{"title":"Sachi Bhand","description":"","products":[{"product_id":"sachichya-goshti-by-sachi-bhand-साचीच्या-गोष्टी","title":"Sachichya Goshti By Sachi Bhand (साचीच्या गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआठ वर्षांची तिसरीतली साची. ती आजोबांना म्हणाली, “मी गोष्ट सांगते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही लिहून घ्या.” ती गोष्ट सांगू लागली. आजोबा लेखनिक झाले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e२०२१ साली तिने पाच गोष्टी सांगितल्या. लेखनिक आजोबा कौतुकाने लिहीत गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकदा आजोबांनी लिहिताना तिचा एक शब्द बदलला. साची पटकन म्हणाली, “मी सांगितलेला शब्द बदलू नका.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e”आजोबांनी तिचा आदेश पाळला. २०२२ साली चौथ्या वर्गात तिने पुन्हा पाच गोष्टी लिहिल्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाचीच्या अशा या दहा गोष्टी. ग्रंथांशी मैत्री अन् वाचन-लेखन संस्कारांचा वारसा लाभलेल्या साचीच्या गोष्टींतून एक प्रकारच्या नीतिकथाच पुढं आल्यात. लेखन संस्कारांचे स्वप्न पाहिलेल्या तिसऱ्या पिढीतील या निरागस लेखिकेची ही सुरुवात आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अगोदर साचीने गोष्टींचे व्हिडिओ केले आहेत. आकाशवाणी केंद्रात काही गोष्टी सांगत धीटपणे मुलाखत दिली होती. ग्रंथप्रेमातून ज्ञान- विज्ञानाची पताका खांद्यावर घेऊ पाहणारी ही बाललेखिका ! तिच्या कथा म्हणजे उद्याच्या लेखिकेच्या पाऊलखुणाच आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबालकांवर वाचन-लेखनाचे संस्कार करणे, ही आजची गरज आहे. पालकांनी सर्जनशीलतेचे हे कर्तव्य सांभाळले, तर घरोघरी साचीसारखे बाललेखक वाचन-लेखनाची सुरुवात करू शकतील. ‘साचीच्या गोष्टी’ ही त्याची सुरुवात आहे.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– धारा भांड – मालुंजकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Sachi Bhand","offer_id":46134907437314,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/For-Website-Mockup-1_191005ab-7846-4283-a467-307dedc03622.jpg?v=1746773949"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sachi-bhand.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}