{"title":"Rohan Prakashan","description":"","products":[{"product_id":"aharavishayi-sare-kahi-by-vasumati-dhuru","title":"Aharavishayi Sare Kahi By Vasumati Dhuru","description":"\u003cp\u003eआपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक\u003cbr\u003eआहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!\u003cbr\u003eहे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.\u003cbr\u003eथोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45465524011266,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/c408b870-116c-4db8-add6-eac55224f87b.jpg?v=1728235439"},{"product_id":"mee-jayurana-by-jayshree-manohar","title":"Mee Jayurana By Jayshree Manohar","description":"\u003cp\u003eबापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45468771647746,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61a4Z2lomoL._SY425.jpg?v=1728235037"},{"product_id":"gothanyatlya-goshti-by-rushikesh-gupte","title":"Gothanyatlya Goshti By Rushikesh Gupte","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोष्टी सांगण्यापूर्वी… ‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही. म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45468790980866,"sku":"","price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41UxUwDm2XL._SY342.jpg?v=1728235435"},{"product_id":"anandi-sharir-anandi-man-by-lily-joshi","title":"Anandi Sharir Anandi Man By Lily Joshi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45468796453122,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61s9JCHvh3L._SL1000.jpg?v=1728235108"},{"product_id":"man-ulgadtana-by-dr-vijaya-phadnis","title":"Man Ulgadtana By Dr. Vijaya Phadnis","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमन असे कसे, कांद्याचे पापुद्रे जसे!’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोण्या अज्ञात कवीच्या या ओळी मनाचं यथार्थ वर्णन करतात. मात्र थांग न लागणार्‍या मनाची मानसशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती यांच्याद्वारे चिकित्सा केल्यास अनेक मनोव्यापारांचा वेध घेता येतो. ३५ वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणार्‍या डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहातून मनुष्यस्वभाव, मनोविकार, मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रॉइडचे स्वप्नाचे सिद्धान्त, रिअ‍ॅलिटी थेरपी आदी मानसशास्त्रीय संकल्पना किंवा डिप्रेशनसारखे मनोविकार आदी गोष्टी विशद करताना त्यांनी आपल्या लेखांना अनुभवांची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेख माहितीपूर्ण, तसंच मर्मदृष्टी देणारे व रंजक झाले आहेत. या लेखांमधून फडणीस यांनी विविध मानसोपचारतंत्राचा वापर कसा करावा, हेही साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यामुळे वाचकांबरोबरच मानसशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वभावाचे विविध नमुने मांडणारा, सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन देणारा मौलिक लेखसंग्रह… मनं उलगडताना !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45471268569346,"sku":"","price":233.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71nsSTdPu5L._SL1497.jpg?v=1728235064"},{"product_id":"shahid-by-kuldip-nayyar","title":"Shahid By Kuldip Nayyar","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eकेवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ‘माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधनकार ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. यात भगत सिंग यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टीच नय्यर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. भगत सिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या उटल्याचा तपशीलवार वर्णन असून हंस राज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आले आहेत तसंच यात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगत सिंग याच विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले, हेही नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eदेशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा शहीद!\u003c\/div\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527524475138,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/shahid.jpg?v=1728235289"},{"product_id":"sukhane-jaganyasathi-by-dr-vijaya-phadnis","title":"Sukhane Jaganyasathi  By Dr. Vijaya Phadnis","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !\\n हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत\\n मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.\\n स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह... सुखाने जगण्यासाठी !\"}' data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eआजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण !\u003cbr\u003eहे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत\u003cbr\u003eमौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते.\u003cbr\u003eस्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527550361858,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51IlaIZhJbL.jpg?v=1728235350"},{"product_id":"mossad-missions-by-ashish-kalkar","title":"Mossad Missions By Ashish Kalkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकाटेकोर नियोजन, चतुर, चौकस व देशाशी एकनिष्ठ असलेली हेरयंत्रणा आणि धूर्त, चलाख नेतृत्व यांच्या जोरावर ‘मोसाद’ने तिच्या निर्मितीपासून अशक्य वाटणाऱ्या अनेक मोहिमा तडीस नेल्या. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आशिष काळकर यांनी मोसादच्या अशा काही निवडक नाट्यमय मोहिमांचं अथपासून इतिपर्यंत विस्तृत गोष्टीरूप कथन केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मोसादच्या यशस्वी मोहिमांबरोबरच, अयशस्वी मोहिमांचाही आढावा घेतला आहे. याशिवाय इस्त्रायल देशाची स्थापना, मोसादची निर्मिती, तिची गरज अशी पार्श्वभूमीही सांगितली आहे. त्यामुळे मोसादची यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेण्यास मदत होते. पुस्तकात शेवटी, काळकर यांनी इस्त्रायल-हमास संघर्षाचा इतिहास थोडक्यात सांगून २०२३च्या इस्त्रायल-हमास युद्धामध्ये मोसादने निभावलेली भूमिका विशद केली आहे जगातल्या भल्या भल्या देशांना धडकी भरवणाऱ्या आणि काही वाट्टेल ते झालं तरी हाती घेतलेलं काम पार पाडणाऱ्या एका गुप्तचर यंत्रणेच्या कहाण्या… मोसाद मिशन्स !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527567827202,"sku":"","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/173150_PIC_1720701567.jpg?v=1728235125"},{"product_id":"naisargik-saundaryasadhana-by-dr-hari-krishna-bakharu","title":"Naisargik Saundaryasadhana By Dr. Hari Krishna Bakharu","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"निसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपद्धती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरुपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.