{"title":"Scion Publication Pvt. Ltd.","description":"","products":[{"product_id":"punjabi-kathavishwa-by-bhagwant-kshirsagar-पंजाबी-कथाविश्व","title":"Punjabi Kathavishwa By Bhagwant Kshirsagar  (पंजाबी कथाविश्व)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवस्तुतः लेखक लिहितो म्हणजे आपले अनुभव तो आपल्यापरीनं, आपल्या पद्धतीनं शब्दबद्ध करतो हाच एकप्रकारचा अनुवाद आहे. अनुवादाची ही पहिली प्रक्रिया अनादी आहे. परभाषांमधील अभिव्यक्ती परस्परांत उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर. भाषांतरामुळं परभाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसा भाषांतर-व्यवहार गुंतागुंतीचा व संश्लिष्ट असला तरी सरावानं तो साध्य करता येतो. मराठीचा तेलुगू, कानडी, कोंकणी व गुजराती या शेजारील भाषाभगिनींबरोबर भाषांतर-व्यवहार प्रत्यही पुरेशा प्रमाणात होताना दिसतो परंतु पंजाबीसारख्या सुदूरवर्ती भाषेबरोबरचा मराठीचा भाषांतर-व्यवहार तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या दृष्टीनं भगवंत क्षीरसागर यांनी ‘पंजाबी कथाविश्व'च्या रूपानं सादर केलेला हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. या कथा वाचताना, पंजाबी कथेचा बाज तितक्याच समर्थपणे मराठीत आणण्यात भाषांतरकारानं आपलं पूर्ण कसब पणाला लावल्याचं प्रकर्षानं जाणवतं. परकीय आक्रमणांच्या सावटाखाली राहिलेला पंजाबी माणूस झुंजार व लढाऊ बनला हे खरं पण त्याच दणकट व रांगड्या पंजाबी माणसाच्या मनातील तरल भाव भावना, हरित व धवलक्रांतीनं स्फुरण पावलेली उत्फुल्लता, दलित जाणीवा, सामाजिक जाणीवा, फाळणीच्या मरणप्राय यातना आणि स्थलांतरितांचं अनोखं संवेदनविश्व यांच्या कल्लोळाचा एक व्यामिश्र गोफ या कथांमधून उलगडत जातो, व्यथा-वेदनांची व हर्षा-मर्षाची एक चित्रमालिका डोळ्यांसमोरून सरकत राहते. या अर्थानं पंजाबी कथांचा हा मराठी अनुवाद प्रयास म्हणून धाडसी तर आहेच पण ऐतिहासिकही आहे. त्यासाठी भगवंत क्षीरसागर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. - प्रकाश भातम्ब्रेकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018389311746,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61XvHp_0v6L._SY522.jpg?v=1742799354"},{"product_id":"vasant-keshavanchi-katha-by-dr-nagnath-kottapalle-वसंत-केशवांची-कथा","title":"Vasant Keshavanchi Katha By Dr. Nagnath Kottapalle (वसंत केशवांची कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या कथालेखनातून सतत नवे काही देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखकांपैकी वसंत केशव पाटील हे एक महत्त्वाचे कथालेखक आहेत. त्यांची प्रत्येक कथा त्यांच्या आधीच्या कथेपेक्षा वेगळी असते. मराठी कथासृष्टीमध्येही ती वेगळी असते. म्हणजे त्यांच्या कथालेखनावर कोणाचा प्रभाव दिसत नाही. (तसेच त्यांच्या कथेचे कोणाला अनुकरण करता येईल असेही वाटत नाही.) त्यांची कथा ही त्यांची स्वतःची कथा असते. त्यांच्या कथेला खास 'वसंत केशव टच' असतो. त्यांच्या कथेचे' सर्वप्रथम जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांमध्ये भक्कम असे कथानक नसते, तर त्याचा एक बारीकसा पण बळकट धागा असतो. त्या आधाराने संपूर्ण समूहाची संस्कृती प्रकट करणे लेखकाला महत्त्वाचे वाटते. म्हणून त्यांची कथा एकाच वेळी एका किंवा काही व्यक्तींवर केंद्रित झालेली असूनही त्या पलीकडच्या किती तरी गोष्टी प्रकट करते. त्यातून एक मोठे जीवनविश्व आकाराला येत जाते. एक व्यापक, बहुपदरी पट उभा राहतो. वसंत केशव पाटील ज्या जीवनाचे चित्रण करू पाहतात, ते जीवन प्रामुख्याने ग्रामीण आहे. ग्रामीण परिसर, तिथली माणसे, तिथली संस्कृती, तिथले सारे वातावरण आणि तिथली वैशिष्ट्यपूर्ण बोली वसंत केशव पाटील यांच्या कथांमधून प्रकट होत जाते. कथांची भाषा कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील बोली आहे. या बोलीची म्हणून एक प्रत्ययकारिता आहेच पण त्यांच्या शैलीचा विशेष असा की, ग्रामसंस्कृतीतील असंख्य तपशील देणारी आणि संवेदना जागवणारी अशी ही शैली आहे. भावावस्था सूचित करणाऱ्या व्यक्तीच्या कृती, कोल्हापूर-सांगली भागातील विशिष्ट अशा म्हणी (सशाला खळगा जामीन), वाक्प्रचार (सोताची पात घिवून दाल्ल्याच्या पातीला बसणे) यामुळे वसंत केशव पाटील यांची कथा अधिकाधिक प्रभावी होत जाते. समर्थ होत जाते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018395504898,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81lqHCHvsHL._SY466.jpg?v=1742799349"},{"product_id":"aadhunik-bharatatil-aadya-krushitadnya-jotirao-govindrao-phule-by-dr-r-d-shinde-आधुनिक-भारतातील-आद्य-कृषीतज्ञ-जोतिराव-गोविंदराव-फुले","title":"Aadhunik Bharatatil Aadya Krushitadnya Jotirao Govindrao Phule By  Dr. R. D. Shinde (आधुनिक भारतातील आद्य कृषीतज्ञ जोतिराव गोविंदराव फुले)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसन १८८३ साली महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेला 'शेतकऱ्याचा असूड' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या भौतिकवादी द्वंद्वात्मक अशा ऐतिहासिक दृष्टिकोनाचा आणि ज्ञानाच्या भौतिक ताकदीचे महत्त्व मांडणारा पायाभूत ग्रंथ आहे. साम्राज्यवादाचे शोषक स्वरूप, शेतकरी आणि श्रमिक जातींच्या पिळवणूकीचा आशय आणि स्वरूप, पर्यावरणाचे संतुलन आणि ते समृद्ध करण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना, शेती आणि पाणी संबंध आणि समन्यायी पाणी वाटपाचा पर्याय या सर्व अंगांनी केलेले विश्लेषण या ग्रंथात आहे. जगात पहिल्यांदाच असा ग्रंथ लिहिला गेला आहे. शेतीची समृद्धी आणि नव्या पद्धतीच्या पर्यावरणपूरक शेती उद्योगांचे पर्याय जोतीरावांनी पुढे आणले आणि आजही उपयुक्त होईल असा दृष्टिकोन मांडला. आज असे पर्याय अमलात आणण्याची गरज आहे. डॉ. आर. डी. शिंदे यांनी 'आधुनिक भारतातील आद्य कृषीतज्ज्ञ जोतीराव गोविंदराव फुले' या छोटेखानी ग्रंथात या संदर्भात सघन मांडणी केली आहे. त्यामुळे या ग्रंथाची दखल ग्रामीण श्रमिक जाती आणि वर्गांबरोबरच धोरणात्मक पातळीवर सुद्धा घेतली जाईल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018400354562,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61lBr3xpgNL._SY522.jpg?v=1742799308"},{"product_id":"dnyaneshwaritil-jeevsrushti-by-manisha-phadke-ravin-thatte-uma-patki-ज्ञानेश्वरीतील-जीवसृष्टी","title":"Dnyaneshwaritil Jeevsrushti By Manisha Phadke, Ravin Thatte, Uma Patki (ज्ञानेश्वरीतील जीवसृष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरीत आहे तेवढे जीवसृष्टीचे वैविध्यपूर्ण वर्णन आणि दर्शन जगातल्या कुठल्याही दुसऱ्या ग्रंथात नाहीच नाही. शेवटी तत्त्वज्ञान ही गोष्ट माणूस नावाच्या जीवाला सांगितली जात असली, तरी जैविकता ही गोष्ट वनस्पती आणि इतर प्राण्यांमध्ये देखील उपस्थित असते. त्या जीवांचे आयुष्य माणसाइतके प्रगल्भ नसेलही, परंतु त्यांच्या स्वभावातले आणि वर्तनातले गुणदोष आपल्यातही असतात आणि त्यांची उदाहरणे देऊन ते माणसाला दाखवून जर समजावून सांगितले तर तत्त्वज्ञान समजणे जास्त सुकर होते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. ह्या सर्वसमावेशकतेमुळे तो ग्रंथ जास्त रसपूर्ण, वाचनीय, वेधक आणि असामान्य झाला आहे हे निर्विवाद आहे. जीवसृष्टीचा एक विशिष्ट अधिवास आहे आणि त्यात ढवळाढवळ करू नये हे आता सगळ्यांनाच पटले आहे. तसेच प्राण्यांचे आणि त्यांच्या शरीराचे उदाहरण देऊन माणसांना हिणवणे आता शिष्टसंमत नाही. हे पुस्तक संकलित करताना ह्या बाबी जेव्हा ध्यानात घेतल्या गेल्या तेव्हा ज्ञानेश्वरकालीन समजुती निराळ्या होत्या आणि त्या त्याही पूर्वीपासून प्रचिलत होत्या हे ध्यानात घ्यावे लागले. महाभारतात सपर्सत्रात सरपटणाऱ्या प्राण्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला गेल्याची कथा आहे. (लेखकांच्या प्रस्तावनेतून\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018410217730,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61mxio3-yoL._SY466.jpg?v=1742799341"},{"product_id":"shriramagraja-shanta-by-n-r-patil-श्रीरामाग्रजा-शांता","title":"Shriramagraja Shanta By N. R. Patil (श्रीरामाग्रजा शांता)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018413265154,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_0519ead6-942e-4b53-9a12-6ed471cb5d58.png?v=1742626511"},{"product_id":"bharatiya-strivadache-pranete-jotirao-govindrao-phule-by-ramesh-shinde-भारतीय-स्त्रीवादाचे-प्रणेते-जोतिराव-गोविंदराव-फुले","title":"Bharatiya Strivadache Pranete Jotirao Govindrao Phule By Ramesh Shinde (भारतीय स्त्रीवादाचे प्रणेते जोतिराव गोविंदराव फुले)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018414936322,"sku":"","price":94.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31aMT7yjugL.jpg?v=1742799324"},{"product_id":"tarabai-shinde-likhit-stree-purush-tulana-by-dr-nagnath-kottapalle-ताराबाई-शिंदे-लिखित-स्त्री-पुरुष-तुलना","title":"Tarabai Shinde Likhit Stree Purush Tulana By Dr. Nagnath Kottapalle  (ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018419556610,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/319Z9FecCeL._SY466.jpg?v=1742799329"},{"product_id":"keshavsutanchi-khandit-kavita-by-vasant-keshav-patil-केशवसुतांची-खंडित-कविता","title":"Keshavsutanchi Khandit Kavita By Vasant Keshav Patil (केशवसुतांची खंडित कविता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएळाद्या ग्रंथाला ब्लर्ब किंवा पाठराखण लिहिण्याची (म्हणजे लिहून घेण्याची किंवा लिहून देण्याची) प्रशंसनीय प्रथा तशी सतातन आहे. मलपृष्ठावरील मजकुरात ग्रंथाचे मर्म वा वर्म बहुधा थोर्थोर वडीलधारी मंडळी लिहीत आली आहेत. अर्थात् डोळे झाकून वगैरे कारण उतारवयात अशा मंडळींचे चर्मचक्षू आणि अंतश्चक्षूही अधू झालेले असतात. ईश्वरेच्छेपुढे कुणाचे काय चालते। आणखी एक असे की ही मंडळी साठीच्या सत्तरीच्या बांधांवर डुगडुगत उभी असतात. अंगावरील धडुतांचेही त्यांना धड भान नसते. आपण काय बोलतो, लिहितो हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. अशा वेळी त्यांपैकी कुणाच्याही गळ्यात पडून ब्लर्बसाठी गळ घालणे हा अमानुष अपराध आहे, असे वाटते. यातून मुक्त होण्यासाठी खरे तर मलपृष्ठ कोरेच असावे असे आमचे प्रच्छन्न मत आहे. पण परंपरेची कास न सोडणाऱ्या आमच्या अभिजात स्थूलबुद्धी सुस्वभावामुळे आपणच काहीतरी गरगटणे हेच आमचे नियत कर्तव्य ठरत नाही काय । कर्तव्याला जागण्याच्या अंतःस्फूर्त प्रेरणेने आम्हीच हा मजकूर गिचबिडला आहे. आम्हाला तरी गोड वाटतो आहे. तुम्हाला तो तसा वाटला नाही तर तो तुमचा इंद्रियदोष. सहज मनात येते की हयातभर संशोधनादीच्या खातवड्यात अहर्निश गाडून घेतल्यामुळे आम्ही जणू अपृष्ठवंशीय प्राणिमात्रात स्थित्यंतरित झालो आहोत; तेव्हा ज्याला पाठच नाही, त्याची पाठराखण कसली व कशासाठी ! कुणाला काही सांगण्यात हशील नाही. आमची पाठ थोपटून आम्हाला तोंडघशी पाडणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कुणा अनामिकाला आमची पाठ थोपटण्याची संधी आम्ही कधी दिली नाही. तेव्हा आमची पाठ म्हटल्यावर ती आम्हीच का नाही थोपटणार !