{"title":"Sandeep Wakchoure","description":"","products":[{"product_id":"bhasha-aani-shikshan-by-sandeep-wakchoure-भाषा-आणि-शिक्षण","title":"Bhasha Aani Shikshan By Sandeep Wakchoure (भाषा आणि शिक्षण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबोलणं, लिहिणं, वाचणं या साऱ्यातनं शब्दांचं मांडणं असतं. भाषेची आंतरिक ओढ असल्याशिवाय हे सूचणं शक्य नसतं. ही ओढ आणि हे शब्दांचं मांडणं संदीपनं आपल्या शिक्षणविषयक सलग चौदाव्या पुस्तकात फारच सहजतेनं साधलं आहे. एखाद्या प्राध्यापकाच्या घनगंभीर शब्दप्रणालीऐवजी सामान्य वाचकाला वाचता वाचता सहज समजेल इतक्या सोप्या पद्धतीनं संदीपनं शिक्षणविषयक विचार आपल्यापुढं मांडला आहे. त्याचं मनापासून अभिनंदन!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिकवण्याची भाषा असूनही अलंकारीक शब्द नाहीत. डोईजड होणारे मुद्दे नाहीत. भाषाविषयक ओढ वाटेल आणि मुळातुन सारं समजून घ्यावसं वाटेल अशी सारी शब्दरचना आणि तिची सुलभ मांडणी संदीपनं केलीय. एकच विषय, एकच लेखक आणि एकच प्रकाशक या प्रकल्पा अंतर्गत  ‘चपराक’नं संदीपची ही पुस्तकमालिका देखण्या स्वरुपात प्रकाशित केली. संत ज्ञानेश्वरांचा शिक्षण विचार, विनोबा भावेंचा शिक्षणविचार ते अगदी गिजूभाई बधेका ते थेट जे. कृष्णमूर्तीपर्यंत अनेकांच्या शिक्षणविषयक विचारांचा जयघोष या निमित्तानं झाला. हे सर्व लेखन निष्ठापूर्वक केल्याबद्दल व्वा संदीप व्वा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e– सुधीर गाडगीळ\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Chaprak Prakashan \/ Sandeep Wakchoure","offer_id":46679905632514,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhasha-aani-Shikshan-Cover-1-scaled.jpg?v=1755586594"},{"product_id":"shikshanachiye-dwari-by-sandeep-wakchoure-शिक्षणाचिये-द्वारी","title":"Shikshanachiye Dwari By Sandeep Wakchoure (शिक्षणाचिये द्वारी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण शाळेत रोज ‘प्रतिज्ञा’ म्हणतो, पण ती कधी आपल्या आचरणात येत नाही. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ हे शालेय आयुष्यानंतर सहसा आपल्या लक्षातही येत नाही. आपण श्रमाला प्रतिष्ठा देत नाही. खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावताना आजवर आपल्यावर जे मूल्यसंस्कार घडले, ते आपल्या खिजगणतीतही नसतात. हे सगळे का घडते? तर इथली व्यवस्थाच पोखरली गेली आहे. पाठ्यपुस्तकातील धडे गिरवताना आयुष्याकडून आपण कसलेही ‘धडे’ घेत नाही, ही शोकांतिका आहे. ‘माणसाकडे माणूस म्हणून पाहा,’ इतके साधे पण अत्यंत महत्त्वाचे सूत्र घेऊन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक संदीप बाकचौरे ही पुस्तकमाला आपल्यासाठी घेऊन येत आहेत. बघता-बघता यातील हे दहावे पुस्तक प्रकाशित होत आहे. ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणें मुक्ति चारी, साधियेल्या,’ हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितले. परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी त्याच्या दारी भक्तिभावाने थांबलेला एक क्षणही पुरेसा असतो, असे त्यांना सांगायचे आहे. हाच भाव संदीप वाकचौरे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा केला आहे. ‘शिक्षणाचिये द्वारी आपण सर्व जण उभे असतोच! त्यातून राष्ट्रनिर्मितीस हातभार लावणारा आणि आपापसात आनंद पेरणारा ‘माणूस’ घडावा इतकी आपली शिक्षणव्यवस्था बळकट असावी.’ हे सारे कसे घडेल, याचे प्रांजळ, चिकित्सक चिंतन म्हणजे ‘शिक्षणाचिये द्वारी’ हे पुस्तक म्हणावे लागेल. – घनश्याम पाटील\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Chaprak Prakashan \/ Sandeep Wakchoure","offer_id":46679906255106,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/shikshanachiye-dwari.jpg?v=1755586563"},{"product_id":"srujanachi-waat-by-sandeep-wakchoure-सृजनाची-वाट","title":"Srujanachi Waat By Sandeep Wakchoure (सृजनाची वाट)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eअसे म्हणतात की, जोपर्यंत मूलभूत परिवर्तन होत नाही तोपर्यंत वरवर दिसणार्या बदलांना फारसा अर्थ उरत नाही. जर खरे समाज परिवर्तन घडवायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण म्हणजे जे शाळेत दिले जाते तेवढेच, अशी याची संकुचित व्याख्या नाही. जीवन जगण्यासाठी, एक चांगला माणूस म्हणवून घेण्यासाठी, देशाचा आदर्श नागरिक होण्यासाठी जे गुण अंगी असावे लागतात ते जाणून घेणे, आचरणात आणणे म्हणजे शिक्षण! असे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही ‘शिक्षण विचार’ घेऊन काही पुस्तके प्रकाशित करायचे ठरवले. सुप्रसिद्ध साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी ही कल्पना मांडली आणि स्वतःच ते शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललेही. त्यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि एकच विषय या कल्पनेतील तब्बल बारावे पुस्तक वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून त्यांनी ‘सृजनाची वाट’ दाखवली आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Chaprak Prakashan \/ Sandeep Wakchoure","offer_id":46679909433602,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Srujanachi-Waat.jpg?v=1755586542"},{"product_id":"patras-karan-ki-by-sandeep-wakchoure-पत्रास-कारण-की","title":"Patras Karan ki By Sandeep Wakchoure (पत्रास कारण की)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या महाराष्ट्रातील ‘दृष्टी’ असणारे शिक्षणतज्ज्ञ म्हणून तुम्ही आम्हाला ‘प्रिय’ आहात. हे प्रिय असणं वरवरचं किंवा तोंडदेखलं नाही. ज्यांच्या कामाविषयी आदर वाटावा, ज्यांच्याविषयी काळजातून प्रेमाचे झरे पाझरावेत, अशी तुमच्यासारखी माणसं आजच्या काळात खूपच दुर्मीळ झालीत. जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येईल तेव्हा ‘त्याचा’ अवतार अटळ असतो, असं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं; मात्र समाज जेव्हा जेव्हा अधोगतीचं टोक गाठतो तेव्हा तुमच्यासारखे काही विचारवंत लेखणीचं शस्त्र करत समाजाच्या डोळ्यावरील झापड दूर करण्यासाठी सरसावतात. आपल्या समाजरचनेच्या अधोगतीचं मूळ शिक्षणव्यवस्थेत आहे, हे तुमच्यासारख्या प्रज्ञावंत शिक्षकानं हेरलं आणि जागरुकतेचं व्रत स्वीकारलं. शिक्षणावर आधारित अल्पकाळात चौदा पुस्तके लिहून तुम्ही हा धोका वाचकांच्या समोर मांडला. इथली राज्यव्यवस्था त्याची दखल घेईलच, असं नाही! पण निदान तुम्ही चोचीत पाणी घेऊन जंगल विझवणाऱ्या चिऊताईच्या गटात सामील झालात. प्रस्तुत पुस्तक हे शिक्षणव्यवस्थेवरचं नसलं तरी विविध क्षेत्रातील लोकांना, प्रामुख्यानं पालकांना जागं करणारं आहे. ही ‘जागल्या’ची भूमिका समाजप्रबोधनाचाच भाग आहे. आपले हे विचार थेट काळजाला भिडतात आणि त्यातून लोकशिक्षणाचा मार्ग सुलभ होतो. यातील काही पत्रे वाचकांच्या मनाला स्पर्शन जातील, विचार करायला भाग पाडतील. भिल्ल अंधारात एखाद्या काजव्याचं टिमटिमणं किती आल्हाददायक आणि आश्वासक असतं याची प्रचिती घडवणारं हे लेखन आहे. तुमच्या प्रेमाचा ओलावा वाचकांना ज्ञानसाधनेचा मार्ग दाखवतो. स्नेह आहेच. तो अधिक वृद्धिंगत होत जाईल. घनश्याम पाटील लेखक, प्रकाशक आणि संपादक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Chaprak Prakashan \/ Sandeep Wakchoure \/ Marathi","offer_id":47133605560578,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/594549211_24950571317948467_7908992061596577158_n-e1765204392658.jpg?v=1765781718"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sandeep-wakchoure.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}