\\n कृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले, तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.\\n ० तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय ० त्वचारोगांवर निसर्गोपचार ० चमकदार डोळ्यांसाठी उपाय ० डोळ्यांच्या समस्यांवर उपाय ० चमकदार दातांसाठी उपाय ० केसांची नैसर्गिक निगा ० हातापायाची निगा ० सुडौल शरीरासाठी उपाय ० सौंदर्यासाठी विशिष्ट आहार ० विविध वनौषधी ० व्यायाम ० योगासने\"}' data-sheets-userformat='{\"2\":15353,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"10\":2,\"11\":4,\"12\":0,\"14\":{\"1\":2,\"2\":0},\"15\":\"Mangal, serif\",\"16\":12}'\u003eनिसर्गात सौंदर्य सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचे सौंदर्य वाढवण्याचे गमकही त्यात लपलेलं आहे. निसर्गोपचारतज्ज्ञांनी विविध अन्नपदार्थांचा व वनौषधींचा नेमका वापर, घरगुती सोप्या उपायपद्धती यांचा अभ्यास करून त्याद्वारे शरीरसौंदर्यात अंतर्बाह्य आणि कायमस्वरुपी भर कशी पडू शकते, याची उकल केली आहे.\u003cbr\u003eकृत्रिम प्रसाधनांमुळे तात्पुरते आणि बाह्यांगी सौंदर्य वाढले, तरी त्यासोबत येणारे दुष्परिणामही लपलेले नाहीत. अशा कृत्रिम उपायांना नैसर्गिक पर्याय कोणते, सौंदर्यासंदर्भातील विविध तक्रारींवर कोणते निसर्गोपचार प्रभावी ठरू शकतात, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य नैसर्गिक उपायांनी जोपासण्याचे मार्ग कोणते याची नेमकी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे.\u003cbr\u003e० तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय ० त्वचारोगांवर निसर्गोपचार ० चमकदार डोळ्यांसाठी उपाय ० डोळ्यांच्या समस्यांवर उपाय ० चमकदार दातांसाठी उपाय ० केसांची नैसर्गिक निगा ० हातापायाची निगा ० सुडौल शरीरासाठी उपाय ० सौंदर्यासाठी विशिष्ट आहार ० विविध वनौषधी ० व्यायाम ० योगासने\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527655088386,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51ubRQt9CKL._SL1000.jpg?v=1728235304"},{"product_id":"kalekarde-strockes-by-pranav-sakhdeo","title":"Kalekarde Strockes  By Pranav Sakhdeo","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय... आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास...अटळ! खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या क्यानव्हासवरचे... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531250721026,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41u1ea5-LaL.jpg?v=1728235445"},{"product_id":"financial-affairs-of-the-common-man-marathi-by-anil-lamba","title":"Financial Affairs of the Common Man ( Marathi ) By Anil Lamba","description":"\u003cp\u003eहे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक-नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकं काय समजून घेताना…?\u003cbr\u003eकोणतं मार्गदर्शन करतं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१)फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती\u003cbr\u003e२)वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?\u003cbr\u003e३)चक्रवाढ व्याज एक महाशक्ती\u003cbr\u003e४)’शेअरमार्केट’मधील शिरकाव\u003cbr\u003e५)म्युच्युअल फंडातील गुंतवणूक\u003cbr\u003e६)पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय\u003cbr\u003e७)क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT( असे नवे पर्याय\u003cbr\u003e८)गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे\u003cbr\u003e९)आयकरातील कर सवलती\u003cbr\u003e१०)प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्यांचं जणू एक गुंतवणूक हँडबुक…फायनान्शिअल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531526824194,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51s6f9IV5PL._SY425.jpg?v=1728235162"},{"product_id":"striyansathi-yog-by-geeta-iyengar","title":"Striyansathi Yog By Geeta Iyengar","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"या पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे.\\n पुस्तकाची ठळक वैशिष्टये\\n 0 दृढशास्त्रीय बैठक\\n 0 अभ्यासाची क्रमवार मांडणी\\n 0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा \\n सर्वांगीण परामर्श\\n 0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र\\n 0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय \\n योगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे.\"}' data-sheets-userformat='{\"2\":15353,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"10\":2,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":12}'\u003eया पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे.\u003cbr\u003eपुस्तकाची ठळक वैशिष्टये\u003cbr\u003e0 दृढशास्त्रीय बैठक\u003cbr\u003e0 अभ्यासाची क्रमवार मांडणी\u003cbr\u003e0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा\u003cbr\u003eसर्वांगीण परामर्श\u003cbr\u003e0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र\u003cbr\u003e0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय\u003cbr\u003eयोगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45543858045186,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/619oaHqkwRL._SL1000.jpg?v=1729068148"},{"product_id":"the-goal-marathi-by-shuchita-nandapurkar-phadake","title":"The Goal (Marathi) By Shuchita Nandapurkar- Phadake","description":"\u003cp\u003eप्लांट-मॅनेजर अॅलेक्स रोगो एकदा सकाळी कारखान्यात पोचण्याआधीच त्याचा बॉस तिथे हजर असतो। ऑर्डर्स पूर्ण करायला उशीर होत असल्याने तो अॅलेक्सची चांगली खरडपट्टी कावतो आणि शेवटी 'पुढच्या तीन महिन्यांत सुधारणा दिसली नाही तर हा प्लांट बंद करावा लागेल' अशी धमकीवजा सावधतेची सूचना देऊन निघून जातो. आणि तिथून अॅलेक्सची व त्याच्या सहकाऱ्यांची सुधारणेकडे आणि यशाकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते... त्यात त्यांना मोलाची मदत करतो तो पारंपरिक विचारसरणीला दाहरे देणारा मार्गदर्शक जोनाह... 'उद्योग-जगताले गुरू' आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले 'जिनीयस' म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या एलियाहू गोल्ड़्ट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कथा सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली 'थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स' ) TOC ( या पुस्तकातून गोष्टीरूपात, दाखले देत विशद केली आहे. खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक... द गोल ।\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45551425913090,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_Image_2024-10-08_at_16.41.49.jpg?v=1729068208"},{"product_id":"ruskin-bond-set-by-nilima-bhave-ramaa-hardikar","title":"Ruskin Bond Set By Nilima Bhave,Ramaa Hardikar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्या कथा-कादंबर्यांनची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553614127362,"sku":"","price":893.