{"title":"Loknath Yashwant","description":"","products":[{"product_id":"saadat-hasan-manto-by-loknath-yashwant-सआदत-हसन-मंटो","title":"Saadat Hasan Manto By Loknath Yashwant (सआदत हसन मंटो)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003eसआदत हसन मंटो यांना दोनदा जीवन मिळालं-\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eएक मरणापूर्वी अन् दुसरं मरणानंतर.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eदुसऱ्या जीवनात त्यांची प्रसिद्धी भारत आणि पाकिस्थानच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण जगात पसरून गेली. त्यांनी या दुनियेला आपल्या सिगारेटमध्ये भरून जाळलं आणि चष्म्याच्या भिंगांमागून बघणाऱ्या डोळ्यांना नेहमीसाठी बंद करून घेतलं.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eत्यांच्या कथेतली पात्रं केवळ कपोलकल्पित नाहीत, तर ती या बहुढंगी दुनियेतली आणि समाजातली वास्तविक पात्रं असून ती आपल्या आजूबाजूला सतत जिवंत असल्याचा प्रत्यय आपणाला येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eलोकनाथ यशवंत यांना जाणण्यासाठी त्यांच्या कविता वाचणं आवश्यक आहे. त्यांच्या लिहिण्याची शैली सरळ आणि सोपी आहे. डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटनांना ते मोठ्या शिताफीने असं काही कवितेचं रूप देतात की, वाचकाला तो आपलाच आवाज असल्याचा भास होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eवरवर शांत दिसणाऱ्या या कवीच्या आत एक ज्वालामुखी सतत खदखदत आहे; जो अन्याय अत्याचार, अमानवीयता, भ्रष्टाचार, धोका, भेदभाव कायमचा मिटवू इच्छितो. त्याचं आतल्या आत स्मित हे एका कवीचं यश आहे, ज्याला या कुरूप समाजाने नाकारण्याची अक्षम्य चुक केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eसमाजाच्या कोड पडलेल्या काळ्या चेहऱ्यावर ते आपल्या लेखणीचा उपयोग कट्यारीसारखा इतक्या ताकदीने करतात, की सगळे अवाक् व हतबल होऊन जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003eनिदा फाजली, जयंत परमार, मन्सूर एजाज जोश, ओमप्रकाश बाल्मीकी, बाबुराव बागुल या महनीयांप्रमाणेच आता सआदत हसन मंटोही लोकनाथ यशवंतजींच्या मराठी अनुवादातून प्रगट होत आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Loknath Yashwant","offer_id":46183937507586,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/manto-800x800.jpg?v=1748686667"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/loknath-yashwant.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}