{"title":"Narayan Dharap","description":"","products":[{"product_id":"440-chandanwadi-by-narayan-dharap","title":"440 Chandanwadi By Narayan Dharap","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531246723330,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61OdUCGNBXS._SL1500.jpg?v=1729070052"},{"product_id":"kalokhi-pournima-काळोखी-पौर्णिमा-by-narayan-dharap","title":"Kalokhi Pournima : काळोखी पौर्णिमा By Narayan Dharap","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती. शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली. तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली. तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच. एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही. तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45654857318658,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71YIxAZFaSL._SY425.jpg?v=1732091622"},{"product_id":"bhukeli-ratra-by-narayan-dharap-author","title":"Bhukeli Ratra By Narayan Dharap (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eत्यांना स्वत:ला आता स्वत:चं ते दुसरं रुप दिसलं. गणपतराव विस्फारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते आणि मग त्यांनी आपल्या थकलेल्या शरीराने उठून बसण्याची एक क्षीण, केविलवाणी धडपड केली. लाल अंगरख्यातला आकार दात विचकून हसत हसत पुढे सरकत होता, कॉटवर वाकत होता. गणपतरावांच्या तोंडून एक अर्धवट गुदमरल्यासारख्या आवाज आला आणि त्यांचा चेहरा रमाबाईंकडे वळला. चेहरा पांढरा पडला होता, डोळे वटारले होते, घसा आवळला होता; काहीतरी बोलण्याची त्यांची निष्फळ धडपड चालली होती. तो एक क्षण ते दोन्ही चेहरे रमाबाईंकडे पाहत होते. एक भेदरलेला, पांढराफेक, काहीतरी बोलण्याची धडपड करणारा; दुसरा विचकलेल्या दातांचा, व्क्रर, दुष्ट, मत्सराने भरलेला....आणि मग गणपतराव किंचाळले रमा!.... मी..... मी.... मी....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवळून ते एकदम वेडेवाकडे पडले. तोंड उघडं होतं. वटारलेले डोळे छतावर खिळले होते. छातीची हालचाल शेवटी थांबली होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि मग ते दुसरे गणपतराव कॉटला वळसा घालून सावकाश त्यांच्या दिशेने यायला लागले. डोळे आता एका सैतानी विजयाच्या धुंदीत पेटून उठले होते. रमाबाई जागच्या हलल्याही नाहीत. त्यांच्या मनात भीती, आशा या भावनांना जागाच नव्हती. त्या शेवटच्या काही क्षणांत आता काय होणार आहे याची पुरेपूर कल्पना त्यांना आली होती; पण आता सर्व भावना थिजल्या होत्या. त्यालाच काय, कशालाच काही महत्त्व नव्हतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45654878290178,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/714j5lymRnL._SY425.jpg?v=1732178187"},{"product_id":"samarth-malika-sanch-by-narayan-dharap-समर्थ-मालिका-संच","title":"Samarth Malika Sanch By Narayan Dharap (समर्थ मालिका संच)","description":"\u003cp\u003eनारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45756390899970,"sku":"","price":1275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SamarthSetBack.jpg?v=1736060204"},{"product_id":"samarthancha-vijay-by-narayan-dharap-समर्थांचा-विजय","title":"Samarthancha Vijay By Narayan Dharap (समर्थांचा विजय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45756391555330,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SamarthanchaVijay.jpg?v=1736060126"},{"product_id":"samarthanchi-olakh-by-narayan-dharap-समर्थांची-ओळख","title":"Samarthanchi Olakh By Narayan Dharap (समर्थांची ओळख)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45756392997122,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SamarthanchiOlakh.jpg?v=1736060160"},{"product_id":"sathe-ficus-by-narayan-dharap-साठे-फायकस","title":"Sathe Ficus By Narayan Dharap (साठे फायकस)","description":"\u003cp\u003eफायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाठे फायकस !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eनारायण धारप\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45766414893314,"sku":"","price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SatheFicusFront-1.jpg?v=1736405764"},{"product_id":"gogramcha-chitar-by-narayan-dharap-गोग्रॅमचा-चितार","title":"Gogramcha Chitar By Narayan Dharap (गोग्रॅमचा चितार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविजयचे लक्ष वर गेले. त्याला अगदी डोक्यावर एक लाल व एक पिवळा असे चमचमणारे दोन बिंदू दिसले. ताऱ्यांना रंग नसतात व ग्रह चमचम करत नाहीत . हे चमचम करणारे दोन प्रकाशबिंदू हलत होते… खाली त्याच्याकडे येत होते. कोणीतरी खूप मोठ्या आवाजात रेडिओ लावला असावा , असा आवाज येत होता . त्याच्या अवतीभवती घुमणारा तो विलक्षण आवाज तसाच चालू राहिला.. आणि विजयच्या डोळ्यांसमोर हे असे विविध रंगछटांनी चमकणारे काहीतरी त्याच्यापासून पाच फूटावरच हिरवळीवर टेकले … आणि लगेच त्याच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या… विजय… विजय ! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची कुमारवयीन वाचकांसाठी उत्कंठावर्धक कादंबरी…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45770300195074,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51tRo_GLhIL._SY425.jpg?v=1736405724"},{"product_id":"angarika-by-narayan-dharap-अंगारिका","title":"Angarika By Narayan Dharap (अंगारिका)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eअंगारिका\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45778296930562,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AngarikaFront-1.jpg?v=1736751332"},{"product_id":"chandrachi-sawali-चंद्राची-सावली-by-narayan-dharap","title":"Chandrachi Sawali - चंद्राची सावली | By Narayan Dharap","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45895383089410,"sku":"","price":106.