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ruskin-Bond-Set-Bhavsparshi-V-Romanchak-Kathancha-Guldasta.jpg?v=1729067781"},{"product_id":"aaple-san-utsav-aani-tyatil-vidnyan-by-dr-varsha-joshi","title":"Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan By Dr Varsha Joshi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण मराठी माणसं वर्षभरात अनेक छोटे-मोठे सण-उत्सव साजरे करत असतो, त्यांचा आनंद घेत असतो. आनंद मिळवण्याबरोबरच त्यातून आपण आपली संस्कृतीही जपत असतो. हे सण-उत्सव, दिनविशेष साजरे चालत आलं आहे. परंतु जनमानसात पूर्वजांचे काही निश्चित उद्देश होते, प्रयोक सणांचे दिवस साजरे करण्याच्या काही पद्धती त्यांनी आखून दिल्या आहेत तसेच आहार-विहाराविषयी काही दंडकही घालून दिले आहेत. लेखिका डॉ. वर्षा जोशी या विज्ञानाच्या अभ्यासक. आम्ही त्यांची आजवर दैनंदिन विज्ञानाची पुष्कळ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सदर पुस्तकात त्यांनी आपले सण-उत्सव कसे साजरे करावेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती-ज्ञान देऊन सण-उत्सवांचं प्रयोजन आणि परंपरेने चालत आलेली नियमनं यांची कारणमीमांसा केली आहे, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. निसर्ग आणि सण-उत्सव यांचं नातं सांगितलं आहे. आपल्याला मार्गदर्शन करून, ज्ञानसंपन्न करून आपल्या आनंदात भर टाकणारं पुस्तक... आपले सण, उत्सव आणि त्यातील विज्ञान\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45566651203842,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51qcgw5qaTL._SY425.jpg?v=1729240404"},{"product_id":"escape-to-nowhere-by-amar-bhushan","title":"Escape To Nowhere By Amar Bhushan","description":"\u003cp\u003eभारताच्या ‘एक्सटर्नल इंटेलिजन्स सर्विहस’ अर्थात ‘एजन्सी’च्या सुरक्षा विभागाचा प्रमुख जीवनाथनकडे एकदा एक नवखा, पण हुशार अधिकारी आपला संशय व्यक्त करतो. त्याच्या मते, एजन्सीमधला एक वरिष्ठ अधिकारी परदेशी हेर म्हणून काम करतो आहे. त्यानंतर तातडीने तपास, चौकशी याचं सत्र सुरू होतं आणि संशयित अर्थात, रवी मोहनच्याभोवती सव्हॅलन्सचा जागता पहारा ठेवला जातो… या तपासातून रवी संवेदनशील माहिती चोरत आहे, याला पुष्टी देणारे अनेक तगडे पुरावे समोर येतात. तपास आणि सव्हॅलन्स पुढे चालू राहतो… आणि मग घडते अनपेक्षित अशी घटना, जिचा विचार कुणी कधी केलेला नसतो !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२००४ साली एक वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी अचानक गायब झाला. तो काही दशकांपासून हेर म्हणून काम करतो, असा संशय होता. या सत्यघटनेवर आधारलेली ही कादंबरी, देशाची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता, ऑपरेशन चालवताना येणाऱ्या मर्यादा यांसारख्या अपरिचित विषयांबद्दल सामान्य माणसाला अंतर्दृष्टी देते.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644693504258,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Esacpetonowhere_cover.jpg?v=1731746167"},{"product_id":"tada-by-ganesh-matkari","title":"Tada By Ganesh Matkari","description":"\u003cp\u003eसमाजाच्या सर्व स्तरांतून कथा लिहिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, महानगरी जाणिवेचे जे मोजके लेखक लिहीत आहेत त्यामध्ये गणेश मतकरी आघाडीवर आहेत, हे आठ कथा असलेल्या त्यांच्या ह्या संग्रहाने अधिकच ठळकपणे दाखवून दिलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभूतकाळाची वर्तमानावरली छाया प्रतिबिंबित करणाऱ्या ह्या संग्रहातील बहुतेक कथांमधील निवेदन प्रथमपुरुषी आहे, ज्यातील सीक्रेट ह्या कथेमध्ये असलेली सात प्रथमपुरुषी निवेदनं त्यांची कथालेखनावर असलेली हुकूमत दाखवून देतात. प्रथमपुरुषी निवेदनामध्ये मुख्य पात्राचे बारीकसारीक मनोव्यापार विश्वासार्ह वाटावेत असे टिपता येतात, जे घटितांचा पैस आटोपशीर असलेल्या आणि बव्हंशाने मानसिक पातळीवर घडत असलेल्या ह्या कथांसाठी महत्त्वाचं आहे. परिणामी ह्या कथा दीर्घकथेचा फील देतात. मतकरींना नाट्य म्हणजे काय ह्याची नेमकी जाणीव आहे. तसेच न केवळ भारतीय वर जागतिक चित्रपटांचा व्यासंग असल्यामुळे बारीकसारीक तपशील कॅमेऱ्याऱ्यांच्या नजरेने नोंदवायची हातोटी त्यांनी कमावलेली आहे, हे त्यांच्या कथांमध्ये ठळकपणे दिसते. त्यांच्या कथांमधील भाषिक सरमिसळही तिचं समकालीन असणं अधोरेखित करते. मराठीतील ठेवणीतले शब्द तर ते नेमकेपणे वापरतातच, परंतु इंग्रजी शब्द बेमालूमपणे वापरण्यावरही त्यांचं प्रभुत्व आहे. एकुणातच, समकालीन वातावरण टिपणाऱ्या ह्या कथा, मतकरींची कथनतंत्रावर उत्तम पकड असल्यामुळे वाचनीय तर आहेतच, पण न केवळ महानगरी तर नव्याने लिहिणाऱ्यांसाठी एक रोल मॉडेल ठराव्यात एवढ्या लक्षणीयही आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644697534722,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TadaCover.jpg?v=1731746015"},{"product_id":"nangi-by-santosh-vardhave","title":"Nangi By Santosh Vardhave","description":"\u003cp\u003eहे मानवी कारस्थान आहे का नियतीचं षडयंत्र?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतो अस्वस्थपणे टेबलापलीकडच्या खुर्चीत बसला. खुर्चीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायपोसावर त्याची नजर खिळली. पायपोसाखाली सरकवता येणारी फरशी आहे. त्या फरशीखाली पुरलेल्या मडक्यात विचू आहेत, हे सावबाला ठाऊक होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउजव्या बाजूला झुकत त्याने पायपोस बाजूला हटवला. फरशी सरकवली. फरशीखालच्या अंधाऱ्या मडक्यात पाहत तो क्षणभर थबकला. दुसऱ्या क्षणी त्याने उजव्या हाताचा पंजा मडक्यात घातला…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e…..असंख्य सुया आपल्या हातात टोचल्या जात असल्याचा भास त्याला झाला. क्षणार्धात त्याने हात मागे खेचला. त्वचेखाली नांगीचा काटा अडकलेले अनेक विचू, त्याच्या पंज्याला लगडून मडक्याबाहेर आले. त्याने त्वेषाने हात झटकला… एकदा-दोनदा-तीनदा-अनेकदा… काही विचू पुन्हा मडक्यात पडले. काही टेबल-खुर्चीच्या आसपास झटकले गेले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या तिरीमिरीतच तो बारच्या किचनमध्ये घुसला. किचनच्या ओट्यावर असलेला फुटभर लांबीचा धारदार चॉपर त्याने उचलला. बाजूलाच पडलेला नॅपकिन उचलून त्याने चॉपरभोवती गुंडाळला…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणसात दडलेल्या विंचवाच्या दाहक कथा…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644700582146,"sku":"","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nangi_Cover.jpg?v=1731746039"},{"product_id":"the-goal-by-eliyahu-m-goldratt","title":"The Goal ( Marathi)By Eliyahu M Goldratt","description":"\u003cp\u003eप्लांट-मॅनेजर अॅलेक्स रोगो एकदा सकाळी कारखान्यात पोचण्याआधीच त्याचा बॉस तिथे हजर असतो! ऑर्डर्स पूर्ण करायला उशीर होत असल्याने तो अॅलेक्सची चांगली खरडपट्टी काढतो आणि शेवटी ‘पुढच्या तीन महिन्यांत सुधारणा दिसली नाही तर हा प्लांट बंद करावा लागेल’ अशी धमकीवजा सावधतेची सूचना देऊन निघून जातो. आणि तिथून अॅलेक्सची व त्याच्या सहकाऱ्यांची सुधारणेकडे आणि यशाकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते… त्यात त्यांना मोलाची मदत करतो तो पारंपरिक विचारसरणीला दाहरे देणारा मार्गदर्शक जोनाह…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘उद्योग-जगताले गुरू’ आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले ‘जिनीयस’ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या एलियाहू गोल्ड्रेट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कथा सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स’) TOC (या पुस्तकातून गोष्टीरूपात, दाखले देत विशद केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक… द गोल !