{"title":"Osho","description":"","products":[{"product_id":"swatacha-shodh-by-osho","title":"Swatacha Shodh By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकोणीसशे सत्याऎंशी सालातले ओशोंचे विचार... आणि आता दोन हजार एक मधल्या घटना... खरोखर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे विचार आज तंतोतंत प्रत्ययाला येत आहेत. या तिस-या भागात विश्वाची कोडी उकलताना त्यांनी सॄष्टीला भरभरून धन्यवाद दिले आहेत. इतर प्राणिमात्रांपेक्षा मनुष्यप्राण्याचं जीवन हे जास्त रोमांचकारी आहे हे स्पष्ट करताना वारंवार त्यांनी ठामपणे सांगितलंय की हे ’प्रकॄतीचं देणं आहे...’ ते सांभाळून ठेवा! स्वत:च्या जीवनाची स्वत:च्या हातानं हेळसांड करू नका. आणि त्यासाठी स्वत:चा शोध पहिल्यांदा घ्या. मनुष्याच्या उन्नतीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक टप्पा म्हणजे स्वत:चा शोध.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45460424491266,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61-3NjKnspL._SY425.jpg?v=1729070479"},{"product_id":"sambhogatun-samadhikade-by-osho","title":"Sambhogatun Samadhikade By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो'... बुद्धाचं मोठं अद्भुत वचन आहे. 'तो अमानुषी रती प्राप्त करतो.' तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैल आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयालाच मी ‘संभोगातून समाधीकडे' म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक रती आहे माणसाची, स्त्री आणि पुरुषाची. क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे. जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते. तुम्ही स्वतःलाच निकट करता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक रती आहे दुसऱ्याशी मिलनाची, एक रती आहे स्वतःशीच मिलनाची. जेव्हा तुम्ही स्वतःशीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- ओशो\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527802937602,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/sambhogatun-samadhikade-original-imafbydvvjzrmafb.jpg?v=1728235275"},{"product_id":"mahavir-ani-namokar-by-osho-pradeep-nifadkar-and-shashikant-sambtranslatorsमहावीर-आणि-नमोकार","title":"Mahavir Ani Namokar By Osho, Pradeep Nifadkar And Shashikant Samb(Translators)(महावीर आणि नमोकार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक ओशोंसाठी वाचू नका किंवा हे पुस्तक महावीरांसाठी वाचू नका, तर हे केवळ तुमच्या भल्यासाठी आहे म्हणून वाचा. हे पुस्तक एका धर्माचे गोडवे गाणारे नाही की कोणत्याही व्यक्तीची पूजा करणारे नाही. हे पुस्तक आहे, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता. एकच उदाहरण देतो. पुढच्या पिढीतील महिलांना प्रसववेदना होऊ नये, असे वाटत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला सकारात्मकता म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर वाचाच. प्रदीप निफाडकर हे मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी व त्यांचे मित्र शशिकांत सांब यांनी हा अनुवाद रसाळपणे केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692678701314,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4104.jpg?v=1733640997"},{"product_id":"mahavir-ani-antartap-by-osho-pradeep-nifadka-and-shashikant-sambtranslators-महावीर-आणि-अंतर्तप","title":"Mahavir Ani Antartap By Osho, Pradeep Nifadka And Shashikant Samb(Translators) (महावीर आणि अंतर्तप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक ओशोंसाठी वाचू नका किंवा हे पुस्तक महावीरांसाठी वाचू नका, तर हे केवळ तुमच्या भल्यासाठी आहे म्हणून वाचा. हे पुस्तक एका धर्माचे गोडवे गाणारे नाही की कोणत्याही व्यक्तीची पूजा करणारे नाही. हे पुस्तक आहे, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता. एकच उदाहरण देतो. पुढच्या पिढीतील महिलांना प्रसववेदना होऊ नये, असे वाटत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला सकारात्मकता म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर वाचाच. प्रदीप निफाडकर हे मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी व त्यांचे मित्र शशिकांत सांब यांनी हा अनुवाद रसाळपणे केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694528061698,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4105.jpg?v=1733727341"},{"product_id":"mahaveer-ani-sutra-by-osho-pradeep-nifadkar-and-shashikant-sambtransators-महावीर-आणि-सूत्र","title":"Mahaveer Ani Sutra By Osho, Pradeep Nifadkar And Shashikant Samb(Transators) (महावीर आणि सूत्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक