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879102832898,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3789.jpg?v=1740120938"},{"product_id":"haravlelya-mandirache-rahasya-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-हरवलेल्या-मंदिराचे-रहस्य","title":"Haravlelya Mandirache Rahasya By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | हरवलेल्या मंदिराचे रहस्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहस कथा. शहरात वाढलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी-आजोबांच्या गावी येते. खेड्यातलं संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो; पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, सहलीला जाणं, सायकल चालवायला शिकणं आणि नव्या मित्र-मंडळींबरोबर झालेली दोस्ती या सगळ्यात तिचे दिवस भराभर जाऊ लागतात... आणि एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्र-मंडळींबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एकदंत कथा ऐकलेली असते. निर्भय अनुष्का सोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879115677954,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1612.jpg?v=1740121032"},{"product_id":"kalpavrukshachi-kanya-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-कल्पवृक्षाची-कन्या","title":"Kalpavrukshachi Kanya By Sudha Murty By Leena Sohani (Translators)|  कल्पवृक्षाची कन्या","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपौराणिक ग्रंथांमध्ये स्त्रिया कमी आढळत असल्या, तरी त्यांच्या अंगची शक्ती, ऊर्जा आणि गूढता यांचं पानोपानी वर्णन आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण केल्याच्या कथाही आहेत. या कथासंग्रहात पार्वती,अशोकसुंदरी आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय स्त्रिया भेटीस येतात. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या या स्त्रिया स्वत:च्या नशिबाच्या शिल्पकारही होत्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879140122882,"sku":"","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3019.jpg?v=1740121113"},{"product_id":"mahashweta-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-महाश्-वेता","title":"Mahashweta By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| महाश्‍वेता","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eती अनुपम लावण्यवती,गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साया घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं — कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !.... .... पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला – ‘तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?....’ काय असते या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?.... कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाया संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी,यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879154114818,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/246.jpg?v=1740120969"},{"product_id":"parigh-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-परीघ","title":"Parigh By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | परीघ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपैसा आला की, माणूस का बदलतो? पैसा आला की, माणसाच्या अंतर्यामी दडलेले गुणअवगुण बाहेर येतात. पैसा नसताना दडलेले अवगुण; पैसा आला की, बाहेर येतात... पैसा हा एखाद्या रावकाचेसारखा असतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की, लोभी बनतो. अधाशी माणूस जमीनजुमला खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी बनतो. उदार माणूस दानी बनतो. ज्यांना पैशाचा मोह नाही, त्यांना जवळ पैसा असला काय किंवा नसला काय; काहीच फरक पडत नाही. पैशामुळे खयाखुया मानवी संबंधांचं दर्शन घडतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879169155330,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Parigh-FC.jpg?v=1740120992"},{"product_id":"pitrurun-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-पितृऋण","title":"Pitrurun