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644702843138,"sku":"","price":509.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TheGoalcoverfinal.jpg?v=1731746032"},{"product_id":"ksha-kshullakchi-black-comedy-by-shrikant-bojevar","title":"Ksha Kshullakchi Black Comedy By Shrikant Bojevar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकप्रिय होण्याकरता चार मित्र वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना पुरस्कार द्यायचा घाट घालतात. तेव्हा त्यांना कळतं पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणं हा एक मोठाच व्यवसाय आहे… गोपाळरावांची पत्नी राधा घर सोडून निघून जाते. तिला शोधताना गोपाळरावांची पुरती तारांबळ उडते. शेवटी ते नामी शक्कल लढवतात… पण तीच त्यांच्या अंगलट येते… क्ष सर्व क्षेत्रांतल्या कलावंत मंडळींना भेटतो. त्यांना कलेतून ‘मृत्यू’ या विषयावर अभिव्यक्त होण्याची गळ घालतो. कलावंत पेचात पडतात. ते ‘क्ष’ला भेटायला जातात तेव्हा तो अनंताच्या प्रवासाला निघालेला असत दैनंदिन जीवनातील घटना-प्रसंगांचं मुद्दल… नेमक्या, खुसखुशीत संवादांचा मसाला… आणि नर्मविनोद व ब्लॅक कॉमेडी यांची चरचरीत फोडणी… यांमधून साकारलेली तिखट-गोड, कडू आणि तुरट अशा सर्व चवींच्या ९ कथांची संग्रहरूपी रेसिपी… क्ष क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644707332354,"sku":"","price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KshKshullakchiBlackComedyCover.jpg?v=1731746155"},{"product_id":"pavane-don-payancha-manus-by-shrikant-bojevar","title":"Pavane Don Payancha Manus By Shrikant Bojevar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगरीब घरचा आणि जन्मतः एक पाय तोकडा असलेला ‘लंगड्या’ बुद्धीने मात्र व्यवहार-चतुर आणि धूर्त आहे. या हुशारीच्या साहाय्याने त्याने त्याच्या व्यंगावर मात केली आहे. अभ्यासात अजिबात न चालणारं त्याचं डोकं व्यवहारात मात्र तेजीत चालतं. यातूनच त्याची यशस्वी होण्याची आणि लोकांना तालावर नाचवण्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाते आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करत असतं एक मांजर ! हे मांजर लोकांच्या घरी गुपचूप घुसून त्यांच्या ‘खासगी’ बातम्या त्याला पुरवतं… आणि त्या जोरावर गावपातळीवरून सुरू झालेला लंगड्याचा प्रवास आमदार तयार करणारा ‘किंगमेकर’ इथपर्यंत पोहोचतो… पण मग अशा काही घटना घडतात की त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते… शेवटी, लंगड्याची ही कथा अनेक प्रश्न निर्माण करते… लंगड्या भौतिक यशोशिखराला पोहोचतो की नैतिक अधःपतनाला ? माणसाच्या चकचकीत यशाखाली काय काय दडवलं गेलेलं असतं? महत्त्वाकांक्षेपायी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? नैतिक आणि अनैतिक यांच्या सीमारेषा कुठे संपतात, कुठे सुरू होतात? मानवी जगण्याच्या अतर्व्यतेवर ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून भाष्य करणारी, बौद्धिक रंजन करत खिळवून ठेवणारी विलक्षण कादंबरी… पावणेदोन पायांचा माणूस !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644710609154,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/PawnedonPayanchaManusCover.jpg?v=1731746064"},{"product_id":"rakshas-ani-popatachi-adult-katha-by-shrikant-bojevar","title":"Rakshas Ani Popatachi Adult Katha By Shrikant Bojevar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशयी वृत्तीचा बळवंत पत्नी सुलोचनाकडून वाट्टेल तेव्हा, हवं तसं सुख ओरबाडून घेतो. पण एरवी तिला कवडीचंही मोल देत नाही. पण एकदा सुलोचना अशी काही शक्कल लढवते की, बाजी पूर्णतः पलटून जाते… राहुल आणि आपल्या त्या ‘एकांतगोष्टी’ पाहायला तो कावळा रोज खिडकीजवळच्या फांदीवर बसत नसेल ना? या प्रश्नाने सानिकाचं मन पोखरतं. तिची आई तिला काळा गूळ वापरून एक उपाय करायला सांगते. त्या उपायाने तिच्या मनातली अस्वस्थता क्षमते का ? त्या कावळ्याचं रहस्य असतं तरी काय?… एकदा लेखकाला कथेचं बीज सुचतं. पण पुढच्या क्षणी ते निसटून जातं. तो त्या बीजाचा शोध घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. मेंदू-तज्ज्ञाला भेटून मेंदूचा कोपरान् कोपरा शोधतो. शेवटी ते बीज सापडेल असं वाटतं, पण… साध्या घटना-प्रसंगांमधून आणि नेमक्या, खुसखुशीत संवादांमधून मिश्किल, उपहास आणि ब्लॅक कॉमेडी यांचा चपखल वापर करत अंतर्मुख करणाऱ्या ९ कथांचा गुच्छ…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644712902914,"sku":"","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/RakshasAaniPoptachiAdultKatha_Cover.jpg?v=1731746016"},{"product_id":"crypto-currency-fraud-by-atul-kahate","title":"Crypto Currency Fraud By Atul Kahate","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलहानपणापासून ‘जीनियस’ असलेल्या सॅमचा आयक्यू आणि गणितातली हुशारी पाहता त्याला शेअरबाजाराशी संबंधित कंपन्यांनी कामावर घेतलं नसतं तरच नवल! पण सॅमची महत्त्वाकांक्षा त्याहून मोठी होती, त्याला ‘बिटकॉइन’ या क्रिप्टो करन्सीचं एक्स्चेंज अमेरिकेत काढायचं होतं आणि नव्याने विस्तारत चाललेल्या आभासी चलनांच्या क्षेत्रात मोठी उलाढाल करायची होती. तसं त्याने केलंही, पण अतिहव्यासापोटी चुकीचे व्यवहार केल्यामुळे त्याने कंपनीवर घोंगावणाऱ्या संकटांकडे दुर्लक्ष केलं… आणि त्यातून निर्माण झाला प्रचंड मोठा घोटाळा… वेगाने श्रीमंत होत यशोशिखरावर गेलेल्या आणि तितक्याच वेगाने उतरणीला लागलेल्या सॅम बँकमन-फ्राइडची कुप्रसिद्ध कहाणी…. क्रिप्टो करन्सी फ्रॉड !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644714836226,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Crypto-currency-Fraud-cover.jpg?v=1731746056"},{"product_id":"ek-keli-don-pan-by-dr-alka-kulkarni","title":"Ek Keli Don Pan By Dr. Alka Kulkarni","description":"\u003cp\u003eचहा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगातील दोन नंबरचं पेय… पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षांपासून मानवजात चहा पितेय,  त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्धं लढतेय… अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची; स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लढ्याची ! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गोरा साब- क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही ! कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज… एक असतो वसाहतवादी ‘गोरा साहेब’ आणि एक स्वतंत्र भारतातला ‘काळा साहेब’. पिचलेले साधे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात. जगभरात पैदास होणाऱ्या चहापैकी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e८० टक्के चहा पिकवणाऱ्या भारतातल्या चहामळ्यांतील संघर्षाची संवेदनशील कादंबरी..\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644717916418,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/EkKalidonPaneCover.jpg?v=1731746169"},{"product_id":"rooh-by-manav-kaul","title":"Rooh By Manav Kaul","description":"\u003cp\u003eकाश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eमाझी नजर तिथे खिळून आहे… जिथून तुझा परिमळ दरवळतो आहे… जिथून तू दिलेली हाक मला साद घालते आहे त्याच त्या सफेद भिंतीतल्या निळ्या दरवाजाकडे !