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018421031170,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/712u_TJ-bBL._SY466.jpg?v=1742799314"},{"product_id":"vachansanskruti-by-nagnath-kottapalle-वाचनसंस्कृती","title":"Vachansanskruti By Nagnath Kottapalle (वाचनसंस्कृती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'वाचनसंस्कृती' ही संज्ञा वापरत असताना संपूर्ण साहित्यव्यवहार किंवा ग्रंथव्यवहार आपल्या डोळ्यांपुढे असतो. लेखकापासून सुरू होणारी ही प्रक्रिया वाचकापर्यंत येताना प्रकाशक, मुद्रक, संपादक, ग्रंथ वितरक, मुद्रितशोधक, चित्रकार इत्यादी अनेक घटकांना स्पर्श करीत विकसित होत जाते. प्रक्रियेचा आढावा घेण्याचा प्रयास म्हणजे 'वाचनसंस्कृती' हे पुस्तक. या सर्व मध्ययुगापासून आधुनिक कालखंडापर्यंत या प्रक्रियेचे स्वरूप अनेक अंगांनी बदलत गेले. पूर्वी ‘श्रोता’ असणारा बहुसंख्य वर्ग हळूहळू वाचक बनत गेला. या बदलांना तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांची जशी पार्श्वभूमी होती तसाच त्यांना सामाजिक- वैचारिक स्थित्यंतराचा मोठा आयामही होता. बदलांची ही प्रक्रिया आजही चालूच आहे कारण तंत्र सातत्याने विकसित होत आहेच, परंतु त्याबरोबर सामाजिक स्थित्यंतरेही वेगवेगळ्या स्वरूपात या वाचनसंस्कृतीवर बरे वाईट परिणाम करत आहेत. इतिहास, सामाजिक चळवळी, वैचारिक स्थित्यंतरे, राजकारण आणि शासकीय धोरणे, शैक्षणिक बदल, भौतिक बदल, बदललेला सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवेश या सर्व घटकांच्या वाचनसंस्कृतीवर होत असणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांचा परामर्ष हे पुस्तक घेते आणि त्याचबरोबर भविष्यकालीन अनेक शक्यतांचे संसूचनही करते. मराठी भाषा आणि संस्कृती, वाचनसंस्कृती आणि एकूणच ग्रंथव्यवहार यांच्याशी आपले जैविक नाते आहे, असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018422669570,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61upGKgzTlL._SY466.jpg?v=1742799361"},{"product_id":"sahityatil-upeksheche-samajshastra-by-nagnath-kottapalle-साहित्यातील-उपेक्षेचे-समाजशास्त्र","title":"Sahityatil Upeksheche Samajshastra By Nagnath Kottapalle (साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनाच्या एखाद्या क्षेत्रातील कार्य असो की ललित- वैचारिक लेखन, महत्त्वाचे काम करूनही काही व्यक्तींच्या वाट्याला उपेक्षाच येते. लेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर म. फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी यांच्यापासून किरण नगरकर, बाबूराव बागूल यांच्यापर्यंत अनेक उदाहरणे या संदर्भाने सांगता येतील. उपेक्षा वाट्याला येण्याची काही सामाजिक कारणे असू शकतात का? असतील तर ती नेमकी कोणती ? ही उपेक्षा अनवधानाने घडते की ठरवून केली जाते की एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा ती अपरिहार्य परिणाम असते? यामध्ये समीक्षक, वाङ्मयेतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक्रम ठरविणारे विद्वान इत्यादी घटकांची जबाबदारी किती आणि कोणती ? या सर्व घटकांचा नेमका काय परिणाम होतो ? ते कसे कार्यरत होतात? 'का' कार्यरत होतात? यामध्ये सांस्कृतिक- सामाजिक- वाङ्मयीन कार्य करणाऱ्या संस्थांची भूमिका काय असते? या सर्व घटकांवर अन्य घटकांचा दबाव असू शकतो का ? तसे असेल तर त्यातून निर्माण होणारी सत्तास्थाने कोणती ? त्यातून निर्माण होणारे ताणतणाव कोणते? वाङ्मयीन गुणवत्तेचे काही निकष असू शकतात का ? ते कसे ठरतात? ते सोयीने ठरवण्यासाठी मुद्दाम काही सिद्धांत तयार केले जातात काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयासातून या पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत असणारे 'साहित्यातील उपेक्षेचे समाजशास्त्र' अभ्यासू वाचकांना नवीन दिशा दाखवणारे आणि अभ्यासासाठी नवीन दालन खुले करणारे ठरेल यात शंकाच नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018439184642,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71WCyxkvrTL._SY466.jpg?v=1742885931"},{"product_id":"vishwavasuchi-nirupane-nave-lalitgadya-by-vishwas-vasekar-विश्वावसूची-निरूपणे-नवे-ललितगद्य","title":"Vishwavasuchi Nirupane : Nave Lalitgadya By Vishwas Vasekar (विश्वावसूची निरूपणे : नवे ललितगद्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eललितगद्य हा लेखकांसाठी जेवढा सोपा तितकाच त्याच्या समीक्षकांसाठी अत्यंत आव्हानात्मक वाङ्मयप्रकार आहे. वेद जसे परमेश्वराचे वर्णन ‘नेति नेति’च्या भाषेत करतात तसे समीक्षकांना 'हा म्हणजे कथा नाही', 'हा म्हणजे कविता नाही' अशा भाषेत याच्याबद्दल बोलावे लागते. वसेकरांनी प्रस्तुत ग्रंथात हे आव्हान लिलया पेलत ललितगद्याची उत्तम चिकित्सा केली आहे. लघुनिबंधाने कात टाकल्यानंतरच्या नव्या ललितगद्याचे मर्मस्पर्शी आकलन आणि मूल्यमापन करताना वसेकरांनी उपयोजित समीक्षेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. केवळ मराठी वाङ्मयाच्या विद्यार्थी आणि अभ्यासकांनाच हा ग्रंथ उपयुक्त ठरेल असे नाही तर ललितगद्य लिहू पाहणाऱ्या लेखकांनाही तो मार्गदर्शक ठरावा. म्हणूनच याचे स्थान ग्रंथालयाच्या कपाटात राहणारे नसून संबंधितांच्या टेबलावर सदैव राहील असेच आहे. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018452390146,"sku":"","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61PpqRJuHZL._SY466.jpg?v=1742885898"},{"product_id":"kille-maharashtra-bhag-1-kokan-vibhag-by-n-r-patil-किल्ले-महाराष्ट्र-भाग-१-कोकण-विभाग","title":"Kille Maharashtra Bhag 1 Kokan Vibhag By N. R. Patil (किल्ले महाराष्ट्र भाग १ कोकण विभाग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018460811522,"sku":"","price":723.