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ChandrachiSawaliFront-1.jpg?v=1740552972"},{"product_id":"narayan-dharap-set-1-नायरण-धारप-संच-एक-by-narayan-dharap","title":"Narayan Dharap Set 1  - नायरण धारप- संच एक| By Narayan Dharap","description":"\u003cp\u003eविख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eनारायण धारप\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/swapnamohini\/\"\u003eस्वप्न्मोहिनी \u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/bahumani\/\"\u003eबहुमनी\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/gogramchachitar\/\"\u003eगोग्रमचा चितार \u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45895407763714,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NarayanDharap_Set2Front-1.jpg?v=1740552919"},{"product_id":"narayan-dharap-set-2-नायरण-धारप-संच-दोन-by-narayan-dharap","title":"Narayan Dharap Set 2  - नायरण धारप- संच दोन | By Narayan Dharap","description":"\u003ch2 class=\"product_title entry-title\"\u003eनायरण धारप- संच दोन\u003c\/h2\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eखिळवून ठेवणारी ३ पुस्तकं\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eनारायण धारप\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eविख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eनारायण धारप\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e१.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/sathefaykas\/\"\u003eसाठे फायकस\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२ .\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/chandrachisavali\/\"\u003eचंद्राची सावली\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/rohanprakashan.com\/product\/aangarika\/\"\u003eअंगारिका\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45895659880706,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NarayanDharapSetfront2Front-1.jpg?v=1740552958"},{"product_id":"chetkin-by-narayan-dharap-चेटकीण","title":"Chetkin By Narayan Dharap (चेटकीण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित “चेटकीण’ ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45909908914434,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/chetkin-2018M-898x1024.jpg?v=1740725837"},{"product_id":"pradhyapak-vaikaranchi-katha-by-narayan-dharap-प्राध्यापक-वाईकरांची-कथा","title":"Pradhyapak Vaikaranchi Katha By Narayan Dharap (प्राध्यापक वाईकरांची कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकोणिसाव्या शतकातील साठच्या दशकातील किंवा त्यानंतरच्या दोन शतकातील वाचकांसाठी नारायण धारप हे नाव गूढरम्य, अलौकिक शक्तींचे दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारा एक लोकप्रिय लेखक म्हणून आजही आठवत असेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘प्राध्यापक वाईकरांची कथा’ म्हणजे एका झपाटलेल्या बंगल्याची कथा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया बंगल्यात कोणाच्यातरी पळण्याचा, ओरडण्याचा, हसण्याचा आवाज येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबंगल्यात घडणाऱ्या चित्रविचित्र घटनांनी तेथील वातावरण पछाडले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिसर्गाच्या आणि नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा काहीतरी भयंकर परिणाम असल्याचे त्या घरातील व्यक्तींना वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया बंगल्यात घडणाऱ्या अघटित घटनांमागे नेमके काय असेल, असा यक्षप्रश्न सर्वांपुढे असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया समस्येतून त्या घरातील व्यक्तींची कशी सुटका होते, याचे रोमहर्षक आणि रहस्यमय वर्णन या कथेत आलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्तीला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरहस्यमय आणि गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान अढळ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“तिची नजर समोर फ्लॅटच्या दाराकडे गेली. दाराच्या बाहेरच एक अगदी कृश शरीराचे गृहस्थ उभे असलेले तिला दिसले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते बाहेरच का उभे आहेत? आत का येत नाहीत? तिच्या बालमनाला प्रश्न पडला होता- आणि विशेष । म्हणजे त्यांचा चेहरा किती दु:खी होता! डोळ्यांतून सारखं पाणी येत होतं, ते दाराच्या मागच्या बाजूने डोळे पुसत होते आणि पुन्हा आत पाहत होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमघाशी होमाच्या धुराने तिच्याही डोळ्यांना पाणी आलं होतं; पण आता तर काही धूर नव्हता, मग ते रडत होते की काय? तिची नजर पुन्हा समोर गेली, तेव्हा तिथे ते गृहस्थ नव्हते…”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910019113218,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pradhyapak-Vaikaranchi-Katha-spin-10M.jpg?v=1740725830"},{"product_id":"luchai-by-narayan-dharap-लुचाई","title":"Luchai By Narayan Dharap (लुचाई)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअहो माझे बाप, आता माझ्यावर कृया करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुजके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या घासानं तुप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या या जागी मला खूण दाखवा, त्या या जागी मला प्रेरणा द्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमी तुमच्या कार्याची सुरूवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या.’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा विश्चल देह होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो दोन पावलं मागं सरला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआधीचीच शांतता. आता तर ती आणखी गडद झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवारा थांबला. जणू हवेतल्या सर्व काणांचीही हालचाल थांबली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाहीतरी झालं – शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडचं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखडकावरच्या मृत शरीराचं मासं काळं-निळं पडलं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवितळल्यासारखं प्रवाही झालं, त्याचे ओघळ वाहायला लागले,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउकळल्यासारखे त्यात बुडबुडे उठायला लागले-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘सक्! सक्! सक्!’ आवाज येत होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाणाळलेलं अस्थी – मांस- मज्जा त्वचा-रूधीर शोषलं जात होतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेवटी तिथं फक्त एक काळा डाग राहिला-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eन ओळखता येण्यासारखा…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910028878082,"sku":"","price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Luchai-Mockup-898x1024.jpg?v=1740725791"},{"product_id":"anolakhi-disha-bhag-1-by-narayan-dharap-अनोळखी-दिशा-भाग-१","title":"Anolakhi Disha Bhag 1 By Narayan Dharap (अनोळखी दिशा भाग १)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910160277762,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71-P2WHi2DS._SY425.jpg?v=1740725741"},{"product_id":"atrarcha-fas-by-narayan-dharap-अत्रारचा-फास","title":"Atrarcha  Fas By Narayan Dharap (अत्रारचा फास)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपरिस्थितीच्या फेऱ्यात सापडून अगतिकपणे समाज-प्रवाहाबरोबर वाहवत जाणाऱ्या एका अतिसामान्य शिक्षकाची गोष्ट म्हणजे अत्रारचा फास होय.अनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भरलेला हा अत्रारचा फास म्हणजे रहस्य, गूढता आणि भयकथांच्या मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारा भयकथासंग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910247145730,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aatrarcha-faasM.jpg?v=1740725771"},{"product_id":"swaha-by-narayan-dharap-स्वाहा","title":"Swaha By Narayan Dharap (स्वाहा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग खाली तपशील होता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपोलीस अधिक तपास करीत आहेत.’’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910269493506,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/swahaM.jpg?v=1740725751"},{"product_id":"aghatit-by-narayan-dharap-अघटित","title":"Aghatit By Narayan Dharap (अघटित)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवन खूप गुंतागुंतीचे आहे. कोणत्या क्षणी काय होईल, काही सांगता येत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, आपण समजून घेण्याच्या आधीच घडून गेलेलं असतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘हे असं कसं घडलं?’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारतो. एकूण घटनाक्रम आपलया तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करुल आपलं डोकं शिणून जातं; तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकारण त्या घटना अकल्पित असतात, आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या सुरू होतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले आहोत. कळसूत्री बाहुले आहेत, हे सत्य आपण एका पातळीवर स्वीकारतो; तरीही दुसऱ्या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘हे असं कसं घडलं?’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकारण ते सर्व अघटित असतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांच्या नारायण धारप यांच्या लेखनीतून उतरलेल्या कथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910408626434,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AghatitM.jpg?v=1740725805"},{"product_id":"anolakhi-disha-bhag-3-by-narayan-dharap-अनोळखी-दिशा-भाग-३","title":"Anolakhi Disha Bhag 3 By Narayan Dharap (अनोळखी दिशा भाग ३)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910433431810,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41CU7ilvXCS._SY445_SX342.jpg?v=1740725841"},{"product_id":"shapatha-by-narayan-dharap-शपथ","title":"Shapatha By Narayan Dharap  (शपथ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eत्या संध्याकाळी जयराम बाहेर गेला – नेहमीसारखाच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण नेहमीसारखा तासा-दोन तासात परत आला नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरुक्मिणीला काळजीने वेड लागायची वेळ आली होती. तोच खोलीचं दार दाणदिशी उघडून जयराम आत लटपटत्या पावलांवर आला आणि जमिनीवर कोसळलाच. त्याचे कपडे फाटले होते, चिखल-मातीने लडबडले होते. श्वास धापांनी येत होता. रुक्मिणी घाईघाईने जवळ आली तेव्हा तिला दिसलं की, त्याच्या गालावर, मानेवर दोन्ही हातांवर (मागून दिसलं की पाठीवरही) ओरबाडल्याच्या, रक्ताळलेल्या जखमा होत्या. एखाद्या चित्त्याने किंवा बिबट्याने पंजाने ओरबाडल्यासारख्या जखमा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘‘अहो- अहो- झालं तरी काय-?’’ रुक्मिणी ओरडलीच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजयराम डावा हात हलवत होता- नाही नाहीची खूण करीत होता. त्याचा उजवा हात पुढे होता- हातात एक कागद होता- ‘‘वाच!’’ तो घोगर्याक आवाजात म्हणाला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजयराम आणि रुख्मिणी यांच्या रोजच्या आयुष्यातील ही विचित्र घटना. ती का घडली असावी? अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागेल असा संशय जयरामला आधीच का आला असावा? ‘आपली शपथ आठवा, मायगावला परत या’ अशी पत्रे त्याने कुणासाठी व का लिहून ठेवली होती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910463086850,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ShapathM.jpg?v=1740725737"},{"product_id":"anolakhi-disha-bhag-2-narayan-dharap-अनोळखी-दिशा-भाग-२","title":"Anolakhi Disha Bhag 2 Narayan Dharap (अनोळखी दिशा भाग २)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45910587244802,"sku":"","price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Anolakhi-Disha-2M.jpg?v=1740725761"},{"product_id":"narayan-dharap-kadambari-sanch-गाजलेल्या-कादंबऱ्यांचा-संच-5-books-set","title":"Narayan Dharap - Kadambari Sanch ( गाजलेल्या कादंबऱ्यांचा संच ) - ( 5 Books set)","description":"\u003cp\u003e1) \u003cspan\u003eGrahan  ( ग्रहण) - 250\/-\u003cbr\u003e2) 440, Chandanwadi - ४४०, (चंदनवाडी) - 275\/-\u003cbr\u003e3) Bhukeli Ratra - भुकेली रात्र - 150\/-\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e4) Kalya Kapari - काळ्या कपारी - 200\/-\u003cbr\u003e5) Pradhyapak Vaikaranchi Katha - प्राध्यापक वाईकरांची कथा - 225\/-\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46110667833602,"sku":"","price":880.