{"title":"Nature","description":"","products":[{"product_id":"mala-uttar-havay-paryavaran-by-mohan-apte-1","title":"Mala Uttar havay Paryavaran By Mohan Apte","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'सध्या सगळीकडे `इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय? आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत ओळख करून देणारं पुस्तक. पर्यावरण \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350177505538,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Mala-Uttar-Hawai-Paryavaran_c5fc25c3-b9b3-46e1-8a24-6156b23e378e.jpg?v=1729069929"},{"product_id":"pani-sarvansathi-by-varsha-ganjendragadkar","title":"Pani Sarvansathi By Varsha Ganjendragadkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eपाणी ही जगण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे; मात्र या नैसर्गिक संपत्तीचा पृथ्वीवरचा साठा मर्यादित आहे. पाणी आपल्या शरीराला कोणकोणत्या प्रकारे गरजेचे आहे, इतर सजीवांना त्याची काय मदत होते आणि ते काटकसरीने वापरले नाही, ते स्वच्छ ठेवले नाही, तर काय होईल? चला, जाणून घेऊ या पाण्याविषयी सगळे काही!       \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350195822850,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_5e9397c0-039c-435c-bf9a-932c5cceed77.png?v=1729070067"},{"product_id":"maharashtratil-dhabdhabe-by","title":"Maharashtratil Dhabdhabe By","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eमाणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे, हे विधान मात्र आज `अ-वास्तव' ठरलं आहे. संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील `दूरची रम्यता' जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात, रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो, कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो. त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो. तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे. विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो, त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो. श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात, कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात. परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून ! महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय, त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत; त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय. सुधीर शालिनी ब्रह्मे\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350196740354,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_132d4f28-2462-45a1-8e46-7db6861d4746.png?v=1721805277"},{"product_id":"jaivavaividhya-ani-abhayaranye-by-madhavi-bhat","title":"Jaivavaividhya Ani Abhayaranye By Madhavi Bhat","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eजैववैविध्य आणि अभयारण्ये तुम्ही कधी एखाद्या जंगलाला भेट दिली आहे का? आपला मोगली, सिंबा आपल्याला आवडतो ना? मग प्रत्यक्षातले बगिरा, सिंबा, भालू यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही. आपणही त्यासाठी काही करू शकतो. त्यासाठी जैववैविध्य म्हणजे काय, ती नष्ट होण्याची कारणे काय, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांची आवश्यकता काय, हे माहिती करून घ्यायला हवे. चला, त्यासाठी हे पुस्तक वाचू या.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350197494018,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_2ac933d3-84f6-4ff7-80f6-c25ed6c7b968.png?v=1721805300"},{"product_id":"paryavarnache-rakhvaldar-by-sureshchandra-warghade","title":"Paryavarnache Rakhvaldar By Sureshchandra Warghade","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eपर्यावरणरक्षणात पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची आहे. परिसराच्या सफाई- स्वच्छतेपासून हवामानबदलाचा संदेश देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत पक्षी करत असतात. चला, या पुस्तकात अशा वेगवेगळ्या मित्रपक्ष्यांची ओळख करून घेऊया. पर्यावरणाचे रखवालदार\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350198280450,"sku":null,"price":32.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_5ae03950-8521-4725-8c6a-a2c75f099747.png?v=1721805316"},{"product_id":"vasundhareche-shodhayatri-by-dr-anurag-lavekar","title":"Vasundhareche Shodhayatri By Dr Anurag Lavekar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eअज्ञाताबद्दलचे कुतूहल अन् अज्ञाताचा वेध घेण्याची जिज्ञासा यांमुळे अनेक धाडसी प्रवासी वसुंधरेच्या विविध भागांचा शोध घेत राहिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अन् पराकाष्ठेच्या जिद्दीमुळे ज्ञानाची नवनवीन क्षितिजे उदयास आली. निर्मिती, व्यवसाय, वितरण, व्यापार, उद्योग, प्रवास, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, इतिहास, भूगोल अशा मानवी जीवनाच्या अनेक आयामांवर या शोधयात्रांचा अमिट ठसा उमटला. ज्या भागांतून हे प्रवास घडले; त्या त्या भागांत कला, वास्तू, शिल्प, संगीत, साहित्य, धर्म, जीवनमूल्ये आदींची देवाणघेवाण होत राहिली - कधी सहकार्यातून, तर कधी संघर्षातून. ‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते.’ या विधानाची प्रचिती देणार्‍या - आपल्या शोधयात्रांमधून नवा इतिहास घडवणार्‍या शोधनायकांची गाथा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350201426178,"sku":null,"price":448.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_a55c7741-d12b-4a03-9ab0-9cebb6e2c46b.png?v=1729070376"},{"product_id":"nisargakallol-by-atul-deulgaonkar","title":"Nisargakallol By Atul Deulgaonkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eकुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350202933506,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_29ed00b3-6e4c-410d-a211-3c8046d6715b.png?v=1721805404"},{"product_id":"nisargayan-by-dilip-kulkarni-1","title":"Nisargayan By Dileep Kulkarni","description":"\u003cdiv data-slug=\"\" class=\"wpf-search-container\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv id=\"product-2868\" class=\"pmpro-has-access product type-product post-2868 status-publish first instock product_cat-2032 product_cat-62 has-post-thumbnail shipping-taxable purchasable product-type-simple\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"clearfix\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत — आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350221119746,"sku":null,"price":215.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nisargayan.jpg?v=1721805631"},{"product_id":"nisarga-bhan-1-by-s-d-mahajan","title":"Nisargbhan – Bhag 1 By S D Mahajan","description":"\u003cp\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २६ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. देवराई, भीमाशंकरचे अभयारण्य, पुण्याचे वृक्षवैभव, देशी वृक्षांचे महत्व असे विविध लेख आहेत.\u003c\/p\u003e\n\u003ch1\u003e\u003cbr\u003e\u003c\/h1\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523591725314,"sku":"","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nisargabhan.jpg?v=1728234363"},{"product_id":"nisargbhan-bhag-2-by-s-d-mahajan","title":"Nisargbhan – Bhag 2 By S D Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २१ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. खारफुटी जंगल, कॅम्पफायर, कृषीज्ञानकोश, देवराई असे विविध लेख आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523594805506,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nisargbhan2.webp?v=1728234342"},{"product_id":"nisargbhan-bhag-3-by-s-d-mahajan","title":"Nisargbhan – Bhag 3 By S D Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २० लेखांचा संग्रह निसर्गभान भाग ३ या पुस्तकात आहे. निसर्गपर्यटन, पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र उद्यान, रामायणातील वृक्षवेली असे विविध लेख आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523606569218,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nisargbhan3.jpg?v=1728234612"},{"product_id":"nisargbhan-bhag-1-2-3-set-by-s-d-mahajan","title":"Nisargbhan – Bhag 1.2.3 Set By S D Mahajan","description":"\u003cp\u003eNisargBhan – Bhag 1.2.3 Set By S D Mahajan\u003cbr\u003e\u003cbr\u003e Nisargbhan – Bhag 1\u003cbr\u003e\u003cspan\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २६ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. देवराई, भीमाशंकरचे अभयारण्य, पुण्याचे वृक्षवैभव, देशी वृक्षांचे महत्व असे विविध लेख आहेत.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e Nisargbhan – Bhag 2\u003cbr\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २१ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. खारफुटी जंगल, कॅम्पफायर, कृषीज्ञानकोश, देवराई असे विविध लेख आहेत.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e Nisargbhan – Bhag 3\u003cbr\u003e\u003cspan\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरण तज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी निसर्ग आणि पर्यावरण या संबंधी लिहिलेल्या २० लेखांचा संग्रह निसर्गभान भाग ३ या पुस्तकात आहे. निसर्गपर्यटन, पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र उद्यान, रामायणातील वृक्षवेली असे विविध लेख आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523664044290,"sku":"","price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nisargabhan_d41d07f7-817e-4562-b1f8-269042d0b4ac.jpg?v=1728235004"},{"product_id":"vanaspati-jivanprakriya-shastra-by-s-d-mahajan","title":"Vanaspati Jivanprakriya Shastra By S D Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवनस्पती क्षार व पाणी कसे शोषून घेतात, ते वरपर्यंत कसे चढवले जाते, अन्नपदार्थ कसे तयार जातात, वनस्पतींची वाढ कशी होते, इत्यादी प्रक्रियांबद्दल सर्वांच्या मनात कुतुहल असते. हा काहीसा तांत्रिक व किचकट विषय समजून घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते मनोरंजकही आहे. त्यामध्ये रासायनिक क्रियाप्रक्रियांचाही समावेश होत असल्याने हा विषय जैवरासायनिक शास्त्रांच्या( Biochemistry ) जवळ जाणारा आहे. ह्या विषयावर मायमराठीत लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523666501890,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vanaspati-s-d-mahajan.jpg?v=1728234822"},{"product_id":"nisarggan-by-s-d-mahajan","title":"NisargGan By S D Mahajan","description":"\u003cp\u003eज्येष्ठ वनस्पती आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन तथा बापूंची वनस्पती आणि पर्यावरण या विषयांवरील १० पेक्षा जास्त पुस्तके आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. तुमच्याकडून मिळालेल्या भरभरून आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच बापूंना पुढील पुस्तके लिहिण्याचा उत्साह आणि प्रेरणा मिळत असते. बापूंचं वनस्पतींवरील प्रेम व आदर त्यांच्या प्रत्येक लिखाणात दिसून येते. या विषयांवर पुस्तकांव्यतिरिक्त बापूंनी अनेक लेख लिहिले आहेत तसेच त्यांना कविताही स्फुरल्या आहेत. एखादा विषय समजावून सांगताना बापू त्या विषयाशी इतके समरस होतात की त्यांना कविता होते. Poetry is spontaneous outburst of powerfull feelings असं काहीतरी बापूंचं होतं. अशा विषयांवर कविता करताना शास्त्रीय माहितीतील अचुकता जपणे ही अवघड तारेवरची कसरत बापूंनी चांगली साधली आहे. काही शास्त्रीय शब्दांचे आणि संदर्भाचे सोप्या शब्दांत स्पष्टीकरणही दिले आहे. या काव्यसंग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व कविता बापूंच्या हस्ताक्षरात छापल्या आहेत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523673678082,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/nisargan.webp?v=1728235526"},{"product_id":"vanaspati-by-s-d-mahajan","title":"Vanaspati By S D Mahajan","description":"\u003cp\u003eआपले वृक्ष, देशी वृक्ष, विदेशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवृक्ष, वेल-महावेल इ. पुस्तकांचे लेखक, वनस्पती अभ्यासक प्रा. श्री. द. महाजन तथा 'बापू' ग्रांनी लिहिलेले 'वनस्पती' हे ह्या विषयातले आगळे वेगळे पुस्तक आहे.\u003cbr\u003e'वनस्पती म्हणजे काय ? त्या प्रथम केव्हा, कशा व कोठे उत्पन्न झाल्या' येथपासून 'काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती' येथपर्यंत वनस्पती विश्वाचा अनोखा मागोवा घेतला आहे. त्यात वनस्पतींचा आणि माती, पाणी, हवा, प्रकाश, पक्षी इत्यादींशी असलेला परस्परसंबंध उलगडून दाखवला आहे. 'वनस्पतीच्या अभियांत्रिकी करामती, वनस्पतीच्या रंगांचे रहस्य' आणि 'वनस्पती व विचारशक्ती' ह्या विशेष लेखांचा समावेश केला आहे. बापूंच्या इतर सर्व पुस्तकांप्रमाणेच ह्या पुस्तकालाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी खात्री वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523674169602,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vanaspati.webp?v=1728235246"},{"product_id":"sanskrutik-vruksha-by-s-d-mahajan","title":"Sanskrutik Vruksha By S D Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसांस्कृतिक वृक्ष भारतीय संस्कृती निसर्गसंवर्धक आणि निसर्गपूजक आहे. भारताच्या निरनिराळ्या भागातील तीस पूजनीय वृक्षजातींचा परिचय या पुस्तकात करून दिला गेला आहे. या वृक्षांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक बाबी जितक्या त्या वृक्षांच्या वैशिष्ट्यांशी निगडीत आहेत, तितक्याच मनोरंजकही आहेत. उदाहरणार्थ दोन वृक्षांचा विवाह समारंभ साजरा करणे, किंवा एखाद्या वृक्षाला देवत्व बहाल करून त्याचे मंदिर उभारणे आणि पूजा व आरती करणे, नक्षत्र वृक्षांची संकल्पना किंवा प्रत्येक राशीसाठी एका आराध्य वृक्षजातीची योजना करणे यांमुळे त्या वृक्षजातींचे संरक्षण व संवर्धन घडून आणणे साध्य होत असणार, साध्य झालेलेच आहे. वृक्षलागवड आणि वृक्षशेती यासारख्या कार्यक्रमात सांस्कृतिक वृक्षांचा आवर्जून समावेश केला जावा अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523677872386,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SANSKRUTIKVRUKSHA.webp?v=1728235506"},{"product_id":"anakhi-kahi-aaplech-vruksha-by-s-d-mahajan","title":"Anakhi Kahi Aaplech Vruksha By S D Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपहिल्या दोन भागाप्रमाणे ह्या पुस्तकालाही अभ्यासूंचा आणि वाचकांना भरभरून प्रतिसाद मिळेल अशी खात्री लेखक व प्रकाशक यांना आहे म्हणूनच ह्या सर्व २०० वृक्षांची थोडक्यात माहिती एकत्रितपणे करून देणारे ‘भारतीय वृक्ष’ असे फील्ड गाईड तयार करून प्रसिद्ध करण्याचीही योजना आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523683574018,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Apalech-Vruksha.webp?v=1728235371"},{"product_id":"deshi-vruksh-by-s-d-mahajan","title":"Deshi Vruksh By S D Mahajan","description":"\u003cp\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. द. महाजन यांना निसर्गप्रेमी आदराने चालता बोलता 'वनस्पती-ज्ञानकोश' संबोधतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष भाग-१' आणि 'देशी वृक्ष' (आपले वृक्ष-भाग २). साध्या सरळ, मनोरंजक भाषेत वृक्षांची करुन दिलेली ओळख. शास्त्रीय माहितीबरोबर