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61bQz978dVL._SY522.jpg?v=1742886063"},{"product_id":"vrukshmatecha-sangharsh-by-anil-mohite-वृक्षमातेचा-संघर्ष","title":"Vrukshmatecha Sangharsh By Anil Mohite (वृक्षमातेचा संघर्ष)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बिनदिक्कतपणे बळी देत देशोदेशीचे धोरणकर्ते स्वतःचे आणि आपल्या मित्र-बगलबच्च्यांचे खिसे भरण्याचे काम कसे अव्याहतपणे करत असतात, हे आपण सारे बघत असतो. केनियाचा तत्कालीन राज्यकर्ता डॅनियल अराप मोई याच्या काळात नेमके हेच होत होते. निसर्गसंपन्न केनियातले सगळे जंगल त्याच्या मित्रांना त्याने जणू आंदणच दिले होते. केनियाच्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या, पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले तरी केनियाच्या जमीन, जंगल, पाण्याशी आपली मुळे घट्ट जोडून ठेवणाऱ्या वांगारी माथाई यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरू केला. त्यासाठी सरकारकडून केला गेलेला अनन्वित छळ सोसला. सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी त्यांनी तेथे 'ग्रीन बेल्ट मूव्हमेंट'ची स्थापना केली. ही संस्था वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करत होती. अखेर त्या सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. तिथल्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या. २००४ मध्ये मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराने त्यांच्या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या. लेखक अनिल मोहिते यांनी या वृक्षमातेच्या सगळ्या आयुष्याचा, संघर्षाचा, त्यातून उभ्या राहिलेल्या सकारात्मक कामाचा वेध या पुस्तकात घेतला आहे. पर्यावरणाविषयी काही कळकळ असणाऱ्या प्रत्येकाकडे हे पुस्तक असले पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018466414850,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71Y818Q2p4L._SY466.jpg?v=1742885866"},{"product_id":"pratiparmeshwar-by-vasudev-reddy-vishnu-salunkhetranslators-प्रतिपरमेश्वर","title":"Pratiparmeshwar By Vasudev Reddy, Vishnu Salunkhe(Translators) (प्रतिपरमेश्वर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'कादंबरीची कथा तिरुपतीजवळील रामपुरम या काल्पनिक खेड्यात घडते. प्रताप हा सुशिक्षित, सत्प्रवृत्त आणि न्यायप्रिय, पण अतिभावनाशील तरुण या कादंबरीचा नायक आहे. कृष्णाय्या व लक्ष्मी हे त्याचे गरीब अल्पभूधारक आई-वडील. वीरभद्रय्या हे गावप्रमुख सरपंच आणि नंतर आमदार. जंगलातील साग, चंदन, रक्तचंदन यांची चोरटी व बेकायदेशीर तोड व विक्री करण्यात हातखंडा असलेले. गावातील सावकार आणि अल्पभूधारकांच्या जमिनी गिळंकृत करण्यात पटाईत. पंचक्रोशीत दरारा असलेले 'प्रतिपरमेश्वर'. गोविंदय्या हे गरीब पण सहकाराची वृत्ती असलेले पोस्टमास्तर. या तीन प्रमुख कुटुंबांच्या परस्पर क्रिया-प्रतिक्रिया या कादंबरीच्या विकासास कारणीभूत होतात. विजय कुणाचा होतो आणि पराजय कुणाचा होतो? की काव्यात्म न्याय होतो ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018469200130,"sku":"","price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71KjaKbShcL._SY522.jpg?v=1742885938"},{"product_id":"samajik-chalvaliche-aitihasic-calender-by-eknath-somkuwar-सामाजिक-चळवळीचे-ऐतिहासिक-कॅलेंडर","title":"Samajik Chalvaliche Aitihasic Calender By Eknath Somkuwar (सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राला प्रबोधनाची अतिशय दीर्घ परंपरा लाभली आहे. या प्रबोधनाच्या परंपरेतील महत्त्वाचे टप्पे म्हणजे महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांच्या जीवनकार्यातील घटनाक्रम अतिशय सोप्या पद्धतीने, अभ्यासकांना तसेच जिज्ञासू वाचकांना, विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना उपयोगी होईल, अशा रीतीने अॅड. एकनाथ सोमकुवर यांनी तारखेनुसार संकलित केला आहे. या पुस्तकाची संकल्पना अतिशय नावीन्यपूर्ण आहे. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत वर्षातील प्रत्येक तारखेला महात्मा जोतीराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे अतिशय विस्तृत परंतु काटेकोर संकलन त्यांनी केले आहे. मराठी भाषेमधील हा असा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणूनच या ग्रंथाचे मोल अनन्यसाधारण असेच आहे. महाराष्ट्रातील जिज्ञासू वाचक आणि अभ्यासक; तसेच विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्व स्तरांतून या पुस्तकाचे स्वागत होईल; ; या सर्वांसाठीच हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018491023618,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71X0PybcguL._SY522.jpg?v=1742885990"},{"product_id":"leelacharitra-sanshodhan-ani-samiksha-by-dr-avinash-avalgaonkar-लिळाचरित्र-संशोधन-आणि-समीक्षा","title":"Leelacharitra Sanshodhan Ani Samiksha By Dr. Avinash Avalgaonkar (लिळाचरित्र संशोधन आणि समीक्षा)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018546434306,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51lI9kQ7Q6L._SY466.jpg?v=1742885949"},{"product_id":"savidhanvadi-sahitya-sidhdant-ani-disha-by-dr-anant-d-raut-संविधानवादी-साहित्य-सिध्दांत-आणि-दिशा","title":"Savidhanvadi Sahitya Sidhdant Ani Disha By Dr. Anant D. Raut (संविधानवादी साहित्य सिध्दांत आणि दिशा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान आणि त्यातील जीवनमूल्ये आत्मसात करणाऱ्या साहित्यिकाची जीवनदृष्टी संविधानवादी कशी बनते, याची प्रगल्भ मांडणी हा ग्रंथ करतो. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेवर मूलगामी भाष्य करतो. संविधानवादी साहित्य निर्मिती संदर्भातील विषय आशयाच्या दिशा दाखवतो. संविधानवादी साहित्याच्या मूल्यमापनाचे निकष निश्चित करतो. वाङ्गयेतिहास लेखनाचा संविधानवादी दृष्टिकोन मांडतो. संविधान युगाची संकल्पना निश्चित करून या युगातील साहित्याची मूल्यमय चिकित्सा करतो. आधुनिक साहित्याच्या संविधानवादी संशोधनाची दिशा देतो. हा ग्रंथ वाचकांची अभिरुची उंचावेल. साहित्य क्षेत्रात नवे व सकस असे काही निर्माण करू पाहणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंतांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरू शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018548039938,"sku":"","price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81XNNFGYr4L._SY466.jpg?v=1742885846"},{"product_id":"kille-maharashtra-bhag-5-dakhkhan-subha-marathwada-vibhag-by-n-r-patil-किल्ले-महाराष्ट्र-भाग-५-दख्खन-सुभा-मराठवाडा-विभाग","title":"Kille Maharashtra Bhag 5 Dakhkhan Subha Marathwada Vibhag By N. R. Patil (किल्ले महाराष्ट्र भाग ५ दख्खन सुभा मराठवाडा विभाग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018702639362,"sku":"","price":408.