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71nwlTpOafL._SL1500.jpg?v=1745823322"},{"product_id":"frankenstaien-by-narayan-dharap-फ्रँकेन्स्टाइन","title":"Frankenstaien By Narayan Dharap (फ्रँकेन्स्टाइन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजनित्राचं चाक पिसाटासारखं गरगरत होतं. त्याच्या ठिणग्यांचा प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात मला त्या प्राण्याचा चेहरा दिसला. ओठ मागे गेले होते. आणि दात एका क्रूर हास्यात विचकले होते. तो चेहरा एका बेभान, हिंस्र पिसाट पशूचा होता! फाटक्या बँडेजमध्ये गुंडाळलेल्या त्या जाडजूड हाताचा माझ्या मानेभोवती विळखा पडला आणि एका हिसक्यासरशी मी प्रयोगशाळेत खेचला गेलो. केवढा दैवदुर्विलास! इतकी प्रगती झाल्यावर जे मी निर्माण केलं होतं त्याच्याच हातून माझा नाश व्हावा... निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा, एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी आणि त्या हाती मला मरण यावे...! कोण आहे हा बॅरेन फ्रँकेन्स्टाइन? प्रयोगशाळेत तो कसले प्रयोग करत होता? हिंस्र, पिसाट, राक्षसी मानवाचा त्याला कशामुळे सामना करावा लागला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46110731862274,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41Q0m8qKhCL._SY445_SX342.jpg?v=1745909867"},{"product_id":"ataracha-fas-by-narayan-dharap-अत्रारचा-फास","title":"Ataracha Fas By Narayan Dharap (अत्रारचा फास)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46110767939842,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31X-DinRWKL.jpg?v=1745909739"},{"product_id":"sankraman-by-narayan-dharap-संक्रमण","title":"Sankraman By Narayan Dharap (संक्रमण)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46110768988418,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_e20d2eda-22c2-43db-b884-a6d387f38a18.png?v=1745650567"},{"product_id":"dvait-by-narayan-dharap-व्दैत","title":"Dvait By Narayan Dharap (व्दैत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रखर सूर्यप्रकाशात दिसणार्या पावसाळ्यात धूक्याने आच्छादलेले शिखर आपल्याला खुणावतात. कारण धूक्याच्या आवरणामुळे त्यांना रहस्यमय बनवलेले असते. मानवी जडणघडण अशी असते की, त्याला नेहमीच अर्धवट दिसणार्या गोष्टींवरील पडदा उघडून त्यांचे गूढ जाणून घेण्याचा थरार अनुभवायचा असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा नियम केवळ भौतिक जगतालाच लागू पडतो. असे नाही तर अगोदर, अपार्थिव जगातील गोष्टींबाबतही तितकाच लागू पडतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमानवी मनाचे हे वैशिष्ट्य गेल्या शतकातील ख्यातमान लेखक श्री नारायण धारप यांनी अचूकपणे हेरले आणि उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय कथांचा मनोवेधक नजराणा वाचकाला भेट दिला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला माहीत नसलेल्या अनुभवापलीकडच्या जगात काय असेल हे जाणून घेण्याच्या आपल्या उत्कट इच्छेला ते हळूवारपणे फुंकर घालून फुलवतात. त्यांच्या कथांमधून आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा घटना एकापाठोपाठ वेगाने घडू लागतात आणि आपला या जगाशी असलेला संबंध तात्पुरता तुटतो. आपण त्या काल्पनिक जगात इतके गुरफटले जातो की, पुस्तक पूर्ण वाचून बाजूला ठेवेपर्यंत एका अनोख्या विश्वाचा भाग बनून जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधारपांच्या द्वैत या कादंबरीतील ठेंगू खलनायक अशीच वाचकांची उत्कंठा वाढवत जातो. कादंबरीतील विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण घटनाक्रमांचे विविध पैलू दिसत जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत, अॅजबस्ट्रॅक्ट आहेत; पण पापी स्वभाव ही गोष्ट खरी आहे, कारण ती एक घटना आहे. त्यामागे माणसाचा स्वभाव आहे आणि किंवा नसेलही; पण निसर्ग मात्र माणसाचा स्वभाव अवश्य कोरून ठेवतो आणि तोही कपाळासारख्या अशा एखाददुसर्या ठिकाणी नाही, तर शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा साचा उठवलेला असतो. क्रोमोसोमच्या रंगसूत्राची शृंखला आणि त्यातले जीन्सचे दुवे - त्यांच्यातच हे रहस्य दडलेले असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46110769283330,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81sJFTTebFL._SY466.jpg?v=1745909774"},{"product_id":"veda-vishwanath-by-narayan-dharapवेडा-विश्वनाथ","title":"Veda Vishwanath By Narayan Dharap(वेडा विश्वनाथ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी साहित्यजगतामध्ये श्री. नारायण धारप यांचे स्वतंत्र असे स्थान आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ श्री. धारप आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लिहिलेल्या भयकथा, विस्मयकथा, गूढकथा मराठी वाचकांना सादर करीत आहेत. एका अदभुत, रहस्यमय आणि प्रसंगी अंगावर भीतीने काटा आणणार्या दुनियेमध्ये सफर घडविणारी त्यांची लेखणी अजूनही तितकीच ताजी, टवटवीत व वाचकाला रिझविणारी आहे. धारप म्हटल्यावर त्यांच्या कादंबरीमध्ये थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारे, दचकविणारे आणि शेवटी सारं काही ठाकठीक झाल्याने वाचकालाही सुटकेचा नि:श्वास टाकायला लावणारे विचित्र, रोमांचकारक असे अनुभव असणार याची वाचक नकळतपणे आपल्या मनाशी अटकळ बांधतो. धारपांची नवीन भयकादंबरी ‘वेडा विश्वनाथ’ हीही त्याला अपवाद नाही. संपूर्ण उपेक्षणीय, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्वनाथ’ आणि असामान्यांचा मेरुमणी ‘आर्यवर्मन’, आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारप मन स्तिमित करणारी कथा विणतात. चित्रमय शैली, ओघवती भाषा, चातुर्यपूर्ण मांडणी हे विशेष ‘वेडा विश्वनाथ’ मध्येही आढळतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46110779703554,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81O7WnbT77L._SL1500.jpg?v=1745909845"},{"product_id":"ikmaai-by-narayan-dharap-इक्माई","title":"Ikmaai By Narayan Dharap (इक्माई)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46110779998466,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_2f7a7513-0d0e-4a1f-995e-7ed053851909.png?v=1745909749"},{"product_id":"andharyatra-by-narayan-dharap-अंधारयात्रा","title":"Andharyatra By Narayan Dharap (अंधारयात्रा)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114701410562,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41GJMc3px7L.jpg?v=1745996330"},{"product_id":"savadhan-by-narayan-dharap-सावधान","title":"Savadhan By Narayan Dharap (सावधान)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114706260226,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41rbqx2o2GL.jpg?v=1745996381"},{"product_id":"kulvruttant-by-narayan-dharap-कुलवृत्तांत","title":"Kulvruttant By Narayan Dharap (कुलवृत्तांत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानव स्वत:च्या उत्क्रांतीचा कधी विचार तरी करतो का? आपण कोण होतो, कोठून आलो, कोठे चाललो आहोत, या प्रवासाची परिणती कशात होणार आहे याचा माणूस कधी विचार तरी करतो का? मी तरी कोण? येथे या शहरात कसा आलो? प्रत्यक्ष मी नाही; पण माझे पूर्वज... कोठून आले? महत्त्वाकांक्षेने आले की, गरजेपोटी आले? मी अनेक कुलवृत्तांत वाचले होते. चारचार, पाचपाच पिढ्यांचा इतिहास. त्यात एका तक्त्याच्या रूपात मांडला होता. आडव्या उभ्या रेषांनी जोडलेली ती फक्त नावं होत. अमक्याची ती चार-पाच मुलं... त्यांचे विवाह... त्यांची मुलं... हा नावांचा आणि रेषांचा तक्ता त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काय सांगणार? त्या तर फराट्यांनी ओढलेल्या रेषाकृती होत्या; पण माझ्या विलक्षण अनुभवात या रेषाकृती सजीव झाल्या होत्या. रंग... रूप... सुखं... दु:ख... अशा सगुण त्रिमित स्वरूपात समोर आल्या होत्या... रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत हा असाधारण अनुभव बसवणं किती कठीण होतं! जवळजवळ अशक्यच! पण इथे धोका होता. त्या कालगर्तेत माझा प्रवेश अगदी सहज होत होता. पण काही कारणाने, अपघाताने, दुर्दैवाने मला परत माझ्या एकवीसाव्या शतकात परत येता आलं नाही तर? मी कालवस्त्राच्या त्या सुरकुतीत अडकून पडलो तर? सर्व शक्यतांचा विचार करायला हवा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114720219394,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71-yz6_1XqL._SL1500.jpg?v=1745996230"},{"product_id":"palati-zade-by-narayan-dharap-पळती-झाडे","title":"Palati Zade By Narayan Dharap (पळती झाडे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eती विलक्षण गंभीर झाली होती. कोणत्यातरी तणावाखाली होती. तिचा मूड संसर्गजन्य होता. आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती. बाल्कनीचा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता. तिकडेचख् चंदी एकटक पाहत होती. आणि मग तिने माझा डावा हात घट्ट धरला. ‘ते पहा-’ ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली - पण तिने मला सांगाची जरूरीच नव्हती - मलाही ते दिसत होतं - ते किंवा तो. बाल्कनीच्या त्या टोकाकडून तो आमच्या दिशेने येत होता. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकांत नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114735751426,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81jUAAvmPtL._SY466.jpg?v=1745996441"},{"product_id":"shaducha-shap-by-narayan-dharap-शाडुचा-शाप","title":"Shaducha Shap By Narayan Dharap (शाडुचा शाप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठया दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनारायण धारपांच्या कथा भय या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीचे, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातील मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114748596482,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31aNhg1RExS.jpg?v=1745996418"},{"product_id":"pathlag-by-narayan-dharap-पाठलाग","title":"Pathlag By Narayan Dharap (पाठलाग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविज्ञानाला सीमा नाही. आज केवळ कल्पनेत असलेल्या अनेक गोष्टी उद्या साकार होतात. केवळ कल्पना म्हणून कोणतीही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नसतो. काळाच्या गर्भात काय काय दडलेले आहे, याचा आज थांग लागत नाही; कारण उद्या सर्वस्वी नवीन असतो. आज नेहमीच उद्याचा पाठलाग करीत असतो. काळाशी स्पर्धा करीत असा पाठलाग सुरू होतो तेव्हा मग मानवी भावभावनांचे विश्वही हादरून जाते. मानवी संस्कृती उद्याच्या दिशेने धावायला लागते, तेव्हा आजच्या पावलाखाली काल तुडविला जातो. कालपर्यंत ज्याना डोक्यावर घेऊन नाचत होतो अशा अनेक गोष्टी, संस्कार आणि विचार आज पायदळी तुडविले जातात; कारण उद्याचे आकर्षण खूप मोठे असते. उद्याच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यात असतो थरार, उत्साह आणि काळजाला घर पाडणारी एक अनामिक भीती भीती आणि थरार यांच्या मिश्रणातून उदयाला येते उत्कटता. पुढे काय. पुढे काय? ही अपेक्षाच उत्कटतेच्या मळाशी असते आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपण कल्पनाही न केलेल्या घटना एकापाठोपाठ वेगाने घडत जातात तेव्हा मनातल्या उत्कटतेचे रहस्यात रूपांतर होते. अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114834776322,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61RGUm0wUPL._SY466.jpg?v=1745996458"},{"product_id":"chakrawal-by-narayan-dharap-चक्रावळ","title":"Chakrawal By Narayan Dharap (चक्रावळ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविवर आता चांगले सहा फूट रुंद आणि तितकेच खोल झाले होते. ते आमच्यापासून दूरही गेले होते. आम्ही त्याच्या दिशेने पळत निघालो. सोनिया पाठमोरी झाली. पाय खाली सोडून काठावर काहीक्षण हातावरच लोंबकळत राहिली आणि मग तिने हात सोडले. तिच्या मागोमाग मी आणि श्रीनंद खाली उतरलो. आमची तिघांची आत अगदी गर्दी झाली होती; पण काही वेळातच विवर रुंद आणि उंच होऊ लागले. भिंती आमच्यापासून दूर जात जात उंच होऊ लागल्या. ते विवर रुंद होतच होते. मघापेक्षा यावेळी हालचाल खूपच शीघ्र होती. लवकरचं आम्ही एका खूप मोठ्या खोलगट-दरीत उभे होतो. तिचा व्यास नक्कीच एखाद्या मैलाचा तरी वाटत होता. या विशाल दरीच्या तळावर दगड, धोंडे, फत्तर इतस्तत: विखुरले होते आणि मधूनच एखादे पाण्याचे डबकेही होते. एवढ्यातच पाऊस होऊन गेला होता! मग आश्चर्याचा धक्का बसून मला सत्यस्थिती उमगली हे एक नवीन जगच होते! चमत्कारिक, विस्मयकारक नवे जग! नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी चक्रावळ कथासंग्रह जरुर वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114837790978,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/813axRXxz9L._SY466.jpg?v=1745996277"},{"product_id":"talghar-by-narayan-dharap-तळघर","title":"Talghar By Narayan Dharap (तळघर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण... पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते.... जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या.... कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती....आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला.... उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या.... आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता.... तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे.... काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW... त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला... “मी आलो आहे.