संस्कृत वाङ्मयातील संदर्भ हे या लिखाणाचे वैशिष्ट्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. पराग महाजन आणि इतर अनेक सुहृदांनी काढलेल्या 'प्रत्यक्षाहून सुंदर प्रतिमा' असलेल्या प्रकाशचित्रांमुळे पुस्तकाचे देखणेपण द्विगुणित झाले आहे. त्याचबरोबर वृक्षांचा नेमका परिचय करुन देण्याचे कामही साध्य झाले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523684393218,"sku":"","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Deshi-Vruksha.jpg?v=1728235083"},{"product_id":"videshi-vruksh-by-s-d-mahajan","title":"Videshi Vruksh By S D Mahajan","description":"\u003cp\u003eआपले वृक्ष आणि देशी वृक्ष ह्या दोन पुस्तकांमध्ये १११ भारतीय वृक्षांचा परिचय करून देण्यात आला आहे. दोन्ही पुस्तकांना वाचकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतामध्ये लावल्या जाणाऱ्या १०० परदेशी वृक्षजातींची पुरेशी ओळख ह्या पुस्तकात करून देण्यात आली आहे. त्यासाठी उत्कृष्ट प्रकाशचित्रांचा आवश्यक तितका वापर करण्यात आला आहे. अभ्यासक व वाचकांचा भरघोस प्रतिसाद याही पुस्तकाला मिळेल अशी आशा व अपेक्षा आहे आणि तशी खात्रीही वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523686392066,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/videshivruksh.jpg?v=1728234385"},{"product_id":"aaple-vruksha-bhag-by-s-d-mahajan","title":"Aaple Vruksha Bhag  By S D Mahajan","description":"\u003cp\u003eवनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, श्री. द. महाजन ह्याना निसर्गप्रेमी आदराने 'वनस्पतींचा चालता बोलता ज्ञानकोश' संबोधतात. महाजन सर तथा बापू 'जंगली' म्हणवून घेण्यात स्वतःचा गौरव समजतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष', वृक्षांशी एकरूप होऊन, जणू त्यांच्याशी संवाद साधून शब्दबद्ध झालेली ही वृक्षगाथा. सर्वसामान्य वाचकापासून ते वनस्पतीशास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच वृक्षांची सर्वांगीण ओळख करून देणारा हा ग्रंथ.\u003c\/p\u003e","brand":"Deepak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523690782978,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Apale-Vruksha.webp?v=1728234935"},{"product_id":"saad-ranvatanchi-by-anuj-suresh-khare-साद-रानवाटांची-भारतातील-अरण्यांच्या-भटकंतीसाठी-सोबती","title":"Saad Ranvatanchi By Anuj Suresh Khare (साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजंगल पर्यटनाचा आनंद घ्यायचा तर जंगल बघणं शिकावं लागेल. जंगल कसं बघायचं, कसं अनुभवायचं यासाठी अनुज खरे यांचं 'साद रानवाटांची : भारतातील अरण्यांच्या भटकंतीसाठी सोबती' हे पुस्तक वाचायलाच हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652338442498,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5375-thickbox_default.jpg?v=1732001508"},{"product_id":"paryavaranavadacha-jagatik-itihaas-by-ramachandra-guha-pranav-sakhadevtranslatorsपर्यावरणवादाचा-जागतिक-इतिहास-लेखक-रामचंद्र-गुहा","title":"Paryavaranavadacha Jagatik Itihaas By Ramachandra Guha, Pranav Sakhadev(Translators)(पर्यावरणवादाचा जागतिक इतिहास- लेखक : रामचंद्र गुहा)","description":"\u003cp\u003eप्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा या पुस्तकात तीन खंडांमधल्या पर्यावरणाबाबतच्या चळवळी, घडामोडी आणि या क्षेत्रातले विचारवंत यांची तपशीलात माहिती देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसखोल संशोधनातून त्यांनी पर्यावरणाबाबतच्या चळवळींमधल्या संकल्पना, विचार आणि मोहिमा यांचा ऊहापोह केला आहे. जॉन म्युईर, महात्मा गांधी, राचेल कार्सन आणि ऑक्टाविया हिल या जागतिक पातळीवरच्या पर्यावरण विचारवंतांच्या कामांचाही आढावा घेतात. तसंच चिपको आंदोलन किंवा जर्मन ग्रीन्स यांसारख्या चळवळींबाबतही खोलात जाऊन विवेचन करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृती आणि सभ्यतांमध्ये पर्यावरण चळवळ कशी आकाराला आली आणि एका चळवळीच्या प्रभावाने इतर बाह्य संस्कृतींमधल्या चळवळी कशाप्रकारे रूपांतरित झाल्या याबद्दलची मौलिक अंतर्दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. जागतिक अर्थकारणावर बदलत्या पर्यावरणाचा होणारा परिणाम या सध्या जगभरात चर्चिला जाणाऱ्या विषयाचाही गुहा यांनी या पुस्तकात आढावा घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्यांपासून ते अकादमिक क्षेत्रातील अभ्यासकांपर्यंत, सगळ्यांच्या दृष्टीने आजघडीला महत्त्वाच्या आणि कळीच्या ठरलेल्या एका सामाजिक चळवळीची सर्वसमावेशक आणि विस्तृत कहाणी सांगणारं पुस्तक…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45691584282882,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Paryavaranvad_Cover.jpg?v=1733554605"},{"product_id":"avagha-dehachi-vrusha-jahala-by-veena-gavankar-अवघा-देहचि-वृक्ष-जाहला","title":"Avagha Dehachi Vrusha Jahala By Veena Gavankar (अवघा देहचि वृक्ष जाहला )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! \" हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्‍या पर्यावरणरक्षकाची ही प्रेरणादायी