By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| पितृऋण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसाचं आयुष्य ही एक अजब गुंतागुंत! नात्यांची, भावनांची आणि अतक्र्य घटनांची! काही नाती कोणतेही भावबंध निर्माण न करणारी, तर काही नकळत नात्यांचे बंध उरात जपणारी! काळाचा दीर्घ पडदा सरून गेल्यानंतरही एका अनोख्या नात्याची ओळख होते. मग... नियतीचा बळी ठरलेल्या पित्याची जबाबदारी स्वत:चं अघ्र्य देऊन पूर्ण करणाया कर्तव्यशील पुत्राचं अस्वस्थपण... आणि त्या पूर्ततेसाठी खंबीर उभी राहिलेली कन्या, यांचं अतूट नातं जपणारी पितृऋण! सुधा मूर्ती यांच्या वैचारिक, भावनाप्रधान लेखणीचा नवा आविष्कार!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879180722434,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pitrurun-FC.jpg?v=1740121158"},{"product_id":"punyabhumi-bharat-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-पुण्यभूमी-भारत","title":"Punyabhumi Bharat By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | पुण्यभूमी भारत","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. अनेक अनुभवांना आपण सर्वजण सामोरं जात असतो. पण माझ्यासारखीचा गरीब, श्रीमंत अशा विविध वर्गातील लोकांशी सतत संबंध येत असतो. त्यामुळे माझ्या अनुभवांची क्षितिजं विस्तारित झालेली आहेत. आपलं मन संवेदनशील असेल, आपल्याला आपले विचार स्पष्टपणे, नि:पक्षपाती वृत्तीनं मांडता येत असतील, आपल्या अंगी सूक्ष्म निरिक्षण-शक्ती असेल तर आपल्यापैकी कोणालाही लिहिता येऊ शकतं. मीही केवळ तेवढंच केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879192355074,"sku":"","price":161.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Punyabhumi-Bharat-FC.jpg?v=1740120951"},{"product_id":"samanyatale-asamanya-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-सामान्यांतले-असामान्य","title":"Samanyatale Asamanya By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| सामान्यांतले असामान्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुधा मूर्ती यांचं नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! उत्तर कर्नाटकातल्या या सर्व माणसांना स्वत:चं असं खास व्यक्तित्व आहे. तसेच ते सगळे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. यातील सर्व कथा म्हणजे टपोया, सुगंधी मोगयाच्या फुलांचा गजरा, अस्सल कर्नाटकी गोफात गुंफलेला! या ‘सर्वसाधारण’ माणसांमध्ये जाणवणारं ‘असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879203823874,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Samanyatale-Asamanya-FC.jpg?v=1740120996"},{"product_id":"sarpacha-sud-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-सर्पाचा-सूड","title":"Sarpacha sud By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| सर्पाचा सूड","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879228137730,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2138.jpg?v=1740121095"},{"product_id":"udha-murtinchya-balkatha-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-सुधा-मूर्तींच्या-बालकथा","title":"Sudha Murtinchya Balkatha By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | सुधा मूर्तींच्या बालकथा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"तुमच्या लक्षात आलंय, कांद्याला कसे खूप पदर असतात ते? आणि कांदा चिरत असताना तुमच्या आईच्या डोळ्यांतलं पाणी तुम्ही बघितलंय? कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळ्यांत पाणी का येतं, याचा उलगडा करणारी कथा उल्लेखनीय आहे. आंब्याची मधुर चव आपल्याला सर्वांनाच आवडते. उन्हाळ्यातील तप्त दिवशी आंबा आपली तहान आणि भूक भागवतो; पण आंब्याला त्याची ही मंत्रमुग्ध करणारी चव कुठून प्राप्त झाली असेल, असं कोडं तुम्हाला कधी पडलंय का? आंब्यात ही गोडी कशी आली याची कहाणी मोठी रोमांचकारी आहे. पृथ्वीचं जगावेगळं सौंदर्य, सुंदर सुंदर हिमाच्छादित अशी शिखरं आणि खोल समुद्र, रंगीबेरंगी फुलं आणि नानाविध प्रकारचे प्राणी हे सगळं पाहून तुमचं मन कधीतरी पृथ्वीवरच्या या सौंदर्यामुळे थक्क झालं असेल