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51sOTigxVnL._SY445_SX342.jpg?v=1742886000"},{"product_id":"kille-maharashtra-bhag-4-varhad-vidarbh-vibhag-by-n-r-patil-किल्ले-महाराष्ट्र-भाग-४-वऱ्हाड-विदर्भ-विभाग","title":"Kille Maharashtra Bhag 4 Varhad Vidarbh Vibhag By N. R. Patil  (किल्ले महाराष्ट्र भाग ४ वऱ्हाड विदर्भ विभाग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018706964738,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/614RXxJvNDL._SY522.jpg?v=1742886212"},{"product_id":"kille-maharashtra-bhag-3-khandesh-uttar-maharashtra-vibhag-by-n-r-patil-किल्ले-महाराष्ट्र-भाग-३-खानदेश-उत्तर-महाराष्ट्र-विभाग","title":"Kille Maharashtra Bhag 3 Khandesh Uttar Maharashtra Vibhag By N. R. Patil  (किल्ले महाराष्ट्र भाग ३ खानदेश उत्तर महाराष्ट्र विभाग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018709291266,"sku":"","price":544.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61OWuSy5xuL._SY466.jpg?v=1742885752"},{"product_id":"kille-maharashtra-bhag-2-dakhkhan-pathar-va-maval-vibhag-by-n-r-patil-किल्ले-महाराष्ट्र-भाग-२-दख्खन-पठार-व-मावळ-विभाग","title":"Kille Maharashtra Bhag 2 Dakhkhan Pathar Va Maval Vibhag By N. R. Patil  (किल्ले महाराष्ट्र भाग २ दख्खन पठार व मावळ विभाग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018713256194,"sku":"","price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61QHSpdA31L._SY522.jpg?v=1742886200"},{"product_id":"mughal-samrajya-humayun-by-alex-rutherford-swati-madanvad-मुघल-साम्राज्य-हुमायून","title":"Mughal Samrajya Humayun By Alex Rutherford, Swati Madanvad (मुघल साम्राज्य हुमायून)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018720268546,"sku":"","price":663.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_a98996b4-c9dc-4974-b646-3d44e00cf536.png?v=1742885960"},{"product_id":"mughal-samrajya-akbar-by-alex-rutherford-mustajib-khan-मुघल-साम्राज्य-अकबर","title":"Mughal Samrajya Akbar By Alex Rutherford, Mustajib Khan (मुघल साम्राज्य अकबर)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018724430082,"sku":"","price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_d75c313a-e725-4fb3-8000-de72ab227e90.png?v=1742885744"},{"product_id":"mughal-samrajya-babar-by-alex-rutherford-mukta-mahajantranslators-मुघल-साम्राज्य-बाबर","title":"Mughal Samrajya Babar By Alex Rutherford, Mukta Mahajan(Translators) (मुघल साम्राज्य बाबर)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018764865794,"sku":"","price":663.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_f73cf523-9acc-41c0-9196-0d9634d7c37f.png?v=1742885889"},{"product_id":"mughal-samrajya-aurangjeb-by-alex-rutherford-dipak-borgavetranslators-मुघल-साम्राज्य-औरंगजेब","title":"Mughal Samrajya Aurangjeb By Alex Rutherford, Dipak Borgave(Translators) (मुघल साम्राज्य औरंगजेब)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018775548162,"sku":"","price":476.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_f73cf523-9acc-41c0-9196-0d9634d7c37f.png?v=1742885889"},{"product_id":"24-tasancha-yog-by-vishwas-yewale-२४-तासांचा-योग","title":"24 Tasancha Yog By Vishwas Yewale (२४ तासांचा योग)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018781118722,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4187Nrv21HL._SY445_SX342.jpg?v=1742886017"},{"product_id":"dharmatma-kshatru-by-n-r-patil-धर्मात्मा-क्षत्रू","title":"Dharmatma Kshatru By N. R. Patil (धर्मात्मा क्षत्रू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधर्मात्मा क्षत्रू रा कादंबरीचा महाभारतातील विदुराच्रा व्रक्तिमत्त्वाचा वेध घेणारी कादंबरी. विदुर ही महाभारतातील एक प्रमुख व्रक्तिरेखा. विदुर दासीपुत्र आहे, कृष्णभक्त आहे, पांडवांचा पक्षपाती आहे, धृतराष्ट्राचा टीकाकार आहे, कुंतीच्रा भावविश्‍वातला एक पुरुष आहे, विद्वान आहे, धर्मविषरक तत्त्व जाणणारा आहे, सत्राच्रा न्राराच्रा बाजूने उभे राहताना कुठल्राही परिणामांची तमा न बाळगणारा आहे, रमधर्माचा अणुमांडव्र ऋषींचा शाप भोगणारा एक शापित आहे, रुधिष्ठिराचा जैविक नात्राने पिता आहे... विदुराच्रा व्रक्तिमत्त्वाचे हे असे अनेक पैलू आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018784592130,"sku":"","price":417.