चरितकहाणी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45735993344258,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original.png?v=1735196261"},{"product_id":"concretechi-vanarai-by-sulakshana-mahajan-काँक्रीटची-वनराई","title":"Concretechi Vanarai By Sulakshana Mahajan (काँक्रीटची वनराई)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकाँक्रीटचं जंगल’ म्हटलं की डोळयासमोर उभ्या राहतात आक्राळविक्राळ, कशाही-कुठेही बांधलेल्या इमारती! पण कोणतंही शहर किंवा नगर म्हणजे फक्त उत्तुंग, दाटीवाटीने फोफावलेल्या इमारती आणि भावनाशून्यपणे घडयाळाच्या काटयावर पळणारी माणसं, एवढंच असतं का? शहरांबाबतच्या समाजातील अशा प्रकारच्या प्रचलित नकारात्मक समजुती आणि विस्तारणारं नागरीकरण हा प्रचंड विरोधाभास लेखिकेलाही चक्रावून टाकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया विरोधाभासाचा शोध घेण्याचा, त्यामागची गृहितकं तपासण्याचा, नागरीकरणाची प्रक्रिया समजून घेण्याचा आणि समजावून देण्याचा सकारात्मक व प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखिकेच्या दृष्टिकोनातून राज्याच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी शहरं निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तम सोयी-सुविधांनी युक्त शहरांच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती दूरदृष्टी ठेवून केलेल्या नियोजनाची. ज्याप्रमाणे एखादी वनराई फुलवायला, ती वृध्दिंगत करायला एका कुशल माळयाची व त्याच्या प्रेमळ संगोपनाची गरज असते त्याचप्रमाणे आजच्या काँक्रीटच्या जंगलाचं वनराईत रूपांतर करण्यासाठी आज गरज आहे ती द्रष्टया लोकनेत्यांची आणि व्यापक दृष्टीकोन असणाऱ्या कुशल प्रशासकांची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया दृष्टीने या पुस्तकातील चर्चा व मुद्दे वाचकांना व संबंधितांना आजच्या बकाल काँक्रीटच्या जंगलाचं रूपांतर सुंदर व नियोजनपूर्ण ‘वनराई’मध्ये करण्यास नक्कीच उद्युक्त करतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45746355110146,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ConcretechiVanraai_Front-1.jpg?v=1735628293"},{"product_id":"the-hidden-life-of-trees-marathi-by-dr-gurudas-noolkartranslatorsद-हिडन-लाईफ-ऑफ-ट्रीज-मराठी","title":"The Hidden Life Of Trees (Marathi) By Dr. Gurudas Noolkar(Translators)द हिडन लाईफ ऑफ ट्रीज (मराठी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eझाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच. पण वोह्ललेबेन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पद्धतीने मांडली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- न्यू यॉर्क टाइम्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा सहजीवनात वाढणार्‍या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्‍या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्‍या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45778447663362,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_20Image_202022-12-12_20at_205.00.26_20PM-800x800.jpg?v=1736747738"},{"product_id":"new-trees-of-pune-by-sharvari-barve-shrikant-ingalhalikar","title":"New Trees Of Pune By Sharvari Barve,Shrikant Ingalhalikar","description":"","brand":"Corolla Publications","offers":[{"title":"Corolla Publications","offer_id":46483082281218,"sku":null,"price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/219727.jpg?v=1751525725"},{"product_id":"the-hidden-life-of-trees-by-peter-wohlleben","title":"The Hidden Life Of Trees By Peter Wohlleben","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eIn 'The Hidden Life of Trees', Peter Wohlleben shares his deep love of woods and forests and explains the amazing processes of life, death and regeneration he has observed in the woodland and the amazing scientific mechanisms behind these wonders, of which we are blissfully unaware. Much like human families, tree parents live together with their children, communicate with them and support them as they grow, sharing nutrients with those who are sick or struggling and creating an ecosystem that mitigates the impact of extremes of heat and cold for the whole group. As a result of such interactions, trees in a family or community are protected and can live to be very old. In contrast, solitary trees, like street kids, have a tough time of it and in most cases die much earlier than those in a group.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eDrawing on groundbreaking new discoveries, Wohlleben presents the science behind the secret and previously unknown life of trees and their communication abilities, he describes how these discoveries have informed his own practices in the forest around him. As he says, a happy forest is a healthy forest and he believes that eco-friendly practices not only are economically sustainable but also benefit the health of our planet and the mental and physical health of all who live on Earth.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Penguin Random House India","offers":[{"title":"Default Title","offer_id":45827149463810,"sku":"","price":509.