ना? पृथ्वीवरचं हे निसर्गसौंदर्य कुठून आलं, याची कहाणी खरोखर मनोवेधक आहे. खूप खूप वर्षांपूर्वी समुद्राचं पाणी गोड होतं आणि ते पिण्यायोग्य होतं. ते खारट कसं बनलं याची एक थक्क करणारी कथा आहे. भारताच्या लोकप्रिय लेखिकेने आपल्या अनन्यसाधारण, खेळकर आणि सरळ, साध्या शैलीत या कालातीत कथा आपल्यासाठी आणलेल्या आहेत. सुंदर सुंदर चित्रांनी नटलेली ही कथापुस्तिका बालवाचकांना सुधा मूर्ती यांच्या कथाविश्वाची ओळख करून देण्यासाठी अगदी योग्य आहे. \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879248027906,"sku":"","price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3948.jpg?v=1740121126"},{"product_id":"sukeshini-ani-itar-katha-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-सुकेशिनी-आणि-इतर-कथा","title":"Sukeshini Ani Itar Katha By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| सुकेशिनी आणि इतर कथा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुधा मूर्तींनी लिहिलेल्या बालकथांचं हे पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाया कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणाNया अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879302652162,"sku":"","price":161.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sukeshini-Aani-Etar-Katha-FC.jpg?v=1740120987"},{"product_id":"swargachya-vatevar-kahitari-ghadal-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-स्वर्गाच्या-वाटेवर-काहीतरी-घडलं","title":"Swargachya Vatevar Kahitari Ghadal By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्यापैकी प्रत्येकाकडेच एक कहाणी असते, जिच्यामुळे आपला जगण्यावरचा विश्वास दृढ होतो... सुधा मूर्तींच्या पुस्तकाच्या पानोपानी भेटणारी माणसं आणि त्यांच्या रोमहर्षक कहाण्या आपल्या मनावर कायमचा ठसा ठेवून जातात. पण या सर्व पुस्तकांमधून आपल्याला जी कुणी माणसं भेटतात, ती सुधा मूर्तींच्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेली माणसं असतात. पण तशाच प्रकारच्या कहाण्या इतरांच्याही आयुष्यात घडल्या असतील. प्रत्येकाकडेच सांगण्यासारखं काहीतरी असेल. ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा निवडल्या. आपण आपल्या खडतर, कष्टप्रद अशा दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना हे जीवन आशा, श्रद्धा, दयाळूपणा आणि आनंद यांनी किती ओतप्रोत भरलेलं असतं, याची प्रचीती या कथा वाचून आपल्याला येते. अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशा कथांचा हा संग्रह, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाला मंत्रमुग्ध करून टाकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879323394306,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1611.jpg?v=1740120974"},{"product_id":"teen-hajar-take-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-तीन-हजार-टाके","title":"Teen Hajar Take By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| तीन हजार टाके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879340531970,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2126.jpg?v=1740121077"},{"product_id":"thailibhar-goshti-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-थैलीभर-गोष्टी","title":"Thailibhar Goshti By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| थैलीभर गोष्टी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879352721666,"sku":"","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/241.jpg?v=1740121046"},{"product_id":"trishanku-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-त्रिशंकू","title":"Trishanku By Sudha Murty By Leena Sohani (Translators) | त्रिशंकू","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरामाच्या सूर्यवंशातील दिलीप राजाला देवांनी तू काही काळ निपुत्रिक होशील असा शाप दिला होता...कशामुळे मिळाला होता त्याला शाप?...कसा दूर झाला तो शाप?...समुद्राची निर्मिती कशी झाली...रावणाला चार जणांकडून कोणते चार शाप मिळाले होते...विजयादशमीला आपण सोनं का लुटतो...कसं झालं राम-लक्ष्मण-भरत-शत्रु्घ्न यांचं महानिर्वाण...