{"title":"Sourabh Wagle","description":"","products":[{"product_id":"detective-alpha-ani-korlelya-teen-akrutya-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-कोरलेल्या-तीन-आकृत्या","title":"Detective Alpha ani Korlelya Teen Akrutya By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि कोरलेल्या तीन आकृत्या)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअत्यंत गडबड आणि धावपळीच्या अशा त्या जानेवारी महिन्यात एक वयस्क वाटणारे गृहस्थ अल्फाच्या दारावर येऊन ठेपतात. त्यांचं म्हणणं आहे, की त्यांच्या वडिलोपार्जित, ब्रिटिशकालीन बंगल्यात एक गुप्त खजिना दडलेला असण्याची शक्यता आहे. अल्फाने तो खजिना शोधण्यात मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे. पण अल्फाच्या डोक्यावर इतर अनेक प्रकरणांचा भार असल्याने तो त्या गृहस्थाला मदत करण्यास नकार देतो. पण काही दिवसांनी अल्फापर्यंत खबर येऊन पोचते - त्या वयस्क गृहस्थाचा त्याच बंगल्यात रहस्यमयरित्या खून झाला आहे! आणि साहजिकच, अल्फासमोर त्या प्रकरणाचा शोध घेण्याखेरीज पर्याय उरत नाही. तो खून त्या खजिन्यासाठीच झाला आहे का? असेल तर बंगल्यातल्या खजिन्याबद्दल आणखी कुणाला कळलं होतं? आणि कसं? एकमेकांत गुंतलेले किष्ट पुरावे आणि घटना यांचं विश्लेषण करत असताना अल्फाच्या मनात आणखी एक प्रश्न सुरुवातीपासून आव्हान देत उभा आहे. तो म्हणजे, ते गृहस्थ ज्या खजिन्याबद्दल सांगत होते, तो खरोखरच अस्तित्वात आहे का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807558263042,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Detective_Alpha_ani_Korlelya_Teen_Akrutya_600x_a2ed8266-bed2-419a-b6b1-87a421d7361c.jpg?v=1737704063"},{"product_id":"detective-alpha-ani-madhyaratriche-sangeet-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-मध्यरात्रीचे-संगीत","title":"Detective Alpha ani Madhyaratriche Sangeet By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह ! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी ? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू ? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807567470850,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81m5-cG_cwL._SY425.jpg?v=1737788130"},{"product_id":"detective-alpha-ani-kagadi-pakshanche-gupit-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-कागदी-पक्षांचे-गुपित","title":"Detective Alpha ani Kagadi pakshanche Gupit By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि कागदी पक्षांचे गुपित)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउज्ज्वल मोहपात्रा - दक्षिण मुंबईतील आमदार दिलीप ससाणे यांच्या पक्षाचा ट्रेझरर. दादरमधील एका प्रशस्त बंगल्यात तो एकटाच राहतो. एके दिवशी सकाळी मोहपात्राच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास येतं, की तो त्याच्या घरातून अचानक नाहीसा झाला आहे. बंगल्यातील अस्ताव्यस्त सामान आणि फरशीवरील आणि रक्ताचे ओघळ यावरून कोणीतरी राजकीय शत्रुत्वातून मोहपात्रावर हल्ला केला आणि त्याला उचलून नेलं, असा पोलीस निष्कर्ष काढतात. पण प्रकरणाला चमत्कारिक वळण तेव्हा लागतं, जेव्हा त्याच दिवशी सकाळी मोहपात्राच्या नावाने आलेलं एक निनावी टपाल पोलिसांच्या हाती पडतं. त्यात असतो कागदाने बनवलेला एक पक्षी ! पुढच्या तपासात पोलिसांना मोहपात्राच्या घरात असेच आणखी कागदी पक्षी सापडतात. या पक्ष्यांचा मोहपात्राच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का? ते पक्षी मोहपात्राला कोण आणि का पाठवत होतं? त्यांच्यात कोणता अनाकलनीय असा अर्थ दडला आहे? जेव्हा अल्फा या प्रकरणाचा तपास सुरू करतो, तेव्हा वरवर साध्या दिसणाऱ्या या प्रकरणाचं जीवघेण्या साहसात रूपांतर होतं!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807578874114,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71cK12mWgKL._SY425.jpg?v=1737788146"},{"product_id":"detective-alpha-aani-morewadi-estate-madhil-rahasya-by-sourabh-wagle-author-डिटेक्टिव-अल्फा-आणि-मोरेवाडी-इस्टेट-मधील-रहस्य","title":"Detective Alpha aani Morewadi Estate Madhil Rahasya By  Sourabh Wagle (Author) | डिटेक्टिव अल्फा आणि मोरेवाडी इस्टेट मधील रहस्य","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'मोरेवाडी इस्टेट' म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला मोरेवाडी या खेडेगावाजवळील गोविंदराव मोरे या धनाढ्य सावकाराची दूरवर पसरलेली प्रॉपर्टी. या एकशे वीस एकर एवढ्या प्रचंड जागेत पसरलेल्या इस्टेटीत बंगला, गेस्टहाऊस, कित्येक लहानसहान घरं, बगिचे, फळबागा आणि बरंच काही आहे. या इस्टेटीवर आणि मोरेवाडी गावावर गोविंदराव मोरेंचं पिढीजात वर्चस्व आहे. अशा या मोरेवाडी इस्टेटीत झालेला खुनाचा सनसनाटी प्रयत्न आणि इस्टेटीतच दबा धरून बसलेला अज्ञात गुन्हेगार यांचा पर्दाफाश करण्यासाठी डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांना पाचारण करण्यात आलंय. या सगळ्याचा शोध घेत असताना अनेक रहस्यमय घटनांची मालिका तिथे घडत जाते आणि मोरेवाडी इस्टेटीचं गूढ आणखीनच गडद होत जातं. नक्की वाचा : डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'मोरेवाडी इस्टेट' मधील रहस्य\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46080771424514,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81TIw2IxCeL._SY425.jpg?v=1744700109"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/detective-alpha-aani-morewadi-estate-madhil-rahasya-by-sourabh-wagle-author.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}