{"title":"Sadhana Prakashan","description":"","products":[{"product_id":"sangat-narharchi-by-madhu-kurandkar-संगत-नरहरची","title":"Sangat Narharchi By Madhu Kurandkar (संगत नरहरची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९३२ ते १९८२ असे केवळ ५० वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नरहर कुरुंदकर यांना विचारी महाराष्ट्र लेखक व वक्ता म्हणून ओळखतो. मराठवाड्याची शान आणि विवेकाचा प्रवक्ता, अशी त्यांची ख्याती होती. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती इत्यादी क्षेत्रांतील अनेकविध विषयांची चर्चा-चिकित्सा त्यांनी केली. हजारो भाषणे आणि शेकडो लेख यांद्वारे त्यांनी विवेकजागर चालवला. (अर्थातच, हे करताना त्यांनी भावनांचे महत्त्व ओळखून जीवनातील माधुर्य सातत्याने जपले.) त्यांनी केलेले हे कार्य वयाच्या पंचविशीनंतरचे आहे. म्हणजे हे विचारकार्य घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची घडण आधीच्या पंचवीस वर्षांत झाली, ती प्रक्रिया नेमकी काय होती, याचे कुतूहल त्यांचे लेखन वाचलेल्या सर्व लहानथोरांना असते. ते कुतूहल बऱ्याचअंशी शमवणारे आणि अनेक पटीने वाढवणारे हे पुस्तक आहे. वय वर्षे १० ते २२ या काळातील नरहरी कसा आकाराला येत गेला, याचे चित्रमय व आशयसंपन्न वर्णन त्याच्या निकट सहवासात राहिलेल्या गाववाल्या समवयस्क मित्राने केले आहे. अतिशय समरसून, उत्कटतेने व भारावलेल्या मनाने केलेले हे लेखन आहे. अशा प्रकारचे पुस्तक मराठीत तरी अन्य कोणते नसावे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45854570250498,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51bjTxKnbTL._SY425.jpg?v=1739429735"},{"product_id":"nya-m-g-ranade-likhit-3-granth-by-nya-m-g-ranade-avdhut-dongretranslators-न्या-म-गो-रानडे-लिखित-तीन-ग्रंथ","title":"Nya M G Ranade Likhit 3 Granth By Nya M G Ranade, Avdhut Dongre(Translators) ( न्या. म.गो.रानडे लिखित तीन ग्रंथ)","description":"\u003cp\u003e \u003cstrong\u003eन्या. म.गो.रानडे लिखित तीन ग्रंथ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. Essays on Indian Economics.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2. Religious and Social Reforms.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3. Miscellaneous Writings.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.\u003cbr\u003eआता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3. संकीर्ण निबंध.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.\u003cbr\u003eया तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.\u003cbr\u003eया लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45936319332610,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nya_M_G_Ranade_Yanche_Tin_Granth_By_._._..jpg?v=1740984914"},{"product_id":"manasrangche-antarang-by-atul-pethe-मानसरंगचे-अंतरंग","title":"Manasrangche Antarang By Atul Pethe (मानसरंगचे अंतरंग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमन, मनाचे व्यवहार, मानसिक आजारांची, लक्षणे, कारणे आणि उ यांवर काही वर्षांपूर्वी डॉ. हमीद दाभोलकर या मनोविकार तज्ज्ञासोब मी आणि राजू इनामदार यांनी 'मनोविकार संवाद कार्यशाळा' घेतली त्यात आम्ही संवादाच्या विविध पद्धतींवर काम केले. विविध आजा लोकांना देण्याकरता पोस्टर, घोषवाक्य, गाणी आणि नाटक यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यात घुसळण ह अचूक शास्त्रीय माहिती ही कलात्मक संवादी पद्धतीने देण्याचे मार्ग त्यातील एक मार्ग म्हणजे Community Theatre सुरू करून लोकांशी संवाद साधणे हा होता. नाटक करताना करणारे आणि बघण या दोघांचेही शिक्षण होते. विचारांची बीजे दृक्-श्राव्य रूपातून खोलवर रुजतात. जिवंत अनुभव हा प्रभावशाली असतो. हे सर्व लक्ष् 'मानसरंग नाट्यमहोत्सव' भरवावा असे ठरले. तीन वर्षे ते महोत्सव= त्या संपूर्ण प्रक्रियेची झलक दाखवणारी ही पुस्तिका आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46024436056322,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81mYBkqYyXL._SY466.jpg?v=1742972155"},{"product_id":"goshta-mendha-gavachi-by-milind-bokil-गोष्ट-मेंढा-गावाची","title":"Goshta Mendha Gavachi By Milind Bokil (गोष्ट मेंढा गावाची)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46029056672002,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_66be5ec7-5406-44df-ab19-1375048b644e.png?v=1743144943"},{"product_id":"jwarichi-kahani-by-dhananjay-sanap-ज्वारीची-कहाणी","title":"Jwarichi