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81_90cmEOqL._SY425.jpg?v=1738565712"},{"product_id":"ruturang-by-j-d-paradkar-ऋतुरंग","title":"Ruturang By J. D. Paradkar (ऋतुरंग)","description":"","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45856564478210,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2025-02-17-at-15.03.52-e1739788660482.jpg?v=1746341975"},{"product_id":"paryavarniya-samiksha-aani-marathi-kadambari-by-dr-sandip-bhuyekar-पर्यावरणीय-समीक्षा-आणि-मराठी-कादंबरी","title":"Paryavarniya Samiksha Aani Marathi Kadambari By  Dr. Sandip Bhuyekar (पर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपर्यावरणीय समीक्षा आणि मराठी कादंबरी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाहित्यातील पर्यावरणीय संदर्भांचे पृथ्वीकेद्री दृष्टीकोनातून पुनर्वाचन करून, पर्यावरणीय नैतिकतेच्या अनुषंगाने केलेले विश्लेषण किंवा चिकित्सा म्हणजे पर्यावरणीय समीक्षा होय. पर्यावरणीय समीक्षेचा विचारव्युह हा व्यापक नीतीविचार आहे. विश्वबंधुता, मानवता ही रूढ नीतीतत्त्वे तर यामध्ये संमिलित आहेतच पण त्याही पुढे जाऊन प्रत्येक सजीवाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार पर्यावरणीय समीक्षा करते. मुंगी, हत्ती किंवा सूक्ष्मजीव या सर्वांना पर्यावरणीय समीक्षक सजीवता या एकाच निकषावर समान पातळीवर आणतात. याच बरोबरीने हवा, पाणी, जमीन इ. निर्जीव घटकांविषयीदेखील आदराची भावना ठेवतात. निसर्गासोबत एकसुरता किंवा सौहार्द राखून जगणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे, असे पर्यावरणीय समीक्षक मानतात. शाश्वत विकास आणि पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे साहित्यातील प्रतिबिंब शोधून त्याची परिपृष्टी पर्यावरणीय समीक्षेद्वारे केली जाते. प्रस्तुत पुस्तकात पर्यावरणीय समीक्षेचे सैद्धांतिक सूचन केले आहे आणि तिच्या उपयोजनाचाही प्रयत्न केला आहे. मराठीतील तेरा महत्त्वाच्या कादंबर्‍यांची पर्यावरणीय समीक्षा केली आहे. मराठी कादंबरीत उमटलेली ही पर्यावरणीय शहाणीव इतरत्र संक्रमित व्हावी व ‘वसुधैव कल्याणम्’चा सदभाव जागृत व्हावा हा नितळ हेतू या लिखाणामागे आहे. मराठी समीक्षा क्षेत्राला या पुस्तकाच्या रूपाने एक नवी समीक्षादृष्टी गवसेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Padmagandha Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45865288007938,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81k9eImf_WL._SY425.jpg?v=1739516109"},{"product_id":"phulanche-aushadhi-upayog-by-s-g-palsule-फुलांचे-औषधी-उपयोग","title":"Phulanche Aushadhi Upayog By S. G. Palsule (फुलांचे औषधी उपयोग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसध्याच्या स्पर्धेच्या वेगवान युगात लोकांना विविध विवंचनांमुळे अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होत असतोच. या शारीरिक, मानसिक त्रासांनी ग्रासल्यानंतर पुष्पौषधे ही कशी उपयुक्त ठरतात हे डॉ. श्री. गो. पळसुले यांनी प्रस्तुत भाषांतरित पुस्तकात उदाहरणांसहित सिद्ध केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mihana Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46044434858242,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Fulanche-Aushadhi-Uapyog.jpg?v=1746341714"},{"product_id":"abhujmaadche-anunaad-by-narendra-avadhut-dongre-अबुझमाडचे-अनुनाद","title":"Abhujmaadche Anunaad By Narendra, Avadhut Dongre (अबुझमाडचे अनुनाद )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअबुझमाडचे अनुनाद\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअबुझमाड नि बस्तर इथल्या तीस वर्षाच्या अनुभवांचे अनुनाद शब्दांमधे नोंदवण्याचा प्रयत्न त्यांनी सदर पुस्तकातून केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Papayras Prakashan","offers":[{"title":"Papyrus Prakashan","offer_id":46110573428994,"sku":"","price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Abhuzmadcheanunad-F.jpg?v=1745823353"},{"product_id":"ek-harit-chalval-by-vikas-kharage-एक-हरित-चळवळ","title":"Ek Harit Chalval By Vikas Kharage (एक हरित चळवळ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eझाडाचं आणि माणसाचं नातं अगदी आदिम काळापासूनचं. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा अविभाज्य भाग असलेल्या वनश्रीनं आपल्याला जगवलंय... जगायला शिकवलंय. मात्र आधुनिकतेच्या वेगात हे भान कुठेतरी हरवलं आणि सुरू झाला पर्यावरणाचा बेसुमार र्हाीस. ही कहाणी आहे पर्यावरणाचा र्हाुस रोखण्यासाठी सुरू झालेल्या एका भगीरथ चळवळीची. गोष्ट आहे 50 कोटी वृक्षलागवडीचं स्वप्न पाहणार्यान संवेदनशील अधिकार्या नं सरकार आणि लोकसहभागातून महाराष्ट्रातीला पर्यावरणसमृद्ध करण्यासाठी उचललेल्या पावलाची. पर्यावरणसंवर्धन ही आपली प्रत्येकाच्यी जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून आपणही हा वसा घेऊया आणि अवघ्या वसुंधरेवर नंदनवन फुलवूया...