{"title":"Dr. Pramod Mundhate","description":"","products":[{"product_id":"samas-by-dr-pramod-mundhate-समास","title":"Samas By Dr. Pramod Mundhate (समास)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉ. अमर्त्य सेन यांनी भारतीयांचे वर्णन ‘वाद-संवादप्रिय’असे केले आहे. विविध\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरस्पर-विरोधी विचारप्रवाह आणि निकोप वादविवाद यासाठी महाराष्ट्राची भूमी\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्राचीन काळापासून अनुकूल राहिली आहे. मध्ययुगात उदयास आलेले विविध\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eउदारमतवादी भक्तिसंप्रदाय असोत की आधुनिक काळातील विवेकनिष्ठ\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रबोधनाच्या चळवळी असोत, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eउभे राहिलेले समाज परिवर्तनाचे लढे असोत की स्वातंत्र्यासाठी झालेले राष्ट्रीय\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआंदोलन असो, त्यासाठी वैचारिक रसद आणि ऊर्जा महाराष्ट्राने पुरवली आहे, हा\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअगदी अलीकडचा इतिहास आहे. मराठीतील प्राचीन आणि अर्वाचीन साहित्य हा\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्याचा पुरावा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतेराव्या शतकापासूनचे मराठीतील उदारमतवादाची शिकवण देणारे संतकाव्य,\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eविवेकनिष्ठेचे अधिष्ठान असलेले निबंध वाङ्मय, संवेदना आणि सौंदर्याचे दर्शन\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eघडवणारे गद्य-पद्य ललित साहित्य आणि तर्कशुद्ध-बुद्धिप्रामाण्यवादी मशागत\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eकरणारे वैचारिक साहित्य, हे त्या-त्या काळातील महाराष्ट्राच्या बदलत्या\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eविचारविश्वाचे दर्शन घडवणारे साहित्य आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘समास’ या ग्रंथात साहित्याच्या रूपाने गतकाळातील परिवर्तनाची परंपरा जशी\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eदिसते, तशी भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक अशी प्रेरणाही दिसते.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eवर्तमान मराठी जनमानस चैतन्यशील, सर्जनशील आणि कृतिशील व्हावे यासाठी\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमराठीतील मौलिक व प्रातिनिधिक साहित्याचे हे संपादन केले आहे. अनेक भारतीय\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eभाषांमध्ये राबवल्या जात असलेल्या ‘दक्षिणायन भारतीय विचारमाले’चा हा\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमराठी खंड आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Pramod Mundhate","offer_id":46686424236290,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_a60b804b-36e5-45e7-ad9d-d2dcec0ab9a6.jpg?v=1755759370"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-pramod-mundhate.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}