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644735054082,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ruh_Cover.jpg?v=1731746115"},{"product_id":"kathavividha-by-suhas-bartakke","title":"Kathavividha By Suhas Bartakke","description":"\u003cp\u003eआपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं … एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात. ‘हार्ट टू हार्ट’, ‘चांडाळणीचं भूत’ सारख्या नर्मविनोदी कथा असोत किंवा ‘व्हायन’, ‘उपरा’ आणि ‘शेवंता’सारख्या मनाला स्पर्शन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाणाऱ्या कथा असोत, या सर्व कथा वाचकाला समाधान देतात,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेगळी अनुभूती देतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध ढंगांच्या कथांचा संग्रह… कथाविविधा\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644747571458,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KathavividhaCover.jpg?v=1731746130"},{"product_id":"vashat-ani-ithar-katha-by-suhas-bartakke","title":"Vashat Ani Ithar Katha By Suhas Bartakke","description":"\u003cp\u003eआपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं… एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘चिनी कम’, ‘नोटबंदीचा दणका’सारख्या नर्मविनोदी कथा मनाला गुदगुल्या करत हसवतात, तर ‘उपाध्येंचा अहंकार’, ‘खिचडी’ आणि ‘वशाट’ सारखी शीर्षक कथा मनाला खोल स्पर्शन जातात. या कथांमुळे वाचकाला वेगळी अनुभूती मिळत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या विविध ढंगांच्या कथांचा संग्रह…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवशाट आणि इतर कथा\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan","offer_id":46110779932930,"sku":"","price":128.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VashataaniItarKathaCover.jpg?v=1731746150"},{"product_id":"mantra-by-binayak-bandhopadhyay","title":"Mantra By Binayak Bandhopadhyay","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं. आश्रम सोडल्यानंतर जिच्या घरी त्याला आसरा मिळतो, त्या अनसूयेला उत्तरणच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचंय. संसार करावा की व्रतस्थ आयुष्य जगावं अशा संभ्रमावस्थेत असतानाच उत्तरण विचारांच्या एका वळणावर अनुसूयेसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे नातं पुढील आयुष्यात कोणतं वळण घेतं? उत्तरणपुढे कोणते पेच निर्माण होतात? या व इतर पेच प्रसंगांची उकल कशी होत जाते? लेखक बिनायक बंद्योपाध्याय त्यांच्या संवादी शैलीत ही कथा या कादंबरीत समर्थपणे रंगवत जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ‘संसारी संन्याशाची’ अध्यात्मिक धाटणीची कादंबरी… मंत्र !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644763234562,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MantraCover.jpg?v=1731746043"},{"product_id":"daityer-bagan-arthat-daityacha-bagicha-by-shashvati-nandi","title":"Daityer Bagan Arthat Daityacha Bagicha By Shashvati Nandi (दैत्येर बागान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा माणूस किती मोठा क्रिमिनल आहे, ते त्याच्याकडे बघून कधीच समजलं नसतं. अनेक दिवस त्याने सगळ्यांना मूर्ख बनवलं. दिवसेंदिवस माती उकरत राहिला, कुदळीचे घाव घालत राहिला, माती दाबून-पसरून त्या कबरींवर फुलझाडं लावत गेला. रोपं रुजली, मोठी झाली, फुलंही येऊ लागली. रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या विखुरल्या जात होत्या. तिथे पाकळ्यांची रंगीबेरंगी अल्पना सजवली जात होती. ते बघून लोक मुग्ध होत होते पण बागेतल्या त्या मातीखाली थरावर थर रचून काय दडवलं जात होतं?…ख्यातनाम बंगाली साहित्यिक शाश्वती नंदी यांनी साकारलेली सत्य घटनेवर आधारित एक खिळवून ठेवणारी थरारक कादंबरी… दैत्येर बागान !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644773064962,"sku":"","price":166.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/DaityerBagaanCover.jpg?v=1731746094"},{"product_id":"elonvarcha-sangharsh-by-sadhana-shankar","title":"Elonvarcha Sangharsh By Sadhana Shankar","description":"\u003cp\u003eसीनीचा मृत्यू झाला आणि सगळं काही बदलून गेलं. कित्येक वर्ष टिकून राहिलेल्या शांततेचा भंग झाला!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही शेकडो वर्ष इलोन या ग्रहावर स्त्री आणि पुरुष आपापल्या सीमारेषा आखून वेगवेगळे राहत होते. पृथ्वीवरचे एकेकाळचे एकमेकांचे साथीदार आता परस्परांचे विरोधक झाले होते. त्यांनी आपापल्या भागात शहरं वसवली होती, अमरत्व प्राप्त केलं होतं आणि मीलनाशिवाय संतती निर्मिती करायचं तंत्रज्ञानही अवगत केलं होतं स्वतंत्रपणे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण सीनीच्या मृत्यूनंतर, स्त्री आणि पुरुष पुन्हा युद्धाची – निर्णायक संघर्षाची भाषा बोलू लागले. इतकी वर्षं त्यांच्यात जी शांतता प्रस्थापित झाल्यासारखी वाटत होती, ती खोटी, आभासी तर नव्हती, की तो एक दीर्घ विराम होता? हा संघर्ष किती काळ चालणार होता? या संघर्षाचे परिणाम महाभयानक होते. दोन्ही बाजू संघर्षाच्या टोकावर पोचल्या होत्या. पण प्रत्यक्ष संघर्ष झाला का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविनाश टळला का? फँटसीच्या साहाय्याने विचारही करता येणार नाही अशी सामाजिक रचना उभारून स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यांच्या सहजीवनावर भाष्य करणारी ‘कल्पित’ कादंबरी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइलोनवरचा संघर्ष !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644782862594,"sku":"","price":319.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ElonCover.jpg?v=1731746010"},{"product_id":"punarbhet-vismrutit-gelelya-natakanshi-by-vijay-tapas","title":"Punarbhet Vismrutit Gelelya Natakanshi By Vijay Tapas","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअठराव्या शतकापासून मराठीजनांना नाट्यकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यात संगीत नाटकांनी आपली एक विशेष जागा व्यापली आहे. विष्णुदास भावेंपासून ते अगदी आजपर्यंतच्या व्यावसायिक आणि प्रयोगशील नाटककारांपर्यंत अनेकांनी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचार, दृष्टिकोन विविध नाटकांमधून मांडलेले दिसतात. म्हणूनच, मराठी नाट्यभूमीच्या इतिहासात डोकावून बघणं, त्या नाटकांचा वेध घेणं महत्त्वाचं ठरतं. नाटकांमधून आपल्या समाजाचं चित्रण होतं; तत्कालीन समाजव्यवस्था, समाजातील त्या त्या वेळचे कळीचे प्रश्न यावर भाष्य केलेलं असल्याने या नाटकांना सामाजिक दस्तावेज म्हणून विशेषता लाभते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे लेखक विजय तापस हे मराठी रंगभूमीचे अस्सल संशोधक-अभ्यासक म्हणून मराठी वाचकाला परिचित आहेत. पुस्तकातील सर्वच लेख अभ्यासपूर्ण आणि त्याच वेळी मनोरंजक व ज्ञानात भर घालणारे आहेत. १९१० ते १९५० या कालखंडातील विस्मृतीत गेलेल्या आणि केवळ गाजलेल्या अशा नव्हे, तर लक्षवेधी ठरलेल्या नाटकांचा मागोवा त्यांनी यात घेतला आहे. त्यात जाणवणारी अभ्यासाची सखोलता आणि विश्लेषणाची पद्धत तर विशेष दाद द्यावी अशीच ! नाटकाकडे पाहण्याची, त्यांचा अभ्यास करण्याची एक वेगळीच मांडणी तापस आपल्यासमोर पेश करतात. लेखात समाविष्ट केलेल्या नाटकाची थीम, त्यातील उल्लेखनीय प्रसंग, पात्र आणि त्यात डोकावणारे विचार हे सर्व तापस रंजकपणे सांगतातच, पण त्याचबरोबर नाटककाराची पार्श्वभूमी, त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं, त्यांची गाजलेली इतर नाटकं, ते विशिष्ट नाटक लिहिण्यामागचा त्यांचा विचार-भूमिका, त्या काळाची सामाजिक पार्श्वभूमी आणि प्रेक्षकांची नाटकाबाबतची प्रतिक्रिया याचाही ऊहापोह ते समर्थपणे करतात.