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Vikas Kharage","offer_id":46128783655170,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91fXxX19ivL._SY466.jpg?v=1746601030"},{"product_id":"panpasara-by-vijay-diwan-पाणपसारा","title":"Panpasara By Vijay Diwan (पाणपसारा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआज लोकसंख्या बेसमार वाढलेली आहे. त्या प्रमाणात पाण्याची गरजही वाढलेली आहे. परंतु जलस्रोत मात्र पूर्वीपेक्षा कमी झालेले आहेत. पृथ्वीवर गोडे पाणी अत्यंत थोडे आहे, ते अमर्याद नाही. जे काही पाणी उपलब्ध आहे, त्याची व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची आहे. ती एकूण व्यवस्था पाण्याचे बाष्पीभवन, मेघनिर्मिती, पृष्ठीय तापमान, पर्जन्यमान यांवर अवलंबून असणारी, गुंतागुंतीची, आणि परस्परावलंबी आहे. तिच्यावर टोकाचे मानवी आघात झाले, तर ती व्यवस्था कोलमडून पडू शकते. खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण, हवामान बदल आणि सर्वच स्तरांवर जलसंघर्षांच्या संख्येत तीव्रतेत निरंतर होत असलेली जीवघेणी वाढ या व्यापक पार्श्वभूमीवर ‘पाणपसारा' हे पुस्तक पाण्यावर नेमकेपणाने प्रकाशझोत टाकते. लोकाभिमुख व शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आणि सुस्पष्ट विश्लेषण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. मोठ्या धरणांना विरोध आणि लोकसहभागावर आधारित पर्यावरण-स्नेही विकेंद्रित जलविकासाचा आग्रह हे 'पाणपसारा'च्या मांडणीचे मध्यवर्ती सूत्र आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Vijay Diwan","offer_id":46130680758530,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71R8pRxD6OS._SY466.jpg?v=1746601060"},{"product_id":"aapale-paryavaran-by-arun-joshi-आपले-पर्यावरण","title":"Aapale paryavaran By Arun Joshi (आपले पर्यावरण)","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्राचा समग्र परिचय झाल्यास,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणूस हाही इतर सजीवांपैकीच आहे, ही जाणीव निर्माण होईल. आत्तापर्यंत वेळोवेळी अनेक सजीव पर्यावरणाच्या -हासामुळे कायमचे नष्ट झाले आहेत. निसगचि नियम सजीवांना सारखेच लागू असल्याने, माणूसही एक दिवस असाच नष्ट होणे शक्य आहे. हे विदारक सत्य पर्यावरणशास्त्राच्या आकलनामुळे लक्षात येईल. असे झाले तर आपले औदासीन्य आणि बेफिकिरीची वृत्ती आपण सोडून देऊ, या अपेक्षेनेच हा पुस्तक प्रपंच.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Arun Joshi","offer_id":46158453309698,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aaple-paryavaran-221-800x800.jpg?v=1747821536"},{"product_id":"pais-paryavaransanvadacha-by-santosh-shintre-पैस-पर्यावरणसंवादाचा","title":"Pais Paryavaransanvadacha By Santosh Shintre (पैस पर्यावरणसंवादाचा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक सजग, सर्वसामान्य वाचकांसमोर भारतीय निसर्ग-पर्यावरण \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि त्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय गुंतागुंत सविस्तर उलगडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपर्यावरण क्षेत्रात सक्रिय व्यक्ती\/संस्था\/समूहांना आजवर पडलेल्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबहुतांश अनुत्तरित प्रश्नांची समर्पक उत्तरे देणारे; निव्वळ ‘झाडे लावा, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवाघ वाचवा' ह्यांच्यापलीकडे असणारा पर्यावरण प्रश्नांवरील उपायांबाबतचा \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंवाद-आवाका भारतीय संदर्भ घेऊन समजवणारे आणि इथल्या पर्यावरण \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमस्या निवारण्यासाठी आवश्यक संवादाच्या दिशा अचूक दर्शवणारे हे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तक आहे. पर्यावरणसंवादाचे सामाजिक न्याय, विज्ञान, समाजशास्त्र, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यवस्थापन, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, विक्री-कौशल्ये या अन्य\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्याशाखांशी गहिरे नाते असते. हे पुस्तक ते विस्तृत रीतीने दर्शवते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंबंधित विषयांच्या अभ्यासकांना, अध्यापकांना, संशोधकांना या \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंतरविद्याशाखीय अभ्यासक्षेत्रातील भावी अभ्यास-संशोधनाचे \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eथांबे, हे पुस्तक स्पष्ट करते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Santosh Shintre","offer_id":46179979428098,"sku":"","price":408.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pais_20Paryawaransamwadacha_20-Cover-CQ-800x800.jpg?v=1748507575"},{"product_id":"jalchar-prani-by-shailaja-grab-जलचर-प्राणी","title":"Jalchar Prani By Shailaja Grab (जलचर प्राणी)","description":"","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Shailaja Grab","offer_id":46181998231810,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5138Cfejt3L._SY385.jpg?v=1748588131"},{"product_id":"pani-udyachi-disha-by-mukund-dharashivkar","title":"Pani Udyachi Disha By Mukund Dharashivkar","description":"","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Mukund