{"title":"Ranjeet Desai","description":"","products":[{"product_id":"varsa-by-ranjeet-desai","title":"Varsa By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘वारसा अशाच असतो सुभाना... ते देवाचं देणं असतं. त्यागातच तो जगतो. नाहीतर कैकयीनं तो वर मागितला नसता. प्रभू रामचंद्र वनवासी झाले नसते. रावणानं सीतेला पळवलं नसतं. ना दशरथ पुत्रशोकानं गेले असते. हे सर्व सत्यवचनी रघुकुलाच्या ‘वारशा’मुळे झाले... सोसावंच लागतं. त्यातून कुणाचीही सुटका नाही. प्रत्येकाचा पिंड वेगळा. कोण एकवचनी राम असतो, तर कोणी बंधुभक्त लक्ष्मण, भरत होतं. तर कुणाच्या नशिबी दुर्दैवी सीता बनण्याचं येतं.... वारशाचं महत्त्व अधोरेखित करणारं नाटक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45525025718530,"sku":"","price":94.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61hA659DRdL._SL1400.jpg?v=1729070178"},{"product_id":"garudzep-by-ranjeet-desai","title":"Garudzep By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते. जी पिलं पंखांचं बळ घेऊन माघारी घरट्यात येतात, तीच गरुडांची पिलं ठरतात. राजे गरुड असतील, तर आपल्या पंखांच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता, असं म्हणावं लागेल. —आणि या गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे!’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45525356609794,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41eYfuf9K8L._SY445_SX342.jpg?v=1728234741"},{"product_id":"swami-by-ranjeet-desai","title":"Swami  By Ranjeet  Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती.रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45525381480706,"sku":"","price":247.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/615VTaHoZqS._SY425.jpg?v=1728235238"},{"product_id":"shriman-yogi-by-ranjeet-desai","title":"Shriman Yogi By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531279851778,"sku":"","price":638.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61SOc2QYChS._SY425.jpg?v=1729070192"},{"product_id":"aalekh-by-ranjeet-desai","title":"Aalekh  By Ranjeet  Desai","description":"\u003cp\u003eग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असता गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या ही घटनांची केंद्रस्थळं. गावातली तऱ्हेवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गांजलेली, देवभोळी, अंधश्रद्धाळू माणसं ! निसर्ग आणि जनावरं यांच्याशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. ही माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरची माया, शहरवासीयांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531349221634,"sku":"","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/16_6b3fc418-df26-4510-a3b8-af5aa37bbbfa.jpg?v=1728234578"},{"product_id":"samidha-by-ranjeet-desai","title":"Samidha  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e एका शहरामध्ये हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. त्यानंतर अशा घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. शेकडो वर्षे ज्या देशात संतांची शिकवण नांदते आहे, त्या देशात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा पंचवीस वर्षांनी या घटना का घडतात? का घडाव्यात? या मनातील व्यथेवर विचार करत करत गावोगावी हिंडून गोळा केलेल्या तपशीलातून साकार झाली ती ही समिधा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531353612546,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81j12b7cZFL._SY342.jpg?v=1728234995"},{"product_id":"vaishakh-by-ranjeet-desai","title":"Vaishakh By Ranjeet  Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e \"रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणा-या कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45536468271362,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vaishakh-FC.jpg?v=1728235264"},{"product_id":"tuzi-vat-vegali-by-ranjit-desai","title":"Tuzi Vat Vegali  By Ranjit Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात, तेवढीच टिकतात. बाकीची भक्ष्य असतात...’’ पिढ्यान् पिढ्यांचे सावनगढचे राजे. तिथल्या मातीवर त्यांचं घराणं पोसलं. तिथलं सारं ऐश्वर्य भोगलं... पण संस्थानं विलीन झाली.. रिश्ता तुटला. सावनगढचे वंशज परदेशात हॉटेल्स काढून बसले. त्या खानावळवाल्यांच्या हाती घराण्याचा वारसा सोपवायचा?.. मग कोण असू शकतो खरा वारसदार? राजदरबारातील गायिका आणि युवराज यांच्या अनोख्या प्रीतीतील त्यागानं, तपश्चर्येनं, दोन जीव जळूनही वारसा अमर होतो?...