Kahani By Dhananjay Sanap (ज्वारीची कहाणी)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46029057786114,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_66be5ec7-5406-44df-ab19-1375048b644e.png?v=1743144943"},{"product_id":"jinkuni-maranala-by-vasant-bapat-जिंकुनि-मरणाला","title":"Jinkuni Maranala By Vasant Bapat (जिंकुनि मरणाला)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46029059490050,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_66be5ec7-5406-44df-ab19-1375048b644e.png?v=1743144943"},{"product_id":"asidhara-असिधारा-केशव-गोरे-स्मृतिग्रंथ","title":"Asidhara (असिधारा केशव गोरे स्मृतिग्रंथ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकेशव ऊर्फ बंडू गोरे समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग, कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद. आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा 'बायोडेटा'. पण बायोडेटामध्ये मावणारं हे व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची त्यांना योग्य जाण होती. केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका संपूर्ण काळाचं ते दस्तावेजीकरण होतं. हा दुर्मिळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077621862658,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/712vgIObRdL._SY466.jpg?v=1744527315"},{"product_id":"charvak-by-suresh-dvadashivar-चार्वाक","title":"Charvak By Suresh Dvadashivar (चार्वाक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eईश्वर, धर्म, धार्मिक कर्मकांडे यांना विरोध करणारा चार्वाकांचा पंथ पांडवाच्या काळातही आदरणीय होता हे विशेष आहे. वनपर्वात द्रौपदी कृष्णाला सांगते, 'लोकायत मताचे ग्रंथ शिकवायला तिच्या वडिलांनी काही पुरोहितांची नेमणूक केली होती.' तात्पर्य, चार्वाक आदरणीय होते, त्यांचे ग्रंथ अस्तित्वात होते. ते शिकवले जात होते आणि त्यांचे पुरोहितही होते. आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले... पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही... कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077623959810,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41GTtZQRiEL._SY425.jpg?v=1744527319"},{"product_id":"ekaki-by-suresh-dvadashivar-एकाकी","title":"Ekaki By Suresh Dvadashivar (एकाकी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो. यावर उपाय सांगणारे शास्त्र कोणते? मानसशास्त्र, धर्मशास्त्र, लहरीपण की एकाकीपणा समझौता करण्याची मानसिकता? एक प्रकार याहून वाईट व दुःखद आहे. दीर्घ काळ आजारी असलेली, फार काळ वृद्धत्व जगणारी किंवा कधी काळी वाट्याला आलेले वैधव्य वा विधुरपण सांभाळणारीही माणसे असतात. त्यांच्या एकाकी कळांची कल्पना कशी करायची? की, तो समाजाचा विषयच नव्हे ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077625401602,"sku":"","price":106.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51yEjdMpJ6L._SY466.jpg?v=1744527337"},{"product_id":"ikebana-by-datta-nayak-इकेबाना","title":"Ikebana By Datta Nayak (इकेबाना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेश- विदेशांतला प्रवास हा आंतरिक आनंद देणारा अनुभव असतो. कालांतराने दुधाचे दही व्हावे त्याप्रमाणे हे अनुभव आंबून त्यांची अनुभूती होते. छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचे किंवा निसर्गाचे जशाचे तसे प्रतिबिंब पडल्याचे दिसते. चित्राची गोष्ट वेगळी आहे. चित्रकार एखादी व्यक्ती किंवा निसर्ग पाहताना आपल्या मनात भावनांचे जे कल्लोळ उसळले त्याचे मिश्रण आपल्या चित्रात करत असतो. या पुस्तकात अंतर्भूत झालेली प्रवासवर्णने प्रभाववादी शैलीत लिहिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077628416258,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41R-2sSn23L._SY425.jpg?v=1744527341"},{"product_id":"gandhinche-garud-by-sanjivani-kher-गांधींचे-गारुड","title":"Gandhinche Garud By Sanjivani Kher  (गांधींचे गारुड)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगांधीजींच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते ! सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मागरिट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मागरिट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने आलेल्या काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या. काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत् वाटावे