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71fg-ZJymTL._SY466.jpg?v=1742886070"},{"product_id":"samiksha-ani-samikshak-by-sudhir-rasal-समीक्षा-आणि-समीक्षक","title":"Samiksha Ani Samikshak By Sudhir Rasal (समीक्षा आणि समीक्षक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समीक्षा आणि समीक्षक’ या ग्रंथात समीक्षेविषयीच्या काही मूलभूत प्रश्नांची मीमांसा करणाऱ्या लेखांचा समावेश करण्यात आला असून यातील काही लेख मराठीतील काही महत्त्वाच्या समीक्षकांच्या वाङ्मयीन भूमिकेची चिकित्सा करणारे आहेत. समीक्षाव्यवहार हा एक उपरा आणि निरर्थक व्यवहार आहे, समीक्षा हे शास्त्र होऊ शकत नाही, अशांसारख्या मतांचा परामर्श या लेखांत घेण्यात आला आहे. यासमवेत समीक्षेचे स्वरूप, वाङ्मयव्यवहारात तिची उद्दिष्टे आणि वाङ्मयीन मूल्ये या संबंधीची चर्चा या लेखांत केली गेली आहे. समीक्षाविषयक तात्त्विक स्वरूपाच्या लेखांबरोबरच एकोणिसशे पन्नासनंतरच्या मराठीतील काही मान्यवर समीक्षकांच्या आणि सौंदर्यशास्त्राभ्यासकांच्या भूमिकांची सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध आलोचना करणाऱ्या काही लेखांचा समावेशही या ग्रंथात करण्यात आला आहे. समीक्षकांवरच्या या लेखांमधून आधुनिक मराठी समीक्षेच्या वर्तमान स्थितीचे एक चित्रही वाचकांसमोर उभे राहते. समीक्षेविषयीच्या काही पायाभूत प्रश्नांच्या मीमांसेबरोबरच काही समीक्षकांच्या समीक्षेची ‘समीक्षा’ करणारा सुधीर रसाळ यांचा ‘समीक्षा आणि समीक्षक’ हा ग्रंथ वाङ्मयाभ्यासकांच्या आणि चिकित्सक वाचकांच्या विचारांना चालना देणारा ठरेल, याची खात्री वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018788950274,"sku":"","price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41fdjfWcCDL._SY466.jpg?v=1742885762"},{"product_id":"kaya-vacha-mane-by-sunil-yaavlikar-काया-वाचा-मने","title":"Kaya Vacha Mane By Sunil Yaavlikar (काया वाचा मने)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018824962306,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kayavachamane.jpg?v=1742885789"},{"product_id":"raktatuni-vahe-by-kishor-medhe-रक्तातुनी-वाहे","title":"Raktatuni Vahe By Kishor Medhe (रक्तातुनी वाहे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, फुले यांना गुरुस्थानी मानल्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या असंख्य अडथळ्यांवर त्यांना यशस्वीपणे मात करता आली. मुळातच डॉ. आंबेडकर हे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते. बुद्धिमत्तेच्या जोडीला या तिन्ही गुरुजनांचे मनस्वी आशीर्वाद लाभल्याने त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर समस्त गोरगरिबांच्या कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी नेमका करता आला. त्यांचे तेजस्वी कार्य आज जगभरात गौरविले जात आहे. जुन्या पिढीतील लोकांचे ते आदर्श तर होतेच, पण नवीन पिढीसाठी आदर्शासोबतच ते मुख्य प्रेरणास्रोतही बनले आहेत. ही नवीन पिढी त्यांना आपला गुरू मानून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना दिसत आहे. आंबेडकरी विचारांचा हा समर्थ वारसा असाच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत व दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत झिरपत रहावा यासाठी किशोर मेढे 'रक्तातुनी वाहे' या पुस्तकातील लेखांमधून बाबासाहेबांच्या जीवन- कार्यांच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा आणि एकूणच आंबेडकरी विचारधारेशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांचा सव्यसाची धांडोळा घेतात. या लेखांबरोबरच सुप्रसिद्ध गीतकार गुलजारांच्या त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या काही कविता, अमृता प्रितम आणि इमरोज यांचे त्यांनी अनुवादित केलेले काही लेख देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशा वैविध्याने नटलेले हे पुस्तक वाचकांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018834727170,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71S4qs5GwhL._SY425.jpg?v=1742885781"},{"product_id":"jakhadan-by-bhimrav-waghchoure-जखडण","title":"Jakhadan By Bhimrav Waghchoure (जखडण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतसा हा शेतीचा धंदा म्हणजे डोक्याला ताप होता; कधीही न संपणारा कायमचा व्याप होता अन् कदाचित पाचवीला पुजलेला तो आदल्या जन्मीचा शाप होता. इथलं जगणं म्हणजे घोर-फिकिरीचं आगर होतं; भीती-धास्तीचं आखर होतं अन् घाता - आघाताचं माहेरघर होतं. इथं दिवस-रात्र राब राब राबावं, जिवाचं रान करून पेरावं, ढोर-मेहनत करीत त्याला खत-पाणी घालून फुला-फळात आणावं अन् ऐन पदरात पडायची वेळ की, त्याच्यावर कसलं तरी गंडांतर यावं; त्याच्यानं त्यानं पुरतं कोलमडून पडावं; असंच काहीसं इथलं जगणं; निव्वळ कस्पटासारखं! त्याच्या केलेल्या कष्टाला, त्याच्या नशिबाला कसली तरी पनवती होती. काही तरी नाट होतं; म्हणूनच त्याचं जगणं असं एकाकी- सुनाट होतं. इथं कधीच सुख नाही; अति जास्तीचा हरिख नाही; म्हणूनच इथला कुणी हसतमुख नाही. उलट तोंडावर रापलेले चट्टे, अंगावर उभे आडवे चरपटे अन् हाता-पायांना जडलेले घट्टे, हीच इथल्यांची कमाई; हीच त्यांची ओळख! इथं फक्त कष्ट आहे, ऐष नाही; इथं फक्त झुरणं आहे; जल्लोष नाही; म्हणून हा जन्मकुळाचा दोष आहे, कुणावरचा रोष नाही ! इथलं असलं हे सगळंच अटळ अन् अनावर आहे, एक निवारलं की, दुसरं समोर आहे; अन् तेही निस्तारलं तरी, पुढचं आणखी 'आ' वासून उभं आहे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018852389122,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81161h9bSnL._SY466.jpg?v=1742885995"},{"product_id":"bharatache-parrashtriya-dhoran-ek-vatchal-by-vinayak-pande-भारताचे-परराष्ट्रीय-धोरण-एक-वाटचाल","title":"Bharatache Parrashtriya Dhoran Ek Vatchal By Vinayak Pande  (भारताचे परराष्ट्रीय धोरण एक वाटचाल)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46018856517890,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/715_Tmqo9BL._SY522.jpg?v=1742886012"},{"product_id":"dalit-bharat-by-kishor-medhe-दलित-भारत","title":"Dalit Bharat By Kishor Medhe (दलित भारत)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46022706659586,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9788195279005-f.jpg?v=1742885841"},{"product_id":"father-by-vilas-vare","title":"Father By Vilas