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45536746373378,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61Ekn6T4DIL._SY342.jpg?v=1728235546"},{"product_id":"swami-natak-by-ranjeet-desai","title":"Swami (Natak ) By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशास्त्री : वहिनीसाहेब, श्रीमंत गेले आणि मराठी दौलतीचा कणाच मोडला. पानिपताचा घाव यापुढे काहीच नाही. अवघ्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत बलाढ्य शत्रूंचं पारिपत्य करून पेशवाईचं कर्ज निवारणारा, पानिपताचा कलंक धुऊन काढणारा असा प्रजादक्ष पेशवा परत मिळणं कठीण! रमा : स्वारींना फार काळ तिष्ठत ठेवणं बरं नाही. आम्ही मंदिरात येऊ. चिंतामणीच्या साक्षीनं आम्ही स्वारींच्या मागून जाऊ. ‘स्वामी’ या अजरामर साहित्यकृतीचे नाट्यरूपांतर!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45536760103170,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Swami-Natak-FC.jpg?v=1728234975"},{"product_id":"snehadhara-by-ranjeet-desai","title":"Snehadhara By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकै. रणजित देसाई यांच्या दैवी प्रतिभेचा हा प्रसन्न; परंतु अखेरचा ललिताविष्कार : स्नेहधारा ! दैव, व्यक्तित्व आणि परिस्थिती या तिन्हीच्या क्रियाप्रतिक्रियांमधून जीवन घडलं जात असताना ज्या ज्या छोट्यामोठ्या व्यक्तीशी त्यांचा ऋणानुबंध जडला, त्या सर्वांच कृतज्ञ स्मरण श्री. रणजित देसाई यांनी आपल्या या अखेरच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहात केलं आहे. हे सलग आत्मकथन नव्हे. काही तरी तात्कालिक निमित्त्त घडलं आणि त्या त्या व्यक्तीचं स्मरण उत्कटतेनं झालं. त्या व्यक्तीशी संबंधित प्रसंगांची आणि व्यक्तीचं हे हळुवार लेखणीनं केलेलं भावचित्रण आहे. या व्यक्तिरेखाही तशा समग्र, परिपूर्ण नाहीत. त्या व्यक्तीशी आलेला श्री. देसार्इंचा संबंध आणि त्या संबंधाची प्रतिक्रिया म्हणून त्यांच्या मनावर उमटलेला चिरकालिक स्वरूपाचा संस्कार यांनाच या छोट्या स्मरणसाखळीत प्राधान्य दिलं गेलं आहे. कै. रणजित देसार्इंच्या वाचकांच्या हाती त्यांची ही अखेरची ललितकृती देताना आम्हांला दु:खमिश्रित आनंद होत आहे. दु:ख अशासाठी, की श्री. देसार्इंचं हे अखेरचं अप्रकाशित असं साहित्य आम्ही ग्रंथरूपानं प्रसिद्ध करीत आहोत...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45536767738114,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Snehadhara-FC.jpg?v=1728234513"},{"product_id":"shekara-by-ranjeet-desai","title":"Shekara By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेकरा हा खारीच्या जातीचा विशेषत: जंगलात आढळणारा, झाडावर राहाणारा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मुक्तपणे फिरणारा व आवश्यकतेप्रमाणे जमिनीवर येणारा प्राणी. शेकरा खारीसारखाच दिसणारा, पण खारीहून कितीतरी मोठा, झुबकेदार शेपटी असलेला शाकाहारी प्राणी आहे. वेगवेगळ्या झाडांवरची फळे खात हिंडण्याबरोबरच जंगलातील वन्य पशुंचे जीवननाट्य तो बिटबिट्या, लालबुंद डोळ्यांनी दुरून पाहात असतो. या निरीक्षणात तटस्थता नसते. खूप उत्सुकता असते; जमेल तेथे सहभाग आणि पलायनही असते. शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. शेकरा एका डोहाकाठी असलेल्या वडाच्या झाडावर बसून निसर्गाचे, तेथे पाणी पिण्यास येणार्या विविध पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करतो. यामध्ये काळतोंड्या हुप्प्यांचं दात विचकून, भीती दाखवत अंगावर येणं, अस्वलाचं जमिनीवर पालापाचोळा हुंगत जाणं, मधमाश्यांच्या चाव्याची पर्वा न करता पोळं पाडून त्यातला मध पिणं आणि पिलांना मागे सारून वारुळात तोंड खुपसून अधाशासारखी एकट्यानेच वाळवी खाणं, वाघाची शिकारीला जाताना झाडाच्या सालीमध्ये नखांनी ओरबाडून ती साफ करण्याची सवय, मादी गव्याच्या प्रसूतीच्या वेळी खुद्द गवा आणि इतर माद्यांनी केलेले तिचे आणि वासराचे संरक्षण, सुसरीचं डोहाच्या काठावर येऊन ऊन अंगावर घेताना तोंडाचा आ वासून पक्ष्यांकडून दात साफ करून घेणं आणि डोहात शिरल्यावर किंचित डोके वर काढून पाणी पिण्यास आलेल्या भेकरास अलगद पाण्यात ओढून नेणं, प्रणयभंगास कारणीभूत ठरणार्या गजेंद्राच्या सोंडेला महाभुजंगाने घेतलेला चावा आणि त्यात झालेला दोघांचाही मृत्यू, नाग उंदराला खाण्याच्या पवित्र्यात तर झाडाच्या ढोलीतून बाहेर आलेले घुबड नागाला पकडण्याच्या तयारीत, भुकेलेल्या अजगराने सशाला लक्ष्य करणं; हे सारे प्रसंग अधूनमधून शेकराच्या डोळ्यांसमोर घडत असतात. दरम्यान, जंगलाला लागलेल्या आगीमध्ये सारे भस्मसात होते; साहजिकपणे बहुतेक सारे पशु-पक्षी हे जंगल सोडून आपल्या वाटेने दुसर्या जंगलात आश्रयास जातात. शेकरा मात्र या जागेने आजवर दिलेले सुख लक्षात घेऊन हे जंगल सोडून इतरत्र जात नाही; तर अशा प्रसंगातही तो बिळात असलेल्या सशाच्या दोन पिलांना कोवळे गवत देतो आणि त्यांच्याशी खेळतो तसेच तो सुतारपक्ष्याने चोचीने झाडामध्ये तयार केलेल्या पोकळीतील पिलांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. अखेर एका दुर्दैवी क्षणी वाढत्या वयानुसार चपलताहीन झालेले शरीर आणि खचलेल्या मनाचा शेकरा पाणी पिण्यास येतो आणि बेसावधपणे खोकडाची शिकार होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45538931179778,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/11_82df15ab-924e-4ec8-b0f7-ad6ff4363575.jpg?v=1728235141"},{"product_id":"savali-unhachi-by-ranjeet-desai","title":"Savali Unhachi By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘...ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. ते दोन जीव अधिक सामथ्र्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं. जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं. मुलंबाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते. अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत असताना तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता. ख-या अर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो. ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो. राखेतून जन्म घेणाया फिनिक्स पक्ष्यासारखा. ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता. निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल, तोवर कशालाही भिण्याची गरज नाही, कळलं?’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45538932261122,"sku":"","price":59.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Savali-Unhachi-FC.jpg?v=1728234665"},{"product_id":"sanket-by-ranjeet-desai","title":"Sanket By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआटपाडीच्या हंबीरराव मोहित्यांचा एकुलत्या एका मुलानं ‘यशाचं कडं’ जिंकलं; ‘बदली’च्या गावी जाताना शंकर मास्तरांना रामूच्या पत्रानं दिलासा दिला; दोन दिवस उपाशी असणाया गाईच्या ‘आंबवण’साठी द्रौपदीनं जीवाचं रान केलं; ‘हंगाम’ गाठण्यासाठी जीवाचा आटापीटा करणाऱ्या भरमूचं तान्हं पोर मात्र तापानं फणफणलं होतं; बुढ्या ‘पाशा’ने पैजेसाठी सवाई पाश्याशी कडवी झुंज दिली; रानडुक्कराची ‘शिकार’ करताना रामूच्या आवडत्या खुज्या कुत्रीनं आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही; धनगरांच्या पाल्यावर ‘राखण’ करताना सिद्दाच्या रावज्यानं लांडग्याशी कडवी झुंज दिली; महेंद्राच्या पाठीमागून माद्या पैलतीराकडे निघाल्या, तेव्हा ‘हस्ता’च्या पावसाच्या उभ्या सरी कोसळत होत्या; ह्या अनर्थाला तोच मानव कारणीभूत आहे, हे ओळखून वाघाने त्याचा ‘सूड’ घेतला; ....ह्या घडणाया प्रत्येक घटना जणू एक अघटित ‘संकेत’च घेऊन जन्माला आल्या होत्या!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45538934063362,"sku":"","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sanket-FC.jpg?v=1729069886"},{"product_id":"sangeet-tansen-by-ranjeet-desai","title":"Sangeet Tansen By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘गाणं हे पौर्णिमेच्या रात्रीसारखं असतं, बिलास. जो राग आळवला जातो, तो त्या रात्रीचा चंद्र असतो. अशा वेळी निस्तेज तारे दिसूही शकत नाहीत. जे ठळक तारे आहेत, त्यांच्याच सोबतीनं चंद्र प्रवास करीत असतो. बाकीचे सारे तारे चंद्राच्या प्रकाशात लुप्त होतात. ज्यांची चंद्राला साथ करण्याची कुवत असते, तेवढेच फक्त दिसतात. जो राग आपण गातो, त्याचंही असंच आहे. वादीसंवादी तेवढेच स्वर आपण पाहायला हवेत. तरच तो राग खुलतो.’ ...गुलशन, अब्बाजानसारखा गुरू मिळणं कठीण! त्यांनी नुसता आकार लावला, तरी कान तृप्त होतात. संगीतसम्राट तानसेन यांची मैफल सजवणारं नाटक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45538934718722,"sku":"","price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sangit-Tansen-FC.jpg?v=1728234585"},{"product_id":"radheya-by-ranjeet-desai-राधेय","title":"Radheya By Ranjeet Desai ( राधेय )","description":"\u003csection class=\"reviews-section\"\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e#साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"reviews-section submit-btn-css\" id=\"reviews-section\"\u003e\n\u003cfigure class=\"left-sec\"\u003e\u003c\/figure\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/section\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647243051266,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/716xe0O0pfL._SY425.jpg?v=1731832516"},{"product_id":"set-of-3-shriman-yogi-mrutunjay-chhava-shri-shambhuchhatrapati-smarak-granth-by-ranjeet-desai-shivaji-sawant-sushant-sanjay-udawant","title":"Set Of 3 Shriman Yogi+Mrutunjay+Chhava+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth By Ranjeet Desai+Shivaji Sawant+Sushant Sanjay Udawant+","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869730955522,"sku":"","price":1639.