Dharashivkar","offer_id":46183741489410,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/pani-udyachi-disha-431-800x800.jpg?v=1748667863"},{"product_id":"panyachya-bhartiya-parampara-by-mukund-dharashivkar-पाण्याच्या-भारतीय-परंपरा","title":"Panyachya Bhartiya Parampara By Mukund Dharashivkar (पाण्याच्या भारतीय परंपरा)","description":"","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Mukund Dharashivkar","offer_id":46183760068866,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_d97bf2e9-6c8f-4c5a-8537-c9b6233bebae.png?v=1748674537"},{"product_id":"my-dear-friend-nature-by-dr-p-g-kulkarni","title":"My Dear Friend Nature By Dr. P. G. Kulkarni","description":"","brand":"Snehavardhan Prakashan","offers":[{"title":"Snehavardhan Prakashan \/ Dr. P. G. Kulkarni","offer_id":46587104231682,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/693c133d483b45919c66ea7c4a072fb9.jpg?v=1752389765"},{"product_id":"chavhata-bharatiya-nisarga-paryavaranacha-by-santosh-shintre-चव्हाटा-भारतीय-निसर्ग-पर्यावरणाचा","title":"Chavhata Bharatiya Nisarga Paryavaranacha By Santosh Shintre (चव्हाटा भारतीय निसर्ग पर्यावरणाचा)","description":"\u003cp\u003eचार वाटा किंवा रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा. सार्वजनिक हिताचे विषय चर्चेसाठी येणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर) असा त्याचा अधिक गंभीर अर्थ. भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्याबाबतच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय अंगांच्या वाटांनीच साकारतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला भवताल समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चित उमटतात. चारही रस्त्यांमार्गे आलेल्या माहितीची तिथे देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातल्या प्रश्नांचे सहजी न कळणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात.\u003cbr\u003eहे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यांच्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते.\u003cbr\u003eभारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौन्दर्यही सामोरे आणते.\u003cbr\u003eसजग वाचकांना आणखी विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्वाचे संदर्भ पुरवते.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Santosh Shintre","offer_id":46589857726722,"sku":null,"price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5620-thickbox_default.jpg?v=1752391671"},{"product_id":"paramparik-harit-warsa-devraya-by-dr-vinaya-ghate-पारंपरिक-हरित-वारसा-देवराया","title":"Paramparik Harit Warsa Devraya By Dr. Vinaya Ghate (पारंपरिक हरित वारसा देवराया)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवराई म्हणजे देवासाठी राखलेले जंगल. याच देवराईची ओळख, या संकल्पनेचा उगम त्याचे प्राचीनत्व, समाज, विकास आणि देवराया यांचा सर्वांगीण अभ्यास लेखिका डॉ विनया घाटे यांनी केलेला आहे. तोच अभ्यास पारंपरिक हरित वारसा देवराया या पुस्तकात मांडलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Merven Technologies","offers":[{"title":"Merven Technologies \/ Dr. Vinaya Ghate","offer_id":46686420205826,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Paramparik-Harit-Warsa-Devraya.jpg?v=1755759327"},{"product_id":"mrugpakshishastra-by-maruti-chitampalli-मृगपक्षिशास्त्र","title":"Mrugpakshishastra By Maruti Chitampalli (मृगपक्षिशास्त्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशौड राजाच्या इच्छेनुसार मंडक गावातील श्री हंसदेव यांनी रचलेला मूळ संस्कृतमधला पशुपक्ष्यांची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. मृग म्हणजे पशू व पक्षी यांच्या वैशिष्ट्यांसह ८०० वर्षापूर्वीच्या काळात असा ग्रंथ भारतात तयार झाल हे अभिमानास्पद आहे. मृगपक्षिशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्या खंडात १२७ पशूंची व दुसऱ्या खंडात ९७ पक्ष्यांची वर्णने दिली आहेत, या ग्रंथात छत्तीस श्रेणीमध्ये पशुपक्ष्यांच्या माहितीचे संकलन केले आहे. वन्यजीवनाची माहिती देणारे मूळ संस्कृत ग्रंथाचा भावानुवाद प्रख्यात वनमहर्षी मारुती चितमपल्ली, तसेच पी नरसिंहशास्त्री भातखंडे यांच्या रोचक शैलीतून सामान्य वाचकालाही समजेल अशा सहजसुंदर भाषाशैलीतून साकार झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prasad Prakashan","offers":[{"title":"Prasad Prakashan","offer_id":46697380118786,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Mrugapakshishastra.jpg?v=1756104929"},{"product_id":"pruthvichi-aabhushane-by-rajnish-joshi-पृथ्वीची-आभूषणे","title":"Pruthvichi Aabhushane By Rajnish Joshi (पृथ्वीची आभूषणे)","description":"","brand":"Indus Source Books","offers":[{"title":"Indus Source Books \/ Rajnish Joshi \/ Marathi","offer_id":47386596540674,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6_a3c37893-e287-44f0-9f3f-a93e3953c0fd.jpg?v=1771654623"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/nature.oembed?page=3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}