ओशोंसाठी वाचू नका किंवा हे पुस्तक महावीरांसाठी वाचू नका, तर हे केवळ तुमच्या भल्यासाठी आहे म्हणून वाचा. हे पुस्तक एका धर्माचे गोडवे गाणारे नाही की कोणत्याही व्यक्तीची पूजा करणारे नाही. हे पुस्तक आहे, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता. एकच उदाहरण देतो. पुढच्या पिढीतील महिलांना प्रसववेदना होऊ नये, असे वाटत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला सकारात्मकता म्हणजे काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर वाचाच. प्रदीप निफाडकर हे मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी व त्यांचे मित्र शशिकांत सांब यांनी हा अनुवाद रसाळपणे केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694534189314,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4106.jpg?v=1733727345"},{"product_id":"aika-santano-ऐका-संतांनो-by-osho","title":"Aika Santano - ऐका संतांनो  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाधू' या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं 'साधुत्व', त्यागा-भोगाच्या कल्पना, शरीररूपी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली चादर आणि त्यावर कबीरांचं साध्या-सोप्या प्रतीकांद्वारे दिलेलं भाष्य या सर्वातून ओशोंनी मांडलेली मानवी जीवनाची कल्पना... ही कबीरांची कवनं आणि त्यावरचं ओशोंचं भाष्य ! यातून स्वच्छपणे जाणवतो तो दोघांनी मानवी जीवनाचा चहूअंगांनी केलेला सार्थ विचार !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45880229101826,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Aika-Santano-FC.jpg?v=1740121189"},{"product_id":"bhaktit-bhijla-kabir-भक्तीत-भिजला-कबीर-by-osho","title":"Bhaktit Bhijla Kabir - भक्तीत भिजला कबीर By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकबीराच्या मते भक्तिसाधनेमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचं काय स्थान आहे? ध्यान आणि प्रार्थना हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. प्रार्थना ही भावदशा आहे; तर ध्यान ही चित्तदशा आहे. प्रार्थनेचा प्रवास हृदयातून सुरू होतो. प्रार्थना हृदयातील प्रेमाला वैयक्तिक पातळीवरून वैश्विक पातळीवर नेते. तेव्हाच प्रार्थना करणारा `मी` संपून जातो. ध्यानाचा उगम मस्तकातून सुरू होतो. ध्यानाने मस्तकातील विचारच संपून जातात. जसजसे ध्यान वाढू लागते तसतशी प्रार्थना प्रकट होऊ लागते आणि जशीजशी प्रार्थना वाढू लागते तसतसे ध्यान प्रकट होऊ लागते. शेवटी असा क्षण येतो की, ध्यान आणि प्रार्थना एकमेकात विलीन होऊन जातात. याच अवस्थेला भक्ती म्हणतात. कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन या पुस्तकात समाविष्ट केले आहे. भक्ती मार्गावर वाटचाल करणा-यांच्या मनातील प्रश्नांची सविस्तर उत्तरे या पुस्तकातून निश्चितच मिळतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883015659778,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhaktit-Bhijala-Kabir-FC.jpg?v=1740207778"},{"product_id":"dhyansutr-ध्यानसूत्र-by-osho","title":"Dhyansutr - ध्यानसूत्र | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न वातावरणामध्ये ओशोंनी संचालित केलेल्या ध्यानशिबिरामधल्या प्रवचनांचं तसंच ध्यानाच्या प्रयोगांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. शरीर, विचार आणि भावना यांच्या एकेका पापुद्र्यांनी पेशीपेशींना विलीन करण्याची अद्भुत कला समजवताना ओशो आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य, तसंच संतुलनाकडे घेऊन जातात. पुस्तकातील अन्य विषय कामशक्तीचा सर्जनशील उपयोग कसा करावा? क्रोध म्हणजे काय? क्रोधाची शक्ती कोणती? अहंकाराला कोणत्या शक्तीमध्ये बदलता येईल? वैज्ञानिक युगात अध्यात्माचं स्थान काय?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883042431234,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dhyansutra-FC.jpg?v=1740207422"},{"product_id":"ek-ek-paul-vaidnyanik-chintan-ani-dharm-एक-एक-पाऊल-वैज्ञानिक-चिंतन-आणि-धर्म-by-osho","title":"Ek Ek Paul Vaidnyanik Chintan Ani Dharm  एक एक पाऊल वैज्ञानिक चिंतन आणि धर्म | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमी आपल्याला सांगतो, कोणी कितीही दुबळा असला तरी एक पाऊल पुढे टाकण्याची ताकद सर्वांमध्ये असते. हजार मैल चालण्याची नसेल, हिमालय चढण्याची नसेल, पण एक पाऊल उचलण्याचं सामथ्र्य प्रत्येकामध्ये असतं. थोडासा धीर एकवटला तर आपण एक पाऊल नक्कीच टाकू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो, जो एक पाऊल उचलू शकतो तो हिमालय चढू शकतो; जो एक पाऊल उचलू शकतो तो हजारो मैल चालू शकतो. कारण या जगात कोणीही कधीही एका पावलाहून अधिक चालूच शकत नाही. नेहमी एकच पाऊल चाललं जातं... एक पाऊल अगदी पुरेसं आहे. कारण