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61SOc2QYChS._SY425.webp?v=1739788775"},{"product_id":"bari-बारी-by-ranjeet-desai","title":"Bari - बारी By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879784571138,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bari-FC.jpg?v=1740121108"},{"product_id":"abhogi-अभोगी-by-ranjeet-desai","title":"Abhogi - अभोगी | By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eघराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसार्इंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879794893058,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_771ea9ca-bdec-4f37-b6a6-9dbfbd8ff269.jpg?v=1740121028"},{"product_id":"gandhali-गंधाली-by-ranjeet-desai","title":"Gandhali - गंधाली |  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऐतिहासिक व्यक्तींची रसरशीत चित्रे उभ्या करणार्या ललितरम्य कथा. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा सूर असलेली प्राणप्रिय पत्नी चुन्ना निवर्तल्यावर वेदनेने पिळवटलेला अस्सल कलावंत आहे. सती झालेली; पण जाताजाता इतरांची आयुष्यं उजळणारी पुतळाबाई आहे, तर स्नेहाने मुत्सद्द्यांचीR हृदयं जिंकणारी, बुद्धिमान कलावंतीण माहेलका आहे. या कथांमधून प्रेमाचे वेगवेगळे पोत रणजित देसाई आपल्यापुढे ठेवतात. सगळ्या कथांचा बाज हा ऐतिहासिक असला, तरी त्यातल्या भावभावना मात्र कालातीत आहे. ‘रोमँटिक’ जातकुळीच्या या कथा व्याकूळ करतात. यातली तपशिलांची, थेट वर्णनात्मक शैली मनाचा ठाव घेते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879806099714,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/17_115fad22-4aab-42b9-a3cf-419f0ab8eb85.jpg?v=1740121122"},{"product_id":"garudzep-गरुडझेप-by-ranjeet-desai","title":"Garudzep - गरुडझेप |  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते. जी पिलं पंखांचं बळ घेऊन माघारी घरट्यात येतात, तीच गरुडांची पिलं ठरतात. राजे गरुड असतील, तर आपल्या पंखांच्या बळावर माघारी घरट्यात येतील. नाहीतर या घरात गरुड जन्मलाच नव्हता, असं म्हणावं लागेल. —आणि या गरुडाला जाळ्यात पकडणारा फासेपारधी अजून जन्माला यायचा आहे!’’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879838343426,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Garudzep-FC.jpg?v=1740121063"},{"product_id":"he-bandh-reshmache-हे-बंध-रेशमाचे-by-ranjeet-desai","title":"He Bandh Reshmache - हे बंध रेशमाचे | By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशराब, सत्ता आणि पैसा यांची नशा चढली, तर केव्हानाकेव्हा ती उतरते; पण ही धर्माची नशा. तिच्यासारखी बुरी चीज नाही. तिची परीक्षा घेऊ नये, श्री.... धर्म का वाईट? कोण म्हणतो? धर्म निष्पाप, अजाण असतो. माणुसकीचं बोट धरून धर्म चालतो, तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. पण नुसत्या धर्माचं बोट धरून माणूस जेव्हा चालायला लागतो, तेव्हा स्वर्गाचा नरक बनायला फारसा वेळ लागत नाही. पाठीशी घेतलेली चीजवस्तूच नव्हे, पण बरोबरची माणसंसुद्धा कडेपर्यंत सुखरूप पोहोचत नाहीत.... फाळणीच्या पाश्र्वभूमीवर दोन मित्रांच्या अतूट मैत्रीवर साकारलेलं नाटक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879848993026,"sku":"","price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/29_fd715395-4d93-4b1e-be1b-13dfc41ec44f.jpg?v=1740121185"},{"product_id":"kanchanmruga-कांचनमृग-by-ranjeet-desai","title":"Kanchanmruga - कांचनमृग |  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘श्री’ मिळवायची झाली, तर वेडीवाकडी वळणं घेतल्याखेरीज ती हाती येत नाही. पण आज ‘श्री’चं वेडंवाकडं वळण तेवढंच लक्षात ठेवलं जातं. ‘श्री’च्या वळणातलं सामथ्र्य नेमकं विसरलं जातं. वेडीवाकडी वळणं घेतच नदी जाते. पण तिची वळणं भूभाग अधिक समृद्ध करायला कारणीभूत ठरतात. वेडीवाकडी वळणं घेत दयाखोयांचा रस्ता जातो. म्हणूनच माणसाला सहजतेनं संकटांचे डोेंगर तरता येतात. आज ‘श्री’चं नेमकं सामथ्र्य हरवून वेडीवाकडी वळणं तेवढीच कवटाळली जातात! कष्ट, सेवा हे शब्द फक्त उच्चारण्यापुरते उरलेत. सामथ्र्याच्या पायाखाली ‘त्याग’ चिरडला जात आहे. जीवनमूल्यांचा हा हास माणसाला कुठवर पोहोचवणार आहे ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879860494594,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/27_1fcefd56-b672-4da1-bdf4-c744ad60aa62.jpg?v=1740121117"},{"product_id":"lakshyavedh-लक्ष्यवेध-by-ranjeet-desai","title":"Lakshyavedh - लक्ष्यवेध  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक. बारा मावळांत स्वराज्याचे रोपटे रुजते न रुजते, तोच अफझलखानाचे संकट अवतरले. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्वोक्ती होती; आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारणधुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच ‘लक्ष्यवेध’.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879871799554,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Lakshyavedh-FC.jpg?v=1740120978"},{"product_id":"megh-मेघ-by-ranjeet-desai","title":"Megh - मेघ  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह. घराणं, इभ्रत, प्रतिष्ठा, गावकी, वैर या धाग्यांनी विणलेल्या कथा मनाच्या तळापर्यंत पोहोचतात. जिथं घराण्याची पत सांभाळण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी माणसं, आप्तेष्टांच्या प्रेमापोटी सर्वस्व उधळणारी माणसं या कथांमधून भेटतात, तिथंच स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी माणसंही भेटतात. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879898865922,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Megh-FC.jpg?v=1740121153"},{"product_id":"morpankhi-savlya-मोरपंखी-सावल्या-by-ranjeet-desai","title":"Morpankhi Savlya - मोरपंखी सावल्या |  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. कादंबरीलेखनामुळे त्यांनी दिगंत किर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता. सुरवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतरम्य वातावरणात नेणाNया मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीतक्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाNया काही कलावंतांची सुखदुःखही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथाही लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाया प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. कथासूत्रात बांधलेली ही लालित्यपूर्ण निसर्गचित्र पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879907385602,"sku":"","price":107.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Morpankhi-Savlya-FC.jpg?v=1740121135"},{"product_id":"pankh-jahale-vairee-पंख-जाहले-वैरी-by-ranjeet-desai","title":"Pankh Jahale Vairee - पंख जाहले वैरी  By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकावळ्याच्या घरट्यात वाढलेलं कोकिळेचं पिल्लू सुद्धा आपला ‘सूर’ विसरत नाही. पण चांगल्या घराण्यात वाढलेली माणसं कित्येकदा माणुसकीपासून दूर जातात. माया, ममता त्यांना जखडून ठेवू शकत नाही. उदासीन पालक, बेजबाबदार शिक्षक, बेताल विद्यार्थी या जगाचा गाडा नेणार आहेत तरी कुठे ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879919182082,"sku":"","price":77.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/32_becd7b51-54d0-4696-b65e-907589cef590.jpg?v=1740120942"},{"product_id":"pavankhind-पावनखिंड-by-ranjeet-desai","title":"Pavankhind - पावनखिंड By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहेलकावे घेणाया पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता, ‘‘चला’’ चला! कुठं जायचं? एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर? बाजी! कशासाठी हे कष्ट घेता? कोणाच्या स्वार्थापायी? आणि तेही एका माणसाच्या जिवापायी? कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं? कोणत्या अधिकारानं? जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वत:च्या जीवाचं! मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात? कसल्या आणि कुणाच्या भरवशावर? बाजी, फुलाजी तुम्ही स्वामीकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात? कोणत्या त्यागापायी? हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो. पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपुर्द केलंत? यातून खरं काही साधणार आहे का? या पालखीचा वीट येतो! नशिबानं या संकटातून पार पडलोच तर... बाजी, पालखीचा मान तुम्हाला देऊ! त्यावेळी तुम्हाला कळेल ही पालखी केवढं सुख देते ते!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879942250754,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pavankhind-FC.jpg?v=1740120983"},{"product_id":"rupmahal-रुपमहाल-by-ranjeet-desai","title":"Rupmahal - रुपमहाल By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरणजित देसाईंच्या अगदी सुरुवातीच्या काळातील काही कथा या संग्रहात संगृहित केल्या आहेत. माडगूळकर, शंकर पाटील, मिरासदार इत्यादींच्या काळात लिहूनही आपले स्वतंत्र स्थान देसाईंनी निर्माण केले व टिकवले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखानदानीपणाच्या अभिमानाने स्वत:च्या मुलाला कड्याच्याखाली लोटणारा आबाजी पाटील, मानाच्या आहारी जाऊन अखेरची शर्यत खेळणारे भवानराव, साठमारीत मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या हत्तीणीला एका चांदण्या रात्री एकटाच आव्हान देणारा केशव इत्यादी