Vare","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46022775013634,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_3d3a659b-73b0-4dbf-9dd6-e6d73daa56f8.png?v=1742885726"},{"product_id":"kavyalochana-by-sudhir-rasal-काव्यालोचना","title":"Kavyalochana By Sudhir Rasal (काव्यालोचना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुधीर रसाळांच्या या लेखसंग्रहात काव्यासंबंधीचे काही सैद्धांतिक लेख समाविष्ट केले असून काही लेख कवींच्या काव्यावरचे आहेत. यातील सैद्धांतिक लेख काव्य, कविता, कवितेचे मूल्य अशा काव्यासंबधीच्या पायाभूत संकल्पनांसंबंधीचे आहेत. कविता दुर्बोध का व कधी बनते, आधुनिक कवितेतील दुर्बोधतेमागची कारणे आणि तिचे स्वरूप, कवितेतील व्याज दुर्बोधता या संबंधीची चर्चाही या संग्रहातील एका लेखात करण्यात आली आहे. या लेखसंग्रहात अलीकडच्या अरुण कोलटकर, चंद्रकांत पाटील, अनुराधा पाटील यांच्या काव्यवैशिष्ट्यांचा वेध घेणारे लेख समाविष्ट झालेले आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोविंदाग्रज आणि बालकवी या दोन अभिजात कर्वीच्या कवितेचे एका नव्या दृष्टिकोनातून विश्लेषण आणि पुनर्मूल्यांकन करणारे लेख, तसेच प्रचलित काव्यपरंपरेपेक्षा वेगळ्या प्रकारची काव्यनिर्मिती करणाऱ्या द. भा. धामणस्करांच्या कवितेची चिकित्सा करणारा लेख, यांमुळे हा लेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. मराठी काव्यसमीक्षेत शहाणपणाच्या कवितेचे स्वरूप प्रथमच स्पष्ट करून अलीकडे लोकप्रियतेचा उच्चांक गाठणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या ‘बोलगाणी’ या शहाणपणाच्या कवितेची मीमांसा करणाऱ्या लेखामुळे या संग्रहाचे मूल्य अधिकच वाढलेले आहे. या मोजक्या लेखांमुळे विसाव्या शतकातील काव्यपरंपरेचा पट वाचकांसमोर उभा राहतो. हा लेखसंग्रह काव्याच्या अभ्यासकांना आणि काव्यरसिकांना निश्चितच उपयुक्त होणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46022824788226,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61G6FhYAHlL._SY425.jpg?v=1742885710"},{"product_id":"aajachi-aswasth-kutumbe-by-pushpa-solanke-आजची-अस्वस्थ-कुटुंबे","title":"Aajachi Aswasth Kutumbe By Pushpa Solanke (आजची अस्वस्थ कुटुंबे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाला आपलं घर प्रफुल्लित आणि हसरं असावं, निशिगंधाच्या सुगंधासारखं प्रेम तिथं मिळावं असं वाटत असतं. खूप पूर्वीपासून मानवप्राण्याला ही स्वप्न खुणवीत होतीच; पण आज आयुष्याची हीं सर्वच्या सर्व सुखस्वप्ने पैसे कमवले की पूर्ण होतील म्हणून मनुष्य वेड्यासारखा पैशामागे इतका धावतोय की त्याची स्वत:शीच फारकत होऊन बसलीय ! आजचं जगच चांगलं नाही, या मानसिकतेतून आई-वडिलांकडून मुलांना माणुसकीचे धडे दिले जात नाहीत! ताणाने ग्रासलेल्या व्यक्ती व्यसनाची मदत घेत आहेत. कष्टाने उभे केलेले मुलांचे संसार अर्ध्यावरच विस्कटत आहेत व पालक आपल्या नशिबाचे फासे उलटे फिरले या भावनेने दु:खी आहेत. तरुणांचे आनंदाचे वय, भांडणात जात आहे. चुकीची जीवनपद्धती आरोग्य बिघडवत आहे. या अस्वस्थेची कारणमीमांसा केली तर उत्तरे मिळणार आहेत आणि त्या उत्तरावर उपायही सापडणार आहेत. सुखी संसार एक कला आहे. त्यासाठी काही सोपे मंत्र आहेत. जीवनादर्शाला जीवनात प्रतिष्ठित बनवले, प्रेमतत्त्व, नीतितत्त्व व अध्यात्म यांचा हात धरून जीवनात चालले तर 'सुख' म्हणजेच ‘मन:शांती’ घरात नक्कीच नांदते ! घराच्या आनंदासाठी स्वत:लाही व घरातील माणसांना जपायचे कसे? या विषयाचे तंत्र, मंत्र आणि समुपदेशन या पुस्तकातून वाचकांना मिळेल ही अपेक्षा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46022868107522,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71uMmJw5LBL._SY466.jpg?v=1742885814"},{"product_id":"triveni-by-madhuvanti-shidore-त्रिवेणी","title":"Triveni By Madhuvanti Shidore  (त्रिवेणी)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":46023030505730,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51AuntARh_L._SY522.jpg?v=1742886075"},{"product_id":"the-pilgrimage-marathi-by-paulo-coelho-vijaya-gat-translators-द-पिलग्रिमेज-मराठी","title":"The Pilgrimage (Marathi) By Paulo Coelho, Vijaya Gat (Translators) द पिलग्रिमेज (मराठी)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Paulo Coelho","offer_id":46116440277250,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41E-R0v_-FL.jpg?v=1745996133"},{"product_id":"samatasangaracha-mahanayak-by-datta-bhagat-समतासंगराचा-महानायक","title":"Samatasangaracha Mahanayak By Datta Bhagat (समतासंगराचा महानायक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्यासाठी पोषणभूमी ठरलेल्या काळातील आणि 1891 ते 1960 या बाबासाहेबांच्या कार्यकाळातील घटनांच्या नोंदीच्या आधारे साकार केलेले नोंदींच्या स्वरूपातील बाबासाहेबांचे चरित्र. सर्व प्रकारच्या वाचकांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरावा या हेतूने आंबेडकरी विचारांशी व कार्याशी संबंधित समग्र अभ्याससामग्रीचा सूक्ष्मपणे अभ्यास करून दत्ता भगत यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. मराठी भाषेतला या स्वरूपाचा हा पहिलाच ग्रंथ असावा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Datta Bhagat","offer_id":46116629741826,"sku":"","price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/samatasangarachamahanayak.jpg?v=1745996220"},{"product_id":"aleph-marathi-by-paulo-coelho-jui-nadkarni-ratan-vaidyatranslators-अॅलेफ-मराठी","title":"Aleph (Marathi) By Paulo Coelho, Jui Nadkarni \u0026 Ratan Vaidya(Translators)  अॅलेफ (मराठी)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Paulo Coelho","offer_id":46116663886082,"sku":"","price":247.