{"title":"Salil Desai","description":"","products":[{"product_id":"sadetin-khun-by-salil-desai-dr-shuchita-nandapurkar-phadketranslator-साडेतीन-खून","title":"Sadetin Khun By Salil Desai, Dr Shuchita Nandapurkar-Phadke(Translator) (साडेतीन खून - इन्स्पेक्टर सारळकर केस फाइल्स)","description":"\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eएक बाई पलंगावर मरून पडलेली… आणि त्याच खोलीत एक पुरुष सीलिंग फॅनला लटकलेला. टेबलावर सुसाइड नोट… कर्जात बुडालेल्या एका पुरुषाने प्रतारणा करणाऱ्या बायकोला मारून टाकत स्वतःलाही संपवलेलं आहे, असं हे प्रकरण वरवर जरी दिसत असलं, तरी तपासातून समोर येणारे धागेदोरे वेगळ्याच बाबींकडे दिशादर्शन करतात.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003eमग सीनिअर इन्स्पेक्टर सारळकर आणि पीएसआय मोटकर या धाग्यांचा कसून माग काढतात. त्यातून उघड होतात निराळ्याच गुंतागुंतीच्या गोष्टी… बंगळुरूतली सात वर्ष जुनी खुनाची केस, लुबाडणुकीचे जमिनीचे व्यवहार, फसवणुकीची कृत्यं, कडवट शत्रुत्व, मृत बाईचं पूर्वजन्म जाणून घेण्याचं वेड आणि रामदेव नामक गूढ बाबाचं गौडबंगाल…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअचानक खुनी समोर येतो… आणखी एक जीव घेण्यासाठी… सारळकर आणि मोटकर यांना चौथा खून करण्याआधी त्याला पकडता येईल का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनपेक्षित वळणं घेणारी, मानवी मनाचे अंधारे कोपरे उजागर करणारी… खिळवून ठेवणारी मर्डर मिस्टरी… साडेतीन खून !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Salil Desai \/ Marathi","offer_id":47144858452226,"sku":null,"price":319.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SadeteenKhoon_CoverFinal_page-0001.jpg?v=1765954627"},{"product_id":"ashish-karve-hatya-prakaran-by-salil-desai-आशिष-कर्वे-हत्या-प्रकरण-इन्स्पेक्टर-सारळकर-केस-फाइल्स","title":"Ashish Karve Hatya Prakaran By Salil Desai (आशिष कर्वे हत्या प्रकरण - इन्स्पेक्टर सारळकर केस फाइल्स)","description":"\u003cp\u003eआशिष कर्वे यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये मुसाइड नोटसह मापडतो, तेव्हा पीएसआय मोटकर यांना ती केस आत्महत्येची आहे असंच वाटतं. परंतु नेहमीप्रमाणेच त्यांच्या साहेबांची सीनिअर इन्स्पेक्टर सारळकरांची कल्पनाशक्ती वेगळेच तर्कवितर्क लढवू लागते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजसजसा ते तपास करू लागतात, तसतसे वेगवेगळे तपशील, तथ्यं समोर येऊ लागतात. आशिष यांचा व्यावसायिक भागीदार आणि त्यांचे संबंध ताणलेले असतात, तर बायको, मित्र, मेव्हणा यांना आशिष नकोसे झालेले असतात आणि सख्ख्या भावाशी त्यांचे मालमत्तेवरून हाणामारी करण्यापर्यंत टोकाचे वाद झालेले असतात…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोस्टमॉर्टम अहवालानुसार आत्महत्या नसून तो खून आहे हे सत्य उघड होताच, सारळकरांची विचारशक्ती आणखी वेगाने दौडू लागते. ते तप करून एकेक धागा सोडवू लागतात, तेव्हाच आणखी एक खून होतो ! आणि त्यापाठोपाठ बाहेर येतात अनेक काळी, गडदगहिरी सत्यं…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्य, अर्धसत्य आणि असत्य यांच्या गुंत्यातून मानवी व्यवहारांच्या अंधाऱ्या बाजू उलगडणारी, उत्कंठावर्धक मर्डर मिस्टरी… आशिष कर्वे हत्या प्रकरण !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Salil Desai \/ Marathi","offer_id":47144914190594,"sku":null,"price":319.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AshishKarveHatyaprakaran_CoverFinal_page-0001-3.jpg?v=1765954646"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/salil-desai.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}