वेगवेगळ्या व्यक्तीरेखांचे चित्रण कसदार झाले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45879965024514,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/13_aca696dd-5b2d-46e4-bd70-2160c702a399.jpg?v=1740121130"},{"product_id":"samidha-समिधा-by-ranjeet-desai","title":"Samidha - ||समिधा|| By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९६० च्या सुमारास दलित साहित्याचा उगम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्याचा व चळवळीचा भक्कम पाया रोवला गेला. अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, नारायण सुर्वे साहित्यिकांनी दलित साहित्यात मोलाची भर घातली. स्वातंत्र्य समता व बंधुता हे मुख्य उद्दीष्ट मानून दलित साहित्याची वाटचाल सुरू झाली. याच वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण कलाकृती म्हणजे रणजित देसाईंची 'समिधा' होय\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45880215437570,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Samidha-FC.jpg?v=1740120920"},{"product_id":"sanchit-संचित-by-ranjeet-desai","title":"Sanchit   संचित By Ranjeet Desai","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e... साहित्य ही निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्यातरी सह जाणारी वस्तू आहे. आपलं मानवी जीवन अनेक निष्ठांच्या बळावर जगलं जातं. साहित्यातून याच निष्ठा साकारत असतात. लेखकाच्या स्वानुभवातून त्याला घडणारं जीवनदर्शन एवढ्यानं साहित्यनिर्मिती होत नसते. त्याचं साहित्य सहित म्हणजे हितासाहित असावं लागतं. लेखक निव्वळ वास्तवता टिपत नसतो. वास्तवाच्या साऱ्याच गोष्टींनी त्याचं मन भारलं जात नाही; काही गोष्टी त्याच्या अनुभूतीला भिडतात; त्यातूनच त्याचं मन जागं होतं. या वास्तवाच्या अनुभूतींतून जाग्या झालेल्या मनाला कुठंतरी आदर्शाच्या स्पर्श होतो आणि त्याचं साहित्य साकारतं. नुसते सूर्यकिरण पाण्यावर पडून इंद्रधनुष्य उमटत नाही. मेघावरून परावर्तीत झालेले सूर्यकिरण जेव्हा आकाशातून स्त्रवणाया दवबिंदुंवर पडतात, तेव्हाच सप्तरंगांचं इंद्रधनुष्य प्रगटतं. वास्तवाला आदर्शाचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हाच त्या साहित्याला वेगळं रूप लाभतं...! अभिजात साहित्य आणि त्याच्या निर्मितिप्रेरणा यासंदर्भात वेगवेगळ्या निमित्तांनी, वेगवेगळ्या संमेलनांत श्री. रणजीत देसाई यांनी अध्यक्षपदावरून केलेल्या निवडक भाषणांचा एकत्रित संग्रह !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45880216912130,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sanchit-FC.jpg?v=1740121086"},{"product_id":"ranjeet-desai-combo-set-42-books","title":"RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS","description":"\u003cdiv\u003eSr.No.\u003cspan\u003e \u003c\/span\u003eBook Name\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePrice\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e1\u003cspan\u003e \u003c\/span\u003eAALEKH\u003cspan\u003e \u003c\/span\u003e350\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e2\u003cspan\u003e \u003c\/span\u003eAASHADH\u003cspan\u003e \u003c\/span\u003e130\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e3\u003cspan\u003e \u003c\/span\u003eABHOGI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e250\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e4\u003cspan\u003e \u003c\/span\u003eBABULMORA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e220\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e5\u003cspan\u003e \u003c\/span\u003eBARI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e250\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e6\u003cspan\u003e \u003c\/span\u003eDHAN APURE\u003cspan\u003e \u003c\/span\u003e90\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e7\u003cspan\u003e \u003c\/span\u003eGANDHALI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e220\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e8\u003cspan\u003e \u003c\/span\u003eGARUDZEP\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e9\u003cspan\u003e \u003c\/span\u003eHE BANDH RESHMACHE\u003cspan\u003e \u003c\/span\u003e80\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e10\u003cspan\u003e \u003c\/span\u003eKAMODINI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e170\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e11\u003cspan\u003e \u003c\/span\u003eKANCHANMRUG\u003cspan\u003e \u003c\/span\u003e100\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e12\u003cspan\u003e \u003c\/span\u003eKATAL\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e13\u003cspan\u003e \u003c\/span\u003eLAKSHYAVEDH\u003cspan\u003e \u003c\/span\u003e220\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e14\u003cspan\u003e \u003c\/span\u003eLOKNAYAK\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e15\u003cspan\u003e \u003c\/span\u003eMADHUMATEE\u003cspan\u003e \u003c\/span\u003e140\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e16\u003cspan\u003e \u003c\/span\u003eMAZA GAON\u003cspan\u003e \u003c\/span\u003e395\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e17\u003cspan\u003e \u003c\/span\u003eMEGH\u003cspan\u003e \u003c\/span\u003e160\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e18\u003cspan\u003e \u003c\/span\u003eMEKH MOGARI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e160\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e19\u003cspan\u003e \u003c\/span\u003eMORPANKHI SAVALYA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e125\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e20\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePANGULGADA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e21\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePANKH JAHALE VAIRI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e90\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e22\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePAVANKHIND\u003cspan\u003e \u003c\/span\u003e250\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e23\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePRAPAT\u003cspan\u003e \u003c\/span\u003e170\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e24\u003cspan\u003e \u003c\/span\u003ePRATIKSHA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e170\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e25\u003cspan\u003e \u003c\/span\u003eRADHEYA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e280\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e26\u003cspan\u003e \u003c\/span\u003eRAJA RAVI VARMA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e340\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e27\u003cspan\u003e \u003c\/span\u003eRAMSHASTRI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e100\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e28\u003cspan\u003e \u003c\/span\u003eROOPMAHAL\u003cspan\u003e \u003c\/span\u003e150\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e29\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSAMIDHA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e200\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e30\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSANCHIT\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e31\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSANGEET TANSEN\u003cspan\u003e \u003c\/span\u003e70\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e32\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSANKET\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e33\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSAVALI UNHACHI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e70\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e34\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSHEKARA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e150\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e35\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSHRIMAN YOGI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e795\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e36\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSHRIMANYOGI (NATAK)\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e37\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSNEHADHARA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e160\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e38\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSWAMI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e350\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e39\u003cspan\u003e \u003c\/span\u003eSWAMI (NATAK)\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e40\u003cspan\u003e \u003c\/span\u003eTUZI VAT VEGALI\u003cspan\u003e \u003c\/span\u003e120\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e41\u003cspan\u003e \u003c\/span\u003eVAISHAKH\u003cspan\u003e \u003c\/span\u003e140\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e42\u003cspan\u003e \u003c\/span\u003eVARSA\u003cspan\u003e \u003c\/span\u003e110\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan\u003e 7735\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883270791426,"sku":"","price":5723.