चंद्रवंशाचे दोन भाग कसे झाले...शबरासुराने कृष्णाचा पुत्र प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं...तरी तो वाढत होता शबरासुराच्या महालात...कसा? बाणासुराची रूपवती कन्या उषा हिच्या स्वप्नात एक देखणा तरुण रोज येतो आणि स्वप्नातच ती त्याच्याशी विवाह करते... कोण असतो तो तरुण?...सत्यवती अंध भिकारी असलेल्या वर्धनशी लग्न का करते?...तिला वैभव कसं प्राप्त होतं?...उदंक ऋषींना श्रीकृष्ण काय वर देतो...श्रीकृष्णाची महानिर्वाणाकडे वाटचाल कशी होते...हे जाणून घेण्यासाठी वाचा रामायणातील आणि महाभारतातील असंख्य कथांनी-उपकथानकांनी सजलेला वाचनीय कथासंग्रह ‘त्रिशंकू.’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879362519298,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2620.jpg?v=1740121162"},{"product_id":"wise-and-otherwise-marathi-by-sudha-murty-by-leena-sohani-translators-वाइज-अँड-अदरवाइज","title":"Wise And Otherwise (Marathi) By Sudha Murty By Leena Sohani (Translators)| वाइज अँड अदरवाइज","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879370711298,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/238.jpg?v=1740121104"},{"product_id":"sudha-murty-combo-set-28-books","title":"SUDHA MURTY COMBO SET - 28 BOOKS","description":"\u003cp\u003eSr.No.    Book Name    Price\u003cbr\u003e1    AAJI AAJOBANCHYA POTADITALYA GOSHTI    280\u003cbr\u003e2    AAJICHYA POTADITALYA GOSHTI    200\u003cbr\u003e3    AAJOBANCHYA POTADITLYA GOSHTI    230\u003cbr\u003e4    ASTITVA    150\u003cbr\u003e5    AYUSHYACHE DHADE GIRAVTANA    200\u003cbr\u003e6    BAKULA    200\u003cbr\u003e7    DOLLAR BAHU    200\u003cbr\u003e8    DON SHINGE ASALELA HRUSHI    220\u003cbr\u003e9    GARUDJANMACHI KATHA    220\u003cbr\u003e10    GOPICHI DIARY    495\u003cbr\u003e11    GOPICHI DIARY- EK UNAD DIWAS    225\u003cbr\u003e12    GOSHTI MANSANCHYA    200\u003cbr\u003e13    HARAVALELYA GOSHTICHE RAHASYA    240\u003cbr\u003e14    HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA    200\u003cbr\u003e15    KALPAVRUKSHACHI KANYA    230\u003cbr\u003e16    MAHASHWETA    200\u003cbr\u003e17    PARIGH    250\u003cbr\u003e18    PITRURHUN    140\u003cbr\u003e19    PUNYABHUMI BHARAT    190\u003cbr\u003e20    SAMANYATALE ASAMANYA    220\u003cbr\u003e21    SARPACHA SOOD    220\u003cbr\u003e22    SUDHA MURTYNCHYA BALKATHA    475\u003cbr\u003e23    SUKESHINI AANI ITAR KATHA    190\u003cbr\u003e24    SWARGACHYA VATEVAR KAHITARI GHADALE    200\u003cbr\u003e25    TEEN HAJAR TAKE    220\u003cbr\u003e26    THAILIBHAR GOSHTI    240\u003cbr\u003e27    TRISHANKU    200\u003cbr\u003e28    WISE \u0026amp; OTHERWISE    220\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883239301378,"sku":"","price":4260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3750.jpg?v=1740207608"},{"product_id":"the-circle-of-life-by-sudha-murty-leena-sohanitranslator","title":"The Circle Of Life By Sudha Murty, Leena Sohani(Translator)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"उत्तरा राव, जानकी परांजपे, अरविंद शाह, के. सुब्बा राव आणि सुमित्रा अय्यर यांची पहिली भेट १९९९ साली बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये होते. अत्यंत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले हे पाचजण लवकरच चांगले मित्र बनतात. नाती, करिअर आणि आयुष्याचा प्रवास करत असताना, ते एकमेकांना वचन देतात—पंचवीस वर्षांनंतर पुन्हा या कॅम्पसवर भेटायचं. संघर्ष, चिकाटी, यश आणि निराशा यांची ही गोष्ट, या पाच मित्रांच्या आयुष्याचा मागोवा घेत त्यांच्या आठवणींमधून आयुष्याने कोणते वळण घेतले, हे उलगडते. त्यांच्या दृष्टीने आयुष्य एक चक्र पूर्ण करून परत त्या सुरुवातीच्या बिंदूवर आलेले असते. प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी, द सर्कल ऑफ लाइफ ही आयुष्यातील मोठ्या अपेक्षांचा सामना करणाऱ्या पाच मित्रांची एक भावनिक आणि मन हेलावणारी कथा आहे.