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/0280ae925b874b6c9f1606791a23b39f.jpg?v=1746428231"},{"product_id":"chor-police-by-pankaj-kurulkar-चोर-पोलिस","title":"Chor Police By Pankaj Kurulkar (चोर पोलिस)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Pankaj Kurulkar","offer_id":46183842414850,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_aee9cac9-839d-4c44-976c-784e170fe23a.png?v=1748674563"},{"product_id":"sahityavedh-by-dr-janardan-waghmare-साहित्यवेध","title":"Sahityavedh By Dr. Janardan Waghmare (साहित्यवेध)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Dr. Janardan Waghmare","offer_id":46227988873474,"sku":"","price":349.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/441747fa0e544202a115bb666f788342.jpg?v=1750056936"},{"product_id":"its-okay-to-fail-by-drishti-bajaj","title":"It's Okay To Fail By Drishti Bajaj","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe secret to dealing with failure in life?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eDeal with it.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIf you have struggled to achieve something in your career, you are not alone.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMany people go through that whirlwind of emotions.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eThe result is people running away from failures altogether.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eThe consequences?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e1. Wasted life lessons\u003cbr\u003e2. Not listening to your intuition\u003cbr\u003e3. Wasted opportunities for huge growth\u003cbr\u003e4. Not having the conversations you must have\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eWhat a mess.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eThankfully, the author went through similar failures for 5 years straight while pursuing her CA and failing at it, which taught her how to deal with the f-word of failure everyone is fearful of.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIf you use the wisdom in this book correctly, you will also learn how it is okay to fail. And a failure does not define YOU as a person.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eIn this book, the author unveils her most vulnerable journey of failing for more years than people even try in the first place.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Drishti Bajaj","offer_id":46636340117762,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71p7PZUGiPL._SY522.jpg?v=1754031361"},{"product_id":"mahatma-jotirao-phule-jeevan-aani-karya-by-ekanath-somkuvar-महात्मा-जोतीराव-फुले-जीवन-आणि-कार्य","title":"Mahatma Jotirao Phule Jeevan Aani Karya By Ekanath Somkuvar  (महात्मा जोतीराव फुले जीवन आणि कार्य)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Ekanath Somkuvar \/ Marathi","offer_id":46791259390210,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/7_73cb0149-2ce6-438a-976f-41b2af6da617.jpg?v=1759215369"},{"product_id":"manamanantala-aavaj-by-arun-shevte-मनामनांतला-आवाज","title":"Manamanantala Aavaj By Arun Shevte (मनामनांतला आवाज)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46791260766466,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_ca22e680-b2be-4794-8d47-0ea3bbccc7f1.jpg?v=1759215319"},{"product_id":"santwaani-by-arun-shevte-संतवाणी","title":"Santwaani By Arun Shevte (संतवाणी)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46791262929154,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/10_992542f3-c2fd-4334-a87a-1db613615b82.jpg?v=1759215373"},{"product_id":"aatala-aavaj-by-arun-shevte-आतला-आवाज","title":"Aatala Aavaj By Arun Shevte (आतला आवाज)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46791269286146,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_2e3de8e4-026b-4413-9207-e32d1d47670f.jpg?v=1759215328"},{"product_id":"aavajachi-duniya-by-आवाजाची-दुनिया","title":"Aavajachi Duniya By  (आवाजाची दुनिया)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46791270236418,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_c6b54f77-0325-40d4-8e55-901398d108a8.jpg?v=1759215341"},{"product_id":"asahamaticha-aavaj-by-arun-shevte-असहमतीचा-आवाज","title":"Asahamaticha Aavaj By Arun Shevte (असहमतीचा आवाज)","description":"","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Arun Shevte \/ Marathi","offer_id":46791273349378,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_af8585b0-580e-449e-a3f4-412d7a974770.jpg?v=1759215360"},{"product_id":"guru-ek-yogiyache-turiyatit-swapn-by-nitin-kottapalle","title":"Guru : Ek Yogiyache Turiyatit Swapn By Nitin Kottapalle","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसाच्या प्रगतीचा, विकासाचा, वासनेचा आणि वैराग्याचा,  पराभवाचाही भव्य सारीपाट मांडणारी कादंबरी..  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Nitin Kottapalle \/ Marathi","offer_id":46809695617282,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/GuruF.jpg?v=1759733768"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/scion-publication-pvt-ltd.oembed?page=4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}