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114864824578,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81r9BuxhDqL._SL1500.jpg?v=1745996399"},{"product_id":"maifal-by-narayan-dharap-मैफल","title":"Maifal By Narayan Dharap (मैफल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता, आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती- पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावी-उजवीकडे वाहत्या गतीने हलायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कोठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ- तो एक क्षण- ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती; तारांगणासारख्या असंख्य, हजारो ज्योती होत्या. त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतीचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत कोठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येताच झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकीचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता...आणि असं वाटत होतं की या क्षणाची, या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे... सुटकेसाठी ती विलक्षण धडपड! सारी हालचालच गोठली होती! फक्त निद्रव्य मन आतल्या आत तडफड करीत होतं. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमद गतीने उलटत होता.... त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल, तो क्षण उलटेल, इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल... त्या आधीच.... त्या आधीच....”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46114912108802,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81iqWRnrymL._SL1500.jpg?v=1745996437"},{"product_id":"vasansi-nutnani-by-narayan-dharap-वासांसि-नुतनानि","title":"Vasansi Nutnani By Narayan Dharap (वासांसि नुतनानि)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहीमन त्या विलक्षण स्वप्नाने झोपेतून खडबडून जागा झाला होता. तो कोण ऋषिकेश होता, त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या सात दिवसांतल्या नाट्यमय, थरारक, संघर्षाच्या घडामोडी त्यानं स्वप्नात पाहिल्या होत्या. त्यांच्या त्या इमारती, वाहनं, शहरं, कपडे, सर्वकाही अपरिचित होतं; पण तरीही त्या ऋषिकेशबद्दल मनात एक विलक्षण आपुलकी होती. तो दुष्ट स्वामीजी आणि ऋषिकेश... त्यांच्यातला अखेरचा संघर्ष... महीमनला त्याचा शेवट काय झाला कधी कळणारच नाही. पण हे चमत्कारिक स्वप्न एवढ्यावरच थांबत नव्हतं. त्या ऋषिकेशलाही पाच रात्री लागोपाठ अशी स्वप्नं पडली होती. तोही आधी चकित झाला होता. पण ही स्वप्नं त्याच्यासाठी काहीतरी घेऊन येत होती... वेगवेगळ्या मार्गावरून जीवनप्रवास करणाऱ्या या सर्व अस्मिता आहेत.... अपवादात्मक परिस्थितीत एकमेकांना ज्ञात झालेल्या... महीमनच शरीर थरारून उठल होत. मग तोही याच साखळीतला होता का? त्यालाही या सर्व शक्ती प्राप्त होणार होत्या का? या क्षणापर्यंत नीरस, एकसुरी वाटणारं आयुष्य आता एकाएकी सप्तरंगी झालं होतं. मनासमोर त्याने अनेक आकर्षक देखावे रंगवले होते... इतके दिवस तो समजून चालला होता, हे भाबड्या कल्पनांचे चाळे आहेत... पण आता सर्वकाही बदललं होतं. शक्यतांची मर्यादा एकदम विस्तारली होती. आयुष्यात आव्हानं एकदम विस्तारली होती. महत्त्व जय-पराजयाला नव्हतं. आयुष्य एकाएकी रसरशीत झालं होतं. क्षण आणि क्षण उत्कंठा घेऊन येणार होता. यापेक्षा जास्त असं काय मागणं असणार?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46117798805762,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71-09Eg8QhL._SL1000.jpg?v=1746082626"},{"product_id":"aisi-ratne-melvin-by-narayan-dharap-ऐसी-रत्ने-मेळवीन","title":"Aisi Ratne Melvin By Narayan Dharap (ऐसी रत्ने मेळवीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“तुम्ही माझ्याविरुद्ध लढा पुकारला आहे! स्वत:च्या शक्तीचा अदमास न घेता गगनाला गवसणी घालायला निघाला आहात! मूर्ख! ज्याच्यामागे तुम्ही दोघे आता कोकरासारखे मुकाट्याने चालत आहात, तो कोण आहे पाहा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकाएकी सर्वत्र दिव्यांचा झगझगाट झाला. अंधाराला सरावलेले माझे डोळे एकदम दिपून गेले. जरा वेळाने मला जेव्हा सर्वकाही स्पष्ट दिसायला लागले तेव्हा मी समोर पाहिले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्ही एका फरसबंदी चौकात उभे होतो. समोरच प्रखर दिवे होते, त्यामुळे त्यामागचा भाग दिसत नव्हता. जेवढा भाग प्रकाशित होता तेवढ्या भागात मला शिवभक्त दिसले नाहीत; पण आणखी काहीतरी दिसले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआमच्याकडे पाठ करून एक ओळखीची वाटणारी आकृती समोर उभी होती. मागाहून दिसायला अगदी डॉक्टर कोतवालांसारखीच ती व्यक्ती दिसत होती; पण एका विलक्षण कल्पनेने माझी छाती धडधडायला लागली होती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही आवाज न करता ती व्यक्ती स्वत:भोवती फिरली; पण आमच्याकडे वळली तरी तिला चेहराच नव्हता. कोट आणि पीक कॅप यांच्यामध्ये काहीही नव्हते- केवळ मोकळी हवा होती...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक सेकंदभर तिकडे पाहून सुमित्रा एकदम किंचाळली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआमच्या डोळ्यांसमोर तो आकार पाहता पाहता विरघळला आणि नाहीसा झाला! एका फसव्या, काल्पनिक आकृतीमागे लागून आम्ही पार त्याच्या मुठीत सापडलो होतो!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि तिकडे डॉक्टर कोतवाल आम्हाला शोधत असतील, आम्ही दिसलो नाही तर आमची काळजी करीत असतील!”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e...