{"title":"Satish Badwe","description":"","products":[{"product_id":"madhyayugin-marathi-wangmay-chintan-aani-charcha-by-satish-badwe-मध्ययुगीन-मराठी-वाड्मय-चिंतन-आणि-चर्चां","title":"Madhyayugin Marathi Wangmay : Chintan Aani Charcha By Satish Badwe (मध्ययुगीन मराठी वाड्मय : चिंतन आणि चर्चां)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मध्ययुगीन वाङ्मयाविषयीचे चिंतन व चर्चा हा या ग्रंथाचा गाभा आहे. मौखिक व लिखित अशा दोन्ही प्रकारच्या लेखनातून हा वाङ्मय प्रवाह वाहत आला आहे. मौखिक परंपरा व लोकपरंपरा यांचे संमिश्रण या काळात आढळते. मराठीचा ठासून पुरस्कार करण्याची भूमिका याच काळात मांडली गेली. कवितेची वैविध्यपूर्ण रूपे व रचनाप्रकारांची रेलचेल उलगडून दाखविणारा हा कालखंड आहे. या लेखनात केवळ धार्मिकता, अध्यात्माचा सोस आहे असे म्हणता येणार नाही. त्यातील आत्माविष्कार, कलाभिव्यक्ती, सामान्य माणसांविषयीचा प्रकट होणारा कळवळाही ध्यानात घेता येतो. या वाङ्मयातील रचनेचे सौंदर्य, त्यातून प्रकटणारी सामाजिकतेची दृष्टी आणि लोकसमूहाला केलेले आवाहन लक्षणीय ठरते. एका व्यापक पटावर आविष्कृत झालेल्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयनिर्मितीविषयीची निरीक्षणे व शोध चार भागांमध्ये मांडलेला आहे. ग्रंथकर्तृत्व, वाङ्मय विशेष, काव्यलेखनाचे विविध प्रवाह, अभिव्यक्तीतील सौंदर्यदृष्टी, धर्मसंप्रदायांची कामगिरी, गद्य लेखनाचे वेगळेपण, पर्यावरणीय संवेदन, संहिता चिकित्सा, संशोधनाच्या वाटा अशा अनेकांगांनी घेतलेला धांडोळा अभ्यासपूर्ण पद्धतीने इथे प्रकटलेला आहे. एका अर्थी हा परंपरेतील सत्त्वांशाचा शोध आहे. वाङ्मयेतिहासाला पूरक ठरणाऱ्या या लेखनात मागोवा, चिंतन, निरीक्षणे, संहिताकेंद्री व आशयकेंद्री दृष्टी केंद्रवर्ती आहेत. त्यामधून मध्ययुगीन वाङ्मयाचा बहुमुखी पट उभा राहतो आणि मूल्यविचाराच्या अनुषंगाने या वाङ्मयाच्या आशय व अभिव्यक्तीचे पदर उलगडले जातात.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shabdalay Prakashan","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Satish Badwe \/ Marathi","offer_id":47048067514626,"sku":null,"price":553.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_2c9ac496-91ae-433a-839b-f0646ba485cf.jpg?v=1763535348"},{"product_id":"bhaktiparamparecha-antaraprantiy-anubandh-by-satish-badwe-भक्तिपरंपरेचा-आंतरप्रांतीय-अनुबंध","title":"Bhaktiparamparecha Antaraprantiy Anubandh By Satish Badwe (भक्तिपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. सतीश बडवे हे मराठी साहित्याचे जाणते आणि महत्त्वाचे अभ्यासक आहेत हे सर्व परिचितच आहे. विशेषतः मध्ययुगीन मराठी साहित्याचा त्यांनी खोलवर धांडोळा घेऊन त्यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे मांडलेली आहेत. प्रस्तुत ग्रंथात त्याच्या आणखी पुढे जावून त्यांनी 'भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध' मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सभोवताली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवस्था भ्रष्ट आणि खिळखिळी होत असल्याच्या काळात कींनी त्याला प्रतिक्रिया देवून अगदी सरळ सोप्या उपासनामार्गाचा पुरस्कार करून समाजाची नवी बांधणी केली. महाराष्ट्रात रामदेवराय यादवाच्या पतनापासून नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ ते तुकाराम म्हणजे शिवाजी राजाचा उदय असे ते झाले. विशेष म्हणजे असेच कार्य आंध्र, कर्नाटक, तमिळनाड, पंजाब, उत्तरेतील प्रांत, बंगाल, असे सगळीकडेच जवळपास एकाचवेळी घडले. हा अत्यंत महत्त्वाचा अनुबंध शोध हे या ग्रंथाचे सगळ्यात मोठे फलित आहे, असे मला वाटते. आपली भारतीय एकात्मता ही वरवरची नसून तिची अशी आंतरिक बैठक आहे याची महत्त्वाची जाणीव हा ग्रंथ करून देतो. तीच याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. रंगनाथ पठारे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shabdalay Prakashan","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Satish Badwe \/ Marathi","offer_id":47048075739394,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/15_ca56fb57-a9e8-46cc-a828-3dc65b70141c.jpg?v=1763535372"},{"product_id":"akalana-aani-anvayarth-by-satish-badaveआकलन-आणि-अन्वयार्थ","title":"Akalana Aani Anvayarth By Satish Badave(आकलन आणि अन्वयार्थ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्यकृतीच्या सूक्ष्म, विचक्षण, मार्मिक आकलनातूनच साहित्यकृतीच्या अर्थनिर्णयाला मौलिकता आणि विश्वासार्हता प्राप्त होत असते. याची प्रचीती देणारे समीक्षालेखन सदर पुस्तकातून प्रभावीपणे येते. समकालीन निवडक कादंबऱ्या, कविता, आत्मकथने आणि ललितगद्य यांचे साहित्यकृती म्हणून असणारे अस्तित्व तपासून त्याची प्रतिष्ठापना करणारे साहित्यकृतीकेंद्री समीक्षालेखन सदर पुस्तकातून प्राधान्याने आले आहे. साहित्यकृतीच्या केवळ आशयाची ही चर्चा नव्हे, तर विशिष्ट साहित्यप्रकाराच्या रचनाबंधाच्या अनुषंगाने आलेली अभिनवता आणि प्रयोगशीलता यांचाही सूक्ष्म शोध घेण्याची भूमिका येथे महत्त्वाची मानलेली आहे. वाङ्मयीन संस्कृती आणि वाड़मयेतिहास या अंगांनी मांडणी करणारे सदर पुस्तकाच्या पहिल्या भागातून आलेले लेख समकालीन साहित्यसमीक्षेच्या समृद्धतेत मौलिक भर घालणारे आहेत. भाषा, संस्कृती, विशिष्ट कालखंड, सामाजिक संदर्भ, अध्यापन प्रक्रिया अशा विभिन्न संदर्भातून वाड्मयीन संस्कृतीच्या अंतरंगात डोकावून पाहून तिचे मर्म ग्रहण करू पाहणारी सदर लेखांतील मांडणी संदर्भसंपन्न आणि विशिष्ट दृष्टी प्रदान करणारी आहे. मनःपूर्वकतेने आणि मूलगामीपणे साहित्याचा तळठाव धुंडाळण्याची ऊर्मी सदर पुस्तकातील लेखांतून सतत जाणवते. या प्रक्रियेतून उन्नत होत जाणारा साहित्याकलनाचा स्तर आणि खुल्या होत जाणाऱ्या साहित्यान्चयार्थाच्या दिशा समकालीन वाङ्मयीन पर्यावरणाला समृद्ध करणाऱ्या आहेत. आशुतोष पाटील\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shabdalay Prakashan","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Satish Badwe \/ Marathi","offer_id":47048090714370,"sku":null,"price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/21_7d7bac6e-4c0f-4a58-9bb7-b8cf160f419a.jpg?v=1763535395"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/satish-badwe.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}