म्हणूनच हे पुस्तक म्हणजे मराठी रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी तसंच नाट्यप्रेमी रसिकांसाठी मोलाचा ठेवा आणि सामाजिक दस्तावेज ठरावा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविजय केंकरे (ज्येष्ठ रंगकर्मी)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644791382274,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Punarbhet_Cover.jpg?v=1731746045"},{"product_id":"vartanchya-zalya-katha-by-rajiv-sabade","title":"Vartanchya Zalya Katha By Rajiv Sabade","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव सावडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्ताकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वातकिनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील औशवित्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडे ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उत्तरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शन जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्ताकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात… वार्तांच्या झाल्या कथा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644799312130,"sku":"","price":421.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VartanchyaZalyaKathaCover.jpg?v=1731746025"},{"product_id":"itranama-by-hinakausar-khan","title":"Itranama By Hinakausar Khan","description":"\u003cp\u003eही गोष्ट ऐन पंचविशीतल्या नाझियाची. तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लीम असण्याची, तिच्या सामाजिक जाणिवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्याविषयीच्या कल्पना मनात स्पष्ट असणाऱ्या नाझियाला सुमीत भेटतो. समंजस, शहाणा आणि थोडासा कन्फ्युज्डही ! दोघंही एकमेकांत गुंतत जातात. भलेही अलीकडचे काही तरुण धर्म-जात मानत नसतील, मात्र नकळत्या वयात झालेल्या संस्कारांची सोबत तर प्रत्येकाबरोबर असतेच. प्रेमात सबकुछ करायला तयार असणारी मंडळी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गोंधळून जातात, अशावेळी उमगलेली आस्था आणि न उमगलेली आस्था यांच्यातलं घर्षण अटळ होऊन जातं. या सगळ्या व्यवहार-संघर्षातून नाझिया आणि सुमीतही सुटलेले नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहानपणापासूनचा नाझियाचा घट्ट मित्र असद हा तिच्याच धर्मातला… तिच्या विचारांचा, तिच्या स्वप्नांचा आदर करणारा आणि तिच्यावर बेहद प्यार करणाराही… पण प्रेम असं सोयीने करता येतं का? अनेक पेच, अनेक प्रश्न…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रेम, मैत्री, आस्था, आस्तिकता आणि मानसिक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंदोलनाच्या विवरात अडकलेल्या या तिघांची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्मापलीकडे जाणारी कादंबरी…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644815761666,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ItranamaCover.jpg?v=1731746087"},{"product_id":"sathinantarcha-ahar-va-aarogya-साठीनंतरचा-आहार-व-आरोग्य-by-dr-varsha-joshi-author","title":"Sathinantarcha Ahar Va Aarogya - साठीनंतरचा आहार व आरोग्य  By Dr.Varsha Joshi (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताची सर्वधर्मसमानता, मानवता व सांस्कृतिक वारसा डोळसपणे टिपणारा रॉय मॉक्झॅम हा ब्रिटिश लेखक होता. मूळ The Theft of India या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद सरिता आठवले यांनी केलेला आहे. असा लुटला भारत या पुस्तकात सत्य इतिहास लिहून या लेखकाने युरोपियन व्यापारी व युरोपियन कंपन्यांनी केलेल्या अत्याचारांस वाचा फोडली आहे. लेखक स्वतः ब्रिटिश असूनही त्याने कुठेही ब्रिटिशांचे समर्थन केलेले नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647397388546,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91T4L55HhpL._SY425.jpg?v=1731832542"},{"product_id":"indira-gandhi-anibani-v-bharatiy-lokshahi-इंदिरा-गांधी-आणीबाणी-व-भारतीय-लोकशाही-by-p-n-dhar-author","title":"Indira Gandhi Anibani V Bharatiy Lokshahi - इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही By P.N.Dhar (Author)","description":"\u003cp\u003eमहत्त्वपूर्ण राजकीय घटना घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापुन टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तूनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला  देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उदबोधक! \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647402860802,"sku":"","price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/718IXAlUMkL._SY425.jpg?v=1731832449"},{"product_id":"mumbai-gangwar-by-ajay-tamhane-मुंबई-गँगवॉर","title":"Mumbai Gangwar By Ajay Tamhane (मुंबई गँगवॉर)","description":"\u003cp\u003eही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे शॉटकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची…\u003cbr\u003eही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“जगण्याचा संघर्ष ‘खल्लास’ करण्यासाठी पाहिजे पैसा… खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात,” अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eमुंबई गँगवॉर!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691526152450,"sku":"","price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/GangwarCover.jpg?v=1733554638"},{"product_id":"red-light-diaries-gauahar-by-sameer-gaikwad","title":"Red Light Diaries... Gauahar By Sameer Gaikwad (रेड लाईट डायरीज… गौहर- समीर गायकवाड )","description":"\u003cp\u003eज्या दुनियेपासून समाज चार हात अंतर राखून असतो, ज्या स्त्रियांचं अस्तित्व समाज बेदखल करतो, झिडकारतो, तिरस्कार करतो; त्या दुनियेचं, तिथल्या हाडा-मांसाच्या स्त्रियांचं, त्यांच्या स्वप्नांचं, आकांक्षांचं प्रतिबिंब रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातल्या बहुतांश कथा वेदनेच्या, शोषणाच्या आणि दुःखाच्या आहेत. त्या वाचताना मन सोलवटून निघतं. डोळ्यांतून नकळतपणे पाणी झरू लागतं. हतबलता घेरून राहते… पण तरी काही कथा मात्र सकारात्मक प्रकाशाचा कवडसा हाती देतात. निराशेच्या अंधारात छोटासा दिवा लावतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौहर म्हणजे मोती. यातली बायका-माणसंही मोत्यासारखी… स्वतःचं तेज असलेली. निसर्गाच्या कुशीतून जन्मून उजळपणाची खूण वागवणारी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे उजळलेपण तुमच्यापर्यंत पोचवण्याची सच्च्ची धडपड म्हणजेच\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691527594242,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gohar_Cover-1.jpg?v=1733554640"},{"product_id":"gypsy-by-ketan-mangaonkar-जिप्सी","title":"Gypsy By Ketan Mangaonkar (जिप्सी)","description":"\u003cp\u003eही गोष्ट आहे एका फिरस्त्याची… दिशाहीन झालेल्या भटक्याची… स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे एका प्रवासाची… या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची… ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची… त्यांच्यातल्या अतूट नात्याची… ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची… आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गोष्ट आहे तुमची-आमची… सगळ्यांची… तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची…!