एकाच वेळी दोन पावलं कोणीच टाकू शकत नाही. एकच पाऊल टाकण्याचा धीर करण्याची गोष्ट आहे आणि जो जिवंत आहे त्याच्यामध्ये एवढं सामथ्र्य नक्कीच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883046953218,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ek-Ek-Paul-FC.jpg?v=1740207597"},{"product_id":"ha-shodh-vegla-हा-शोध-वेगळा","title":"Ha Shodh Vegla - हा शोध वेगळा | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e`कबीर म्हणतात... गुरूदेव बिन जीव की कल्पना ना मिटे। शोधाची पहिली पायरी आहे अज्ञान. अज्ञानी कल्पनेमध्ये जगत असतो. कल्पना अज्ञानाचं सूत्र आहे; तर सत्य ज्ञानाचं. गुरु तुमचा हात धरून हळूहळू तुम्हाला सत्याकडे नेतो. गुरु तुम्हाला तुमच्या कल्पनेपासून मुक्त करतो. तुम्ही स्वत:च्याच आधाराने चालत राहिलात, शोधत राहिलात तर रस्ता चुकणारच. तुम्ही जे शोधत आहात ते त्याला कधीच मिळालेलं आहे. तुमच्यात आणि गुरुमध्ये एवढंच अंतर आहे की, तुम्ही प्रारंभ आहात तो अंत आहे.` कबीरांसारखे वेडे क्वचितच भेटतात. पण जो कोणी त्यांचे दोहे वाचतो, त्यांचे विचार वाचतो, त्यांची भक्ती पाहतो, तो प्रत्येकजण कबीरासारखाच वेडा होऊन जातो. अशांमधलेच एक होते ‘ओशो’ कबीराच्या दोह्यांमधून त्यांनी अनेक नवे अर्थ शोधले आणि ते आपल्या प्रवचनांमधून सर्वांना सांगितले. कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन लावलेला हा शोध वेगळा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883049279746,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ha-Shodh-Vegla-FC.jpg?v=1740121014"},{"product_id":"hasat-khelat-dhyandharana-हसत-खेळत-ध्यानधारणा-by-osho","title":"Hasat Khelat Dhyandharana - हसत-खेळत ध्यानधारणा | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक दार आहे. ध्यान केवळ आध्यात्मिक पातळीवरच न राहता, त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, हे ओशोंनी अनेक दाखले देऊन समजावले आहे. मनाच्या पलीकडे जाऊन ध्यान काय आहे, हे ओशोच सांगू जाणे. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. ध्यानामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि तो अधिकाधिक विधायक होत जातो. ध्यान ही कल्पना धर्मातीत आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनातही धर्माचे स्थान काय आहे, हेही त्यांनी सांगितले आहे. ध्यान मनुष्याला अंतर्बाह्य बदलवते, हे ओशोंनी संभाषणाच्या खास शैलीतून व्यक्त केले आहे. आध्यात्मिक क्षेत्राबद्दल सामान्य माणसाच्या मनात निर्माण होणाया प्रातिनिधिक प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्याला या पुस्तकातून निश्चितच मिळतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883058815234,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Hasat-Khelat-Dhyandharana-FC.jpg?v=1740207801"},{"product_id":"krushnasakha-कृष्णसखा-by-osho","title":"Krushnasakha - कृष्णसखा | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883063730434,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3640.jpg?v=1740207679"},{"product_id":"krushnamrut-कृष्णामृत-by-osho","title":"Krushnamrut - कृष्णामृत | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883115438338,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3639.jpg?v=1740121144"},{"product_id":"krushnarang-sawala-कृष्णरंग-सावळा-by-osho","title":"Krushnarang Sawala - कृष्णरंग सावळा |By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883120615682,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3641.jpg?v=1740207750"},{"product_id":"maze-mazyapashi-kahi-nahi-माझे-माझ्यापाशी-काही-नाही-by-osho","title":"Maze Mazyapashi Kahi Nahi - माझे माझ्यापाशी काही नाही |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘‘योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एकएक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वाद्य तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत— मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही— तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऐकू येऊ लागतं— फक्त तुमच्याजवळ ऐकण्याची क्षमता हवी आहे... त्या नादालाच आपण ‘ओंकार’ म्हणतो.