{"title":"Sandesh Bhandare","description":"","products":[{"product_id":"vari-ek-aanandyatra-by-sandesh-bhandare-वारी-एक-आनंदयात्रा","title":"Vari Ek Aanandyatra By Sandesh Bhandare (वारी एक आनंदयात्रा)","description":"\u003cp\u003eडलिकाने जशी आपल्या आई-वडिलांना बरोबर घेऊन वारी केली व त्यांना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्रभागेत स्नान घातले, वारकरी आज आपल्या आई-वडिलांची तशीच सेवा करताना\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिसतात. 2001 साली आषाढी एकादशीला मी गेलो असताना हे दृश्य मला दिसले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवारीपरंपरेमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती या छायाचित्रात पकडता आली याचा मला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंद वाटला. छायाचित्रात दिसणारा वृद्ध वारकरी पाणी अंगावर पडताना शांत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्ताने डोळे मिटून समाधान अनुभवत होता. पायी वारी केल्यानंतरच्या या स्नानाने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. आठशे वर्षाच्या या वारीपरंपरेचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछायाचित्रात्मक शोध घेण्याची प्रेरणा या छायाचित्राने मला मिळाली. ‘वारी एक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंदयात्रा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर माझी छायाचित्रात दिसणार्या शंकर भैरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगाडे या गडहिंग्लज तालुक्यातील वारकर्याशी भेट झाली. त्यांना स्नान घालणारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती माणसे त्यांच्या कुटुंबातील नव्हती. एवढेच नाही, तर ते त्यांच्या ओळखीचेदेखील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्हते, ना ते एका दिंडीतील होते, हे त्यांच्याकडून मला समजले. वडिलधारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्ती एकटीच स्नान करताना पाहून ती व्यक्ती आपल्याच कुटुंबातील असे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमजून इतर वारकर्यांनी त्यांना स्नान घातले. रक्ताचे नाते नसतानाही\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवडिलधार्या व्यक्तीला आपले वडील समजून स्नान घालताना टिपलेला हा प्रसंग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Sandesh Bhandare","offer_id":46182429131010,"sku":"","price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Wari_20Ek_20Anandyatra_20-_20Sandesh_20Bhandare_20-_203th_20Edishan_20-_20Price_20350-800x800.jpg?v=1748599253"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sandesh-bhandare.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}