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691528577282,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gypsy_cover.jpg?v=1733554562"},{"product_id":"ramachya-pavlanvar-paul-by-vikrant-pande-nilesh-kulkarni-shuchita-nandapurkar-phadketranslatorsरामाच्या-पावलांवर-पाऊल-रामायणातील-प्रत्येक-स्थानाला-भेट-देत-केलेला-प्रवास","title":"Ramachya Pavlanvar Paul By Vikrant Pande, Nilesh Kulkarni, Shuchita Nandapurkar-Phadke(Translators)(रामाच्या पावलांवर पाऊल-  रामायणातील प्रत्येक स्थानाला भेट देत केलेला प्रवास)","description":"\u003cp\u003eवनवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691533066498,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ramachyapavalanvar_Cover.jpg?v=1733554550"},{"product_id":"finance-chatury-by-anil-lamba-फायनान्स-चातुर्य-१३१-स्मार्ट-सल्लेलेखक-डॉ-अनिल-लांबा","title":"Finance Chatury By Anil Lamba (फायनान्स-चातुर्य १३१ स्मार्ट सल्ले)(लेखक : डॉ. अनिल लांबा )","description":"\u003cp\u003e“जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा तुमची ‘अर्थ-हुशारी’च तुम्हाला वाचवू शकते…”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. अनिल लांबा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक यशस्वी पुस्तकांनंतर डॉ. अनिल लांबा यांचं ‘मस्ट-रीड’ पुस्तक…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफायनान्स-चातुर्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात… अगदी सोप्यारितीने, थोडक्यात ! मात्र एक निश्चित की, एक-एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा… जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा ‘फायदा’ अधिक…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थ-सोबती… फायनान्स-चातुर्य !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691549057282,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/LambaCover.jpg?v=1733554558"},{"product_id":"paryavaranavadacha-jagatik-itihaas-by-ramachandra-guha-pranav-sakhadevtranslatorsपर्यावरणवादाचा-जागतिक-इतिहास-लेखक-रामचंद्र-गुहा","title":"Paryavaranavadacha Jagatik Itihaas By Ramachandra Guha, Pranav Sakhadev(Translators)(पर्यावरणवादाचा जागतिक इतिहास- लेखक : रामचंद्र गुहा)","description":"\u003cp\u003eप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा या पुस्तकात तीन खंडांमधल्या पर्यावरणाबाबतच्या चळवळी, घडामोडी आणि या क्षेत्रातले विचारवंत यांची तपशीलात माहिती देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसखोल संशोधनातून त्यांनी पर्यावरणाबाबतच्या चळवळींमधल्या संकल्पना, विचार आणि मोहिमा यांचा ऊहापोह केला आहे. जॉन म्युईर, महात्मा गांधी, राचेल कार्सन आणि ऑक्टाविया हिल या जागतिक पातळीवरच्या पर्यावरण विचारवंतांच्या कामांचाही आढावा घेतात. तसंच चिपको आंदोलन किंवा जर्मन ग्रीन्स यांसारख्या चळवळींबाबतही खोलात जाऊन विवेचन करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि सभ्यतांमध्ये पर्यावरण चळवळ कशी आकाराला आली आणि एका चळवळीच्या प्रभावाने इतर बाह्य संस्कृतींमधल्या चळवळी कशाप्रकारे रूपांतरित झाल्या याबद्दलची मौलिक अंतर्दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. जागतिक अर्थकारणावर बदलत्या पर्यावरणाचा होणारा परिणाम या सध्या जगभरात चर्चिला जाणाऱ्या विषयाचाही गुहा यांनी या पुस्तकात आढावा घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्यांपासून ते अकादमिक क्षेत्रातील अभ्यासकांपर्यंत, सगळ्यांच्या दृष्टीने आजघडीला महत्त्वाच्या आणि कळीच्या ठरलेल्या एका सामाजिक चळवळीची सर्वसमावेशक आणि विस्तृत कहाणी सांगणारं पुस्तक…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691584282882,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Paryavaranvad_Cover.jpg?v=1733554605"},{"product_id":"vincent-wine-ani-moksh-by-devendra-bhagwat-deepti-devendra","title":"Vincent, Wine Ani Moksh By Devendra Bhagwat , Deepti Devendra","description":"\u003cp\u003eथांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eविन्सेंट, वाइन आणि मोक्ष\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692311372034,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VincentCover.jpg?v=1733554554"},{"product_id":"shyam-benegal-ek-vyakti-ek-digdarshak-by-dr-savita-nayak-mohite-श्याम-बेनेगल-एक-व्यक्ती-एक-दिग्दर्शक","title":"Shyam Benegal : Ek Vyakti Ek Digdarshak By Dr. Savita Nayak Mohite (श्याम बेनेगल : एक व्यक्ती एक दिग्दर्शक)","description":"\u003cp\u003eश्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ १९७४ साली प्रदर्शित झाला व चित्रपटांकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ असे सामाजिक समस्याप्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचारप्रवृत्त होता होता, प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि ‘समांतर’ चित्रपट मुख्य धारेत येऊ लागले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका मासिकासाठी बेनेगलांची मुलाखत घेता घेता, लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व त्यांच्या चित्रपटांनी इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांचं व्यक्तिमत्त्व व कार्य यावर पुस्तक लिहिण्यासच त्या प्रेरित झाल्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबेनेगल ही एक आंतर्बाह्य सद्भाव बाळगून असलेली व्यक्ती असून, त्यांच्या चित्रपटांच्या विषयांत, सादरीकरणात तोच सद्भाव प्रतिबिंबित होतो. एक विशुद्ध मनाची व्यक्ती आणि एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून बेनेगलांची ओळख करून देता देता लेखिका ‘मंडी’, ‘सुसमन’, ‘मम्मो’, ‘जुबैदा’ असे अनेक चित्रपट व ‘भारत एक खोज’, ‘संविधान’ या मालिका आणि काही बायोपिक्स यांचं विश्लेषण करतात. बेनेगल यांच्यासोबतच्या अनेक भेटींमधून आणि संवादातून हे पुस्तक साकार झालं असल्याने या पुस्तकाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या संवेदनशील, प्रयोगशील दिग्दर्शकाचा धांडोळा घेणारं पुस्तक…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694413832450,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ShamBenegalCover-1.jpg?v=1733727342"},{"product_id":"flirting-with-stocks-by-anil-lamba-फ्लर्टिंग-विथ-स्टॉक्स","title":"Flirting With Stocks By Anil Lamba (फ्लर्टिंग विथ स्टॉक्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.\\n \\n या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?...\\n \\n १. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?\\n \\n २. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?