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1650.jpg?v=1740207372"},{"product_id":"shivaji-sawant-combo-set-10-books","title":"SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS","description":"\u003ctable border=\"0\" cellpadding=\"0\" cellspacing=\"0\" width=\"343\" style=\"border-collapse: collapse; width: 258pt; max-width: 100%; border-spacing: 0px; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; orphans: 2; text-align: start; widows: 2; -webkit-text-stroke-width: 0px; text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\"\u003e\n\u003ccolgroup\u003e\n\u003ccol width=\"64\" style=\"width: 48pt;\"\u003e \u003ccol width=\"181\" style=\"mso-width-source: userset; mso-width-alt: 6619; width: 136pt;\"\u003e \u003ccol width=\"98\" style=\"mso-width-source: userset; mso-width-alt: 3584; width: 74pt;\"\u003e \u003c\/colgroup\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"left\" width=\"64\" style=\"height: 15.0pt; width: 48pt;\"\u003eSr.No.\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" width=\"181\" style=\"width: 136pt;\"\u003eBook Name\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" width=\"98\" style=\"width: 74pt;\"\u003ePrice\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e1\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eASHI MANE ASE NAMUNE\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e180\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e2\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eCHHAVA - NATAK\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e150\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e3\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eCHHAWA\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e750\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e4\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eKANCHANKAN\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e140\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e5\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eKAVADASE\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e190\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e6\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eMORAVALA\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e110\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e7\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eMRUTYUNJAY\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e460\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e8\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eMRUTYUNJAY - NATAK\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e140\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e9\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eSHELKA SAJ\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e195\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" align=\"right\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e10\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"left\" style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003eYUGANDHAR\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e675\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 0px; padding-top: 0px;\"\u003e\n\u003ctd height=\"20\" style=\"height: 15.0pt; margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd style=\"margin-right: 0px; padding-bottom: 8px; padding-top: 8px;\"\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd align=\"right\"\u003e2990\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883327414530,"sku":"","price":2691.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1600.jpg?v=1740207838"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ranjeet-desai.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}