{"title":"Kamil Parakhe","description":"","products":[{"product_id":"savitribai-jotibanche-shikshak-michel-dampatya-aani-streeshikshanatil-poorvasuri-by-kamil-parakhe-सावित्रीबाई-जोतिबांचे-शिक्षक-मिचेल-दाम्पत्य-आणि-स्त्रीशिक्षणातील-पूर्वसुरी","title":"Savitribai Jotibanche Shikshak Michel Dampatya Aani Streeshikshanatil Poorvasuri By Kamil Parakhe (सावित्रीबाई जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्रीशिक्षणातील पूर्वसुरी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील आणि इतर कार्यामागे आतापर्यंत इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या अनेक व्यक्तींचा हातभार लागला होता. गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब ही त्यापैकी सुरुवातीची दोन नावे. कुठल्याही महान व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या काळात असलेली परिस्थिती, त्या काळातल्या घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास करावा लागतो. फुले दाम्पत्याच्या समकालीन व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास केला की त्या कालखंडातील परिस्थितीचे खरेखुरे आकलन होते. जोतिबांचे शिक्षक जेम्स मिचेल, सावित्रीबाईंना अध्यापनाचे प्रशिक्षण देणार्या सिंथिया फरार आणि मिसेस मिचेल, तसेच जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, मार्गारेट विल्सन आणि जॉन मरे मिचेल यांची नावे सावित्रीबाई आणि जोतिबांच्या विविध चरित्रांत विविध संदर्भांत येतात. मात्र, या व्यक्तींबाबत माहिती देणारे आणि त्याद्वारे फुले दाम्पत्याच्या जीवनावर नवा प्रकाश टाकणारे लिखाण आतापर्यंत झालेले नाही. कामिल पारखे यांच्या या पुस्तकामुळे ही कसर भरुन निघेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chetak Books","offers":[{"title":"Chetak Books \/ Kamil Parakhe \/ Marathi","offer_id":46784928153858,"sku":null,"price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51NpM1VwlrL._SY445_SX342_ControlCacheEqualizer.jpg?v=1758956293"},{"product_id":"churchbel-pola-san-chrismas-dance-aani-sorpotel-by-kamil-parakhe-चर्चबेल-पोळा-सण-ख्रिसमस-डान्स-आणि-सोरपोतेल","title":"Churchbel Pola San Chrismas Dance Aani Sorpotel By Kamil Parakhe  (चर्चबेल पोळा सण ख्रिसमस डान्स आणि सोरपोतेल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत देश बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्मियांचा असला तरी नेहमीच्या संपर्कातील लोकांच्या धर्मांविषयी आणि वेगळ्या संस्कृतीविषयी आपल्याला मुळी माहितीच नसते. त्यातही ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक रितीरीवाजांबाबत पूर्णतः अज्ञान असते. ख्रिस्ती व्यक्ती मराठी बोलू शकतो, लिहू शकतो याबाबत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत असतो ते यामुळेच. महाराष्ट्रातला आणि या देशातील विविध भागांतला ख्रिस्ती समाज या भूमितलाच आहे आणि या ख्रिश्चनांची संस्कृती या मातीतच रुजलेली आहे या वास्तवाची अनेकांना जाणीव नसते. महाराष्ट्र आणि गोव्यातील ख्रिस्ती लोकांच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अंतरंगांची या पुस्तकातून झलक दिसेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chetak Book's","offers":[{"title":"Chetak Books \/ Kamil Parakhe \/ Marathi","offer_id":46784944079106,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61uOmyGSQWL._SY466.jpg?v=1758956253"},{"product_id":"goa-aani-maharashtratil-patrakaritetalya-katha-by-kamil-parakhe-गोवा-आणि-महाराष्ट्रातील-पत्रकारितेतल्या-कथा","title":"Goa Aani Maharashtratil Patrakaritetalya Katha By Kamil Parakhe (गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदैनंदिन बातमींचा आणि स्पेशल स्टोरींचा रतीब घालण्याच्या कामातून इतर पानांसाठी, स्तंभासाठी किंवा पुरवणीसाठी लिहायला वेळ नाही अशी सबब अनेक बातमीदार सांगत असतात. पणजीला असताना मी मात्र नवहिंद टाइम्सच्या संपादकीय पानासाठी आणि रविवारच्या पुरवणीसाठीही लेख लिहायचो, त्याशिवाय आमचे जुळे भावंड असलेल्या ‘नवप्रभा’ या मराठी दैनिकासाठीही लिहायचो. हिच सवय मी पुढे ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’त, महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स’मध्ये चालू ठेवली. या अवांतर लिखाणाचा मला किती फायदा झाला हे आज असे मागे वळून पाहताना लक्षात येते. याचे कारण म्हणजे या वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतच माझ्या भावी इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची बीज होते, या लेखांतूनच माझ्या पुढील सर्व इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची निर्मिती झाली. या पुस्तकाच्या विविध प्रकरणांतून वर उल्लेख केलेल्या पत्रकारितेच्या वेगवेगळ्या अंगांची, विविध बिट्सची आणि कामकाजपद्धतीची झलक दिसेल. - कामिल पारखे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chetak Book's","offers":[{"title":"Chetak Book's \/ Kamil Parakhe \/ Marathi","offer_id":46804735394050,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81sUIn7cUcL._SY466.jpg?v=1759647331"},{"product_id":"goa-maharashtratil-patrakarita-by-kamil-parakhe-गोवा-महाराष्ट्रातील-पत्रकारिता","title":"Goa Maharashtratil Patrakarita By Kamil Parakhe (गोवा महाराष्ट्रातील पत्रकारिता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमाजाच्या सर्वच क्षेत्रांत पत्रकार वावरत असतात. प्रकाशझोतात असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींच्या संपर्कात बातमीदार येत असतात. यापैकी सर्वच व्यक्तींना आणि घडलेल्या प्रसंगांना दैनिकांच्या पानांवर जागा मिळत नाहीे. बातम्यांचा पाठलाग करत असताना पत्रकाराला अनेकदा बरेच काही मागे ठेवावे लागते. असेच हातचे राखून ठेवलेल्या घटनांना आणि व्यक्तींनाही मग कधीकाळी शब्दांमध्ये साकार करावे लागते. इंग्रजी दैनिकांत चार दशके काम केलेल्या कामिल पारखे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील आपले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. पूर्व युरोपात बल्गेरिया येथे पारखे यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बातमीदार आणि उपसंपादक म्हणून ‘द नवहिंद टाइम्स’ (पणजी, गोवा), ‘लोकमत टाइम्स’ (औरंगाबाद) आणि पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि सकाळ वृत्तसमूहाच्या ‘महाराष्ट्र हेराल्ड’-‘सकाळ टाइम्स’ या दैनिकांत त्यांनी काम केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chetak Book's","offers":[{"title":"Chetak Book's \/ Kamil Parakhe \/ Marathi","offer_id":46804735787266,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61HhVxd3AnL._SY466.jpg?v=1759647371"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/kamil-parakhe.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}