असे विश्व मनासमोर साकारत गेले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077803331842,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41YzqT4fSFL._SY466.jpg?v=1744527327"},{"product_id":"tujhyasave-tujhyavina-by-suresh-dvadashivar-तुझ्यासवे-तुझ्याविना","title":"Tujhyasave Tujhyavina By Suresh Dvadashivar (तुझ्यासवे तुझ्याविना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमी मूल्यांसाठी तुरुंगवास भोगला. ज्यांच्या दर्शनासाठी लोक येतात, त्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांच्याशी असलेले पितृवत संबंध फुंकून टाकले. पण विचारांची कास सोडली नाही आणि थोरा-मोठ्यांचे पदर कधी सोडले नाहीत. ज्यांना मी ऐकविले ते महाराष्ट्राचे नामवंत वक्ते आणि आत-बाहेर संतवृत्ती धारण करणारे माझेच वडीलधारे होते. ते कमालीचे प्रामाणिक होते. माझे ऐकून ते म्हणाले, \"तू म्हणतोस ते खरे आहे.' मला माणसांचा मोह सोडवत नाही.. त्यासाठी त्यांच्या प्रमादांकडे दुर्लक्ष करणे कमीपणाचे वाटत नाही. पण त्यांच्याविषयीच्या माझ्या विश्वासाचे टवके मात्र नेहमीच उडत असतात. 'तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि 'लोकसत्ता'त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077807198466,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31UPWK3kvvS._SY466.jpg?v=1744527311"},{"product_id":"nakshalwadache-avhan-by-devendra-gavande-नक्षलवादाचे-आव्हान","title":"Nakshalwadache Avhan By Devendra Gavande (नक्षलवादाचे आव्हान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनक्षलवाद्यांची हिंसापूर्ण चळवळ व सशस्त्र लढ्याची तयारी, अतिमागास आदिवासी प्रदेशांत त्यांना मिळणारे पाठबळ, राज्य सरकारे आणि भारत सरकार यांच्याकडून सतत दिले जाणारे गोंधळाचे संकेत आणि पोलिसी बळावर दिला जाणारा भर या सगळ्या कारणांमुळे नक्षलवादाच्या प्रश्नाबद्दल, उद्दिष्टांबद्दल कार्यपद्धतीबद्दल आणि परिणामांबद्दल जिज्ञासू व जागरूक नागरिकांना माहिती व दृष्टी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. पण वाचक-प्रेक्षकांचे क्षणिक लक्ष वेधून घेण्याच्या माध्यमसंस्कृतीच्या काळात नक्षलवादाबद्दल सनसनाटीच्या पलीकडे लोकांच्या हाती फारसे काही लागत नाही. या पार्श्वभूमीवर, नक्षलवादाचे आव्हान नेमके काय आहे, याची चर्चा करणारे हे पुस्तक वाचकांना नक्कीच विचारप्रवृत्त करणारे ठरेल! सुहास पळशीकर (प्रस्तावनेतून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46077809426690,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41cCdBwW-5L._SY466.jpg?v=1744527324"},{"product_id":"drushti-aarogyakrantichi-by-atul-deulgaonkar-दृष्टी-आरोग्यक्रांतीची","title":"Drushti Aarogyakrantichi By Atul Deulgaonkar (दृष्टी आरोग्यक्रांतीची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीणआरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो.त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे 'भारतवैद्य', 'हॅलो मेडिकल फाऊंडेशन', 'महिला बचतगट योजना', 'एकल महिलांचे सक्षमीकरणअसे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक 'भारतवैद्य' उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीयपातळीवर 'आशा' साकारते. 'व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था' हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे. वीणा गवाणकर.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46093776978178,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61jMapqCHHL._SY466.jpg?v=1745218519"},{"product_id":"maharashtratil-prabodhan-pudhil-disha-by-milind-bokil-महाराष्ट्रातील-प्रबोधन-पुढील-दिशा","title":"Maharashtratil Prabodhan Pudhil Disha By Milind Bokil (महाराष्ट्रातील प्रबोधन पुढील दिशा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Milind Bokil","offer_id":46145247641858,"sku":"","price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MaharashtratilPrabodhan-F.jpg?v=1747292127"},{"product_id":"aajache-masters-by-mina-karnik-आजचे-मास्टर्स","title":"Aajache Masters By Mina Karnik (आजचे मास्टर्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा \/ दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– मीना कर्णिक  (मनोगतामधून)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Mina karnik","offer_id":46146989097218,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AajcheMasters-F.jpg?v=1747378730"},{"product_id":"mushafiri-by-niti-badave-मुशाफिरी","title":"Mushafiri By Niti Badave (मुशाफिरी)","description":"\u003cp\u003eअनेक तहेच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कामांच्या निमित्त नीती बडवे यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, नेदरलँड, फिनलँड, डेन्मार्क, इस्राएल, झेक रिपब्लिक, टर्की, कॅनडा, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी देशांना भेटी दिल्या.