\\n \\n ३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?\\n \\n ४. ट्रेिंडग करताना काय काळजी घ्यायची?\\n \\n ५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?\\n \\n ६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?\\n \\n याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही...\\n \\n शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक... फ्लर्टींग विथ स्टॉक!\"}' data-sheets-userformat='{\"2\":15169,\"3\":{\"1\":0},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eचार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45705596502274,"sku":"","price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FlirtingWithStocksFront-1.jpg?v=1734159445"},{"product_id":"maza-talamay-jeevan-zakir-hussain-by-nasreen-munni-kabir-pranav-sakhadevtranslators-माझं-तालमय-जीवन-झाकीर-हुसेन","title":"Maza Talamay Jeevan: Zakir Hussain By Nasreen Munni Kabir, Pranav Sakhadev(Translators)  (माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45710027260162,"sku":"","price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MajheTalmayJivan-ZakirFront-1.jpg?v=1734332123"},{"product_id":"tar-kara-suru-bhag-1-by-rajiv-tambe-तर-करा-सुरु-भाग-१","title":"Tar Kara Suru Bhag 1 By Rajiv Tambe (तर करा सुरु भाग १)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय मुलांनो,\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक यासाठीच तर आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचा दोस्त,\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45731891773698,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TarKaraSuruBhag1-1.jpg?v=1735887396"},{"product_id":"tar-kara-suru-bhag-2-by-rajiv-tambe-तर-करा-सुरु-भाग-२","title":"Tar Kara Suru Bhag 2 By Rajiv Tambe (तर करा सुरु भाग २)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय मुलांनो,\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक यासाठीच तर आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचा दोस्त,\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45731897573634,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TarKaraSuruBhag2_Cover-1.jpg?v=1735887329"},{"product_id":"shikharratna-kanchanjunga-by-umesh-zirpe-bhushan-hershey-शिखररत्न-कांचनजुंगा","title":"Shikharratna Kanchanjunga By Umesh Zirpe, Bhushan Hershey (शिखररत्न कांचनजुंगा)","description":"\u003cdiv class=\"yj6qo\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशिखररत्न कांचनजंगा जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर….\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eत्याचं दर्शन विलोभनीय खरं ,\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eपण ते सर करणं तितकंच खडतर ,\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eतितकंच आव्हानात्मक…\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हेच आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते केली ती अनेक विक्रम नोंदवत!\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eत्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक तयारी करण्याबरोबरच विजीगीषु वृत्तीही ठेवायची होती.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eही गोष्ट साहसी वृत्तीची जशी,\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eतशीच ती अपार मानवतेचीही आहे आणि निसर्गसंवर्धनाच्या जागरुकतेबद्दलचीही आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eपुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन केलं आहे ते,\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eनिष्णात गिर्यारोहक भूषण हर्षे आणि मोहिमेचे नेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी.\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाहसी आणि विक्रमी मोहिमेची गोष्ट …. ‘शिखररत्न कांचनजुंगा!”\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45743069856002,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KanchanjungaCoverFront-1.jpg?v=1735455319"},{"product_id":"aapattichakra-by-atul-deulgaonkar-आपत्तीचक्र","title":"Aapattichakra By Atul Deulgaonkar (आपत्तीचक्र)","description":"\u003cp\u003e३० सप्टेंबर १९९३ची रात्र किल्लारी आणि परिसरातल्या रहिवाश्यांसाठी काळरात्रच ठरली! भूकंपांच्या हादऱ्यांनी काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं… जगाचं लक्ष वेधलं गेलं… काही तासांत तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सगळं प्रशासन कामाला लागलं, मदतीचा ओघ सुरू झाला आणि नंतर ‘भव्य’ पुनर्वसनही झालं….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या भूकंपानंतर झालेलं बचतकार्य, मदतकार्य, पीडितांची अवस्था, त्यांची मानसिकता आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकात सविस्तर चित्रित केल्या आहेत. तसंच किल्लारी भूकंपाला आता काही वर्षं झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनाच्या स्थितीचाही चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया निमित्ताने देऊळगावकर यांनी आपत्ती ही दैनंदिन घटना झालेल्या आजच्या काळात जोखीम निवारण व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सूत्ररूप सुचवण्या केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ किल्लारीपुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला लावते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची निकड अधोरेखित करणारं, डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45743098429698,"sku":"","price":366.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Apattichakracover.jpg?v=1735455310"},{"product_id":"jeevankondi-by-paresh-manohar-जीवनकोंडी","title":"Jeevankondi By Paresh Manohar (जीवनकोंडी)","description":"\u003cp\u003eराज्यात जवळपास २०० साखर कारखाने….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऑक्टोबर ते एप्रिल असा ६-७ महिन्यांचा गळीत हंगाम ….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या काळात कारखान्यातील परिसरात ऊसाच्या फडांवर लाखो मजूरकुटुंब पोटापाण्यासाठी आपली घरं, शेती, गावं सोडून येतात. या हंगामात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्य समस्या, मुलांच्या शिक्षण समस्या, आर्थिक समस्या असे अनेक गंभीर प्रश्न या स्थलांतरित मजुरांसमोर आ वासून उभे असतात. जीवनकोंडीच जणू! याच समस्यांचा सखोल अभ्यास गेल्या ५ वर्षांत टाटा ट्रस्टस्तर्फे ‘टीम आशा’ने सोमेश्वर साखर कारखाना परिसरात केला. त्या आधारेच अनेक जटील प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षण, कामगार, मानव अधिकार, शेती अशा क्षेत्रांतील कार्यकर्ते, अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत हा विषय पोचवून ऊसतोडणी मजुरांची जीवनकोंडी सुटावी यासाठीच हा एक विधायक प्रयत्न\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45743103475970,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JeevankondiCover-1.jpg?v=1735455323"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/rohan-prakashan.oembed?page=20","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}