``\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883126481154,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Maze-Mazyapashi-Kahi-Nahi-FC.jpg?v=1740207724"},{"product_id":"meerechi-madhushala-मीरेची-मधुशाला-by-osho","title":"Meerechi Madhushala - मीरेची मधुशाला |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमीरा मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणाया परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच. आणि म्हणूनच मीराचं कृष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हृदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हृदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ‘मैं तो प्रेम दीवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch1\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003eBy Osho\u003c\/h1\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883135328514,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Meerechi-Madhushala-FC.jpg?v=1740207562"},{"product_id":"mrutyayushi-मृत्यायुषी-by-osho","title":"Mrutyayushi - मृत्यायुषी |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशरीर आणि चेतना यांचा वियोग म्हणजे मृत्यू. निर्वाणाचा अर्थ आहे, दोन सत्यांची जाण! ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो. तो मृत्यू नाही आणि त्याला जीवन म्हणतो, ते म्हणजे जीवन नाही. जो साधू निर्णय न घेता साधू झाला, त्याच्या तुलनेत निर्णयपूर्वक चोर हा श्रेष्ठ आहे, त्याची जीवनस्थिती श्रेष्ठ आहे, कारण निर्णय त्याचा कॉन्शन्स वाढवतो. त्याच्या व्यक्तित्वाला वजन देतो. त्याची जबाबदारी वाढवतो. तो निर्णय त्याचं दायित्व बनतं. आणि स्वत:ने निर्णय घेतल्यामुळे एक संकल्प निर्माण होतो. संकल्प निर्माण झाल्यामुळे चेतना जागृत होते...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883145224450,"sku":"","price":161.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1384.jpg?v=1740207513"},{"product_id":"mugdha-kahani-premachi-मुग्ध-कहाणी-प्रेमाची-by-osho","title":"Mugdha Kahani Premachi - मुग्ध कहाणी प्रेमाची |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883151057154,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Mugdha-Kahani-Premachi-FC.jpg?v=1740207666"},{"product_id":"sakshatkarachi-denagi-साक्षात्काराची-देणगी","title":"Sakshatkarachi Denagi - साक्षात्काराची देणगी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आत्ता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883157545218,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sakshatkarachi-Denagi-FC.jpg?v=1740207544"},{"product_id":"shiv-sutra-bhag-1-शिव-सूत्र-भाग-१-by-osho","title":"Shiv Sutra Bhag - 1 - शिव सूत्र भाग - १ |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883161968898,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shivsutra-Bhag-1-FC.jpg?v=1740207450"},{"product_id":"shiv-sutra-bhag-2-शिव-सूत्र-भाग-२-by-osho","title":"Shiv Sutra Bhag -2 - शिव सूत्र भाग -२ |  By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883168555266,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shivsutra-Bhag-2-FC.jpg?v=1740207426"},{"product_id":"osho-combo-set-34-books","title":"OSHO COMBO SET - 34 BOOKS","description":"\u003cp\u003e1    AIKA SANTANO                                                160.00    \u003cbr\u003e2    BANDKHOR                                                        150.00    \u003cbr\u003e3    BHAKTIT BHIJALA KABIR                                160.00\u003cbr\u003e4    DHARMA…KABIRANCHYA MANATALA        250.00    \u003cbr\u003e5    DHYANSUTRA                                                240.00    \u003cbr\u003e6    EK EK PAUL                                                        250.00    \u003cbr\u003e7    HA SHODH VEGALA                                        190.00    \u003cbr\u003e8    HASAT KHELAT DHYANADHARANA                140.00    \u003cbr\u003e9    KRISHNA SAKHA                                                  270.00    \u003cbr\u003e10    KRISHNAMRUT                                                270.00    \u003cbr\u003e11    KRISHNARANG SAVALA                                270.00    \u003cbr\u003e12    MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI                   160.00    \u003cbr\u003e13    MEERA EK VASANT AHE                               150.00    \u003cbr\u003e14    MEERA SHAMRANGI RANGLI                       150.00    \u003cbr\u003e15    MEERECHI MADHUSHALA                               150.00    \u003cbr\u003e16    MEERECHYA PREMTEERTHAVAR               150.00    \u003cbr\u003e17    MHANE KABIR DIWANA                               195.00    \u003cbr\u003e18    MI DHARMIKTA SHIKVITO DHARM NAHI       250.00    \u003cbr\u003e19    MRITYU AMRUTA CHE DWAR                       220.00    \u003cbr\u003e20    MRUTYAUSHI                                              190.00    \u003cbr\u003e21    MRUTYUCHE AMRATVA                              180.00    \u003cbr\u003e22    MUGDHA KAHANI PREMACHI                      150.00    \u003cbr\u003e23    NANAK NIRANKARI KAVI                              140.00    \u003cbr\u003e24    NANAK PARMATMYACHA NAD OMKAR      150.00    \u003cbr\u003e25    NANAK SANSARI SANYASTA                      150.00    \u003cbr\u003e26    NANAK SUR SANGEET EK DHUN              130.00    \u003cbr\u003e27    NAVI PAHAT                                                      195.00    \u003cbr\u003e28    PREMRAS... KABIRANCHA!                              160.00    \u003cbr\u003e29    SAD GHALTO KABIR                                      250.00    \u003cbr\u003e30    SAKSHATKARACH DENGI                              200.00    \u003cbr\u003e31    SHIV SUTRA (PART - 2)                                   270.00    \u003cbr\u003e32    SHIV SUTRA (PART- 1)                                      150.00    \u003cbr\u003e33    SWATAHCHA SHODH                                       220.00    \u003cbr\u003e34    VIDROHI    160.00    \u003cbr\u003e          6470.00    \u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45883222229250,"sku":"","price":4076.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1694.jpg?v=1740207847"},{"product_id":"set-of-6-book-shiv-sutra-bhag-1-2-sakshatkarachi-denagi-mrutyayushi-krushnarang-sawala-by-osho","title":"Set Of 6 Book : Shiv Sutra Bhag - 1 \u0026 2 + Sakshatkarachi Denagi +Mrutyayushi+Krushnarang Sawala | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबीजासारखे रुजा आणि वृक्षासारखे व्हा. थेंबासारखे, लाटेसारखे मिसळून जा आणि सागरासारखे व्हा. बुडून जा! विरून जा! मिसळून जा. आत्मसरोवरात, सर्वस्वानं एकरूप होऊन जा; म्हणजे तुम्ही महासागर व्हाल! विशाल व्हाल! मग तुम्हाला कुठलीच सीमा नाही, कुठलंच दु:ख नाही, वेदना नाही मग तुम्ही दीनवाणे नाही, दरिद्री नाही. मग तुम्ही असाल समृद्धसंपन्न, सम्राट. परमेश्वराची सगळी रूपं तुमची आहेत. मग तुम्ही ‘तुम्ही’ नाही; तुम्ही परमेश्वर आहात!\u003cbr\u003e\u003cbr\u003eअध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003eशरीर आणि चेतना यांचा वियोग म्हणजे मृत्यू. निर्वाणाचा अर्थ आहे, दोन सत्यांची जाण! ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो. तो मृत्यू नाही आणि त्याला जीवन म्हणतो, ते म्हणजे जीवन नाही. जो साधू निर्णय न घेता साधू झाला, त्याच्या तुलनेत निर्णयपूर्वक चोर हा श्रेष्ठ आहे, त्याची जीवनस्थिती श्रेष्ठ आहे, कारण निर्णय त्याचा कॉन्शन्स वाढवतो. त्याच्या व्यक्तित्वाला वजन देतो. त्याची जबाबदारी वाढवतो. तो निर्णय त्याचं दायित्व बनतं. आणि स्वत:ने निर्णय घेतल्यामुळे एक संकल्प निर्माण होतो. संकल्प निर्माण झाल्यामुळे चेतना जागृत होते...\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885782688002,"sku":"","price":810.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shivsutra-Bhag-1-FC_536db9a4-95f2-48da-a563-b58d69ace49d.jpg?v=1740228644"},{"product_id":"set-of-5-book-krushnamrut-krushnasakha-ha-shodh-vegla-hasat-khelat-dhyandharana-dhyansutr-by-osho","title":"Set Of 5 Book : Krushnamrut+ Krushnasakha+Ha Shodh Vegla+Hasat Khelat Dhyandharana+Dhyansutr | By Osho","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं.\u003cbr\u003e\u003cbr\u003eकृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. \u003cbr\u003e\u003cbr\u003e`कबीर म्हणतात... गुरूदेव बिन जीव की कल्पना ना मिटे। शोधाची पहिली पायरी आहे अज्ञान. अज्ञानी कल्पनेमध्ये जगत असतो. कल्पना अज्ञानाचं सूत्र आहे; तर सत्य ज्ञानाचं. गुरु तुमचा हात धरून हळूहळू तुम्हाला सत्याकडे नेतो. गुरु तुम्हाला तुमच्या कल्पनेपासून मुक्त करतो. तुम्ही स्वत:च्याच आधाराने चालत राहिलात, शोधत राहिलात तर रस्ता चुकणारच. तुम्ही जे शोधत आहात ते त्याला कधीच मिळालेलं आहे. तुमच्यात आणि गुरुमध्ये एवढंच अंतर आहे की, तुम्ही प्रारंभ आहात तो अंत आहे.` कबीरांसारखे वेडे क्वचितच भेटतात.\u003cbr\u003e\u003cbr\u003eध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक दार आहे. ध्यान केवळ आध्यात्मिक पातळीवरच न राहता, त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, हे ओशोंनी अनेक दाखले देऊन समजावले आहे. मनाच्या पलीकडे जाऊन ध्यान काय आहे, हे ओशोच सांगू जाणे. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. ध्यानामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि तो अधिकाधिक विधायक होत जातो. ध्यान ही कल्पना धर्मातीत आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003eमहाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न वातावरणामध्ये ओशोंनी संचालित केलेल्या ध्यानशिबिरामधल्या प्रवचनांचं तसंच ध्यानाच्या प्रयोगांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. शरीर, विचार आणि भावना यांच्या एकेका पापुद्र्यांनी पेशीपेशींना विलीन करण्याची अद्भुत कला समजवताना ओशो आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य, तसंच संतुलनाकडे घेऊन जातात. पुस्तकातील अन्य विषय कामशक्तीचा सर्जनशील उपयोग कसा करावा? क्रोध म्हणजे काय? क्रोधाची शक्ती कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885784817922,"sku":"","price":832.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3639_48ed040a-8e4e-4057-961a-241850732eed.jpg?v=1740228924"},{"product_id":"dhyan-kamale-dhyanasadhanevar-osho-yanchi-daha-pravachane-by-osho-ध्यान-कमळे-ध्यानसाधनेवर-ओशो-यांची-दहा-प्रवचने","title":"Dhyan Kamale Dhyanasadhanevar Osho Yanchi Daha Pravachane By Osho (ध्यान - कमळे ध्यानसाधनेवर ओशो यांची दहा प्रवचने)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे - त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- ओशो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओशो पुस्तकातील काही मुख्य विषय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• जीवन एक स्वप्न आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• संयमाचा अर्थ काय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46122823221506,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61gM-sJs2qL._SL1237.jpg?v=1746255458"},{"product_id":"adhyatma-upnishad-by-osho-अध्यात्म-उपनिषद","title":"Adhyatma Upnishad By Osho (अध्यात्म उपनिषद)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे उपनिषद म्हणजे अध्यात्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार आहे. यात सिद्धांत नाहीत, सिद्धांचा अनुभव आहे. यात त्या कोणत्याही गोष्टींची चर्चा नाही, ज्या कुतूहलातून निर्माण होतात. जिज्ञासेमुळे निर्माण होतात. नाही, यात त्यांच्याकडे अंगुलिनिर्देश आहे, जे मुमुक्षेने भरलेले आहेत आणि ज्यांनी प्राप्त केलं आहे. प्रस्तुत ग्रंथात चर्चिल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी याप्रमाणे - शिक्षक होण्यात कोणती मजा आहे? परमात्म्याचा शोध कुठे घ्यायचा? वासना शब्दाचा, वासनेचा अर्थ काय? जेव्हा मृत्यू घडतो, तेव्हा कोण मरतं? धर्म, दर्शन, विज्ञान, इतिहास, साहित्य, संस्कृती, कला इत्यादींचं कोणतंही क्षेत्र असं नाही, जे ओशोंकडून अस्पर्शित राहिलं आहे. त्यांचं विशाल साहित्य त्यांच्या विद्याव्यासंगी व्यक्तित्वाची साक्ष देतं. वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, गीता, बायबल, धम्मपद, ग्रंथसाहिब इत्यादी सर्व अभिजात साहित्य त्यांनी आत्मसात केलं आहे. त्यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्यांनी धर्मग्रंथांत लिहिलेले शब्द जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाहीत. त्या शब्दांमागच्या भावनांना आपल्या मौल्यवान चिंतनानं त्यांनी प्रकट केलं. आपल्या चिंतनाचीही त्यांनी परीक्षा घेतली आणि मग त्या गूढ अर्थांना स्पष्ट केलं. त्यांची दृष्टी एका शास्त्रज्ञाची दृष्टी आहे. - यशपाल जैन (सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46122952032514,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/812KxNEMbnL._SL1500.jpg?v=1746255504"},{"product_id":"satyacha-shodh-dhyansadhanevar-osho-yanchi-paach-pravachane-by-osho-सत्याचा-शोध-ध्यानसाधनेवर-ओशो-यांची-पाच-प्रवचने","title":"Satyacha Shodh Dhyansadhanevar Osho Yanchi Paach Pravachane By Osho (सत्याचा शोध ध्यानसाधनेवर ओशो यांची पाच प्रवचने)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे - त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- ओशो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओशो पुस्तकातील काही मुख्य विषय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• जीवन एक स्वप्न आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• संयमाचा अर्थ काय?