\u003cbr\u003eत्या भेटींचे अनेक रसभरीत वृत्तांत या पुस्तकात सामावलेले असल्यामुळे, प्रत्येक लेखात वाचकाला काहीतरी नवीन वाचायला मिळते. लिहिण्याच्या ओघात त्या-त्या देशामधील सांस्कृतिक वैशिष्ट्ये, भाषा, लोक, प्रेक्षणीय स्थळे, खाद्यसंस्कृती, प्रवासातील विलक्षण अनुभव आणि त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींशी उत्स्फूर्तपणे वाढत गेलेल्या सुखद ऋणानुबंधांच्या कहाण्या, हे सर्व या पुस्तकात अतिशय हळुवारपणे गुंफले गेले आहे.\u003cbr\u003eअशा ऋणानुबंधाच्या भावनिक ओलाव्यामुळे नीती बडवे मनाने केवळ पुणे किंवा महाराष्ट्रच नव्हे, तर भारताबाहेरील अनेक देशांशी एकरूप झाल्याचा प्रत्यय येतो. त्यांची लोकसंग्रह करण्याची हातोटी आणि मैत्री जतन करण्याची क्षमता पाहून वाचक थक्क होतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– राजन हर्षे (प्रस्तावनेतून)\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Niti Badave","offer_id":46147241738498,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mushaphiri-F_1.jpg?v=1747378566"},{"product_id":"drushti-aarogyakrantichi-by-atul-deulgaonkar-दृष्टी-आरोग्यक्रांतीची-1","title":"Drushti Aarogyakrantichi By Atul Deulgaonkar( दृष्टी आरोग्यक्रांतीची )","description":"\u003cp\u003eग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवीणा गवाणकर\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Atul Deulgaonkar","offer_id":46147242393858,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/DrushtiArogyakrantichi-F.jpg?v=1747378639"},{"product_id":"atmakatha-by-madhu-limaye-आत्मकथा","title":"Atmakatha By Madhu Limaye (आत्मकथा)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Madhu Limaye","offer_id":46662642696450,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_e6d9ee82-e450-4bbd-86ce-ec0103e4d6fe.jpg?v=1754981738"},{"product_id":"samaj-rajkaran-kala-by-makrand-sathe-समाज-राजकारण-कला","title":"Samaj Rajkaran Kala By Makrand Sathe (समाज राजकारण कला)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Makrand Sathe","offer_id":46662647447810,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_5a27effd-3d71-4745-a7f1-3b84e88c19a9.jpg?v=1754981761"},{"product_id":"shrikant-bhag-3-4-by-sharcchandra-chattopadhyay-b-v-mama-varerkartranslator-श्रीकांत-भाग-3-व-4","title":"Shrikant Bhag 3 \u0026 4 By Sharcchandra Chattopadhyay, B. V. (Mama) Varerkar(Translator) (श्रीकांत भाग 3 व 4)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘श्रीकांत’ हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Sharcchandra Chattopadhyay \/ Marathi","offer_id":46769690476802,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SHRIKANT_BHAG_3-4_3-4_By_Sharcchandra_Chattopadhyay_BHA._VI_._MAMA_VARERKAR_600x_e4b2dded-2004-4da6-af55-ca1bfac3db99.jpg?v=1758351348"},{"product_id":"savyasachi-by-saratchandra-chattopadhyay-b-v-mama-varerkartranslator-सव्यसाची","title":"Savyasachi By Saratchandra Chattopadhyay, B. V. (Mama) Varerkar(Translator) (सव्यसाची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्य लढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली ‘सव्यसाची’ ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. नरहर कुरुंदकरांनी या भव्य कादंबरीचे भरभरून कौतुक केले आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, “शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, ‘गीता’ आणि ‘सव्यसाची’. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eक्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला तिचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे, याविषयी अनेक तर्क केले जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झाल्यासारखी वाटतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Saratchandra Chattopadhyay \/ Marathi","offer_id":46769693524226,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61hGFdS8R8L._SY466.jpg?v=1758351324"},{"product_id":"sanyashachya-dairytun-by-v-pa-deulgaonkar-संन्याशाच्या-डायरीतून-हैद्राबाद-स्वातंत्र्य","title":"Sanyashachya Dairytun By V. PA. DEULGAONKAR  संन्याशाच्या डायरीतून हैद्राबाद स्वातंत्र्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वामीजींचे महत्त्व वाढण्यास, त्यांना प्रभावशाली नेते बनण्यास इतिहासाने खरोखरच नाट्यपूर्ण प्रसंग व संधी उपलब्ध करून दिली. हैद्राबाद संस्थानात एकीकडे असलेली अनिर्बंध सरंजामशाही व दुसरीकडे असलेले कमालीचे दारिद्र्य व मागासलेपण यांच्यामधील परस्पर क्रिया-प्रतिक्रियांतून शोषण मात्र निःसंकोचपणे बोकाळले होते. जमीनधारणेचा प्रश्न प्रामुख्याने सर्वांपुढे उभा होता. त्या प्रश्नावरून ग्रामीण भागात चोहोकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रझाकार दल, कम्युनिस्ट, सरंजामी वतनदार, समाजकंटक आणि नफेखोर या सर्वांनी मिळून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बराच काळपर्यंत पृथ्वीवर नरक निर्माण केला होता. अकनूर, मचलपल्ली येथील भीषण घटना आणि त्यांसारख्या अन्यत्रही लक्षावधी मूक जनतेवर चाललेल्या अत्याचारांमुळे मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरेकी विचाराच्या मंडळींना आपल्या दृष्टीने या परिस्थितीचा लाभ करून घेण्यास एक संधी मिळाली. प्रश्न मुख्यतः सामाजिक व आर्थिक स्वरूपाचा होता. अर्थात त्यात जातीय व राजनैतिक प्रश्नांचाही गुंता होताच. हे दुखणे नाहीसे करण्यासाठी मोठ्या स्वरूपाची व थोडीशी किचकट अशी शस्त्रक्रिया करणे अवश्य होते. ती शस्त्रक्रिया आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ध्येयनिष्ठेने व चिकाटीने स्वामीजींनी केली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ V. PA. DEULGAONKAR \/ Marathi","offer_id":46771951173890,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61Yr0M3cBFL._SY466.jpg?v=1758524143"},{"product_id":"sathavanincha-kolaj-by-m-vimal-mohan-साठवणींचा-कोलाज","title":"Sathavanincha Kolaj By M. Vimal Mohan (साठवणींचा कोलाज)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'साठवणींचा कोलाज' म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ M. Vimal Mohan \/ Marathi","offer_id":46771971195138,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91lVtA9CmHL._SY466.jpg?v=1758524158"},{"product_id":"aajache-masters-by-meena-karnik-आजचे-मास्टर्स","title":"Aajache Masters By Meena Karnik (आजचे मास्टर्स)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Meena Karnik \/ Marathi","offer_id":46948811833602,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_0a85b427-b021-4fe2-9a36-aa70e69b9c64.jpg?v=1762066558"},{"product_id":"bodhacha-jodla-tara-by-milind-bokil-बोधाचा-जोडला-तारा-1","title":"Bodhacha Jodla Tara By Milind Bokil (बोधाचा जोडला तारा)","description":"\u003cp data-start=\"95\" data-end=\"411\"\u003eसाहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निस्संदिग्ध, उघड करून, सगळं स्पष्ट करून सांगणं हे साहित्याचं काम नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रत्त्येक होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे ठळकलेलं नाही तेच जाणणं; ही प्रक्रिया वाचकाच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो.”\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"413\" data-end=\"645\"\u003e“साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत... सामाजिक जाणीव ही साहित्याची सहच, सुलभ अशी सहचारी आहे. त्यामुळं एकाकी मनात त्या सुमनाचे नाद शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्य असं होईल, पण सामाजिक जाणीवेचं नाही.”\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"647\" data-end=\"846\"\u003e“समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहुवस्त्रं एकत्र शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित झाला तर आतल्या त्या बंधनात अडकतो, त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल.” — मिलिंद बोकील यांच्याशी संवाद\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Milind Bokil \/ Marathi","offer_id":47017204908290,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_5cc5d1c9-6df9-40f4-983b-4943eefd180b.jpg?v=1762671334"},{"product_id":"rajkaran-jidnyasa-by-suhas-palashikar-राजकारण-जिज्ञासा","title":"Rajkaran Jidnyasa By Suhas Palashikar (राजकारण जिज्ञासा)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Suhas Palashikar \/ Marathi","offer_id":47158867820802,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9ebbcf91b7c84a23b2d6c6075746793e.jpg?v=1766386540"},{"product_id":"nivedan-by-dharmanand-kosambi-निवेदन","title":"Nivedan By Dharmanand Kosambi (निवेदन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१८७६ ते १९४७ असे ७० वर्षांचे आयुष्य धर्मानंद कोसंबी यांना लाभले. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर मृत्यूय सेवाग्राम आश्रमात. वयाच्या ऐन पंचविशीत ते बुद्धी प्रेमाच्या आणि बुद्ध धर्माच्या शोधात घराबाहेर पडेल. पुढील दीड दशकात त्यांनी पुणे , गवाल्हेर , काशी, नेपाळ , गया , मद्रास , श्रीलंका , म्यानमार , कलकत्ता , इंदोर , सिक्कीम , बडोदा , अमेरिका असा प्रवास केला. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e त्या निमित्तनोही आणलेली हि नवी आवृत्ती... !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Dharmanand Kosambi \/ Marathi","offer_id":47202066071810,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5jpg_fe32fd8e-f995-4b53-ad8e-ad43c5ff8338.jpg?v=1767596121"},{"product_id":"rajkaran-jidnyasa-by-suhas-palshikar-राजकारण-जीज्ञासा","title":"Rajkaran Jidnyasa By Suhas Palshikar (राजकारण जीज्ञासा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजकारणाबद्दल सर्वांनाच एक कुतूहल असते. ते सत्तेच्या वापराबद्दल असते हे तर खरेच, पण त्याखेरीज सार्वजनिक व्यवहारांमध्ये येणारे शब्दप्रयोग, त्यांच्या आधारे केले जाणारे युक्तिवाद, यांच्याबद्दलही कुतूहल असते. अनेक वेळा राज्यशास्त्र हा विषय न शिकलेल्या नागरिकांना विविध राजकीय घडामोडींचा अर्थ कसा लावायचा यात रस असतो. म्हणून या पुस्तकात कमीत कमी तांत्रिक आणि विद्याक्षेत्रीय भाषा वापरून सभोवतालच्या राजकारणात वापरले जाणारे शब्द आणि होणारे वादविवाद यांची चर्चा केली आहे. या अर्थाने, हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांपेक्षा बिगर-विशेषज्ञ पण चौफेर नजर असलेल्या सुजाण अशा वाचकांसाठी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Suhas Palshikar \/ Marathi","offer_id":47231291719938,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_41f5bbca-89ca-465c-9a5f-a4a05f597adf.jpg?v=1768719379"},{"product_id":"lokmanya-tilak-by-a-k-bhagwat-g-p-pradhan-लोकमान्य-टिळक","title":"Lokmanya Tilak By A. K. Bhagwat \/ G. P. Pradhan (लोकमान्य टिळक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२३ जुलै १८५६ ते १ ऑगस्ट १९२० असे ६४ वर्षांचे आयुष्य लोकमान्य टिळक यांना लाभले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा, म्हणजे १९५६ मध्ये त्यांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस समितीने घोषित केली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक तीन पुस्तकांना विभागून दिला. त्यातील एक पुस्तक होते अ. के. भागवत व ग.प्र.प्रधान यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र. ते दोघेही त्यावेळी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली नव्हती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊस, दिल्ली यांनी प्रकाशित केले. त्याला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. नंतर त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला नव्हता. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आणि ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ, ही दोन निमित्तं साधून प्रस्तुत अनुवाद प्रकाशित केला आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ A. K. Bhagwat \/ G. P. Pradhan \/ Marathi","offer_id":47327592513794,"sku":null,"price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/565_218fb6d0-8e3e-4b02-9d75-36c3fb4b545a.jpg?v=1770101753"},{"product_id":"bijapur-diary-by-aishwarya-revadkar-बिजापूर-डायरी","title":"Bijapur Diary By Aishwarya Revadkar (बिजापूर डायरी)","description":"","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Aishwarya Revadkar \/ Marathi","offer_id":47328189776130,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/65_4f0923bb-d5ae-4c31-b308-2cbb896e77aa.jpg?v=1770188187"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sadhana-prakashan.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}