प्रस्तुत पुस्तकातून\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122771087618,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81PWSDGESYL._SL1500.jpg?v=1746169015"},{"product_id":"ek-papani-lavali-ani-itar-katha-by-narayan-dharap-एक-पापणी-लवली-आणि-इतर-कथा","title":"Ek Papani Lavali Ani Itar Katha By Narayan Dharap (एक पापणी लवली आणि इतर कथा)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122797269250,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41b2yBBQY6S.jpg?v=1746169374"},{"product_id":"seemepalikadun-by-narayan-dharap-सीमेपलीकडून","title":"Seemepalikadun By Narayan Dharap (सीमेपलीकडून)","description":"\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DDTP895B\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"pjfcep-lmgj8a-rwlo18-ebczlj\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003eनारायण धारप यांचा हा काही पहिला भयकथा संग्रह नाही; पण त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या दोनशे हून अधिक कथांमधील वैशिष्ट्ये याही कथांमध्ये आहेत. परिणामकारक भयकथेमध्ये वाचकांना त्यांचा अविश्वास क्षणभर दूर ठेवायला लावण्याची जी किमया असते ती या कथांमध्ये नक्कीच आहे. धारपांची भाषा चित्रमय आहे. वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना प्रत्यक्ष उभी करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आणि लेखन शैलीत आहे. सीमेपलीकडून ही कथा पावलाच्या ठशाभोवती फिरणारी आहे बाथरूमच्या दरवाजाजवळ दिसणारा तो ओल्या पावलाचा ठसा कुणाचा, याचे रहस्य उलगडणारी ही कथा आहे. सीमेपलीकडून हा कथासंग्रह सुद्धा अशाच प्रकारे वाचकांच्या डोळ्यांसमोर घटना प्रत्यक्ष उभी करणारा आहे यातील एक रात्र - उलघालीची, वैरी, सुंदरी आणि पशु या सर्वच कथा मानवाची विचारशक्ती स्तब्ध करणाऱ्या आहेत. याशिवाय अमानवी विश्वासाठी जे तर्कशास्त्र निर्माण केलेले आहे त्याच्याशी या सर्व भयकथा सुसंगत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-slot-id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DDTP895B\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"5mesnc-keyhge-esyeml-3gflep\" data-cel-widget=\"globalStoreInfoBullets_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DDTP895B\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"mkybww-ip7v0i-fewuve-iz9zs2\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBadge_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"tellAmazon_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"tellAmazon\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"tellAmazon\" data-csa-c-slot-id=\"tellAmazon_feature_div\" data-csa-c-asin=\"B0DDTP895B\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"95mcex-dnvec6-o038tt-nlxqje\" data-cel-widget=\"tellAmazon_feature_div\"\u003e\n\u003cdiv class=\"celwidget c-f\" data-csa-op-log-render=\"\" data-csa-c-content-id=\"DsUnknown\" data-csa-c-slot-id=\"DsUnknown-4\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-painter=\"tell-amazon-desktop-cards\" data-csa-c-id=\"wixu5q-xtca4r-y55d73-ye5ur5\" data-cel-widget=\"tell-amazon-desktop_DetailPage_3\"\u003e\n\u003cdiv id=\"CardInstance9DBl2SABX5rygW1bbiG57A\" data-card-metrics-id=\"tell-amazon-desktop_DetailPage_3\" data-acp-tracking=\"{}\" data-mix-claimed=\"true\"\u003e\n\u003cdiv data-asin=\"B0DDTP895B\" data-marketplace=\"A21TJRUUN4KGV\" data-logged-in=\"true\" class=\"_tell-amazon-desktop_style_tell_amazon_div__1YDZk\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122802184450,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71v3nfmuv4L._SY522.jpg?v=1746255549"},{"product_id":"mahantanche-prasthan-by-narayan-dharap-महंतांचे-प्रस्थान","title":"Mahantanche Prasthan By Narayan Dharap (महंतांचे प्रस्थान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदेव -दानव, भुतं-खेतं, चमत्कार यांच्यावर विश्वास ठेवणारी ती भोळी जमात. माझ्या शब्दांनी आधीच ते गोंधळले असणार. त्यामागोमाग विजेसारखा लखलखाट आणि मग पाहतात तर मी अगदी त्यांच्यासमोरून एकाएकी गायब झालेलो. नवल आणि भीती. त्याबरोबरच त्या जत्तारीचा संशय आणि त्याच्यावर राग. त्यांच्या मनावर पारंपरिक संस्कारांचा किती पगडा होता मला माहीत नाही; पण त्या जत्तारीने माझ्याविरुद्ध काही काही सांगायचा प्रयत्न केला तर ते त्याचं म्हणणं आंधळेपणाने मान्य करतीलच अशी आता खात्री राहिली नव्हती. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांत नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122805985538,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/815jTWo9JhL._SY466.jpg?v=1746255513"},{"product_id":"devadnya-by-narayan-dharap-देवाज्ञा","title":"Devadnya By Narayan Dharap (देवाज्ञा)","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eदेवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eवातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eवाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर - ? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eतसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122883514626,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91ux0rR9IfL._SL1500.jpg?v=1746255401"},{"product_id":"nenchim-by-narayan-dharap-नेनचिम्","title":"Nenchim By Narayan Dharap (नेनचिम्)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘नेनचिम्’ एक शास्त्रकथा - ‘शास्त्रकथा’ या प्रकारात विविध ज्ञात, अज्ञात गोष्टींचा समावेश असतो. ते कल्पनांचे एक साहस आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मिती, परिस्थिती, भविष्यात घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या घटनांची शक्यता, निसर्ग आणि मानव यांच्याशी संबंधित काल्पनिक, ज्ञात-अज्ञात गोष्टींचा समावेश शास्त्रकथेत असतो. यात लेखक स्वत:लाच असंख्य प्रश्न विचारतो व आपापल्या परीने त्यांची उत्तरेही देतो. त्यातूनच साहसी, थरारक, भय-गूढ, रहस्यमय अशा घटना मांडल्या जातात. ‘नेनचिम्’ ही अशीच एक शास्त्रकथा आहे. जेथे धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा, भ्रमण परिघाचा परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाशांच्या अभ्यासावरूनच अनेक रहस्यमय बाबी समजल्या होत्या. या घटनाप्रधान कथेत नेनचिमवर मानव वावर असल्याची अनुभूती वाचकांना होते. नेनचिमवर धूमकेतूंच्या द्रव्याचा, गतीचा, कक्षेचा भ्रमणपरिघाचा, परिपूर्ण अभ्यास झाला होता. या आकाशस्थ दूरप्रवाश्यांच्या अभ्यासावरून समजले होते की, त्यांच्या कक्षेचे एक टोक सूर्याच्या अगदी जवळ असते; आणि दुसरे टोक विशाल अवकाशात, दूरवर, सूर्यमंडळाच्याही बाहेर कोठेतरी असते. जणु काही इतक्या दूर, एकट्याएकट्याने, अंधारात येऊन पोहचल्यावर त्याला त्याच्या सूर्यपित्याची आठवण येते, स्वैरस्वातंत्र्याचा कंटाळा येतो, परत आपल्या ग्रहबंधूंना भेटण्याची इच्छा होते, आणि मग तो सावकाश, अति सावकाश गतीने परत फिरतो, एकेका ग्रहबंधूला भेटून, त्याची कक्षा छेदून परत आपल्या पित्याजवळ येतो. पण काहीतरी बिनसते. भेट होत नाही. जितक्या आवेगाने तो जवळ येतो तितक्याच वेगाने परत