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Sudha Murt","offer_id":46521491095810,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4176.jpg?v=1752044136"},{"product_id":"how-to-be-happy-with-who-you-are-by-sudha-murthy-english","title":"How To Be Happy With Who You Are By Sudha Murthy (English)","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e‘True happiness comes not from comparison, but from accepting who we are.’\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eThe young Princess of the Sea wants to be like her friends―strong like a mountain, sweet like a river, or full of life and colour like a tree. But with each change, she faces new surprises.\u003cbr\u003e\u003cbr\u003eWith the turn of seasons and shifting forms, she learns a gentle lesson: you shine brightest as yourself.\u003cbr\u003eA magical, thoughtful tale about nature, change and self-acceptance, this charming chapter book is the ideal introduction to the imaginative world of Sudha Murty.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Puffin","offers":[{"title":"Puffin Books \/ Sudha Murthy","offer_id":46667628773634,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81Oo6fpigLL._SY425.jpg?v=1755154545"},{"product_id":"the-magic-of-the-lost-earrings-by-sudha-murthy-english","title":"The Magic Of The Lost Earrings By Sudha Murthy (English)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eWhen a pair of antique earrings lands in Nooni’s hands, her quiet holiday with Ajja and Ajji turns into the adventure of a lifetime. From the sacred ghats of Ujjain to the buzzing streets of Amritsar, the storied lanes of Delhi and all the way to London, Nooni follows a trail shimmering with mystery and history.\u003cbr\u003e\u003cbr\u003eEach step brings her face to face with forgotten tales of love and loss, revealing that true treasures aren’t just beautiful―they hold memories worth keeping alive.\u003cbr\u003e\u003cbr\u003eTold in India’s favourite storyteller’s inimitable style,\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eThe Magic of the Lost Earrings\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is a heart-warming tale of togetherness, courage and heritage―one that lingers\u003cbr\u003elong after the last page.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Puffin","offers":[{"title":"Puffin \/ Sudha Murthy \/ English","offer_id":46887337296130,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71g9IrN24cL._SY425.jpg?v=1760856954"},{"product_id":"haravlelya-karnaphulanche-rahasya-by-sudha-murty-हरवलेल्या-कर्ण-फुलांचे-रहस्य","title":"Haravlelya Karnaphulanche Rahasya By Sudha Murty (हरवलेल्या कर्ण फुलांचे रहस्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"अनुष्काच्या हातात प्राचीन कानातल्यांची एक जोडी लागते आणि अज्जा-अज्जीसोबतचा तिचा शांत सुट्टीचा काळ आयुष्यातील सर्वात मोठ्या साहसात बदलतो. उज्जैनच्या पवित्र घाटांपासून अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत, दिल्लीच्या ऐतिहासिक गल्लीबोळांतून ते थेट लंडनपर्यंत, अनुष्का रहस्य आणि इतिहासाने उजळलेल्या धाग्याचा पाठपुरावा करते. प्रत्येक टप्प्यावर तिला प्रेम आणि विरहाच्या विस्मृतीत गेलेल्या कथा भेटतात आणि खरे खजिने फक्त सुंदर नसतात, तर जपून ठेवण्यासारख्या आठवणीही सांभाळतात, हे तिला उमजते. भारतातील लाडक्या कथाकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सांगितलेली द मॅजिक ऑफ द लॉस्ट इअरिंग्स ही एकात्मतेची, धैर्याची आणि वारशाची हृदयस्पर्शी कथा आहे, जी शेवटचे पान वाचूनही मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Sudha Murty \/ Marathi","offer_id":47468740411650,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4226.jpg?v=1773465075"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sudha-murty-1.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}