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46124400378114,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71tstNoYqRL._SL1270.jpg?v=1746341745"},{"product_id":"path-pradeep-by-osho-पथ-प्रदीप","title":"Path Pradeep By Osho (पथ प्रदीप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया जगात स्वतःपलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठेवा. जे स्वतःला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांच्या हाती शेवटी अपयश आणि दुःखच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो मार्ग आत्मनाशाचा होय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवासनेची तृप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतृप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वतःत प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46124522602754,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41LdOgdXKwL.jpg?v=1746341966"},{"product_id":"jyotish-vidnyan-by-osho-ज्योतिष-विज्ञान","title":"Jyotish Vidnyan By osho (ज्योतिष विज्ञान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्योतिषाचे तीन भाग आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक आहे अनिवार्य भाग. त्यामध्ये तसूभरही फरक होत नाही. समजून घेण्यास तो सर्वांत कठीण आहे. त्याच्या बाह्य परिघात गैर अनिवार्य भाग आहे. त्यामध्ये सर्व बदल होऊ शकतात, आपल्याला मात्र त्याच भागाविषयी जास्त उत्सुकता असते. या दोन भागांच्या मधील क्षेत्रात अर्ध अनिवार्य हा तिसरा भाग आहे. तो समजून घेतल्याने त्यात बदल होऊ शकतात, न घेतल्यास बदल होत नाहीत. असे हे तीन भाग आहेत. इसेन्शियल, जो अतिशय सखोल आहे, अनिवार्य आहे, ज्यात काहीच बदल होऊ शकत नाही. तो समजल्यानंतर त्याचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नसते. धर्मांनी या अनिवार्य गोष्टीचा किंवा सत्याचा शोध घेण्यासाठीच ज्योतिषशास्त्र आविष्कारित केले. त्याच्याकडे वळले. यानंतर दुसरा भाग आहे. सेमी-इसेन्शियल, अर्ध अनिवार्य. जर त्याविषयी समजले तर बदल होऊ शकतो, नाही जाणून घेतले तर बदलता येणार नाही. अज्ञानात राहाल तर जे व्हायचे तेच होईल. ज्ञान झाले तर पर्याय आहेत. बदल होऊ शकतात आणि तिसरा भाग सर्वांत वरचा स्तर आहे नॉन-इसेन्शियल, गैर अनिवार्य. त्यात काहीच आवश्यक नाही. सर्व संयोगिक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- ओशो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकाचे काही मुख्य विषय :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्योतिष हे विज्ञान आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्योतिषाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजच्या संदर्भात ज्योतिष\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्योतिष एक अंधविश्वास आहे का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46124568281346,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71_xC-JNUxL._SY466.jpg?v=1746341723"},{"product_id":"shakyatachi-chahul-chetaneche-dvar-by-osho-शक्यतांची-चाहूल-चेतनेचे-द्वार","title":"Shakyatachi Chahul Chetaneche Dvar By Osho (शक्यतांची चाहूल चेतनेचे द्वार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘उद्या’ काहीच केलं जाऊ शकतं नाही, जे जे केलं जातं ते आज, आत्ता, या क्षणी! ज्या ‘उद्या’बद्दल आम्ही बोलतो तो आमच्या कल्पनेव्यतिरिक्त आणखी कुठंही नाही. कधीही नसेल. ‘उद्या’ कधी येतच नाही. येतो, तो ‘आज’ पण मन ‘उद्या’त जगतं. जे आत्ता होऊ शकतं ते मन उद्यावर ढकलतं आणि ‘उद्या’ कधीच उगवत नाही. हा उद्याचा प्रवाह, येणार्या उद्याच्या लांबच लांब कल्पनांचे थर मनावर साचत जातात. मनाचा ताण वाढवत जातात. याचा भार मोठा असतो: पण तो आपल्याला कधीच क नाही. ज्या ओझ्यांची आपल्याला सवय नसते. तीच ओझी आपल्याला जाणवतात. या भविष्याच्या ओझ्याची सवय आपल्याला जन्माच्या क्षणापासून होऊ लागते. म्हणून ते आपल्याला जाणवंत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46126471184642,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71uKZv5l-WL._SY466.jpg?v=1746428264"},{"product_id":"nirvan-upanishad-by-osho-निर्वाण-उपनिषद","title":"Nirvan Upanishad By Osho (निर्वाण उपनिषद)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46126564376834,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/21DDLyIBzgL.jpg?v=1746428277"},{"product_id":"yogache-nave-pailu-by-osho-योगाचे-नवे-पैलू","title":"Yogache Nave Pailu By Osho (योगाचे नवे पैलू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eयोग एक विज्ञान आहे. ते काही धर्मशास्त्र नाही. हिंदू-मुस्लिम, जैन किंवा ख्रिश्चन अशा कोणत्याही आत्मज्ञान्यांना या योगाशिवाय सत्यप्राप्तीचे आत्मज्ञान मिळालेले नाही, मकग तो येशू असो वा महंमद पैगंबर, पतंजली असो वा बुद्ध किंवा महावीर, जीवनातल्या परम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. ज्याला आपण रूढ अर्थाने धर्म म्हणतो त्याला श्रद्धेची जोड असते. योग ही श्रद्धेची नाही तर जीवनाच्या सत्याच्या दिशेने केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाची सूत्रबद्ध आचारपद्धती आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eओशोंनी ‘योगाचे नवे पैलू’ या पुस्तकात योगरूपी सप्तदलांचे पुष्प अत्यंत साध्या; पण तितक्याच रसाळ भाषेत उमलवले आहे. योगाद्वारा मी कोण आहे हे जाणून घेऊन शेवटी मीच तो आहे, ‘अहं ब्रम्हास्मी’ या अंतिम मुक्कामापर्यंतचा प्रवास कसा करायचा हे सांगितले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Osho","offer_id":46128596549890,"sku":"","price":111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/716nltu2MBL._SY466.jpg?v=1746514572"},{"product_id":"mi-kon-aahe-by-osho-pratik-puritranslator-मी-कोण-आहे","title":"Mi Kon Aahe By Osho, Pratik Puri(Translator) (मी कोण आहे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुमच्या आत प्रश्न आहेत? तुमच्या आत तुमचे प्रश्न आहेत? हे आयुष्य तुमच्या मनात प्रश्न उठवत नाही का? हे आयुष्य तुम्हाला कुतुहलाने भरून टाकत नाही का? है आयुष्य तुमच्नासमोर प्रश्न उपस्थित करत नाही का, की भी कोण आहे? हे काय आहे? तुम्ही ठार बहिरे आणि आंधळे आहात का? तुमच्या हृदयात कोणते, कोणतेच कुतूहल जागे होत नाही का? जर जागे होत असेल एखादे कुतूहल, जर उठत असेल एखादा प्रश्न, जर मनात जागी होत असेल एखादी तहान समजून घेण्याची, ओळखण्याची, आयुष्याचे सत्य मिळवण्याची, तर ती एकत्र करून घ्या आणि त्याला एक प्रश्न होऊ द्या. कारण जो इतर गोष्टींसंबंधी काही विचारायला जातो, तो दूर निघून गेला आहे, त्याने मूलभूत प्रश्न मागे सोडून दिला आहे. मूलभूत प्रश्न तर स्वतःपासूनच सुरु होतो- मी कोण आहे? ओशो पुस्तकातील काही महत्वाचे विषय-बिंदू: ध्यान य जीवनात श्वासाचे महत्व ध्यानाचा उद्देश काय आहे? ध्यानाचा अर्थ आयुष्य कसे जगावे, त्याचा उद्देश काय आहे? धर्माला वैज्ञानिक होण्याची गरज आहे का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Osho","offer_id":46605317767426,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41G_O49ppZL._SY466.jpg?v=1752908191"},{"product_id":"dharma-kabiranchya-manatala-by-osho-pradnya-oaktranslator-धर्म-कबीरांच्या-मनातला","title":"Dharma Kabiranchya Manatala By Osho, Pradnya Oak(Translator) (धर्म कबीरांच्या मनातला)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिव्यज्ञानी कबीरांचे दोहे म्हणजे अध्यात्माचे सखोल चिंतन. ते जेव्हा ओशोंच्या प्रवचनातून प्रवाहित होते तेव्हा कबीरांना अभिप्रेत असलेला अर्थ उमगत जातो. त्यातील सूक्ष्मातिसूक्ष्म सार ओशो समरसून व्यक्त करतात. म्हणूनच कबीरांची वचनं क्रांतिकारी वाटतात. कारण ती वचनं झणझणीत अंजन आहेत. ज्या हृदयाला ती स्पर्श करतात त्या हृदयातील आत्मज्योत प्रकाशमान होते. मनाचे स्वरूप लक्षात घ्या. ते वारंवार तुमच्या आध्यात्मिक उन्नतीत अडसर निर्माण करतं. मानवी जीवनात श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल मन शंका घेईल, त्या वेळी आत्म्यातील परमात्म्याला पाहता आले पाहिजे. त्याच्यासाठी पाप-पुण्य काहीच नसतं. धर्म व संप्रदायाची चर्चा ओशोंनी पाचव्या प्रवचनात केली आहे. ज्यांना धर्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी सर्व धारणा व भेदांपासून अलिप्त व्हायला पाहिजे,हे ओशो आपल्या प्रवचनांतून सांगत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Osho","offer_id":46644588445954,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4078.jpg?v=1754290526"},{"product_id":"a-sudden-clash-of-thunder-marathi-by-osho-अ-सडन-क्लॅश-ऑफ-थंडर-मराठी","title":"A Sudden Clash Of Thunder (Marathi) By Osho ( अ सडन क्लॅश ऑफ थंडर (मराठी)","description":"","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Osho \/ Marathi","offer_id":47269828919554,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71-zwGA0MrL._SY466.jpg?v=1769064997"},{"product_id":"meera-shamrangi-rangli-by-osho-मीरा-श्यामरंगी-रंगली","title":"Meera Shamrangi Rangli By Osho (मीरा श्यामरंगी रंगली)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजेव्हा दुःखाचा भडिमार होतो तेव्हा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. 'सर्व मोहपाशातून सुटका केलीस,' असं म्हणते. 'ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.' असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वर्षांपूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वर्षांनंतर स्वतःला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, 'खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Osho \/ Marathi","offer_id":47361126007042,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/56_34e53fb2-2425-4170-930d-a1f4d4f03e37.jpg?v=1770959027"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/osho.oembed?page=3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}