दूर जातो. दूरवरच्या अंधाराच्या कुशीत दडी मारतो. पुन्हा केव्हातरी, हजारो वर्षांनी, परत येण्यासाठी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122888560898,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71mOZquVaoL._SY466.jpg?v=1746255568"},{"product_id":"ravatencha-pachhadlela-wada-by-narayan-dharap-रावतेंचा-पछाडलेला-वाडा","title":"Ravatencha Pachhadlela Wada By Narayan Dharap (रावतेंचा पछाडलेला वाडा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमोठमोठ्या वाड्यांबद्दल सर्वांना एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. त्याच्या गूढवलयाचं निराकरण हवं असतं अन् हा वाडा तर पेशवेकालीन...! काय काय घटना घडल्या असतील त्यावेळी वाड्यात...? तेथे वावरणारी कित्येक माणसं - त्यांचे हेवेदावे - सलोखा की सूडवैर - अन् त्यांचे आत्मे - अजून असतील का वावरत - तेथेच - त्यांना मुक्ती मिळेल...? स्थळ आणि त्या स्थळाशी संबंधित असलेली माणसं एकत्रित आल्यावर काय होतं, काय घडतं, याची प्रचीती त्यांना येत होती. त्यांची उपपत्ती तर्कावर आधारित होती. ती आतापर्यंत पुराव्यानं सिद्ध झाली नव्हती. त्यांच्या तर्काला कसलाही शास्त्रीय आधार नव्हता. पुराव्यानं सिद्ध करण्याची त्यांना संधीपण मिळाली नव्हती. रावते यांच्या वाड्यानं ती अनपेक्षितपणे मिळाली होती. पुन्हा अशी संधी मिळेल याची शाश्वती नव्हती. “आपण वाड्यामध्ये जातोय; पण तिथं काही विपरीत घडलं तर..?”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122907140354,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/816otm4KiYL._SY466.jpg?v=1746255429"},{"product_id":"kalokhi-pournima-by-narayan-dharap-काळोखी-पौर्णिमा","title":"Kalokhi Pournima By Narayan Dharap (काळोखी पौर्णिमा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता. भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात. खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती. शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली. तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली. तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच. एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता. ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही. तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122943250690,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81sonpROxVL._SL1500.jpg?v=1746255341"},{"product_id":"nave-daivat-by-narayan-dharap-नवे-दैवत","title":"Nave Daivat By Narayan Dharap (नवे दैवत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘नवे दैवत’ ही कादंबरीही अशीच अनेक रहस्ये उलगडून दाखविते. मानसिक शक्तीचे स्वरूप, विश्वशक्तीशी मानसशक्तीचा संयोग, ती शक्ती पेलण्यासाठी मानसिक धाटणीत आवश्यक असणारे आमुलाग्र बदल या रहस्यमय कादंबरीतून उलगडतात. आपले मन एका नव्या, शुभ्र, पवित्र आणि कल्याणकारी परिसरात प्रवेश करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भारलेल्या व गूढ, रहस्यमय भयचकित साहित्याच्या शोधात असणाऱ्या रसिक-वाचकांची भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. त्यातच आणखी मोलाची भर टाकणारी ही ‘भय’ कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46122952589570,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71CsnyK0FEL._SY466.jpg?v=1746255535"},{"product_id":"kaat-by-narayan-dharap-कात","title":"Kaat By Narayan Dharap (कात)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते. जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती. काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोबर भुईसपाट झाला होता. मनाला आलेला विफलपणा, पुढच्या आयुष्यातला एकटेपणा हे सगळं तिला सहन होणार होतं का? इतकी वर्षं ती शिणली, कष्टली... हाती काय काय राहिलं होतं? सागराचं पाणी ओंजळीतून गळून जावं तशी सर्व नाती गळून गेली होती. शेवटी शेवटी ती एकटी, ती एकटीच राहिली होती. निष्काम कर्म- उच्चारायला शब्द फार सोपे; पण आचरणात महाकठीण.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेळेचं चक्र घरंगळत चाललंच होतं. आयुष्यातून कोणालाच सुटका नव्हती. मनासारखं होत असलं म्हणजे दिवसांची यादच राहत नाही. आणि असं काही विपरीत घडलं की, क्षणाक्षणाचा बोजा असह्य होतो. एकटीचे हात तर अति दुर्बल होतात. एकेका क्षणाचं हे वजन, मग सेकंदाचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष... ती अजस्र रास पाहूनच जीव दडपून जातो. असं वाटतं या रात्रीखाली शरीर पिंजून जाणार आहे... त्याचा चेंदामेंदा होऊन जाणार आहे.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46124394414338,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81rh0tnzPhL._SL1500.jpg?v=1746255415"},{"product_id":"padchhaya-by-narayan-dharap-पडछाया","title":"Padchhaya By Narayan Dharap (पडछाया)","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e“त्या आवाजाची मला एकदम व्याख्याच करता येईना. एखादा भुंगा रागाने जसा गुंगुंगुं आवाज करतो तसला, किंवा रात्रीच्या वेळी एखादं कीटकासारखं जिवाणू खोलीत बंद झालं की जसं भिरभिरत किर्रर्र आवाज करतं-तसला काहीतरी तो आवाज वाढत होता. खोलीतला अंधार, कॉटवर प्रभाकर, हा विलक्षण आवाज. त्या आवाजाचा उगमही कळेना. रोखही कळेना. माझ्या जगाचा तोलच डगमगायला लागला होता. किती तरी गोष्टी करायला हव्या होत्या. धावतधावत जाऊन डॉक्टरांना आणायला हवं होतं, प्रभाकरांना झटपट साहाय्य मिळायला हवं होतं-पण मी जागच्याजागी खिळल्यासारखी झाले होते.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eतो आवाज गुणगुणत होता, खोलीभर भिरभिरत होता. खोलीत काय होतं? ते कशाचा शोध घेत होतं? माणसाच्या मनात एवढा ताण सोसणं शक्य होतं का? माझं काय होणार आहे तेच मला कळेना.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eत्या आवाजाने माझ्यावर मोहिनी घातल्यासारखी माझी अवस्था झाली होती. त्या आवाजाचा मागोवा घेत मी एकदा खोलीच्या या कोपऱ्याकडे मग त्या कोपऱ्याकडे अशी पाहत होते-सरकत तो आवाज कॉटकडे आला, कॉटजवळून यायला लागला, अगदी प्रत्यक्ष प्रभाकरांच्या निश्चल शरीराजवळ यायला लागला. आणि थांबला. एकदम थांबला. खोलीत एकदम पसरलेली शांतता भयानक होती.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":46124395331842,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71t-N-OvW7L._SY466.jpg?v=1746255443"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/narayan-dharap.oembed?page=3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}