{"title":"Shrimant Mane","description":"","products":[{"product_id":"ha-desh-aamacha-ahe-by-shrimant-mane-हा-देश-आमचा-आहे","title":"Ha Desh Aamacha Ahe By Shrimant Mane  (हा देश आमचा आहे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष स्पष्टपणे जिंकला नाही आणि कोणाचा पूर्ण पराभवदेखील झाला नाही. हे नेमके झाले तरी कसे आणि मग जिंकले तरी कोण? अर्थातच, कोट्यवधी भारतीय मतदार जिंकले. कोट्यवधी मतदारांनी चारशे जागांचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाला 'आस्ते कदम'चा इशारा दिला, तर आधीच्या दोन निवडणुकांमध्ये हतोत्साही झालेल्या विरोधकांना मतदारांनी नवी उमेद व उर्जा दिली. या समतोल जनादेशातून मतदार जिंकले हा निष्कर्ष, हे अनुमान किंवा विधान भाबडेपणातून केले आहे का? अर्थातच नाही. खंडप्राय भारतातील या लोकसभा निवडणूक निकालाचा लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजे लसावि सांगतो की, मोठा निर्णायक राष्ट्रीय मुद्दा निवडणुकीत नसल्यामुळे देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश मिळून छत्तीस प्रांतांमध्ये स्थानिक समीकरणेच प्रभावी ठरली. सोबतच, राज्यघटना बदलण्याची भीती, शेतकरी व तरुण मतदारांमधील नाराजी, गरिबी व महागाई अशा जगण्यामरण्याच्या मुद्द्यांवर लोकांनी सत्ताधाऱ्याांच्या विरोधात मतदान केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Shrimant Mane","offer_id":46180062462210,"sku":"","price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/419LwTtGKNL._SY466.jpg?v=1748588122"},{"product_id":"anibaniche-nayak-aani-khalnayak-by-shrimant-mane-आणीबाणीचे-नायक-आणि-खलनायक","title":"Anibaniche Nayak Aani Khalnayak By Shrimant Mane (आणीबाणीचे नायक आणि खलनायक)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eइंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण या आणीबाणीतील दोन प्रमुख नेत्यांचे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eचरित्र, चारित्र्य, स्वभाव, जवळीक, दुरावा आणि महत्त्वाकांक्षांचे द्वंद्व या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसाऱ्यांची ही विस्तृत कहाणी आहे. सत्ता आणि महात्म्य यातील चढाओढीची ही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअभूतपूर्व गाथा आहे. व्यक्तिगत संबंधातला संशयास्पद गोडवा आणि राजकारणातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eटोकाचा दुरावा यांची ही गोष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणीबाणीचे समर्थन कुणी करणार नाही. मात्र ती लावली जाण्यामागची कारणे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहत्त्वाची आहेत. राजकीय भ्रष्टाचार आणि बांगला विजयामुळे इंदिरा गांधींना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमिळालेली राष्ट्रीय व जागतिक मान्यता आणि त्यावर उफाळलेला त्यांच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वपक्षीय नेत्यांचा रोष या गोष्टी येथे लक्षात घ्याव्या अशा आहेत. महागाई व\u003c\/span\u003e\u003cspan\u003eबेरोजगारीचे संकट, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाने संतापलेले देशभरचे भांडवलदार \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि म्हातारपणाकडे झुकलेल्या काँग्रेसमधील पुढाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्टीही यात महत्त्वाच्या ठराव्यात. 'आणीबाणी हा नाइलाज आहे' हे स्वतः \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंदिरा गांधींनीच म्हटले आणि 'सरकारविरोधी आंदोलन करण्यात आपली चूक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eझाली' ही जयप्रकाशांनी विनोबांजवळ दिलेली कबुली साऱ्या घटनांवर वेगळा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रकाश टाकणारी आहे. त्याच वेळी संघाचे सरसंघचालक देवरस यांनी इंदिरा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगांधींना दोन पत्रे लिहून मागितलेली माफी; एकनाथ रानडे, दत्तोपंत ठेंगडी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि भाऊराव देवरस यांनी संजय गांधींजवळ लिहून दिलेले 'शरणपत्र' \u003c\/span\u003e\u003cspan\u003e(डॉक्युमेंट ऑफ सरेंडर) हेही यातच पाहावे असे आहे. मी स्वतः आणीबाणीत \u003c\/span\u003e\u003cspan\u003e१४ महिने तुरुंगात होतो आणि बाजपेयींसारखा विरोधी नेता दीर्घ काळपर्यंत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपॅरोलवर कसा राहिला, ही गोष्ट तेव्हाही आम्हा राजबंद्यांना कळली होती!\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया साऱ्या प्रश्नांमागे असलेली या दोन नेत्यांच्या मानसिकतेची आरंभापासूनची \u003c\/span\u003e\u003cspan\u003eघडण, त्यांनी अनुभवलेल्या राजकीय आपदा व त्यासोबतच मिळवलेली अमाप \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलोकप्रियताही श्रीमंत माने यांनी प्रदीर्घ स्वरूपात लिहिली आहे. विसाव्या शतकाचा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंक्षिप्त राजकीय इतिहास ठरावा, असे हे लिखाण आहे. त्यातल्या प्रत्येक विधानाची \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रमाणे त्यासोबत आहेत. त्यामुळे ती विश्वसनीय ठरणारीही आहेत.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eतात्पर्य, आणीबाणीबाबत प्रकाशित व अप्रकाशित, जाहिरात केलेल्या व दडवलेल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसगळ्या घटनांचा यातील तपशील वाचकांना अभ्यासनीय वाटावा व या घटनाक्रमांकडे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपाहण्याची वेगळी दृष्टी देणारा आहे. महाराष्ट्र या दोन दर्शनांचे सत्याग्रहासारखेच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्वागत करील याविषयीचा माझा विश्वास वाचक खरा ठरवतील ही अपेक्षा आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eश्रीमंत माने यांच्या अभ्यासू वृत्तीचे अभिनंदन!\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रा. सुरेश द्वादशीवार\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Shrimant Mane \/ Marathi","offer_id":47148608192770,"sku":null,"price":493.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_18be0c8a-2766-4172-bebb-84bb56181d41.jpg?v=1766040927"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/shrimant-mane.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}